इमानवंतांसाठी ती प्रत्येक गोष्ट ’’Essential Religious Practice’’ आहे ज्याचा एकवेळा उल्लेख किंवा इशाराही जर कुरआन व प्रेषित सल्ल. यांनी केला असेल. न्याय व्यवस्था ही भौतिक पुरावे मागते. पण अख्खा इस्लाम हा ‘‘ईमान बिल गैब’’ म्हणजे ‘‘अदृश्यावर’’विश्वास या तत्वावर उभा आहे. आता दोघांची दखल सुप्रिम कोर्ट कशी घेते हे पहायचे आहे. माझा हिजाब नाकारणाऱ्या, न घालणाऱ्या मुस्लिमेत्तर व मुस्लिम स्त्रियांवर काहीही आरोप नाही.
समस्त वाचकवर्ग, अस्सलामु अलैकुम ! (तुमच्यावर शांती व सुरक्षितता असो). दिनांक 15/3/2022 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने ज्या शाळेत व्यवस्थापनाने गणवेश निर्धारीत केला आहे, त्याच्या विरोधात जावून ’’हिजाब’’ परीधान करण्यास मज्जाव, या आदेशाच्या समर्थनात निर्णय दिला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर अनेकांनी विरोध. यापैकी किती जणांनी ’’हिजाब’’ हे नेमके काय आहे? व इस्लामशी त्याचा नेमका संबंध काय? याचा शोध घेतला असेल. याबद्दल संशयच आहे. मी माझ्या परीने या विषयाचा जो अभ्यास केला त्याचा उहापोह म्हणजे हा लेख. खर तर ’’हिजाब’’ या अरेबीक शब्दाचा शब्दशः भाषांतर होते ’’पडदा’’ किंवा ’’अवरोध’’ पण हा शब्द जनसामान्य भाषेत प्रतिनिधीत्व करतो स्त्री-वेशभूषेबद्दल. इस्लाम धर्माचे अस्सल अवतरित पुराण किंवा संदर्भग्रंथ म्हणजे कुरआन. कुरआनमधील एकाही शब्दावर कुणीही इस्लामचा अनुयायी आक्षेप घेवूच शकत नाही. त्या शब्दाच्या अर्थावर चर्चा होऊ शकते. दूसरा सदंर्भ म्हणजे हदीस. तर या दोन्ही संदर्भानुसार इस्लाम स्त्रियांच्या वेशभूषेबद्दल काय म्हणतो हे जाणून घेऊ. सुरतुल नूर, आयत (39) (हे प्रेषित) सांगा इमानवंत स्त्रीयांना आपली नजर झुकलेली ठेवा व आपल्या अब्रुचे संरक्षण करा (हाच आदेश इमानवंत पुरूषांनादेखील आयत क्र. 30 मध्ये दिला गेला आहे. लगेच कुराणमध्ये स्त्री-पुरूष असमानता आहे या निष्कर्षावर येण्यापूर्वी हे -(उर्वरित पान 7 वर)
समजून घ्यावे) व नका दिसू देऊ आपले श्रृंगार शिवाय त्याच्या जे आपोआप प्रकट होते व आपले खुमूर (अरब स्त्रीया ज्या कपड्याने डोके झाकत व पाठमोरे मोडत त्याला खुमूर म्हणतात.) आपल्या छातीवरून पसरवा. (सुरतुल अहजाब आयत नं. 59,) ’’ हे प्रेषित सांगा आपल्या पत्नींना व मुलींना व इमानवंतांच्या स्त्रीयांना आपल्यारवून परिधान करा आपले बाह्यवस्त्र / चादर (जसे की घुंगट) यावरून कुरआनमध्ये स्त्रियांनी आपल्या डोक्याचे व चेहऱ्याचे झाकणे अपेक्षित आहे हे स्पष्ट होते.
हदीसमध्ये बऱ्याच ठिकाणी या वेशभूषेला दुजोरा दिला आहे, पण वरील दोन्ही आयतहमध्ये वेशभूषेपेक्षा अजून एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो म्हणजे ’’ईमान’’ अल्लाहने प्रेषितांना ’’इमानवंत स्त्रीयांना’’ हा संदेश दिला. कारण इमानवंत स्त्रीयाच या आदेशाला समजू शकतात. ज्यांच्या हृदयात ’’ईमान’ आहे त्यांना कुरआनच्या कुठल्याही आदेशाचे समर्थन करण्यासाठी इतर भौतिक, सामाजिक किंवा आर्थिक स्पष्टीकरणाची गरज पडत नाही. जरी कुरआनचे आदेश या सर्व स्पष्टीकरणाला सार्थ ठरतात. त्यामुळेच मी म्हणतो की, मूळ प्रश्न ’’हिजाब’’ चा नाही तर ’’ईमान’’चा आहे. काय आहे हे ’’ईमान’’? इमान म्हणजे पोलादापेक्षा मजबूत, पर्वतापेक्षा अढळ व स्वच्छ पाण्यापेक्षाही निर्मळ विश्वास. विश्वास कशावर? तर इस्लाममध्ये असा विश्वास तीन गोष्टीवर अपेक्षित आहे.
1) एकच परमेश्वर हा विश्वास अंध नाहीए. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर हे पर्वत, या नद्या, पशु-पक्षी, झाडे व स्वतःचे अस्तीत्व बघून विचार करावा कि हे सर्व विना कर्त्याच्याच चालले आहे का? का हे सर्व निर्माण करणारा चालविणारा कुणी एकच असलाच पाहिजे!
2.) प्रेषित : मग जर या सृष्टिला त्याने बनविले व मनुष्य जातीला सर्वांपेक्षा वरचढ केले ते का? आपला जन्म का झाला असावा? त्या परमेश्वराच्या आपल्यासाठी काय आदेश आहेत? आपण इतरांशी कसे वागावे व एकंदरीत हे जीवनच कसे जगावे? यासाठी परमेश्वराने त्याचा संदेश देऊन ज्या व्यक्ती विशेषांना आपले प्रेषित म्हणून निवडले त्यांच्या शिकवणी व आचरणाकडे लक्ष दिले तर एक गोष्ट लक्षात येईल की त्यांचे चारीत्र्य व स्वभाव ईशसंदेशा अनुरूप होते. म्हणून प्रेषितांना खरे प्रेषित मानने हे ईमान होय.
3) मरणोत्तर आयुष्य : इस्लाम धर्माला समजण्यासाठी ही संकल्पना समजणे खूप गरजेचे आहे? ’’ईमान’’ हे प्रत्येक इस्लाम अनुयायी म्हणविणाऱ्यासाठी एक पूर्व अटच आहे. या जगात आपण फक्त एक परीक्षा देण्यासाठी आलो आहोत. या जगात ईश संदेश पोहोचवून आपले चारित्र्य व स्वभावाने या जगाला उत्तमात उत्तम बनविण्साठी आलो आहोत. या जगात आपल्याला आपल्या मनमर्जीने न जगता परमेश्वराने ठरविलेल्या व प्रेषितांनी दाखवून दिलेल्या मापदंडानुसार जगायचे आहे. कारण या जगातील मृत्युनंतर आपण पुनःश्च जीवंत केले जाऊ व आपल्याला या 70-80 वर्षाच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाची हिशोब द्यावा लागणार. मरणानंतरचे हे आयुष्य चिरकालीन अक्षय्य आहे.
आता विचार करा, ज्या व्यक्तीच्या मनात या गोष्टीचा ’’ईमान’’ दृढ विश्वास आहे, त्याला ’’हिजाब’’ किंवा ’’दारूबंदी’’ किंवा ’’लैंगीक शालीनता’’ या गोष्टीच्या सक्तीच्या नाहीत तर भक्तीच्या वाटतात. सोप उदाहरण म्हणजे जर का कुणी तुम्हाला फक्त एका मिनीटासाठी अमुक एक वेशभूषा करायला सांगितली, अमुक एका प्रकारचे खाने किंवा अमुक एक जीवनशैली सांगितली ज्यात वैज्ञानिक, सामाजिक, मानसीक व शारीरिकदृष्ट्या तुमचं भलच आहे व बदल्यात अब्जावधी रूपये द्यायचे कबुल केले तर कोण हे एका मिनिटासाठी करणार नाही? हे आहे मुस्लिम व्यक्तीचे ’’इमान’’ या जीवनाच्या संकल्पनेसाठी त्याला परत जाऊन परमेश्वराला तोंड दाखवायचे आहे, जाब द्यायचा आहे.
इमानवंतांसाठी ती प्रत्येक गोष्ट ’’एीीशपींळरश्र ठशश्रळसर्ळेीी झीरलींळलश’’ आहे ज्याचा एकवेळा उल्लेख किंवा इशाराही जर कुरआन व प्रेषित सल्ल. यांनी केला असेल तर न्याय व्यवस्था ही भौतिक पुरावे मागते. पण अख्खा इस्लाम हा ’’ईमान बिल गैब’’ म्हणजे ’’अदृश्यावर’’विश्वास या तत्वावर उभा आहे. आता दोघांची दखल सुप्रिम कोर्ट कशी घेते हे पहायचे आहे. माझा हिजाब नाकारणाऱ्या, न घालणाऱ्या मुस्लिमेत्तर व मुस्लिम स्त्रियांबद्दल काही आरोप नाही. परमेश्वराने प्रत्येकाला जसे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तसेच त्या निर्णयाच्या परिणामास सामोरे जाण्यासही सचेत केले आहे. ’’हिजाब’’ घाला अथवा न घाला त्याचा जाब प्रत्येक स्त्रीला परमेश्वराकडे द्यायचा आहे. आमची प्रामाणिक इच्छा एवढीच की ’’हिजाब’’ घालायचा अथवा न घालायचा याचे स्वातंत्र्य गोठवून मुस्लिम स्त्रीचे ’’ईमान’’ हिरावून घेतले जाऊ नये.
- डॉ. असद पठाण
Post a Comment