सध्या काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रेचे नियोजन केले आहे. ३५०० कि.मी.ची ही यात्रा होणार आहे. खरे तर काँग्रेसने हा निर्णय अगोदरच घ्यायला हवा होता. पण काँग्रेसमुक्त भारत धार्जिन्या लोकांनी काँग्रेस पक्षाला निरनिराळ्या समस्यांमध्ये गुंतवून ठेवले. सर्वांत मोठी समस्या त्यांच्या मते काँग्रेस पक्षाची घराणेशाही आहे, ती संपली की देशाची अर्थव्यवस्था सुधारणार, गरीबी नष्ट होणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार! म्हणून राहुल आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेसमधील आपला घराणा बाजुला सारावा. एकदा हे घराणे संपले की काँग्रेसची जवळपास १०० वर्षांची परंपरा समाप्त होईल. तसे झाले की भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आपल्या परीने संपादित करता येईल. काँग्रेस पक्षात जे काँग्रेस अध्यक्ष झाले असते त्यांना अलाहिदा काढून टाकले, जेणेकरून घराणेशाहीचा प्रोपगंडा सर्रास अविरत चालू राहावा.
राहुल आणि सोनिया गांधी यांची ही चूक की त्यांनी कधीही उघडपणे कोणती भूमिका घेतली नाही. सोनिया गांधी आजारी आहेत. राहुल गांधी २४x७ राजकारणात व्यस्त राहत नाहीत. ते कार्य करता करता कुठे निघून जातात हे कुणालाही कळायला मार्ग नाही. कोणता आजार जडला की काय? उपचारासाठी परदेशी दौरा काढतात की काय कोणताही अंदाच लावता येत नाही.
ज्या संस्कारींना काँग्रेस तोडायची होती ते लोक काँग्रेसच्या अभियानामुळे हवालदिल झाले आहेत. त्यांना तर काँग्रेस तोडायची होती. काँग्रेसने भारत जोडोची मोहीम चालवली तर परिणामी काँग्रेस सक्षम होईल, म्हणून ते 'संस्कारी' आता काँग्रेस पक्षाला भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो मोहीम चालवण्याचा सल्ला देत आहेत. कारण ज्यांनी भारत तोडोची मोहीम हाती घेतली त्यांना यापासून धोका निर्माण होऊ नये. आणि कमाल अशी की जे स्वतः आत राहून काँग्रेस तोडायचा प्रयत्न करत राहिले ते च लोक एकानंतर एक काँग्रेस तोडून बाहेर पडले. पण काँग्रेस पक्षाच्या या मोहिमेने त्यांची झोप उडवली. ५०-६० मोठे नेते ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस सत्तेत असताना कोट्यवधींची मालमत्ता जमवली, सत्तेच्या इतर स्रोतांचा शोध घेत आहेत. त्यांना आता पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेशाची संधी मिळणार नाही. आज ना उद्या काँग्रेस सत्तेत येणारच आहे. भाजप जवळपास ७०-७५ वर्षे सत्तेपासून बाहेर असताना त्या पक्षाच्या निष्ठावंतांनि पक्ष सोडण्याचा कधी विचारही केला नाही. कारण कोणतेही असो, आणि म्हणून त्यांची सत्ता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांना सुद् अधिकार आहे सत्तेत राहण्याचा. मग ते कुणाला आवडो की ना अवडो.
उशिरा का होईना काँग्रेसने शेवटी जनसंपर्काची मोहीम हाती घेतली आहे. उशीर यासाठी की संस्कारी लोकांनी काँग्रेस पक्षाला आरोपांमध्ये जखडून टाकले होते. पक्ष संभ्रमावस्थेत होता. शेवटी ईडीला तोंड द्यावे लागले. जगात कोणतेही सत्तापालट कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या जनांदोलनाशिवाय साकार झालेले नाही. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुपात महात्मा गांधी यांनी दांडी मार्चपासून केली होती, हा इतिहास आहे. बरे झाले काँग्रेस पक्षाने हा उपक्रम हाती घेतला आहे. काहीच साध्य झाले नाही तर देशाची एकतर्फी हवेची दिशा तर बदलेल. बदल सृष्टीचा नियम आहे. सत्ता कोणाचीही असू दे, ती एके दिवशी बदलणारच हे नक्की!
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment