Halloween Costume ideas 2015

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि देशाची सद्यस्थिती


घरो घरी तिरंगा आणि आठवडाभर वेग वेगळे स्वातंत्र्याचे कार्यक्रम वा खूप छान आठवडा गेला आणि असायला सुद्धा पाहिजे आणि आम्हाला देशाभिमान आहे. परंतु.......

आज भारताची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती बघता वाटत आहे का की खरच सगळं व्यवस्थित आहे की मग या विपरीत घडत आहे.

सर्व प्रथम आपण विचार करू व्यक्ती स्वातंत्र्या बद्दल आज जर केंद्र सरकार विरोधात कोण्हीही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला बोलायचं स्वतंत्र आहे की मग अश्या व्यक्तीवर संकट येतात आणि ते लपलेलं सुद्धा नाही मग खरंच आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात आज सत्य बोलणं किंव्हा एक पार्टी विरोधात बोलणं किती महागात पडत आहे मग हे कोणतं स्वातंत्र्य असा जनसामान्यांच्या मनात एक प्रश निर्माण होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट भारत हा आजच्या स्थितीत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो परंतु खरंच आज आपल्या युकांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगार मिळत आहे का?  भारतीय युवक कौशल्यवान बनत आहे का? घर घर तिरंगा सारख घर घर रोजगार का होत नाही हे पण विचार करण्यासारखं आहे."

बरं मग रोजगार नाही तर युवक काय करणार तर मग तो चोरी, दारू, दंगे, वाईट व्यसन, बलात्कार आणि आणखीही वाईट कामात आपला अमूल्य वेळ टाकणार आणि आज हेच आपल्याला दिसत आहे. तर मग जेव्हा आपले मा. प्रधानमंत्री मोदी साहेब  काही विशेष दिवशी इव्हेन्ट करण्यासाठी  देशाच्या जनतेला अहवान करतात तर त्याच जनतेच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी कधी बोलणार किंवा आम्ही तुम्ही जनता त्यांना कधी प्रश्न विचारणार? हा एक प्रश्न आहे यावर सुद्धा विचार करा.

आज देशात प्रत्येक वस्तूवर कर लावण्यात येत आहे. दैनंदिन खाण्या पिण्याच्या वस्तूवर कर लाव्यात आले आहे. एवढे की शैक्षणिक साहित्यावर सुध्दा कर लाण्यात आले. स्वातंत्र्याच्या चवळीत जेव्हा इंग्रजांनी मीठ या जीवनावश्यक वस्तूवर कर लाव्यात आले तेव्हा महात्मा गांधीजींनी त्या विरोधात सत्याग्रह केला आणि त्या जनआंदोलनामुळे इंग्रजांनी मिठावरील कर रद्द केला तर मग आज ज्या जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्य आहे यावरील कर लावण्याविराधात बोलणार आहे का किंव्हा त्या विरोधात जर कोणी बोलले तर सरकार खरंच ऐकणार का की त्यांना देशद्रोही ठरवणार हा सुद्धा आजच्या परिस्थितीमुळे प्रश्न निर्माण होत आहे. मग विचार करू आपण देशाच्या सामाजिक परिस्थितीचा की आज आपण खरच सामजिक रित्या पुरोगामी झालो की मग आज सुद्धा जाती, धर्म, वर्णाच्या, लिंगाच्या आधारावर भेदभाव पाहत आहो आज आपण 75 वा अमृतमहोत्सवी साजरा करत आहो आणि एका दिवस अगोदर आपल्या देशातील राज्यस्थान राज्यातील शाळेत शिक्षकांकडून एका दलित विद्यार्थ्यांना मारून हत्या करण्यात आली ती या कारणाने की तो एक दलित विद्यार्थी आहे आणि त्याने शाळेतील माठात पाणी पीले ही एक काळजाला छेद देणारी घटना आहे.

आज आपण २०२२ मध्यें जगत आहो आणि आज सुद्धा अश्या नीच मानसिकतेचा समाज आपल्या आजूबाजूला आहे जो आज सुद्धा सनातनी विचाराने बुरसटलेला आहे आज सुद्धा त्यांना सर्व मनुष्य समान नाही तर वर्णाने उच्च निच्च दिसतात यामुळे कुठे दलित मुलाला लग्नात घोड्यावर बसला म्हणून  मारण्यात येते आणि रोज या घटना घडत आहे मग यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज आम्ही प्रगती केली की पुनः अधोगती झाली.

आज धार्मिकतेला तर वेगळं स्वरूप प्राप्त झाला आहे.भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही एका धर्मा विशेष न ठेवता सर्वांना समान स्थान दिलेलं आहे. परुंतु आज ज्याच्या हाती लाठी त्यांनी म्हिस असं झालं आहे नको तिथे धर्म आणि त्यावर राजकारण सुरू आहे .  प्रत्येकाला आपल्या धर्मावर अभिमान असावा परंतु  दुसऱ्याच्या धर्माचा अपमान नको किंव्हा दुसऱ्याच्या धर्माला मानणाऱ्याना धर्माच्या नावावर भेदभाव नको परंतु आज आपल्या देशाची स्थिती बघता तुम्ही चांगल्या प्रकारे पाहात हा की इथे जे हिंदू मुस्लिम एकता किंव्हा गँगा जमनी तहेजीब तिला पूर्ण नष्ट करण्याचे काम सुरू आहे आणि इथे फक्त एका धर्म विशेष लोकांना टार्गेट करून बहुसंख्यक लोकांना अल्पसँख्याक समाजाची भीती दाखवून त्यांच्यावर अत्याचार होतांना दिसत आहे आणि रोज कोठे ना कोठे हिजाब, लव जीहाद, आणि नव नवीन मुद्यावर अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहे. आणि एकी कडे मा. पंतप्रधान सब का साथ और अब का विकास घोषणा देत आहे पण ते भाषणात आणि निवडणुकीत छान दिसते परंतु वास्तविक देशाची परिस्थिती खूप वाईट झाली आहे.

आज आपण जे बातम्या बघत आहो त्या मध्ये जास्त करून धार्मिक ध्रुवीकरनाच्या बातम्या दिसंत आहे.कारण  आज हे लोकशाहीचे खांब ज्याला आपण म्हणतो त्यापैकी बहुतांश सरकारची छाटूगेरी करतांना दिसत आहे. आणि रोजगार, शिक्षण, शेतकरी, या वर चर्चा न करता हिंदू-मुस्लिम वर मोठं मोठ्या चर्चा होतांना दिसंत आहे. मग हे कोणत्या प्रकाच स्वतंत्र आहे या वर सुद्धा विचार करा. आज देशाची आर्थिक स्थिती खूप खालावलेली आहे. कारण सरकारची नीती खाजगीकरनास पूरक कार्य करत आहे. एवढ सर्व होऊन सुद्धा आज आपण प्रश्न विचातर नाही किंव्हा त्या बद्दल उघड बोलत नाही तर मग होऊ शकते आपली सुद्धा अवस्था श्रीलंके सारखी होईल आणि मग आपण जगाच्या खूप मागे राऊन जाऊ तर त्या पूर्वीच या मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग स्वतंत्र नागरिक म्हणून करा तर खरे अमृत महोत्सव साजरा होईल......!

- प्रा. सलमान सय्यद

भ्रमणध्वनी: 91589 49409


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget