महान अमेरिका राष्ट्र स्त्रीयांच्या लैंंगिक शोषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. लैंगिक अत्याचारास बळी पडणाऱ्यांमध्ये 91 टक्के महिला आणि 9 टक्के पुरूष आहेत. पण लैंगिक अत्याचार करणारे 99 टक्के पुरूष आहेत. प्रत्येक दहापैकी एका स्त्रीला आपल्या जीवनात कधी न कधी लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागते. भारतात बळी पडलेल्यांपैकी 71 टक्के कुठे तक्रार करत नाहीत. तसेच जगातील 89 टक्के बळी पडलेल्या स्त्रीया कुठेही तक्रार नोंदवत नाहीत. अशा परिस्थितीत महिलांना जास्तीच्या सुरक्षेची गरज भासते.
इस्लाम धर्मात अल्लाहने आदेश दिले आहेत की, ’’हे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) मुस्लिम पुरूषांना सांगा की, त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्या आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे . ही गोष्ट त्यांना पावित्र्य संपन्न करते आणि जे काही लोक करत आहेत अल्लाह त्याची माहिती ठेवतो.’’ ही गोष्ट महिलांच्या शीलांचे रक्षण करण्यासाठी रास्त प्रयोजन आहे. ह्या आयातीवर पुरूषांच्या आचरण करण्यानेे महिलांना कोणतीही भीती निर्माण होत नाही. पण समाजात सगळेच पुरूषया आदेशाचे पालन करणारे नसतात या उलट आचरण करणारे अनेक पुरूष आहेत. म्हणूनच महिलांनी स्वतः देखील आपल्या शीलांचे रक्षण करण्याची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी ’हिजाब’ची पद्धत लागू केली आहे. ज्या प्रकारे मुस्लिम पुरूषांना आदेश देण्यात आले आहेत त्या प्रकारे मुस्लिम स्त्रियांना उद्देशून पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ हे प्रेषित सल्ल. श्रद्धावान महिलांना सांगा की, त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्या आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साजशृंगार लोकांना दाखवू नये आणि आपल्या छातीवर चादरीचे पदर ठेवावे आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू नयेत. ह्याच हिजाबच्या पद्धतीवर सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे.
आधुनिक काळातील स्त्री स्वातंत्र्याचे समर्थक हिजाबला प्रगत स्त्रीयांसाठी अनादर समजतात. त्यांचा प्रथम पुरावा असा असतो की, काळ बदललेला आहे जग फार सुसंस्कृत झालेले आहे त्यांना कोणता धोका नाही आणि म्हणूनच हिजाबची गरज नाही. त्यांच्याकडून दूसरा युक्तीवाद असा असतो की, पूर्वीच्या पेक्षा सध्याच्या महिला फार सशक्त झालेल्या आहेत म्हणून त्यांना जास्तीच्या संरक्षणाची गरज नाही. पण जर आपण आकडेवारी पाहिली तर महिलांसंबंधीचे हे दोन्ही दावे फोल ठरतात.
जगातल्या सर्वात मोठा लोकशाही देश आपल्या भारतामध्ये 2021 सालाच्या आकडेवारीनुसार 31677 महिलांवर लैंगिक अत्याचार झाले म्हणजे दररोज 87 महिलांवर अत्याचार झाले. शासकीय संस्था एनसीआरबीनुसार गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत यात 19.34 टक्क्यांची वृद्धी झाली होती. इतर अत्याचारांचा आकडा 428278 इतका आहे. यात सुद्धा 13.2 ट्नक्याची भर पडली आहे आणि म्हणूनच काळानुसार महिला अधिक सुरक्षित झाल्या आहेत हे खोटे ठरते. लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत दिल्लीचा क्रमांक पहिला आहे. तर सर्व प्रकारच्या महिला विरोधी अत्याचारांमध्ये उत्तर प्रदेश देशात सर्वप्रथम आहे.
सभ्य-सुसंस्कृत असल्याचा दावा करणाऱ्या पाश्चात्य देशांविषयी सांगायचे झाल्यास भारत, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉम्बे नंतर सर्व युरोपीय आणि अमेरिकी देश आहेत. महान अमेरिका राष्ट्र स्त्रीयांच्या लैंंगिक शोषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. लैंगिक अत्याचारास बळी पडणाऱ्यांमध्ये 91 टक्के महिला आणि 9 टक्के पुरूष आहेत. पण लैंगिक अत्याचार करणारे 99 टक्के पुरूष आहेत. प्रत्येक दहापैकी एका स्त्रीला आपल्या जीवनात कधी न कधी लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागते. भारतात बळी पडलेल्यांपैकी 71 टक्के कुठे तक्रार करत नाहीत. तसेच जगातील 89 टक्के बळी पडलेल्या स्त्रीया कुठेही तक्रार नोंदवत नाहीत. अशा परिस्थितीत जास्तीच्या सुरक्षेची गरज भासते. सीमेवरील सैन्य सामान्य माणसापेक्षा जास्त बलवान असतो तरीही त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. म्हणूनच हिजाबची पद्धत खऱ्या अर्थार्ने बुद्धीला पटणारी आहे. जर एखादा सैनिक चिलखत घालत नसेल तर त्याला बहाद्दर म्हणता येत नाही तर मूर्ख समजले जाते आणि म्हणूनच त्याला कायद्याची अवज्ञा करण्यासाठी शिक्षा दिली जाते.
सध्याच्या काळात महिला शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या आहेत. जेणेकरून संसाराची आर्थिक स्थिती बळकट व्हावी. त्या स्वखुशीने का बळजबरीने हा पर्याय निवडत असतील पण त्यांच्या लज्जेच्या रक्षणाचा प्रश्न तर उभा राहतोच. त्याच बरोबर अश्लीलता आणि नग्नता या काळात उफाळून आलेल्या आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा व्यापार झपाट्याने वाढला आणि वाढत जात आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जाहिरातीसाठी महिलांचा वापर केला जातो. यामुळे स्त्रीयांसमोर आणखीनच समस्या उभारल्या आहेत ज्यांना तोंड द्यावे लागते.
पाश्चात देशात कौटुंबिक जीवन पद्धती नष्ट झालेली असल्याने याचा परिणाम अविवाहित जोडप्यांपासून जन्माला येणाऱ्या मुला-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. तसेच घटस्फोटाच्या दरातही झपाट्याने वाढ होत आहे. लैंगिक आणि मानसिक आजारांनी ग्रस्त झालेल्या समाजात आत्महत्येत वाढ होत आहे. कोरोना काळात सुरक्षित राहण्यासाठी मास्क आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळले जात होते. तसे सद्यस्थितीत अश्लीलता आणि व्याभिचारापासून बचाव करण्यासाठी हिजाबची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे.
अल्लाहचे म्हणणे आहे की, ‘‘सैतानाच्या वाटेला जाऊ नका तो तुमचा उघड शत्रू आहे. तुम्हाला दुष्कृत्यांचा आदेश देतो’’ आणि म्हणून शहामृगासारखे वाळूत तोंड लपवण्यापेक्षा वास्तव परिस्थितीला मान्य करून व्यवहारिक उपाय करण्याची गरज आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध हिजाब हेच सक्षम उपाय आहे.
- डॉ. सलीम खान
Post a Comment