Halloween Costume ideas 2015

देशात शांती, न्याय, प्रगती, भाईचाऱ्यासाठी अल्लाहकडे दुआ


लातूर 

देशात शांती, अमन, प्रगती भाईचार्यासाठी मुफ्ती सोहेल कास्मी यांनी अल्लाहकडे दुआ मागितली. ईद उल फित्र निमित्त ईदगाह मैदानावर मंगळवारी आयोजित नमाज पठण झाल्यानंतर मुफ्ती सोहेल यांनी दुआ मागितली. यावेळी उपस्थितांनी आमीन म्हणत साद दिली.

मुफ्ती सोहेल कास्मी यांनी दुआ मागताना म्हटले, हे अल्लाह ! आमच्या चुकांना माफ कर, आम्ही तुझीच बंदगी करतो आणि तुझपाशीच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्ग दाखव त्या लोकांचा ज्यांच्यावर तुझी कृपा झाली, जे तुझे प्रिय बंदे होत. देशातील राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, ब्युरोक्रेटस्, पोलीस, न्यायालये यांना सत्याच्या कसोटीवर आपले कार्य करण्याची सद्बुद्धी दे. अल्लाह त्यांची या कामी मदद कर. देशात शांती, प्रेमाचे वारे वाहू दे. सर्वांना सन्मार्ग दाखव.  शेतकरी, कष्टकरी, उद्योग, व्यवसाय भरभराटीस येवू दे. देशात, राज्यात धार्मिक द्वेष पसरविण्याऱ्या नेक हिदायत दे अशीही दुआ अल्लाहकडे त्यांनी मागितली.

प्रारंभी मुफ्ती ओवेस कास्मी यांनी बयान केले. ते म्हणाले, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जीवन चरित्र प्रत्येकांनी वाचावे. त्यांच्या जीवनचरित्रात यशस्वीतेचा मार्ग सापडतो. युवक प्रत्येक देशाचे भविष्य असतात. युवक स्वस्थ तर देश स्वस्थ. युवकांनी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात आपले कसब पणाला लावून प्रगती साधावी. नैतिकता आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा. वाईट मार्गापासून दूर राहून देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे. कुठलाही बदल करण्यासाठी स्वच्छ भावना अंगी असणे गरजेचे आहे. वाईट विचारांचा प्रतिकार चांगल्या विचारांनी करावा. सद्यपरिस्थित आक्रमक न बनता युवकांनी संयमाने वागण्यावर भर द्यावा. वाईटाचा प्रतिकार चांगल्या विचाराने करावा.   

नमाज, दुआ व खुत्बा पठणानंतर उपस्थितांनी एकमेकांस गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, खा. सुधाकर श्रृंगारे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी आ. पाशा पटेल, मकरंद सावे, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.  


मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे....

आजच्या युवकांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रेषित सल्ल. हे कुस्ती, धनुर्विद्या, पोहणे, धावणेसह मैदानी खेळांना प्राधान्य देत. शरीर सुदृढ असेल तर प्रत्येक  कामात उत्साह येतो. आजचा युवक शारीरिक कष्टापासून दुरावत आहे. त्यामुळे अनंत व्याधींनी तो ग्रासत असल्याचे दिसून येत असल्याचे मुफ्ती ओवेस कास्मी म्हणाले. 

एकमेकांचे आदर करणारे बना; ईदचा संदेश प्रेमाचा, एकात्मतेचा...

युवकांनी चारित्र्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे. सुसंस्कृत बनावे. आपण पडत्याला सावरणारे बनले पाहिजे. आज तुम्ही येथून जाताना हा संदेश लक्षात ठेवावा की तुम्ही येथून गेल्यानंतर नातेवाईक, मित्रांची गळाभेट घ्या. सोबतच जे तुमच्यापासून नाराज आहेत, तुमचे वैरी आहेत त्यांचीही गळाभेट घ्या. ईदचा संदेश प्रेमाचा, एकात्मतेचा, शांतीचा, सौहार्दाचा,  भाईचारगीचा आहे. आपण शांतीचे ध्वजवाहक बनावे. वाईटाचा तिरस्कार करणारे आणि वाईट मार्गापासून सत्य मार्गाकडे नेणारे बनावे. देशाच्या सर्वांगीण विकासात आपण सिंहाचा वाटा उचलावा, असे आवानही मुफ्ती ओवेस कास्मी यांनी केले. 

तरूणांनो भडकू नका शिक्षण, पुस्तक, लेखणीने उत्तर द्या : मुफ्ती अहमदअली

अलिकडे मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक रचले जात असल्याबद्दल सोलापूरचे काझी मुफ्ती अहमदअली काझी यांनी खंत व्यक्त केली. मुस्लीम तरुणांनो तुम्हाला कोणीही कितीही भडकावण्याचा प्रयत्न केला तरीही भडकू नका, कोणत्याही जाळयात अडकू नका, त्याचे उत्तर आपण जरूर देऊ, पण हातात दगड घेऊन नव्हे, तर शिक्षण, पुस्तक आणि लेखणीने उत्तर देऊ, असे त्यांनी सोलापूर ईदगाहमध्ये खुत्बा पठण करताना नमूद केले.

राष्ट्रीय एकात्मता हा देशाचा श्वास...

राष्ट्रीय एकात्मता हा देशाचा श्वास असताना काही मंडळी स्वार्थी हेतूने जाणीवपूर्वक देशात धार्मिक द्वेष पसरवत आहेत. याच्या निषेधार्थ लातूर शहरात दंडावर काळ्या फिती बांधून ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली. 

कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात देशात धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. प्रगतशील भारत देशासाठी ही बाब अत्यंत वाईट व निषेधार्ह आहे, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी आपल्या दंडावर काळ्या फिती बांधून ईद-उल-फित्र साजरी करावी, असे आवाहन सुफी संत परंपरेचे अभ्यास अजमेरचे सज्जादे सय्यद सरवर चिश्ती यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला लातूर येथे प्रतिसाद देत काळ्या फिती बांधून शांततेत ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget