अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडेन यांनी परराष्ट्र धोरणावर आपल्या पहिल्या भाषणात असे म्हटले होते की, लोकशाहीच्या आरोग्यासाठी स्वतंत्र माध्यम अनिवार्य आहेत. जगात सर्वत्र सध्या लोकशाहीचे वर्चस्व असताना देखील सत्ताधारी आणि त्याच्या आधीन असलेल्यांमध्ये अशी फाळणी दिसायला मिळते की सत्तेवर काबिज आपल्या मनाची गोष्ट बोलत असतात. आणि जे लोक सत्तेच्या सिंहासन आपल्या खांद्यावर उचलून फिरतात त्यांनी मुकाटपण त्यांचे ऐकावे. समाज जोवर आपल्या मर्यादा सांभाळून शिष्टाचाराचे पालन करत असतो तोपर्यंत सर्वत्र शांतता नांदते. पण जेव्हा कधी कुणी सत्तेशी एखादा प्रश्न करतो तेव्हा हे सत्ताधारी नाराज होतात. इतकेच नव्हे तर ज्या प्रश्नांचा संबंध लोक कल्याणाशी असतो असे प्रश्न सुद्धा सत्ताधाऱ्यांंना खटकतात. फक्त मोदी किंवा ट्रम्प सारख्या सत्ताधिशांनाच नव्हे तर बाईडेन सारखे मवाळ प्रवृत्तीचे सत्ताधीश सुद्धा आपले संतुलन गमावतात. अमेरिकी अध्यक्ष केवळ आपल्या मनाची बात करू शकत नाहीत. कारण त्यांना अमेरिकी पत्रकारांशी संवाद सुद्धा घालावा लागतो. या आगतिकतेमुळे डोनाल्ड ट्रम्पचे बरेच पैलू जगासमोर आले आणि शेवटी जो बाईडेन यांच्या चेहऱ्यावरील पडदा जगासमोर आणला. व्हाईट हाऊस येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत फॉक्स न्यूज या टीव्ही वाहिनीच्या एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला की, महागाईचे हे ओझे लोकांना निवडणुकीपर्यंत उचलावे लागणार आहेत काय? जो बाईडेनला या प्रश्नाचा इतका राग आला की त्यांच्या हातात माईक्रोफोन आहे हे विसरले आणि म्हणाले की, महागाई मोठी मिळकत आहे आणि त्या पत्रकाराला मुर्ख कुत्र्याचे पिल्लू म्हणाले. पण या चेष्टेला जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने सहन करून घेतले. प्रश्न करणाऱ्या पत्रकाराला जेव्हा या बाबतीत विचारले त्यावर ते म्हणाले की, आवाज फार येत होता मला काही ऐकू आले नाही. त्यानंतर फॉक्स न्यूज चॅनलवरील आपल्या मुलाखतीत पीटर यांनी मौन बाळगले आणि पुढे म्हणाले की, आतापर्यंत या घटनेची चौकशी कुणी केली नाही.तर ही अवस्था अमेरिकेच्या स्वतंत्र मीडियाची आहे.
व्हाईट हाऊसकडून या घटनेबाबत कोणतीही चिंता व्यक्त केली गेली नाही तर हे सर्वच्या सर्व संभाषण लिखित रूपात नोंदवले गेले. आपल्या देशाचे असे आहे की, अमेरिकेत काही वाईट जरी घडले तरी ते आपल्याला सुंदर सारखेच दिसते. जर अशीच घटना उत्तर कोरिया किंवा एखाद्या मुस्लिम देशात घडली असती तर त्यावर किती चर्चांना उधाण आले असते. दीड वर्षापूर्वी (जुलै 2020) राष्ट्रपती पदाचे त्यावेळचे उमेदवार जो बाईडेन यांनी मुस्लिम समुदायाला काही आश्वासन दिले होते. अमेरिकेत मुस्लिम लोकसंख्या भारतसारखी मोठी नाही जेणेकरून ते निवडणुकीवर आपला प्रभाव टाकू शकतील. तिथली मुस्लिम लोकसंख्या केवळ 35 लाख इतकी आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येतील 1.1 टक्के आणि म्हणून कोणतेही पक्ष मुस्लिम मतदारांकडे काही लक्ष देत नसतो. पण व्हाईस ऑफ अमेरिका? या वृत्तवाहिनीत बसलेले मुस्लिम भलतेच आनंदीत झाले. आणि मोठ्या आनंदाने ही बातमी प्रसारित केली. त्यांनी घोषणा केली की अमेरिकेतील काही प्रमुख प्रांतांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या येत्या निवडणुकीत महत्त्वाची भूमीका पार पाडू शकते. 2016 च्या निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 11100 पेक्षा कमी मतांनी मिशिगन येथे जिंकले होते आणि या प्रांतात मुस्लिम मतदारांची संख्या 15 लक्ष इतकी आहे.
या बातमी सहीत जो बाईडेन मुस्लिम मतदारांना संबोधतांना व्हीडिया व्हाईस ऑफ अमेरिकावर दाखवण्यात आले. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुस्लिमांना असे आश्वासन देताना दाखविले आहेत की ते ट्रम्प यांनी मुस्लिम विरोधी जे उपाय केले होते त्यांना संपवून टाकतील. आणि त्याच वेळेला त्यांनी मुस्लिमांना सांगितले होते की, ’’इस्लामोफोबिया’ला संपवण्यासाठी त्यांना मते द्यावीत. या व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह नव्हते तरी देखील ग्लोबल मीडिया संचलित व्हाईस ऑफ अमेरिकाचे वरिष्ठ संपादक माईकल पॅक यांना याची चौकशी करण्यास पाठवले. माईकल पॅक याकडे दुर्लक्ष करूश कले असते पण ट्रम्प यांना नाराज करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती आणि म्हणून त्यांनी तो विडीयो का आणि कशासाठी प्रसारित करण्यात आला याच्या चौकशीचे आदेश दिले.
अमेरिकेत माध्यमांच्या स्वतंत्रतेविषयी फार चर्चा होत असे पण ज्या लोकांनी तो विडीयो प्रसारित केला होता त्यांना जबाबदार धरून त्याच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली. याचे कारण त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक मिनीसोटाचे अलहान उमर आणि मिशीगनचे राशिद तय्यब हे दाखवण्यात आले होते. ग्लोबल मीडिया या वृत्त संस्थेने व्हाईस ऑफ अमेरिकाचे ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वरील याचा मजकूर देखील डिलीट करण्यास सांगितले. एवढेच नाही तर कायद्याचे उल्लंघन केले गेले म्हणून त्यांच्या विरूद्ध कारवाई केली गेली. माईकल पॅक असे देखील म्हणाले की, जे लोक या प्रसारणासाठी जबाबदार आहेत त्याच्या विरूद्ध कडक उपाय केले जातील. जर यालाच माध्यमांचे स्वातंत्र्य म्हटले जात असेल तर माध्यमांची गुलामी कशी असणार? अमेरिका जगातली सर्वात मोठी लोकशाही असल्याने काही लोकांचा असा विचार असू शकतो की, माध्यमांच्या स्वतंत्रेविषयी अमेरिका पहिल्या क्रमांकावर जरी नसला तरी पहिल्या पाच क्रमांकात त्याचे नाव असेल वास्तविकता अशी नाही. स्वतंत्र माध्यमे असलेल्या 180 देशांच्या यादीत त्याचा क्रमांक 45 वा होता. यात सिंहाचा वाटा अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी लावला होता. त्यांनी माध्यमांना अप्रमाणिक म्हटले होते. न्यूयॉर्क टाईम्स सारख्या अमेरिकेतील सम्मान प्राप्त वृत्तपत्राविषयी ट्रम्प म्हणाले होते की, अभद्र भाषेमध्ये बातम्यांचे प्रकाशन करतो. एवढेच नाही तर त्यांनी मीडिया मधील वृत्तांकन खोटा असल्याचे म्हटले होते आणि पत्रकारांविरूद्ध शिवराळ भाषेचा उपयोग केला होता. त्यांच्या या वक्तव्याविरूद्ध अमेरिकेतील 300 माध्यमसंस्था ट्रम्प विरूद्ध मोहिम छेडली होती. बोस्टन ग्लोबच्या अध्यक्षांनी याचे नेतृत्व केले होते. 35 वृत्तसंस्थांनी त्यांची साथ दिली. बोस्टन ग्लोब यांनी आपल्या संपादकीयेत म्हटले होते की स्वतंत्र माध्यमे गेली 200 वर्षापासून अमेरिकेचे आधारस्तंभ राहिले आहे. याचवेळी एका सर्वेक्षणाने हे समोर आले होते की 65 टक्के लोक माध्यमांना लोकशाहीच्या महत्त्वाचा घटक समजत आहेत. पण त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाची भूमीका वेगळी होती. त्या पक्षाचे 51 टक्के लोकांचेे असे म्हणणे होते की, माध्यमे लोकशाहीतील महत्त्वाचा घटक नसून ते जनतेचे शत्रू आहेत. माध्यमांच्या स्वातंत्र्याची मोहिम ट्रम्प यांच्या मीडियावरील विरोधामुळे सुरू केली होती. सीएनएन या वृत्त वाहिनीने आपल्या वाहिनीवर ट्रम्प मीडियाची खिलली उडवतानाचे दृश्य चालविले होते आणि काही पत्रकारांवरील हल्ले झाल्याचेही दाखवण्यात आले होते.
तरी देखील 52 टक्के ट्रम्पच्या समर्थकांनी या हिंसेचा विरोध केला नव्हता. ट्रम्प यांनी एका ट्टवीटद्वारे एमएसएनबीचे एक पत्रकार मिका ब्रेजेन्स्की यांना वेडे म्हटले होते. अमेरिकेत माध्यमांविरूद्ध इतका आक्रोश होता की, व्हाईट हाऊसचे प्रवक्ता यांनी ट्रम्पचे समर्थन करीत म्हटले होते की, अमेरिकी जनतेनी एका अशा सक्षम व्यक्तीची निवड केली आहे जो मजबूत आणि स्मार्ट असून लढाऊ वृत्तीचे आहेत’’
जगातल्या बलाढ्य लोकशाहीतील माध्यमांची इतकी दयनीय अवस्था असल्यास भारतासारख्या देशातील गोदी मीडियाची जी अवस्था आहे त्यावर कोणाला आश्चर्य वाटायला नको.
- डॉ. सलीम खान
Post a Comment