Halloween Costume ideas 2015

युरोपियन राष्ट्रांचा दांभिकपणा चव्हाट्यावर


यूक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यामुळे युरोपियन राष्ट्रांची संस्कृती आणि सभ्यतेविषयी बऱ्याच काही गोष्टी जगासमोर आल्या आहेत. स्वतःला प्रगत, सभ्य आणि सुसंस्कृत म्हणत जगातील इतर राष्ट्रांना हिणवणारे नैतिकदृष्ट्या किती मागास आहेत, त्यांची काय स्थिती आहे, भांडवलदारी अर्थव्यवस्थेतून भांडवल गोळा करीत त्यांनी माणुसकीचाकधी आणि किती नाश केला हे तथ्यादेखील समोर आले आहे. आधुनिक विचारसरणी, आधुनिक शैलीचा डांगोरा पिटणारे हे लोक किती मागासलेले आहेत यावरून युक्रेनच्या युद्धामुळे ते उघडे पडले आहेत. अत्याधुनिक शैलीचा, राजकीय व्यवस्थेचा, ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्यांना किती गर्व होता त्याचे पितळ उघड पडले. सभ्यता म्हणचे काय? फक्त ऐहिक ऐश्वर्य, अमर्याद सत्ता आणि त्यांना जोडून संपत्ती एवढेच त्यांना माहीत आहे. कारण याच वातावरणात तेवावरत आहेत. किंबहुना हीच त्यांची सभ्यता आणि संस्कृती आहे, असा त्यांना गैरसमज झाला असावा. सभ्यता म्हणजे अमर्याद धनसंपत्ती नव्हे. अत्याधुनिक तंत्रज्ञान नव्हे. सभ्यता म्हणजे नीतीमत्ता, नैतिक चारित्र्य, न्याय्यवृत्ती हे एका प्रगत सभ्येतेच आधारस्तंभ आहेत. युक्रेनच्या युद्धामुळे या गोष्टीचा युरोपियन राष्ट्रांमध्ये किती अभाव आहे हे जगासमोर उघडकीस आले आहे. युक्रेनमध्ये निष्पाप लोकांची हत्या होते ही बाब अत्यंत खेदजनक आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. जर मानवतेच्या निकषांवर ह्या घटनांना पाहिले गेले तर. तिथले युरोपियन लोकांना युक्रेन आणि तिथले नागरिक उद्ध्वस्त होताना पाहावत नसेल. पण त्यांच्याविषयी ते काय म्हणतात पाहू या. ‘हे तर आपलेच लोक आहेत. त्यांचे राहणीमान आपल्यासारखेच दिसते. गोरे गोमटे आपल्यासारखेच ते इन्स्टाग्राम वापरतात. त्यांच्यावर हा अत्याचार व्हायला नको.’ मग जगातील इतर देशांवर त्यांनी जे युद्ध लादले, तिथल्या कोट्यवधी निष्पाप लोकांची हत्याकेली, युक्रेनमध्येजसे होते तसेचत्यांना आपली घरेदारे सोडून उघड्यावर राहायला लागत आहे. ती माणसं नाहीत काय? पॅलेस्टाईनवर अतोनातहल्ले होत असताना, लहान मुलांची, महिलांची हत्या होते, त्यावर त्यांनी आपले विचार कधी का मांडले नाहीत? स्वतःवर बेतले तेव्हा त्यांना माणुसकी आठवली. इराकला नेस्तनाबूद केले, सीरियाला उद्ध्वस्त केले, अफगाणीस्तानातल्यांचा बळी घेतला ते माणूस नव्हते? युक्रेनवर रशियाने हल्ला करताच जगभरातील नाटो देशांनी अमेरिकेच्या दराऱ्याला भिऊन रशियाविरुद्ध कडक निर्बंध घातले. इतकेच नाही तर यापेक्षा निम्मे तरी निर्बंध या तथाकथित ‘सभ्य’ अत्याधुनिक प्रगत राष्ट्रांनी इस्रायलविरुद्ध का घातले नाहीत? इराकमध्ये तिथल्या नागरिकांच्या मृत्युचे तांडव रचून त्याचे प्रदर्शन जगभर करण्यासाठी सैन्यदलात पत्रकारांना सोबत घेऊन जात होते. सीएनएन या वृत्तवाहिनीचा उदयच मुळात इराकमधील सैन्यांची कारवाई जगभर प्रदर्शित करण्यासाठी झाला होता. एम्बेडेड जर्नालिझमची सुरुवातच इराक युद्धापासून केली गेही. आफ्रिकेतून काळ्या लोकांना गुलाम बनवून याच अमेरिकी आणि युरोपियन राष्ट्रे त्यांचा बाजार थाटत होते. त्यांची खरेदीविक्री होत होती. ब्लॅक गोल्ड याव्यवसायाचे नामकरण केले होते. ते माणूस नव्हते? फक्तयुक्रेन आणि इतर युरोपियन लोकच माणुसकीत मोडतात काय? त्यांना युक्रेनच्या लोकांचे दुः होते, पण रशियाविरुद्ध त्याची मदत करण्याची त्यांची हिंमत होत नाही. स्वतःपेक्षा दुर्बल राष्ट्रांवर हल्ला करण्यासाठी ते एकमेकांना आमंत्रण देतात. स्वतःवर पाळी आली की कसे आपल्या सीमांमध्ये लपून बसले आहेत. रशिया बलाढ्य शक्ती आहे. त्याचा सामना करण्यास त्यांचा थरकांप उडतो. निर्बंध लादून मोकळे. इराक, सीरिया, लीबिया, अफगाणिस्थानात जसे घुसून युग्ध केले तसे ते रशियाच्या विरोधात युक्रेनची का मदत करत नाहीत? कारण त्यांना माहीत आहे, आज युक्रेनला ज्या परिस्थितीशी तोंड द्यावे लागत आहे, ते सहन करण्याची त्यांच्यात मानसिक आणि शारीरिक शक्ती नाही. आणि म्हणून घरी बसूनच ते इस्न्टाग्रामवर युद्ध पाहत असतील. युक्रेनच्या मदतीस धावणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. ते दांभिक राष्ट्रे आहेत. न्याय करू शकत नाहीत. युक्रेनविषयीचा पुळका त्यांना इतर दुर्बल देशांच्या नागरिकांसाठी का नाही. नाटोच्या विस्तारवादी वृत्तीमुळे युक्रेनचा नाश होत आहे आणि नाटोचे सर्व सदस्यराष्ट्रे बघ्याची भूमिका घेऊ पाहात आहेत. म्हणून त्यांनी मानवतेचे, मानवी सभ्यता-संस्कृतीचे, नैतिकतेचे, नैतिक मूल्यांचे धडे इतरांना शिकवू नये. ते मागास विचारसरणीचे आहेत. त्यांन भांडवल गोळा करत राहावे बस्स. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर न पडलेल्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी नाटोचे संघटन उभारून पूर्वेकडील राष्ट्रे प्रामुख्याने सोव्हियत संघातून बाहेर पडलेल्या देशांपर्यंत आपला विळखा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच रशियाने नाटोसमोरच आव्हान उभे केले आहे. नाटोने युक्रेनचे स्वप्न सोडून आता आपल्या स्वतःचे संरक्षण करावे ही स्थिती रशियाने त्यांच्यावर लादलेली आहे. युरोपियन राष्ट्रे वसाहतवादी आणि राष्ट्रवादी मानसिकता सोडून काळाचे भान ठेवले तरच त्यांचे अस्तित्व सुरक्षित राहील.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget