दिग्रसचे उपक्रमशील शिक्षक मजहर खान यांचा प्रेरणादायी उपक्रम
दिग्रस (जि. यवतमाळ)
येथील सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक मजहर अहेमद खान रहेमान खान यांनी 15 मे रोजी आपल्या मुलीच्या लग्नात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना शिलाई मशीनचे वाटप करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे भारतीय संविधानाच्या प्रती व इतर पुस्तके व रोपटे देऊन स्वागत देखील केले.
दिग्रस शहरासह तालुक्यात सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व जनहिताच्या कार्यासाठी परिचित असलेले अंजुमन उर्दू विद्यालयाचे सहायक शिक्षक मजहर अहेमद खान यांची कन्या मुनव्वर ताज हिचा विवाह असेगांव जि. वाशीम येथील सरदार खान शाहनूर खान यांच्यासोबत पार पडला . लग्न मंडपात त्यांनी संगीता अशोक तुमाने , माला दिनेश राठोड, अंजुम परवीन शेख अय्युब , सुनीता प्रल्हाद मोहकर व संगीता अरुण लोखंडे या आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप करून प्रेरणा व आदर्शत्वाचा अभिनव पायंडा रचला .
मोठ्या मुलीच्या लग्नात देखील त्यांनी अपंगांना तीनचाकी सायकलींचे वाटप केले होते. त्यांचा मुलगा हस्सान अहेमद खान याने देखील महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती आत्महत्याग्रस्त कास्तकांरांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान दिली हे येथे उल्लेखनीय !
शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक, माजी मंत्री माणिकराव ठाकरे , माजी मंत्री संजय देशमुख , माजी आमदार ख्वाजा बेग , वाशीम जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील, अकोलाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, महाराष्ट्र राज्य बांबू मिशनचे सदस्य डॉ. मनोज टेवरे, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे मकसूद पटेल, जिल्हा नियोजन समितीचे सुधीर देशमुख, प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रमोद सूर्यवंशी, तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे, बाभूळगावचे तहसीलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी शेषराव टाले , आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे सिनेट सदस्य विजयकुमार बंग , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष श्रीराम शिंदे , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संजय दुद्दलवार , विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक वानखडे , वैद्यकीय अधीक्षक डॉ विरेंद्र अस्वार , भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे , प्रमोद बनगीनवार , तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे , शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक तायडे, जमाते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष अब्दुल नईम , काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्रसिंह चौहान , तालुकाध्यक्ष शंकर जाधव , दिनेश सुकोडे , सलीम पटेल , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश वानखडे , उर्दू मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष हाजी मुहम्मद इलियास , रामदास बनगीनवार , नूर मुहम्मद खान, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी वर-वधूकडील पाहुणे , पत्रकार व सर्वधर्मीय बांधव यावेळी उपस्थित होते. समाजशील व उपक्रमशील शिक्षक मजहर खान यांच्या दातृत्व व लग्नाला सामाजिक हिताची जोड दिल्याबद्दल मजहर अहेमद खान रहेमान खान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
Post a Comment