(६१) त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही प्रयत्न करू की वडील त्याला पाठविण्यास तयार व्हावेत, आणि आम्ही असे जरूर करू.’’
(६२) यूसुफ (अ.) ने आपल्या गुलामांना इशारा केला की, ‘‘या लोकांनी धान्याच्या मोबदल्यात जो माल दिलेला आहे तो गुपचुप त्यांच्या सामानांतच ठेऊन द्या.’’ यूसुफ (अ.) ने असे या आशेने केले की घरी पोहचल्यावर आपला परत मिळालेला माल ते ओळखतील (अथवा या औदार्यावर कृतज्ञ होतील) आणि आश्चर्य नव्हे की पुन्हा ते परततील.
(६३) जेव्हा ते आपल्या वडिलांजवळ गेले तेव्हा म्हणाले, ‘‘हे पिता, यापुढे आम्हाला धान्य देण्यास नकार देण्यात आला आहे म्हणून आपण आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवून द्यावे जेणेकरून आम्ही धान्य घेऊन येऊ. आणि त्याच्या रक्षणाचे आम्ही जबाबदार आहोत.’’
(६४) वडिलांनी उत्तर दिले, ‘‘मी त्याच्याही मामल्यात तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू काय जसा यापूर्वी त्याच्या भावासंबंधी ठेवला होता? अल्लाह उत्तम रक्षक आहे व तो सर्वांपेक्षा जास्त दया करणारा आहे.’’
(६५) मग जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा पाहिले की त्यांचा मालसुद्धा त्यांना परत केलेला आहे. हे पाहून ते पुकारून उठले, ‘‘हे पिता आम्हाला आणखी काय हवे, पाहा, हा आमचा मालसुद्धा आम्हाला परत केला गेला आहे. परत आता आम्ही जाऊ आणि आमच्या मुलाबाळांसाठी रसद घेऊन येऊ. आपल्या भावाचे रक्षणही करू आणि एका उंटाचा भार आणखी जास्तही आणू. इतक्या धान्याची वाढ सहज होईल.’’
(६६) त्यांच्या पित्याने सांगितले, ‘‘मी त्याला कदापि तुमच्याबरोबर पाठविणार नाही जोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या नावाने मला पक्के वचन देत नाही की त्याला माझ्याजवळ जरूर परत आणाल याव्यतिरिक्त की तुम्ही वेढलेच जाल.’’ जेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर आपापल्या प्रतिज्ञा घेतल्या तेव्हा तो म्हणाला, ‘‘पाहा, आमच्या या वचनावर अल्लाह पाहात आहे.’’
५२) संक्षेपामुळे शक्य आहे की एखाद्यास समजणे कठीण जाईल की पैगंबर यूसुफ (अ.) त्यांना आपली ओळख देऊ इच्छित नव्हते तर येथे सावत्र भावांचा उल्लेख कसा आला आहे. यामुळे तर भेद उघडले असते. परंतु थोडा विचार केल्याने स्पष्ट खुलासा होतो. दुष्काळामुळे तिथे धान्यावर नियंत्रण होते (कंट्रोलचे धान्य) आणि प्रत्येकाला विशिष्ट मात्रेतच धान्य दिले जात होते. धान्य घ्यावयास हे दहा भाऊ आले होते परंतु ते आपल्या पित्याचा आणि आपल्या अकराव्या भावाचा हिस्सासुद्धा मागत असतील. यावर पैगंबर यूसुफ (अ.) यांनी सांगितले असेल की तुमचे वडील स्वत: येथे न येण्याचे कारण त्यांचे म्हातारपण व नेत्रहीनता मी समजू शकतो. परंतु भाऊ का आला नाही? त्यांनी उत्तरात सांगितले असेल की तो सावत्रभाऊ आहे आणि काही कारणांमुळे आमचे वडील त्याला आमच्याबरोबर पाठवित नाहीत. तेव्हा पैगंबर यूसुफ (अ.) यांनी सांगितले असेल की ठीक यावेळेस आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला धान्य देतो. परंतु पुढे भविष्यात त्या भावाला तुम्ही बरोबर आणले नाही तर तुमचा भरोसा आम्ही करणार नाही आणि तुम्हाला येथून धान्य मिळणार नाही. या शासकीय धमकीबरोबर त्यांच्यावर त्यांनी उपकार केले, कारण घराचे हाल जाणून घेण्यास व लहान भावास पाहण्यासाठी त्यांचे मन व्यावूâळ झाले असेल. ही एक साधी सरळ स्थिती आहे याला थोडा विचार केल्याने समजून येते. या स्थितीत बायबलच्या त्या अतिशयोक्तीपूर्ण वर्णनावर भरोसा करणे योग्य नाही ज्याला उत्पत्ति अध्याय ४२-४३ मध्ये सांगितले गेले आहे.
Post a Comment