Halloween Costume ideas 2015

हाथरस येथील दलित तरूणीची हत्या; आश्‍चर्य ते काय?

Hathras

ज्या समाजाचा पाया न्यायावर ठेवलेला नसून जातीवर ठेवलेला आहे त्या समाजात अशा घटना घडतातच. लोक आपल्या जातीच्या लोकांचे समर्थन करतातच. आसिफाच्या बाबतीतही असे झाले होते. यात आश्‍चर्य ते काय?


उत्तर प्रदेश निर्विवादपणे देशातील सर्वात धोकादायक प्रदेश बनलेला आहे. तेथे कुठलाच दिवस असा जात नाही जेव्हा कुठे न कुठे संवेदनशील गुन्हे होत नाहीत. हाथरस जिल्ह्याअंतर्गत येणार्‍या चंदपा तहसीलच्या एका छोट्या गावामध्ये 14 सप्टेंबरला एका दलित मुलीवर बलात्कार झाला. 500 लोकवस्तीच्या छोट्याशा गावमध्ये 150 दलित राहतात. इतर ठाकूर आणि ब्राह्मण आहेत.
   14 सप्टेंबरला एक 19 वर्षीय दलित तरूणी आपल्या आईबरोबर शेतात काम करत होती. काम-करत करत त्या दोघी एकमेकांपासून थोड्या लांब अंतरावर गेल्या. तेवढ्यात तरूणीला एकटी पाहून चार सवर्ण तरूणांनी बाजरीच्या शेतामध्ये तिच्यावर सामुहिक बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. मारहाणीमध्ये तिच्या पाठीच्या कण्याचे हाड तुटले. काम आटोपल्यावर आईने मुलगी कुठे आहे, याचा अंदाज घेतला असता पिकामध्ये ती नग्न अवस्थेत सापडली.
    या घटनेची नोंद उत्तर प्रदेशाच्या पोलिसाच्या सवयीप्रमाणे त्यावेळेस घेण्यात आली नाही. ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद या दलित नेत्याने प्रशासनावर दबाव टाकला, तेव्हा एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी पीडितेला अलिगढच्या सरकारी रूग्णालयामध्ये दाखल केले. नंतरने तिला दिल्लीच्या सफतरजंग रूग्णालयात वर्ग करण्यात आले. तेथे तिने या आठवड्यात अंतिम श्‍वास घेतला. पोलिसांकडे पीडितेच्या आईने विनवनी केली की आमच्या रितीरिवाजाप्रमाणे तिच्या प्रेताला हळद लावून अंतिम संस्कार करावयाचे आहेत, प्रेत आमच्या ताब्यात द्या. मात्र पोलिसांचे क्रौर्य इतके की त्यांनी पीडितेच्या आईची विनंती अमान्य केली व अर्ध्या रात्री परस्पर तिच्या प्रेताला अग्नी देऊन प्रेताची विल्हेवाट लावली. या संदर्भात पोलिसांनी चार सवर्ण तरूणांना ज्यांची नावे रामसिंह, संदीप सिंह, लवकुश आणि रवि आहेत यांना अटक केली. ही अटक होताच गाव आणि गावाच्या आजूबाजूतील सवर्ण लोक खवळले आणि त्यांनी तडक हाथरसच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन चारही तरूणांना पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने या गुन्ह्यात गोवले असल्याचे कारण सांगत त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली.
    ही घटना म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जंगलराज असल्याचे हे एक अत्यंत व्यथित करणारे उदाहरण आहे. कारण या घटनेला फेक न्यूज म्हणून राज्य सरकारतर्फे अधिकृतरित्या सुरूवातीला नाकारण्यात आल्याचे काँग्रेस सांसद राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे.
    स्थानिक प्रशासनाने या घटनेला गांभीर्याने घेतलेच नाही. शिवाय अलिगढ रूग्णालयामध्येही तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाहीत. उलट अलिगढच्या या रूग्णालयात अशा गंभीर रूग्णाच्या इलाजाची सोयच नसल्याचा अनेकांचा आरोप आहे. दिल्लीमध्ये या घटनेला निर्भया-2 असे म्हटले जात आहे. या बाबतीत दलित नेता चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे की, ”हाथरसच्या आमच्या बहिणीवर जे पाश्‍वीक अत्याचार केले गेले ती आता या जगात नाही. मी सुरूवातीपासून मागणी करत होतो की, तिला एम्समध्ये भरती करा पण भाजप सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. आमच्या बहिणीच्या मृत्यूस जबाबदार जेवढे आरोपी आहेत तेवढेच उत्तर प्रदेश सरकारही जबाबदार आहे.”
    ज्या समाजाचा पाया न्यायावर ठेवलेला नसून जातीवर ठेवलेला आहे त्या समाजात अशा घटना घडतातच. आरोपींच्या बाजूने त्यांच्या जातीचे लोक येतातच. आसिफाच्या बाबतीतही असे झाले होते. यात आश्‍चर्य ते काय? खरे आहे! स्त्रीला इस्लामी जीवन व्यवस्थेमध्येच सुरक्षा मिळते. इतर व्यवस्थेत नाही.Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget