भारतात पदयात्रांनी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या भूमिका बजावलेल्या आहेत. महात्मा गांधींच्या दोन यात्रांनी संपूर्ण भारतीय समाजाला बदलून टाकले होते. दांडियात्रा ब्रिटिश शासनाविरूद्ध संघर्षाचा एक महत्वपूर्ण अध्याय होती. या यात्रेने स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या भारतीयांच्या निश्चयाला अधिक मजबूत केले होते. सामाजिक सुधार घडविण्यामध्ये आणि इंग्रजांच्या शासनाला उखडून फेकण्याच्या इच्छेला बळ दिले होते. त्यावेळेसही जातीयवादी संघटना या यात्रेपासून लांब होत्या यात आश्चर्य ते काय होते. या यात्रेचे आयोजन सुद्धा अशा पद्धतीनेच केले गेले होते की, देशाचे सर्व नागरिक धर्म आणि जातीच्या चौकटीबाहेर जाऊन आपली ओळख भारतीय म्हणून पक्की करतील.
भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते कश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार असून, या दरम्यान 3 हजार 500 किलोमीटरचा अंतर कापला जाणार आहे. हा एक राजकीय उपक्रम आहे. परंतु, यात जवळ-जवळ 200 सामाजिक कार्यकर्ते असे सामील होणार आहेत ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी समस्त सामाजिक संस्थांना अशी विनंती केेलेली आहे की, त्यांना या यात्रेमध्ये सहभागी व्हावे. त्यांनी केलेल्या अपीलमध्ये या यात्रेची आवश्यकता आणि महत्त्व स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या अनुसार
1. यापूर्वी कधीही आपल्या देशाच्या गणतांत्रिक मुल्यांवर एवढा गंभीर हल्ला कधीही झाला नव्हता जेवढा मागील काही काळापासून होत आहे.
2. यापूर्वी कधीच एवढी घृणा, विघटन आणि बहिष्कराची भावना देशात एवढी पसरलेली नव्हती जेवढी अलिकडे पसरलेली आहे.
3. यापूर्वी कधीही आमच्यावर अशा प्रकारे नजर ठेवण्यात आलेली नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचाराचा आम्हाला सामना करावा लागला नाही जेवढा आता करावा लागत आहे.
4. यापूर्वी कधीही आम्ही एवढे निष्ठूर सरकार पाहिलेले नाही ज्याला देशाच्या बुडत्या अर्थव्यवस्थेची जरासुद्धा चिंता नाही व जी फक्त आपल्या चमच्यांच्याच सेवेमध्ये लागलेली आहे.
5. यापूर्वी कधीही खरा राष्ट्र निर्मात्या, शेतकरी, कामगार, दलित आणि आदिवासींना राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेतून असे बाहेर काढण्यात आलेले नव्हते जसे आता काढण्यात आले आहे.
6. देशाच्या सध्याच्या निराशाजनक वातावरणाचे अत्यंत सटिक असे वर्णन योगेंद्र यादव यांनी जारी केले आहे. भाजपा जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात पहिल्यांदा सत्तेत आली होती त्यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना असे वाटत होते की, काँग्रेस आणि भाजपा एका श्निक्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, लवकरच त्यांच्या लक्षात आले की भाजपा सर्वस्व वेगळी आहे. ज्या काळात भाजपाला स्वबळावर बहुमत मिळालेले नव्हते आणि ती एनडीएचे नेतृत्व करत होती तेव्हासुद्धा ती इतर पक्षांपेक्षा वेगळी होती. तेव्हाही ते संघ परिवाराचे सदस्य या नात्याने हिंदुत्वाच्या अजेंड्याविषयी कटिबद्ध होते. ते भारतीय राष्ट्रवादाच्या तुलनेत हिंदुराष्ट्रवादाचे समर्थक होते. त्या काळातही त्यांनी शिक्षणाचे भगवेकरण केले होते आणि आरएसएसच्या शाखांमध्ये तेव्हाही जबरदस्त वाढ झाली होती.
भाजपाची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अल्पसंख्यांक विरोधी वर्तणूक सर्वांच्या समोर तेव्हाही होती. मुसलमानां व्यतिरिक्त ख्रिश्चनांच्या विरूद्धही तेव्हा हिंसक घटना झाल्या होत्या. सन 1999 मध्ये ख्रिश्चन धर्मगुरू ग्राहम स्टेन्स यांना बजरंग दलच्या दारासिंह याने जीवंत जाळले होते. या भयानक कृत्याचा उद्देश त्या लोकांना धमकावण्याचा होता जे लोकशाही मुल्यांचे पक्षधर होते. तेव्हाही कार्पोरेट से्नटरचे अच्छे दिन आले होते आणि मीडिया संस्थांनांची खरेदी विक्री सुरू झाली होती. तेव्हा गुजरातच्या नरसंहाराने जातीय हिंसा आणि अमानवीय क्रुरतेचे नवीन उदाहरण प्रस्थापित केले होते.
2014 मध्ये जेव्हा भाजप आपल्या बळावर सत्तेत आली तेव्हापासून एनडीएची भूमीका नाममात्र राहिलेली आहे. भाजप आणि आरएसएसने तेव्हापासून पूर्ण उत्साहाने आपला अजेंडा लागू करण्यास सुरूवात केली आहे. लोकशाहीला टिकवून ठेवण्यासाठी ज्या संस्थांची निर्मिती केली गेली होती त्यांना कमकुवत करण्याचे काम करण्यात आलेले आहे. आरएसएस आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या संस्थांनी मोठ्या हुशारीने दलित, आदिवासीच नव्हे तर अल्पसंख्यांकांमधील एका छोट्या गटाला का होईना आपल्या झेंड्याखाली आणण्यामध्ये यश प्राप्त केलेली आहे. वर्तमान राजकीय परिदृश्य गरीब आणि धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी अत्यंत भीतीदायक आहे. भारताच्या संवैधानिक मुल्य आणि विशेषकरून बंधुत्वाच्या भावनेला बाजूला सारण्यात आलेले आहे. एक चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध सामाजिक समूह लोकशाही मुल्यांच्या पुनर्स्थापणे आणि समाजापासून बाजूला केलेल्या गटांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्यासाठी जमीन तयार करण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. म्हणूनच कदाचित अनेक सामाजिक समूह भारत जोडो यात्रेशी एकरूप होऊ इच्छितात. या यात्रेचा उद्देश बंधुत्वामध्ये वाढ करणे आणि सामान्य माणसाच्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणीकडे समाजाचे ध्यान आकर्षित करणे आहे. शिवाय, आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे आणि समाजाच्या एका मोठ्या भागाचे नागरी अधिकार फक्त कागदावरच शिल्लक आहेत. बिलकीस बानू प्रकरणामुळे लक्षात येते की समाजाची सामुहिक विचारसरणी किती बदललेली आहे.
बलात्काऱ्यांना आणि खुन्यांना तुरूंगातून मुक्त केले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे स्वागत फुलांचे हार घालून करण्यात येत आहे. दुसरीकडे कमकुवत आणि दबलेल्या समाज गटासाठी संघर्ष करणारे उमर खालीद सारखे लोक तुरूंगात डांबण्यात आलेले आहेत. त्यातल्या त्यात ही अत्यंत संतोषाची बाब आहे की, तिस्ता सेटलवाड यांना जामीन मिळालेला आहे. भारतात पदयात्रांनी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या भूमिका बजावलेल्या आहेत. महात्मा गांधींच्या दोन यात्रांनी संपूर्ण भारतीय समाजाला बदलून टाकले होते. दांडियात्रा ब्रिटिश शासनाविरूद्ध संघर्षाचा एक महत्वपूर्ण अध्याय होती. या यात्रेने स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या भारतीयांच्या निश्चयाला अधिक मजबूत केले होते. सामाजिक सुधार घडविण्यामध्ये आणि इंग्रजांच्या शासनाला उखडून फेकण्याच्या इच्छेला बळ दिले होते. त्यावेळेसही जातीयवादी संघटना या यात्रेपासून लांब होत्या यात आश्चर्य ते काय होते. या यात्रेचे आयोजन सुद्धा अशा पद्धतीनेच केले गेले होते की, देशाचे सर्व नागरिक धर्म आणि जातीच्या चौकटीबाहेर जाऊन आपली ओळख भारतीय म्हणून पक्की करतील.
डॉ. आंबेडकर यांच्या महाडच्या चवदार तळ्याचे आणि काळाराम मंदीर आंदोलनांचा उद्देश सामाजिक न्यायाची स्थापना होती. यानंतर महात्मा गांधींनी जातीप्रथा आणि अस्प्रश्यतेच्या विरूद्धही संघर्ष केला होता. ते याबाबतीत एवढे गंभीर होते की, त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरूद्ध 1933 नंतर अनेक पदयात्रा काढल्या. ज्याचा उद्देश वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यतेची प्रथांचे निर्मुलन होते. त्या यात्रांमुळे भारताला एक करण्यामध्ये मदत मिळाली होती.
याशिवाय, जगनमोहन रेड्डी यांनी निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी, एनटीआरने सत्ता मिळविण्यासाठी आणि चंद्रशेखर यांनी प्रामुख्याने भारताला एक करण्यासाठी पदयात्रा काढली होती. परंतु, ज्या यात्रेने देशाला सर्वात जास्त विभाजित केले होते ती यात्रा लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली ती रथयात्रा होती. ही यात्रा व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी लागू केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली होती. आडवाणींच्या यात्रेचा उद्देश एकच होता धार्मिक आधारावर समाजाचे विभाजन करावे. परिणामी, या यात्रेमुळे जातीय हिंसेमध्ये वाढ झाली आणि शेवटी बाबरी मस्जिदला पाडण्यात आले.
मागच्या आठ वर्षात या विघटनकारी राजकारणाचा प्रभाव एवढ्या तीव्रतेने वाढला आहे की, देशाच्या एकता आणि बंधुत्वाच्या भावनेवर गंभीर नकारात्मक परिणाम झालेला आहे. जरी भारत जोडो यात्रा एका राजकीय पक्षाद्वारा काढली जात असली तरी राष्ट्रीय एकात्मतेच्या व्यापक लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी इतर सामाजिक संस्थाही त्याचसोबत जोडल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर अशा संघटनाही या यात्रेचे समर्थन करीत आहेत ज्यांचे काँग्रेस पक्षाशी अनेक मुद्यांवर राजकीय मतभेद आहेत. त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे की, जातीय राजकारण आणि त्याचे देशावर होणारे वाईट परिणाम यांना तोंड देणे आवश्यक आहे.
मला आशा आहे भाजपाशिवाय इतर पक्ष प्रादेशिक पक्ष, सामाजिक कार्यकर्ते व संघटना ज्या स्वातंत्र्य संग्रामातून मिळविलेल्या आइडिया ऑफ इंडियामध्ये विश्वास ठेवतात आणि भारतीय मुल्यांमध्ये विश्वास ठेवतात, जी मूल्य आमच्या राज्यघटनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या पक्ष संघटनांनी वेळेचे महत्व ओळखून गांधी, नेहरू, पटेल आझाद, सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारताला नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी पुढे यावे.
- राम पुनियानी
(मूळ इंग्रजी लेखाचा हिंदी अनुवाद अमरिश हरदेनिया यांनी तर हिंदीतून मराठीत एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केला आहे.)
Post a Comment