(६९) आणि पाहा, इब्राहीम (अ.) जवळ आमचे दूत शुभवार्ता घेऊन पोहचले. म्हणाले, ‘‘तुम्हावर सलाम असो.’’ इब्राहीम (अ.) नी उत्तर दिले, ‘‘तुमच्यावरदेखील सलाम असो.’’मग विनाविलंब इब्राहीम (अ.)ने एक भाजलेले वासरू (त्यांच्या पाहुणचारासाठी) आणले.७५
(७०) परंतु जेव्हा पाहिले की त्यांचे हात जेवणासाठी पुढे होत नाहीत७५अ तेव्हा तो त्यांच्याविषयी साशंक झाला आणि मनात त्यांची भीती धरू लागला.७६ त्यांनी सांगितले,‘‘भिऊ नका, आम्ही तर लूत (अ.) च्या लोकांकडे पाठविले गेलो आहोत.’’७७
(७१) इब्राहीम (अ.) ची पत्नीदेखील उभी होती. ती हे ऐकून हसली७८ मग आम्ही तिला इसहाक (अ.) आणि इसहाक (अ.) नंतर याकूब (अ.) ची खुशखबरी दिली.७९
(७२) ती म्हणाली, ‘‘माझे दुर्दैव!८० आता मला संतती होईल काय जेव्हा मी चक्क म्हातारी झाले आणि माझे पतीदेखील म्हातारे झाले?८१ ही तर मोठी विचित्र बाब आहे!’’
(७३) दूतांनी सांगितले, ‘‘अल्लाहच्या आज्ञेवर आश्चर्य करतेस?८२ इब्राहीम (अ.) च्या कुटुंबियांनो! तुम्हावर तर अल्लाहची कृपा आणि त्याची समृद्धी आहे आणि निश्चितच अल्लाह अत्यंत प्रशंसेस पात्र व वैभवशाली आहे.’’
(७४) मग जेव्हा इब्राहीम (अ.) ची भीड चेपली आणि (संतानच्या सुवार्तेने) त्याचे मन प्रसन्न झाले तेव्हा त्याने लूतच्या लोकांसाठी आमच्याशी भांडण मांडले.८३
७५) याने माहीत होते की देवदूत (फरिश्ते) आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या येथे मानवी रूप धारण करून गेले होते. सुरवातीला त्यांनी आपला परिचय दिला नाही म्हणून इब्राहीम (अ.) यांनी विचार केला की हे कोणी अनोळखी पाहुणे आहेत आणि त्वरित त्यांनी त्या पाहुण्यांची भोजन व्यवस्था केली.
७५अ) याने आदरणीय इब्राहीम (अ.) यांना माहीत झाले की हे फरिश्ते आहेत.
७६) काही भाष्यकारांना ही भीती यामुळे होती की जेव्हा या अनोळखी पाहुण्यांनी जेवण घेण्यास संकोच केला तेव्हा इब्राहीम (अ.) यांना त्यांच्या हेतूवर शंका आली आणि विचार करू लागले की हे एखाद्या शत्रुत्वाच्या हेतूने तर आले नाहीत ना? त्यांना शंका वाटू लागली, कारण अरबांमध्ये जेव्हा एखादा माणूस एखाद्याचे आदरातिथ्य स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा असे समजले जात होते की ते पाहुणे म्हणून आलेले नाहीत तर हत्या आणि हिंसा करण्यासाठी आलेले आहेत. परंतु नंतरची आयत याचे समर्थन करीत नाही.
७७) या वर्णनशैलीने स्पष्ट होते की जेवणाकडे त्यांचे हात पुढे न झाल्यामुळे आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी समजून घेतले होते की हे फरिश्ते आहेत. फरिश्त्यांचे स्पष्टपणे मानवी रुपात येणे असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यानेच होते. म्हणून आदरणीय इब्राहीम (अ.) यांना भीती ज्याची वाटली होती ती म्हणजे काय माझ्या घरातील सदस्यांकडून किंवा गावातील लोकांकडून काही अपराध तर घडला नाही ना? ज्यामुळे फरिश्त्यांना मानवी रूपात आपली पकड करण्यासाठी पाठविण्यात आले आहे? जर असे असते तर फरिश्ते म्हणाले असते, 'भिऊ नका, आम्ही तुमच्या निर्माणर्कत्या स्वामीकडून आलो आहोत." परंतु जेव्हा त्यांनी भीती दूर करण्यासाठी सांगितले, "आम्ही तर लूतच्या लोकसमुदायाकडे पाठविले गेले आहोत." याने ज्ञात होते की आदरणीय इब्राहीम (अ.) यांना ते फरिश्ते होते ह्याचे ज्ञान झाले होते. परंतु काळजी याची होती की ते ज्या उपद्रवामुळे कसोटीच्या रूपात आले आहेत. तर शेवटी तो अभागी कोण आहे? त्याची आता गय केली जाणार नाही.
७८) याने माहित होते की देवदूतांची (फरिश्ते) मानवी रुपात येण्याची खबर ऐकून सर्व कुटुंब व्यथीत झाले होते. आदरणीय इब्राहीम (अ.) यांची पत्नी घाबरून घराबाहेर आली होती. जेव्हा त्यांनी हे ऐकले की त्यांच्या घरावर किंवा वस्तीवर विपदा येणार नाही तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला आणि ती खूश झाली.
७९) देवदूतांनी आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्याऐवजी आदरणीय सारा यांना ही शुभसूचना यासाठी ऐकविली की यापूर्वी आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या येथे त्यांची दुसरी पत्नी आदरणीय हाजरा यांच्यापासून आदरणीय इस्माईल (अ.) जन्माला आले परंतु आदरणीय सारा तोपर्यंत निपुत्रिक होती. त्यामुळे आदरणीय सारा अधिक दु:खी होती. त्यांच्या या दु:खाला दूर करण्यासाठी देवदूतांनी त्यांना हीच शुभवार्ता दिली नाही की तुमच्या येथे इसहाकसारखा प्रतिष्ठित पुत्ररत्न जन्माला येणार आहे; परंतु हेसुद्धा सांगितले की या मुलानंतर नातू याकूब (अ.) सुद्धा एक महान पैगंबर होईल.
८०) याचा अर्थ हा होत नाही की आदरणीय सारा खरेतर यावर खूश होण्याऐवजी उलट याला अभागीपणा समजत होती. परंतु हे अशा शब्दांमध्ये आहे ज्याद्वारा स्त्रिया आश्चर्य व्यक्त करतात आणि ज्यांचा उद्देश शाब्दिक उद्देश नसतो तर उद्देश आश्चर्य व्यक्त करणे हाच असतो.
८१) बायबलद्वारा माहीत होते की आदरणीय इब्राहीम (अ.) यांचे वय त्या वेळी 100 वर्षे आणि आदरणीय सारा यांचे वय 90 वर्ष होेते.
८२) म्हणजे स्वभावत: या वयात माणसाला संतती प्राप्त होत नाही. परंतु अल्लाहच्या कृपेने असे होणे काही असंभव नाही. जेव्हा ही शुभवार्ता तुम्हाला अल्लाहकडून देण्यात येत आहे, म्हणून काहीच कारण नाही की तुमच्यासारख्या ईमानधारक स्त्रीने आश्चर्य व्यक्त करावे.
८३) 'भांडण' शब्द या ठिकाणी त्या अत्याधिक प्रेम आणि गर्वपूर्ण संबंधाला व्यक्त करतो जे आदरणीय इब्राहीम (अ.) अल्लाहशी ठेवून होते. या शब्दाने हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते की दास आणि अल्लाहच्या दरम्यान दीर्घकाळ संवाद चालत राहिला असेल. दास आग्रह करतो की लूतच्या लोकसमुदायावरून प्रकोप टाळला जावा. अल्लाह उत्तरात सांगतो की हे राष्ट्र भलाई आणि सदाचारापासून पूर्णरिक्त झाले आहे आणि याचे अपराध आता त्या सीमेपार झाले आहेत ज्यांना आता क्षमा केली जाऊ शकत नाही. परंतु दास आपला हट्ट सोडत नाही आणि पुन्हा पुन्हा म्हणतो, "पालनर्कत्या प्रभु! त्यात थोडीशी भलाई शिल्लक असेल तर त्याला आणखीन सवलत दे, शक्य आहे त्यामुळे सुधार होईल." बायबलमध्ये या भांडणाचे स्पष्टीकरण दिले आहे परंतु कुरआनचे संक्षिप्त वर्णन अधिक व्यापक अर्थ ठेवून आहे. (उपत्ति 18:23-32)
Post a Comment