(४७) यूसुफ (अ.) यांनी सांगितले, ‘‘सात वर्षांपर्यंत तुम्ही निरंतर शेतीवाडी करीत राहाल. या दरम्यान जी पिके तुम्ही कापाल त्याच्यापासून फक्त थोडासा हिस्सा, जो तुमच्या अन्नासाठी उपयोगी पडेल काढा आणि उरलेला त्याच्या कणसांतच राहू द्या.
(४८) नंतर सात वर्षे अत्यंत बिकट येतील, त्या काळात ते सर्व धान्य खाल्ले जाईल जे तुम्ही त्या काळासाठी साठवाल. जर काही उरेल तर केवळ तेच जे तुम्ही सुरक्षित ठेवले असेल.
(४९) त्यानंतर मग एक वर्ष असे येईल की ज्यात पाऊसरूपी कृपेने लोकांची याचनापूर्ती केली जाईल आणि ते रस गाळतील.’’४१
(५०) बादशाहने सांगितले, ‘‘त्याला माझ्याजवळ आणा, पण जेव्हा राजाचा दूत यूसुफ (अ.) जवळ पोहोचला तेव्हा तो म्हणाला,४२ ‘‘आपल्या राजाकडे परत जा आणि त्याला विचार की त्या स्त्रियांचा काय मामला आहे ज्यांनी आपले हात कापून घेतले होते? माझा पालनकर्ता तर त्यांचा कुटीलपणा चांगल्याप्रकारे जाणून आहे.’’४३
(५१) यावर बादशाहने त्या स्त्रियांकडे पृच्छा केली,४४ ‘‘तुमचा काय अनुभव आहे त्या वेळचा जेव्हा तुम्ही यूसुफ (अ.) ला मोहित करण्याचा प्रयत्न केला होता?’’....
४१) अरबीमध्ये शब्द `यासिरून' आला आहे. त्याचा अर्थ `पिळणे' असा होतो. याने अभिप्रेत `हिरवळ' आणि `संपन्नते'च्या त्या स्थितीचा उल्लेख आहे. दुष्काळानंतर संपन्नतेची वर्षा आणि नील नदीच्या पुरामुळे होणार होती. जेव्हा जमीन सिंचित होते तेव्हा तेलबिया आणि रसदार फळांचे विक्रमी उत्पन्न होते. जनावरे चाऱ्याच्या विपुल उपलब्धतेमुळे दूध जास्त देऊ लागतात. यूसुफ (स.) यांनी या अर्थाने बादशाहच्या स्वप्नाचे फळ दाखविले असे नाही तर खुशहालीच्या प्रारंभी सात वर्षांत येणाऱ्या दुष्काळासाठी कोणत्या नीतीचा स्वीकार करावा. तसेच धान्यसाठा सुरक्षित ठेवण्याचा कोणता प्रबंध केला जावा हेसुद्धा सांगितले. यूसुफ (अ.) यांनी दुष्काळानंतर चांगले दिवस येण्याची शुभसूचना दिली. याचा उल्लेख बादशाहाच्या स्वप्नात नव्हता.
४२) येथून तर बादशाहाच्या भेटीपर्यंत कुरआनने वर्णन केले आहे, हा या घटनेचा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. याचा कोणताच उल्लेख बायबल आणि तलमूदमध्ये आलेला नाही. बायबलचे वर्णन आहे की बादशाहाच्या सांगण्यावरून पैगंबर यूसुफ (अ.) त्वरित निघाले, हजामत केली, कपडे बदलले आणि दरबारात हजर झाले. तलमूद या घटनेला विक्षिप्त् पद्धतीने नमूद करतो (यानुसार जेव्हा यूसुफ (अ.) दरबारात पोहचले) तेव्हा तेथील चमकधमक पाहून आश्चर्यचकीत झाले. ते खाली जनसामान्यात उभे राहिले आणि जमिनीवर झुवूâन सलामी दिली. येथे बनीइस्राईलींनी आपल्या महान पैगंबराला हीनतेचा दर्जा दिला. याला दृष्टीत ठेवून कुरआनच्या वर्णनाकडे पाहा. कुरआन यूसुफ (अ.) यांचे कैदेतून बाहेर पडणे आणि बादशाहाशी भेटण्याची घटना मोठ्या शानदार पद्धतीने करतो. आता हा निर्णय करणे बुद्धीसंगत माणसाचे काम आहे की या दोन्ही वर्णनांपैकी कोणते वर्णन पैगंबरप्रतिष्ठेला शोभून दिसते.
४३) म्हणजे माझ्या स्वामीला मी निरपराध आहे याचे ज्ञान आहे. परंतु तुमच्या स्वामीने माझ्या सुटकेपूर्वी मी निरपराध आहे किंवा नाही याची चौकशी केली पाहिजे. कारण शंकास्पदरित्या जगासमोर मी जाऊ शकत नाही. माझी सुटका करायची असेल तर जगासमोर मी निर्दोष होतो हे सिद्ध झाले पाहिजे. खरे तर तुमच्या राज्याचे शासक आणि कर्मचारीच दोषी होते. ज्यांनी त्यांच्या पत्नींच्या चारित्र्यहीनतेची शिक्षा माझ्या पावित्र्याला दिली.
या मागणीला पैगंबर यूसुफ (अ.) ज्या शब्दांत ठेवतात त्यावरून स्पष्ट होते की इजिप्त्चा बादशाह पूर्वीपासून या घटनेशी परिचित होता. ती ही प्रसिद्ध घटना होती. अजीजच्या पत्नीद्वारा दिलेल्या मेजवानीप्रसंगी घडली होती. (स्त्रियांनी आपले बोट कापून घेणे) येथे त्या प्रसिद्ध घटनेकडे संकेत करणे पर्याप्त् आहे. हे त्यांच्या सदाचारी आणि पावित्र्याचे एक प्रमाण आहे. अजीजची स्त्री यूसुफ (अ.) यांच्याशी कितीही वाईट प्रकारे वागली तरी तिच्या पतीचे उपकार यूसुफ (अ.) यांच्यावर होते. म्हणून त्याच्या प्रतिष्ठेवर यूसुफ (अ.) यांनी आघात केला नाही.
४४) संभवत: शाही महालात त्या सर्व स्त्रियांना एकत्रित करून साक्ष घेतली असेल िंकवा बादशाहने विश्वासु माणसाला त्या सर्वांकडे पाठवून विचारणा केली असेल.
Post a Comment