त्याच्यात दुष्टाईचा लेशमात्रदेखील आढळला नाही.’’ अजीजची पत्नी उद्गारली, ‘‘आता सत्य उघड झाले आहे. ती मीच होते जिने त्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला होता, नि:संशय तो अगदी खरा आहे.’’४५
(५२) (यूसुफ (अ.) ने सांगितले,)४६ ‘‘यापासून माझा हेतू असा होता की (अजीज) ला हे ज्ञात व्हावे की मी पडद्याआड त्याच्याशी विश्वासघात केला नव्हता आणि असे की जे विश्वासघात करतात त्यांच्या कारस्थानांना अल्लाह सफलतेच्या मार्गावर नेत नाही.
(५३) मी आपल्या मनोवासनेपासून मुक्त नाही, मनोवासना तर वाईटाकडे प्रवृत्त करीतच असते, याखेरीज की ज्याच्यावर माझ्या पालनकत्र्याची कृपा होते. नि:संशय माझा पालनकर्ता अत्यंत क्षमाशील व परम कृपाळू आहे.’’
(५४) बादशाहने सांगितले, ‘‘त्यांना माझ्याजवळ आणा की जेणेकरून मी त्यांना माझ्या खास सेवेत ठेवीन’’ जेव्हा यूसुफ (अ.) ने त्याच्याशी बोलणी केली तेव्हा तो म्हणाला ‘‘आता आपण आमच्याकडे प्रतिष्ठित व उच्चस्थान राखता आणि आपल्या अमानतीवर पूर्ण विश्वास आहे.’’४७
(५५) यूसुफ (अ.) ने सांगितले, ‘‘देशाचे खजिने माझ्या स्वाधीन करा. मी रक्षण करणाराही आहे आणि मला ज्ञानही आहे.’’४७अ
४५) अनुमान केला जाऊ शकतो की या साक्षींनी आठ-नऊ वर्षापूर्वीच्या घटनेला कसे स्मरण केले असेल. पैगंबर यूसुफ (अ.) यांचे व्यक्तित्व कैदकाळानंतर उंचावले. तसेच इजिप्त्च्या उच्च्वर्गात, मध्यमवर्गात आणि सामान्यजनात पैगंबर यूसुफ (अ.) यांच्याविषयीचा आदरभाव आणि नैतिक निष्ठा स्थापित झाली असेल. यानंतर आश्र्चयकारकपणे नव्हे तर स्वाभाविकपणे घडले की पैगंबर यूसुफ (अ.) यांनी बादशाहच्या भेटीच्या वेळी बेधडक त्या भूभागातील खजाने सुपूर्द करण्याची मागणी केली आणि बादशाहाने ती मागणी नि:संकोच मान्य करून धरतीचे राज्य त्यांना बहाल केले.
४६) हे पैगंबर यूसुफ (अ.) यानी तेव्हा सांगितले असेल जेव्हा तुरूंगामध्ये त्यांना चौकशीविषयी सांगितले गेले असेल. काही भाष्यकार या वाक्याला पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या कथनाचा नव्हे तर अजीजच्या पत्नीच्या कथनाचा भाग मानतात. त्यांच्या मते हे वाक्य अजीजच्या पत्नीच्या कथनानंतर त्वरित आले आहे. मध्ये काही संकेत असा नाही ज्यावरून `तो नि:संदेह सच्चा आहे' यावर अजीजच्या पत्नीचे कथन समाप्त् झाले आणि नंतरचे वाक्य यूसुफ (अ.) यांचे आहे. परंतु ही वर्णनशैली स्वत: एक मोठा संकेत आहे. पहिले वाक्य हे तर अजीजच्या पत्नीचे आहे. परंतु काय दुसरे वाक्यसुद्धा तसेच वाटते? येथे तर वर्णनशैली स्पष्ट सांगत आहे की याचे सांगणारे पैगंबर यूसुफ (अ.) आहेत, अजीजची पत्नी नाही. या वाणीत जी विशालहृदयता, विनम्रता, नैतिकता आणि ईशपरायणता बोलत आहे, हे सर्व याचे प्रमाण आहे की हे वाक्ये तोंडातून मुळीच निघाले नाही ज्या तोंडाने `ये-जा' म्हटले होते.
४७) हा बादशाहकडून स्पष्ट संकेत आहे की यूसुफ (अ.) यांना कोणतेही जबाबदारीचे पद दिले जाऊ शकते.
४७अ) या अगोदर जे काही स्पष्टीकरण आले त्याच्या प्रकाशात पाहिले तर कळते की हा काही नोकरीचा अर्ज नव्हता. परंतु हा अंतिम प्रहार होता ते क्रांतिद्वार उघडण्यासाठी जे यूसुफ (अ.) यांच्या नैतिक शक्तीने मागील दहा बारा वर्षात उन्नत झाला होता. पैगंबर यूसुफ (अ.) कसोटीच्या दीर्घ काळातून आले होते. या कसोटींमध्ये त्यानी सिद्ध केले की अमानत, सच्चाई, ज्ञान, आत्मनियंत्रण, विशालहृदयता आणि विवेकशीलतेत ते अद्वितीय आहेत. ते रक्षणकर्ता आणि जाणणारा असणे हा केवळ दावा नव्हता तर प्रमाणित घटना होती. यावर आम जनता व राजा या सर्वांचा विश्वास होता. आता काही कसर शिल्लक होती ती ही की यूसुफ (अ.) यांनी शासनाधिकार आपल्या हातात घ्यावा कारण बादशाह आणि अधिकारीगण जाणून होता की शासनाधिकारासाठी यूसुफ (अ.) यांच्यापेक्षा उचित व्यक्ति दुसरा कोणीही नाही. या उणिवेला त्यांनी आपल्या या वाक्याने पूर्ण केले. त्यांच्या तोंडातून ही मागणी बाहेर पडताच बादशाह आणि त्याच्या दरबारी लोकांनी मनापासून तिचा स्वीकार केला.
हे अधिकार जे यूसुफ (अ.) यांनी मागितले आणि त्यांना ते बहाल करण्यात आले तर त्याचे स्वरुप कोणते होते? अज्ञानी येथे `जमिनीचे खजाने' याचा चुकीचा अर्थ घेऊन `धान्यवाटप' असा अर्थ काढतात आणि यूसुफ (अ.) यांना कोषाधिकारी, खाद्यमंत्री किंवा वित्तमंत्रीसारखे पद बहाल करून मोकळे होतात. परंतु कुरआन, बायबल आणि तलमूदच्या वर्णनाने स्पष्ट होते की पैगंबर यूसुफ (अ.) इजिप्त्चे सर्वेसर्वा सत्ताधिकारी बनविले गेले होते. राष्ट्रनिर्माण किंवा राष्ट्रपतन करणे सर्वस्वी त्यांच्या हातात होते. कुरआन सांगतो जेव्हा पैगंबर यावूâब (अ.) इजिप्त्ला पोहचले तेव्हा यूसुफ (अ.) हे शासनाधिकारी होते. त्यांनी आपल्या आईवडिलांना उचलून सिंहासनावर आपल्याजवळ बसविले. पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या मुखातून निघालेले हे वाक्य कुरआनमध्ये नमूद केले आहे, `हे माझ्या प्रभु-स्वामी! तू मला बादशाही प्रदान केली.' फूलपात्राच्या चोरीप्रसंगी सरकारी कर्मचारी पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या फूलपात्राला `बादशाहचे फुलपात्र' म्हणतात. इजिप्त्च्या भूमीचा उल्लेख अल्लाह `यूसुफ (अ.) ची भूमी' असा करतो.
Post a Comment