Halloween Costume ideas 2015

हाथरसमध्ये लोकशाही की तानाशाही !


14 सप्टेंबरला हाथरसची घटना अंगावर शहारे येणारी आहे व हाथरससारख्या घटना देशात अजूनही सुरूच आहे. यात न्याय कमी परंतु राजकारणाचा जास्त वास येत आहे. महिलांवरील वाढते अत्याचार पहाता महिलांना वाय प्लस सुरक्षा देणार, की आणखी कोणती सुरक्षा देणार कि त्यांना वार्‍यावर सोडणार!

स्वतंत्र भारतात महिलांनी आणखी किती अत्याचार सहन करावे. देशातील केंद्र व राज्य सरकारे महिला सशक्तीकरणाची भाषा करतात आणि देशात हजारो महिलांवरील बलात्कारासारख्या घटना घडतात मग महिला सुरक्षीत कशा काय? महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारने पोकळ आश्‍वासने देने ताबडतोब बंद केले पाहिजे. 130 कोटी जनता संभ्रमात आहे की महिलांवरील अत्याचार केव्हा थांबनार? महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत भेदभाव का? एका महिलेला राजकीय हेतूने आपण वाय प्लस सुरक्षा प्रदान करतो आणि लाखो महिला असुरक्षित आहेत त्याकडे केंद्र व राज्य सरकारांचे लक्ष का नाही? उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेली सामुहिक बलात्काराची घटना अंगावर शहारे आणणारी आहे. बलात्काराच्या अनेक घटना उत्तरप्रदेशात घडत असतात. यावरून स्पष्ट होते की उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यांतील महिला, मुली असुरक्षित आहेत. 

एकीकडे सिलेब्रिटी महिलेला आपण वाय प्लस सुरक्षा प्रदान करतो. तर दुसरीकडे सर्वसाधारण महिलांवर घृणास्पद आणि निर्ममतेने अत्याचार करणार्‍यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतो ? यात दोषी कोण याचाही विचार करण्याची गरज आहे. 19 वर्षीय पीडित महिलेची जगण्याची झुंज अखेर 29 सप्टेंबर मंगळवारला अपयशी ठरली. अशा भयावह घटना प्रत्येक राज्य सरकारांनी रोखल्या पाहिजे व याकरिता केंद्रानेही साथ देण्याची गरज आहे. कारण बलात्कारासारखे घृणित कृत्यकरून क्रूरता दाखविणार्‍या दोषींना फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ताबडतोब फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. भारतात उत्तर प्रदेश गुन्हेगारीच्या बाबतीत अव्वल असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. कारण उत्तर प्रदेशात स्वयंघोषित डॉन व बाहुबलींची काही कमी नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा असो कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. देशात ज्या महीलेला सरकारी सुरक्षेची गरज नाही अशा महीलेला सरकार वायप्लस सुरक्षा प्रदान करते व सर्वसाधारण महिलांना सुरक्षेच्या बाबतीत वार्‍यावर सोडल्या जाते. ही बाब भारतासारख्या लोकशाही देशाला काळीमा फासणारी घटना आहे. देशात सध्याच्या परिस्थितीत बलात्कार प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकारण होत असल्याचे दिसून येते. आम जनतेसमोर प्रश्‍न आहे की हाथरस सामुहिक बलात्कारप्रकरणी पीडितेचा प्रशासनाने अचानक पहाटे 3 वाजता अंतीमसंस्कार का केला? हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रश्‍न आहे. या घटनेत अवश्य राजकारण होत आहे व गुन्हेगारांना वाचवीण्याचा प्रयत्न होत आहे. हाथरस कांडानंतर योगी आदीत्यनाथने पीडित परीवाराला 25 लाख रुपये,घर व घरातील एका व्यक्तीला सरकारी नौकरी देण्याची घोषणा केली आणी आता सरकारी सुत्र सांगत आहे की बलात्कार झालाच नाही. ही अत्यंत दुर्दैवीबाब आहे. हाथरस प्रकरणातील सर्व आरोपींना ताबडतोब फाशीची सजा व्हायलाच पाहिजे. आता सत्तापक्ष व विरोधकांमध्ये रेप झाला की नाही यावर सुध्दा राजकारण सुरू आहे.

हाथरसची घटना अंगावर शहारे आणणारी आहे. त्यामुळे अशा घृणास्पद कृत्याच्या विरोधात सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे. यात राजकारण नकोच.राजकीय पुढारी आता हाथरस कांड बाजुला सारून राजस्थानवर आल्याचे दिसून येते. यावरून राजकीय पुढारी आपली पोळी शेकण्याकरीता भाजपा विरूद्ध काँग्रेस असा आखाडा सुरू झाला आहे. भाजपावाले म्हणतात की काँग्रेस शासीत राज्यात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे आणि काँग्रेस म्हणते की भाजप शासीत राज्यात बलात्काराचे प्रकरण जास्त आहे. हे चालते तरी काय! यांच्या या घाणेेरड्या राजकारणात सर्वसामान्य भरडले जातात व मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. हाथरसवरून प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी शेकत आहे ! परंतु पक्ष-विपक्ष एकास्वरात बलात्कार्‍यांना फाशीची सजा झालीच पाहिजे असे समोर येवून बोलायला तयार नाहीत. युपी सरकार आता पुन्हा शंकेच्या फेर्‍यात आली आहे. कारण पीडितेचा अचानक अंतीम संस्कार करणे व डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये बलात्कार न झाल्याचे सांगितले आहे. यात अवश्य पीडितेच्या परिवारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे व अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. सध्याच्या परिस्थितीत हाथरसचे पोलीस छावणीत रूपांत झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणात प्रश्‍न चिन्ह उभे होतेे. यावरून स्पष्ट होत आहे की बलात्कारी गुन्हेगारांना कोणीतरी पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. परंतु मी राष्ट्रपती व सरकारला आग्रह करतो की गुन्हेगारांना मृत्यूदंड देण्यासाठी ताबडतोड कार्यवाही करावी. बलात्कारासारख्या घृणास्पद घटना रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने एकत्र येऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे. हाथरस घटनेत बलात्कार झालेला नाही हे प्रशासनाचे वक्तव्य दुर्भाग्य पुर्ण आहे. राजकीय पुढार्‍यांनो वार-पलटवार करने बंद करा आणि बलात्कारासारख्या घटना कशा रोखता येईल याकडे लक्ष केंद्रित करा व गुन्हेगारांना ताबडतोब शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी जनता करीत आहे. 

केंद्र सरकारसुध्दा आश्‍चर्य कारक निर्णय घेतांना दिसत आहे. कारण कंगणा राणावतला वाय प्लस सुरक्षा मग देशातील सर्वसामान्य व इतर महिलांना कोणती सुरक्षा प्रदान करणार यावर केंद्र व राज्य सरकारांनी  खुलासा करणे गरजेचे आहे.कारण बलात्कारासारख्या घटना होणे म्हणजे देशाला काळीमा फासणारी घटना आहे. याकरीता अशा घृणीत कृत्याबद्दल कठोर कारवाई करीता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहीतीनुसार देशात महिला अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. दर दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्याचप्रमाणे 2019 च्या सर्वेमध्ये राजस्थानमध्ये 5997 बलात्काराच्या घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे तर युपीत 2485 बलात्कार झाल्याच्या घटना सांगण्यात येत आहे.परंतु आता कोणत्या राज्यात किती बलात्कार व अत्याचार झाले हे सांगण्याची वेळ नाही.आता वेळ आहे बलात्कार करणार्‍या नराधमांना ताबडतोब फासावर लटकवीने. निर्भया प्रकरणातील नराधमांना फाशी झाली त्यानंतर अत्याचार कमी झाले काय?हाही प्रश्‍न समाजापुढे उभा ठाकला आहे. लैंगिक अत्याचारानंतर पीडितेचे पार्थीव तिच्या कुटुंबीयांना न सोपविण्याची उत्तर प्रदेश पोलिसांची कर्तबगारी भयानक वाटत आहे.

उत्तरप्रदेशातील हाथरसची घटना झाली त्या पाठोपाठ राज्यात घटनांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे प्रश्‍न आहे की युपीतील क्रौर्य का संपत नाही. हाथरस नंतर बलरामपुर येथे 22 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. भदोहीतही अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तीचे डोके चिरडून हत्या करण्यात आली. म्हणजे अजुनही युपीतील बलात्कार व हत्येची कडी थांबलेली नाही. याला काय म्हणावे? 

मीडियामध्ये तब्बल 3 महीने सुशांत-रिया-कंगणाची सीरिज चालली नंतर जयाबच्चन- पायल घोष-अनुराग कश्यपचा सीलसीला सुरू होता. परंतु आता महिलांवरील अत्याचार, बलात्कार यावर चर्चा करून मीडियाने समाजमन बदलावे. अशा अनेक समाजोपयोगी प्रश्‍नांवर मिडियाने मोहीम हाती घ्यावी. सरकारला मी आग्रह करतो की मिडियावर निर्भया,पीडीतांवर चर्चा होत असतांना राजकारण खेळून तमाशा करने राजकीय पुढार्‍यांनी बंद करावे. मीडियाच्या माध्यमातून असेही सांगण्यात येत आहे की मृतक पीडीतेच्या परीवाराला भेटण्यास मिडियावर बंद टाकली आहे व 144 कलम लावून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु कोणताही पोलिस अधिकारी हाथरस केसबद्दल एकही शब्द बोलायला तयार नाही. यावरून स्पष्ट होते की हाथरस केसमध्ये कुछ तो भी ’दाल मे काला है.’ मी मिडियाला आग्रह करतो की ज्याप्रमाणे सुशांत-रिया-कंगणा व ड्रग्ज केस लगातार 3 महीने मिडियावर चालली त्याचप्रमाणे हाथरस सारख्या घटना व महिलांवरील अत्याचार यांचा उलगडा करण्यासाठी मिडीयाने युद्ध पातळीवर मोहीम चालवली पाहिजे.कारण हाथरस घटना घृणास्पद व चीड उत्पन्न करणारी आहे. युपीचे डीएम पीडीत परीवाराला धमकावत असल्याचे सांगण्यात येत आहे. एस.आय.टी.चा हवाला देत मिडिया,राजनेता व अन्य कोणालाही पीडीत परीवाराला भेटण्यास परवानगी सरकार देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. याला हीटलर शाही म्हणावी की लोकशाही की ठोकशाही! हाथरस कांडाला पाहता अचानक डीएमने लॉकडाउन घोषीत केला ही अत्यंत दुर्भाग्यपूर्णबाब आहे. बलात्कारसारख्या घटनांना मोबाईल सारख्या सोशल मिडिया सुध्दा जबाबदार आहे याला नाकारता येत नाही. यावरसुध्दा अंकुश लावण्याची गरज आहे. पीडिता जिवीत होती तेव्हाही तीला न्याय मिळाला नाही आणि मृत्यूनंतरही तीच्या परिवाराला सुध्दा न्याय मिळाला नाही ही कसली व्यवस्था म्हणावी. त्यामुळे लोकांच्या मनात विचार येतो की लोकशाही आणि शांतीचे दुत समजल्या जाणार्‍या देशात हे चाललय तरी काय! मी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष यांना विनंती करतो की बलात्कारासारख्या घृणास्पद घटना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्या करीता युद्ध पातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजे.


- रमेश लांजेवार, 

नागपूर, 9325105779


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget