(५८) मग जेव्हा आमची आज्ञा आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेने हूद (अ.) ची आणि त्या लोकांची ज्यांनी त्याच्याबरोबर श्रद्धा ठेवली होती, सुटका केली आणि एका कठोर प्रकोपापासून त्यांना वाचविले.
(५९) हे आहेत आद, आपल्या पालनकत्र्याच्या वचनांचा यांनी इन्कार केला, त्याच्या पैगंबरांचे ऐकले नाही,६५ आणि सत्याच्या प्रत्येक जबरदस्त शत्रूचे अनुकरण करीत राहिले.
(६०) सरतेशेवटी या जगातदेखील त्यांचा धिक्कार केला गेला आणि पुनरुत्थानाच्या दिवशीसुद्धा. ऐका! आदनी आपल्या पालनकत्र्याशी विद्रोह केला. ऐका! दूर फेकले गेले आद, हूद (अ.) यांच्या राष्ट्राचे लोक.
(६१) आणि समूदकडे आम्ही त्यांचा भाऊ सॉलेह (अ.) ला पाठविले.६६ त्याने सांगितले, ‘‘हे माझ्या देशबंधुंनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही. तोच आहे ज्याने तुम्हाला भूमीपासून निर्माण केले आणि येथे तुम्हाला वसविले,६७ म्हणून तुम्ही त्याची क्षमायाचना करा६८ आणि त्याच्याकडे परतून या. निश्चितच माझा पालनकर्ता जवळच आहे आणि तो प्रार्थनांना उत्तर देणारा आहे.’’६९
६५) त्यांच्याजवळ जरी एकच पैगंबर आला होता. परंतु ज्याचे त्यांनी आवाहन केले तेच आवाहन होते जे प्रत्येक युगात आणि राष्ट्रात अल्लाहचे पैगंबर प्रस्तुत करीत होते. म्हणूनच एक पैगंबराचे म्हणणे मान्य न करण्याला सर्व पैगंबरांची अवज्ञा करणे असे म्हटेल आहे.
६६) सूरह ७, आयत ७३-८४ यांच्या टीपांना डोळयांसमोर ठेवावे.
६७) हा तर्वâ आहे त्या दाव्याचा जो पहिल्या वाक्यात केला होता की अल्लाहशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. अनेकेश्वरवादी स्वत: या गोष्टीला मान्य करीत होते की त्यांचा निर्माणकर्ता अल्लाहच आहे. याच सर्वमान्य तथ्यावर तर्काचा आधार तयार करून आदरणीय सॉलेह (अ.) त्यांना समजावून सांगतात की जेव्हा तो अल्लाहचा आहे ज्याने धरतीच्या निर्जीव पदार्थाच्या मिश्रणाने तुम्हाला हे मानवी अस्तित्व प्रदान केले आणि या धरतीवर तुम्हाला आबाद करणारा अल्लाहच आहे. असे असताना अल्लाहशिवाय ईशत्व दुसऱ्या कुणाचे असू शकते? कोणा दुसऱ्याला हा अधिकार कसा प्राप्त् होऊ शकतो की तुम्ही त्याची उपासना व पूजा करावी?
६८) म्हणजे आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांची उपासना आणि पूजाअर्चा करत होता, या अपराधाची आपल्या निर्माणकत्र्या स्वामीशी क्षमा मागावी.
६९) हे विवरण अनेकेश्वरवादींच्या एका मोठ्या भ्रमाचे आहे. हा भ्रम सामान्यता सर्व अनेकेश्वरवादी लोकात आढळतो. मानवाला अनेकेश्वरत्वाकडे आकर्षित करण्यात हा भ्रम मूळ कारणांपैकी एक आहे. हे लोक अल्लाहला आपल्या राजे-महाराजे आणि बादशहासारखे समजतात जे आपल्या जनतेपासून दूर राजमहालात ऐश करत असतात. त्यांच्या दरबारात सामान्य माणसाला प्रवेश नसतो. एखादा विनंती अर्जसुद्धा पोहचविण्यासाठी दरबारी लोकांपैकी एखाद्याची मदत घ्यावी लागते. या विचारामुळे हे लोक असा गैरसमज करून घेतात आणि हुशार लोकांनी त्यांना असे समजाविण्याचे हेतूपुरस्सर प्रयत्न केले आहेत की सृष्टीनिर्मात्या स्वामीचे पवित्र स्थान (आस्थाना) सर्वसामान्य माणसाच्या पकडीपासून अतिदूर आहे. त्याच्या दरबारापर्यंत सामान्य माणसाला कसे जाता येईल? तेथे प्रार्थना पोहचणे आणि नंतर त्यांचे उत्तर मिळणे तर असंभव आहे. यासाठी पवित्र आत्म्यांचा वशीला (माध्यम) घेतला पाहिजे. आणि पवित्र आत्मे, धर्माच्या ठेकेदारांची सेवा वशिला म्हणून घेतली जाते. कारण हे देवांपर्यंत आपले नैवेद्य, नजराणे व विनंतीअर्ज पोहचविण्याची रीत चांगलीच जाणतात. लोकांच्या (मुश्रिक) या गैरसमजुतीमुळे आणि भ्रमामुळे दास आणि अल्लाह दरम्यान अनेकानेक उपास्य, शिफारसकार (दलाल) यांची गर्दीच गर्दी झाली आहे. आदरणीय सॉलेह (अ.) अज्ञानतेच्या या पूर्ण मायाजालास केवळ दोन वाक्यांत तोडून फेवूâन देतात. एक म्हणजे अल्लाह अगदी जवळ आहे. दुसरे म्हणजे अल्लाह प्रार्थनेचे उत्तर देणारा आहे. तुमचा हा विचार चुकीचा आहे की अल्लाह तुमच्यापासून लांब आहे आणि हेसुद्धा चुकीचे आहे की तुम्ही सरळ त्याला पुकारून आपल्या प्रार्थनेचे उत्तर प्राप्त् करू शकत नाही. तुमच्यापैकी एक एक माणूस अल्लाहला आपल्याजवळच पाहू शकतो. त्याच्याशी गुप्त्वार्ता करू शकतो व आपले अर्ज सरळ त्याला देऊ शकतो. अल्लाह आपल्या प्रत्येक दासाच्या प्रार्थनेचे उत्तर स्वत: देतो. म्हणजे सृष्टीनिर्माणकत्र्याचा आणि सृष्टीशासकाचा आम दरबार नेहमी प्रत्येकासाठी खुला असतो. अल्लाह प्रत्येकाजवळ आहे. तुम्ही कोणत्या अविचारी दशेत पडलेले आहात की त्यासाठी तुम्ही वशिले आणि शिफारसकार शोधत फिरत आहात? (पाहा सूरह २, टीप १८८)
Post a Comment