देशात व राज्यात पक्ष-विपक्षाचे राजकीय पुढारी महागाईच्या बाबतीत फक्त बघ्याची भूमिका बजावतांना दिसत आहे व प्रत्येक पक्ष आपले शक्ती प्रदर्शन करण्यात गुंग आहेत.कारण महागाईने संपूर्ण रेकॉर्ड तोडुन उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत असे दिसून येते की राजकीय पुढाऱ्यांना महागाईशी काहीही देणेघेणे नसावे.
शातील प्रत्येक व्यक्ती वाढत्या उन्हामुळे होरपळत आहे तर अनेक उष्माघाताने मरते आहेत तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठल्याने गरीब व सर्वसामान्य व्यक्तीचे आयुष्य भस्मसात होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. आज वितभर पोटासाठी जे आपण अन्न शिजवितो त्या गॅसची किंमत आज तब्बल 1052 रूपये झाली.मग खरोखरच गरीब व सर्वसामान्य व्यक्ती जगेल की मरेल! महाराष्ट्रात पक्ष-विपक्ष फक्त राजकीय तमाशा करतांना दिसत आहे.त्यांना जनतेच्या सुखदुःखाशी काहीही देणेघेणे नसावे असे मला स्पष्ट दिसून येते. कारण आज प्रत्येक गोष्टीची झळ गरीब व सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे.विजेची झळ सर्वसामान्यांनी सोसावी. विजेचे बिल थकीत असले तर विज विभाग ताबडतोब विज कापत असते.परंतु जे राजकीय पुढारी गरीबांना व सर्वसामान्यांना ग्यान सांगतात त्याच राजकीय पुढाऱ्यांवर लाखोंचे विजेचे बिल थकीत आहे त्याचे काय?असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित आहे.आज उर्जा विभागाच्या माहिती नुसार महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांकडे एकुण 1 करोड 27 लाख रुपयांचे बिल थकीत असल्याचे सांगण्यात येते. देशाचा विचार केला तर राजकीय पुढाऱ्यांवर विजेचे बिल कीती थकीत असेल हे सांगणे कठीण आहे.सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज निर्मिती समोर मोठे संकट असतानाच वीज पुरवठ्याची सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाचे देखील राज्य सरकारचे विजनिर्मितीसाठी मोठे आव्हान आहे.या प्रकल्पात आता वीजनिर्मितीसाठी जेमतेम 20 दिवसांचा जलसाठा उपलब्ध आहे.याचा संपूर्ण त्रास सर्वसामान्यांना होणार आहे.एवढे संकट असुन सुद्धा राजकीय पुढारी विजेची थकबाकी भरायला तयार नाही.म्हणजे आता राजकीय पुढाऱ्यांचे असे झाले आहे की गरीबांना व सर्वसामान्यांना त्रास झाला तरी चालेल परंतु आपल्याला त्रास व्हायला नको.राजकीय पुढारी व मंत्री विजेचे बिल थकीत ठेवतात. मग हे काय खरोखरच गरीब आहेत काय? सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात भोंग्याचे राजकारण सुरू आहे.
काही काळ वाझे, अनिल देशमुख, रिया चक्रवर्ती, सुशांत राजपूत, समिर वानखेडे, परमबिर सिंह, संजय राऊत, कंगणा रानावनात इत्यादींवर राजकारण चालले यात प्रत्येक पक्ष एकमेकांवर तोफा डागायचे आणि आताही तेच सुरू आहे.परंतु सर्वसामान्यांना काय त्रास व वेदना होत आहे याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल.आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण पहातो व ऐकतो त्यात फक्त राजकीय बातम्या, चौकशी, पक्ष-विपक्षांची उखाडपाखाड हाच लपंडाव दिसून येतो.परंतु लोक महागाईने मरत आहे.याच्याशी राजकीय पुढाऱ्यांना तिळमात्र चिंता नसल्याचे स्पष्ट दिसून येते.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रात तब्बल 4 महिने एसटी बंद होती.यामुळे महाराष्ट्राची 12 कोटी जनता त्रस्त होती.यात खाजगी ट्रायव्हलवाल्यांनी अक्षरशः जनतेला लुटले.परंतु राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली.
यापलीकडे काहीही केले नाही.मग राज्यातील लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी, मंत्री यांचे जनतेच्या प्रती काय दायित्व असायला हवे.सध्याच्या परिस्थितीत राजकीय पुढारी जनतेच्या सेवेपेक्षा स्वतःच्या सेवेत मग्न असल्याचे दिसून येते.सध्या अत्यावश्यक वस्तू, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडर यांचे भाव आभाळाला टेकले आहे.परंतु यावर पक्ष-विपक्ष लक्ष न देता फक्त भोंग्यावर लक्ष देत असल्याचे दिसून येते.ठीक धार्मिक स्थळांवर भोंगे असावे किंवा नसावे, असेल तर त्याचा आवाज किती असावा हे कायद्याला ठरवु द्या यात राजकारण करू नये.परंतु संपूर्ण राजकीय पक्षांच्या प्रती शोकांतिका आहे की भोंग्यासाठी मोर्चे काढत आहे, हनुमान चालीसा पठण करीत आहे,महा आरती करीत आहे.परंतु महागाई कमी झाली पाहिजे यासाठी आंदोलन किंवा उपोषण करायला कोणताही पक्ष तयार नाही.ही गरीब व सर्वसामान्यांच्या प्रती थट्टा असून चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेनी 288 आमदार व 48 खासदार निवडून दिले.याव्यतीक्त विधानपरिषदेतील आमदार वेगळे.त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार वेगळे येवढे लोकप्रतिनिधी व जनप्रतिनिधी असतांना महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, शैक्षणिक समस्या, वीजेची समस्या यावर आळा का घालण्यात येत नाही? राज्याच्या 12 कोटी जनतेला महागाई पासून कोण मुक्ती देणार ? असे अनेक प्रश्न जनमानसांच्या मनात भेडसावत आहे. महागाईमुळे लग्नांना सुध्दा ग्रहण लागले आहे याचा फटका वधुवरांच्या माता-पित्यांना भोगावा लागत आहे.
महागाईमुळे शिक्षणाचा खर्च दुप्पटीने वाढला आहे.महागाईमुळे शेअर बाजार सुध्दा मंदावले आहेत.प्रत्येक दिवशी महागाई वाढत असल्याने जनमानसात आपल्याला रोष दिसून येतो.यामुळे आता असे चित्र दिसुन येते की राजकीय पुढारी मस्त तर गरिब व सर्वसामान्य त्रस्त अशी परिस्थिती उदभवल्याची दिसून येते.मी सरकारला व पक्ष-विपक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांना आग्रह व विनंती करतो की महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी युध्दपातळीवर कार्य करण्याची नितांत गरज आहे.तेव्हाच गरिब व सर्वसामान्य जनता सुखी होईल.
Post a Comment