असे का होते?
प्रत्येक माणसाची स्वतःबद्दल एक कल्पना असते. मी असा आणि असाच आहे. स्वतःला प्रत्येकजण चांगलाच समजत असतो. मग कोणी आपल्याबद्दल नकारात्मक बोलले तर ते आपल्याला मान्य होत नाही. कारण आपण आपल्याबद्दल जी सकारात्मक चौकट बनविलेली असते त्याच्या बाहेर बोललेलं आपल्याला पटत नाही. मग सुरू होतो विचारांचा पूर. त्यांनी असं बोलायला नको होतं! ती अशी का बोलली? मी का असा आहे का? माझ्याबद्दल असे विचार त्यांचे कसे काय होऊ शकतात? असे एक ना अनेक प्रश्न मनात निर्माण होतात आणि आपल्या डोक्यात ट्राफिक जाम करून ठेवतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की, समोरच्या व्यक्तीला माफ करायचे की नाही? मी का माफ करू? मी काय चूक केली होती? माझ्यासोबत इतकं वाईट केलंय तरी मी माफ करावे का? मग बोलणं बंद, भेटणं बंद, समोरच्या व्यक्तीचं नाव जरी काढलं तर त्रास होतो पण हे सगळं बरोबर आहे का?
पती-पत्नी, कुटुंबाचे सदस्य, सहकारी किंवा मित्रांसोबत लांब काळापासून चाललेला राग, संघर्ष हा शारीरिक स्वास्थ्याला प्रभावित करतो.
जॉन हाफकिन हॉस्पिटलमध्ये मूड डिसऑर्डर अडल्ट कन्सलटेशन्निलनिकचे डॉ. केरेन स्वॉरट्झ (एम.डी.) म्हणतात की, ’’ जखम होणे, निराशा व राग येणे हे एकसारखेच असते. हे शरीराला एक मोठ्या ओझ्यासारखे असते. माणसाला फाईट मोडमध्ये घालते. जेणेकरून शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. पण यात एक चांगली बाब ही की, अभ्यासाअंती असे माहित झाले आहेकी, क्षमा केल्याने आरोग्याला खूप चांगला पुरस्कार प्राप्त होतो. जेणेकरून हृदयाचा आजार होत नाही. कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. हृदय घाताचा धोकाही कमी होतो, मधुमेह होण्याची शक्यताही कमी होते, अनिद्रेचे संकट टळते. मग कोणी सॉरी म्हणते तर काय करायचे? सॉरी म्हणणारा व्यक्ती चांगला असतो कारण त्याला आपण चुकलो याची जाणीव होते. तो महानही असतो. कारण त्याने आपला इगो बाजूला ठेवण तुम्हाला स्वॉरी म्हटलेले असते. मग जेव्हाही कोणी आपली चूक मान्य करून सॉरी म्हणत असेल तर त्याला माफ करा. कारण दूसरा पर्यायच नाही. माफ केल्याने तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होतील. सर्वप्रथम तुमच्य चेहऱ्यावर स्मित हास्य फुले, हालकं वाटेल व आपण आपल्या जीवनात महत्त्वाचा व्यक्ती गमावणार नाही, याची स्वतःलाच खात्री मिळेल. खूप काळापासून साठवून ठेवलेला राग आपल्याला हळूहळू मधुमेह आणि हृदयरोगाकडे घेऊन जातो. मूड स्वींग्ज् होतात. विनाकारण उदासीनता राग व अनिद्रा होऊ शकते. म्हणून माफ करण्याची चांगली सवय लावून घेतल्यास बरे. ती माफीही वरून नाही तर मनातून माफ करा.
आज आपण समाजात घटस्फोटाच्या जेवढ्या घटना बघतो ’त्यात माफ न करणे’, हे एक मोठे कारण आहे. पती किंवा पत्नी एकमेकांच्या लहान सहान चुका माफ करत नाहीत. केले म्हणूनही माफ करत नाहीत. आई- वडिल मुलांच्या चुका माफ करायला तयार नाहीत. सासू सासरे सुनेच्या चुका माफ करायला तयार नाहीत. परिणाम स्वरूप भांडणे होतात आणि आपली सामाजिक व्यवस्था सुरळीत चालत नाही. माफ करण्याचे आदेश कुरआन व हदीसमध्येही आहेत. सुरे आले इमरान आयत नं. 159 मध्ये म्हटलेले आहे की, हे पैगंबर (स.), ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी शीघ्रकोपी स्वभावी व निष्ठूर असता तर हे सर्वजण तुमच्यापासून विभक्त -(उर्वरित आतील पान 2वर)
झाले असते. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्म-कार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा, मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात. (3:159)
आम्ही जमीन आणि आकाशांना आणि त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांना सत्याशिवाय इतर कोणत्याही आधारावर निर्माण केले नाही. आणि निर्णयाची घटका निश्चितच येणार आहे, मग हे पैगंबर (स.)! तुम्ही (या लोकांच्या अशिष्टतेवर) सभ्यतेने दुर्लक्ष करीत रहा. (सुरे अलहिज्र 15 : आयत नं. 85)
याशिवाय, हदीसमध्येही आपल्यालाल क्षमा करण्याच्या महत्त्वावर एक पूर्ण चॅप्टर आढळून येतो. एक दुआ जी मला खूप आवडते. तिचे रमजानच्या शब-ए-कद्र मध्ये जास्तीत जास्त पठण करण्याचे आदेश आहेत. ती खालीलप्रमाणे, हे अल्लाह ! तू साक्षात क्षमा आहेस, तू क्षमा करणाऱ्यांना पसंत करतोस,मला क्षमा कर. दुसऱ्या एका हदीसचा अर्थ असा आहे की, प्रत्येक माणूस गुन्हेगार आहे. पण सर्वात चांगला गुन्हेगार तो आहे जो सर्वात लवकर क्षमा मागतो. आणखीन एका हदीसचा अर्थ आहे की, तुम्ही लोकांना माफ करत जा, जर तुम्हाला हे पसंत असेल की, अल्लाहनी तुम्हाला माफ करावे.
सैतान मानवाच्या मनात नकारात्मक विचार टाकत असतो. त्याचे सर्वात प्रिय काम पती, पत्नींमध्ये भांडण लावणे आहे. माणसात आपआपसात भांडण लावणे हे सैतानला प्रिय आहे. जेव्हा नकारात्मक विचार मनात येतात तेव्हा आऊजुबिल्लाही मिनशैतॉनी रजीमचे पठण करावे. त्यामुळे नकारात्मक विचारांवर विजय प्राप्त करता येतो. जीवन हे क्षणभंगूर आहे म्हणून ते आनंदाने व्यतीत करायचे असेल तर आपणाला एकमेकांना माफ करावे लागेल. काहीजण स्वतःलाही माफ करत नाहीत आणि आत्महत्या करून घेतात. अल्लाहचा आदेश आहे की, तो आपल्या भक्तांचे गुन्हे जे समुद्राच्या पाण्याच्या फेसाएवढे प्रचंड जरी असले तरी तो माफ करतो. मग माझी आणि तुमची काय बिसात. अल्लाह, एकमेका व्यक्तीला माफ करण्याची सद्बुद्धी देओ. आमीन.
- डॉ. सिमीन शहापुरे
8788327935
Post a Comment