लातूर
भारतीय कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे नुकतेच अस्तित्वात आले. ज्याचा विरोध देशभरातील शेतकरी संघटना पूर्ण ताकदनिशी करीत आहेत. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रा तर्फेही शेतकरी विरोधी असलेल्या या कायद्यांच्या विरोधात शेतकर्यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 30 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जमाअते इस्लामी हिंद आणि मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस या संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शन करून निवेदन देण्यात आले.
यात मोठ्या प्रमाणात जमाअत आणि एमपीजेचे कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी यावेळी उपस्थित होते. उदगीर येथे वसीयोद्दीन हाश्मी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींच्या नावे निवेदन येथील उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयात देवून या विधेयकांना परत घेऊन देशभरातील विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. लातूर येथे एमपीजेचे शहराध्यक्ष साबेर काझी यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांनी जिल्हाधिकारी लातूर यांना भेटून आपले म्हणणे लिखित स्वरूपात दिले.
Post a Comment