नवी दिल्ली
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंबंधी आम्ही अत्यंत चिंतीत आहोत. अजून जग कोविड-19 च्या भयानक परिस्थितीमधून पूर्णपणे सावरलेले नसतांना युक्रेनच्या लोकांवर रशियाद्वारे युद्ध लादले जात आहे. आम्हाला भीती आहे की, रशियाची ही सैन्य कारवाई एकपूर्ण युद्धाचे स्वरूप घेईल. जर असे झाले तर हे जगाला उध्वस्त करण्याचे कारण बनेल. आपण एका सभ्य जगामध्ये राहतो. ज्यामध्ये राष्ट्रांराष्ट्रांतील मतभेद आणि संघर्ष कुटनिती आणि संभाषणाच्या माध्यमातून मिटविले गेले पाहिजे, असे आवाहन जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी मीडियाशी बोलतांना केले. ते पुढे म्हणाले, जमाअते इस्लामी हिंद केंद्र सरकारकडे आग्रह करते की, या दोन देशातील परिस्थिती आटोक्यात आणण्यामध्ये सरकारने आपली भूमीका बजावावी व दोघांनाही तात्काळ बोलणी करण्यासाठी राजी करावे. एवढेच नव्हे तर युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार विद्यार्थ्यांपैकी ज्यांची अजून सुटका करता आलेली नाही, त्यांची तत्काळ सुटका करण्यासाठी धडाडीचे प्रयत्न करावेत. त्यासाठी हवाईच नव्हे तर सागरी आणि भूमार्गाचाही उपयोग करण्यासंबंधी विचार करावा. विद्यार्थी हवाई यात्रेचे भरमसाठी मूल्य अदा करण्यास पात्र नाही. त्यामुळे सरकारने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपले योगदान द्यावे. अध्यक्ष सआदतुल्लाह हुसैनी यांनी पुढे असेही म्हटले आहे की, या वादाने पुन्हा एकदा वैश्विक शक्तींच्या पाखंडाला उघडे पाडले आहे. ह्या त्याच शक्ती आहेत त्यांनी अलिकडपर्यत इराक, अफगानिस्तान आणि अन्य देशांना उध्वस्त करून टाकले आहे आणि आता रशियाच्या आक्रमनावर विलाप करत आहेत. महाशक्तींच्या हे दुटप्पीपणाचे धोरण वैश्विक अशांतीचे प्रमुख कारण आहे. आता वेळ आलेली आहे की, संयुक्त राष्ट्र संघासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना लोकतांत्रिक आणि मानवी आधारावर पुनर्गठन केले जावे. जग अत्याचारी आणि अत्याचारग्रस्त यांच्यामध्ये भेद करून सैद्धांतिक आधारावर सर्वांप्रती समान दृष्टीकोन ठेऊन त्यांनी वर्तन करावे.
Post a Comment