Halloween Costume ideas 2015

श्रद्धा - अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकेाण

भारतीय राजकारणामध्ये भाजपाच्या उत्कर्षाच्या समांतर शिक्षणाच्या पतनाची प्रक्रिया सुरू आहे. देशाच्या नवीन शैक्षणिक नीतिचे अंतिम स्वरूप काय असेल, हे जाणून घेणे बाकी जरी असले तरी भाजपा अभ्यासक्रम आणि शोधकार्याला कोणती दिशा देउ पाहत आहे, हे तिच्या नेत्यांच्या भाषणांमधून स्पष्ट झालेले आहे. केंद्रीय मनुष्य विकासबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निषंक यांनी अलिकडेच शिक्षकांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितले की, संस्कृत ही जगातील सर्वात मोठी वैज्ञानिक भाषा आहे आणि देशाच्या शिर्ष शैक्षणिक संस्थांना या भाषेवर काम करायला हवे. त्यांच्या अनुसार येत्या काळात संस्कृत हीच संगणकाची भाषा असेल. याशिवाय, मंत्री साहेबांनी अनेक इतर रहस्योदघाटनही केले जे त्यांच्या ज्ञानाच्या व्यापकतेचे द्योतक होते. त्यांनी आपल्या भाषणात अणू आणि परमाणूच्या शोधाचे श्रेय महर्षी चरक यांना एकदा तर दूसर्‍यांदा प्रणव ऋषी यांना दिले. त्यांच्या अनुसार नारद ऋषींनी सर्वप्रथम परमाणू संबंधी प्रयोग केले. ते जेव्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की, ज्योतिषशास्त्र हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. पोखरीयाल यांचे म्हणणे आहे की, गुरूत्वाकर्षणाच्या सिद्धातांची चर्चा प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये आहे. न्यूटनच्या फार पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी गुरूत्वाकर्षणाबद्दल माहिती करून घेतली होती.
    अशा प्रकारचे दावे करणारे (उर्वरित पान 7 वर)
पोखरीयाल एकटे नाहीत. केंद्रीय मानव मनुष्यबळ विकास मंत्री असताना मुरली मनोहर जोशी यांनी अभ्यासक्रमामध्ये ज्योतिषविद्या आणि पौरोहित्यासारखे विषय सामील करून घेतले होते. त्यांनी शाळेमध्ये मुलांना शिकविल्या जाणार्‍या इतिहासाचेही सांप्रदायिकीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. यालाच पुढे शिक्षणाच्या भगवेकरणाचे नाव देण्यात आले. मोदींच्या सत्तेमध्ये आल्यानंतर प्राचीन भारता संबंधात अचंभित करणारे दावे केले जात आहेत. मुंबईच्या एका हॉस्पीटलच्या उद्घाटनावेळेस स्वतः मोदींनी म्हटले होते की, भगवान गणेश या गोष्टीचा पुरावा आहे की, प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरी होती. संघ परिवाराच्या नेत्यांनी आपले जे ज्ञानवर्धन केलेले आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं म्हणता येईल की, प्राचीन भारतात विमाने, मिजाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन आणि जेनेटिक इंजिनिअरिंग या बाबी सामान्य होत्या. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अगोदरच स्पष्ट केलेले आहे की, विज्ञानाच्या प्रगतीसाठी वेदांचा अभ्यास अनिवार्य आहे.
    राजकीय क्षेत्रात गायीच्या प्रवेशासोबत प्राचीन ज्ञानाचे गुणगान करण्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की गायींमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. आणि गायीकडून मिळणारे प्रत्येक उत्पादन दैवीशक्ती आणि चमत्कारिक गुणांनी संपन्न आहे. सरकारने एक उच्चस्तरीय समितीचे गठण करून पंचगव्य (शेण, गोमुत्र, दूध, दही आणि तूपाचे मिश्रण) वर शोध करण्याची जबाबदारी सोपविली आहे. रामायण आणि महाभारतातील कथांना वैज्ञानिक कथा म्हणून सिद्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
    एकूणच प्रयत्न हा ही आहे की, श्रद्धा ही ज्ञानाची पर्यायवाची संज्ञा बणून जाईल. प्राचीन भारताला एका आधुनिक युगात सादर करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. ज्यामध्ये हजारो वर्षांपूर्वी अनेक वैज्ञानिक गोष्टी उपलब्ध होत्या. ज्या पाश्‍चिमात्य देशांनी मागच्या शंभर दीडशे वर्षात प्राप्त केलेल्या आहेत. हे दावे हिंदू राष्ट्राला मजबूत बनविण्याच्या व्यापक परियोजनेचा एक भाग आहे. पूर्व केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी म्हटले होते की, डार्विनचा क्रम - विकास सिद्धांत यासाठी बरोबर नाही की आमच्या पूर्वजांनी माकडाला मनुष्यामध्ये रूपांतरित होताना पाहिलेले नाही. असे नाही की, विज्ञानाला खोटे सिद्ध करण्याचे दावे फक्त हिंदू धर्माचेच अनुयायी करत आहेत. ख्रिश्‍चन कट्टर पंथियांनीही डार्विनच्या सिद्धांताच्या उत्तरादाखल विश्‍वाची निर्मिती ही ईश्‍वरीय असल्याचा सिद्धांत प्रतिपादीत केला होता. जियाउल हकच्या शासन काळात पाकिस्तानमध्ये एक प्रस्ताव आणला गेला होता की, विजेच्या टंचाईचा सामना करण्यासाठी जीन्नात (एलियन्स)च्या शक्तीचा उपयोग करून घेण्यात यावा.
    खरं पाहता पूर्वीपासूनच जगातील प्रत्येक भागात तार्किक विचारांचा विरोध होत आलेला आहे. भारतात जेव्हा चार्वाक यांनी हे माणण्यास स्पष्ट नकार दिला होता की वेद दैवीय रचना आहेत. तेव्हा त्यांना त्रास दिला गेला. आणि लोक परंपरा जिच्या अंतर्गत स्वतंत्र विचारसरणीला प्रोत्साहित केले जात होते चे दानवीकरण केले गेले होते. युरोपमध्ये गॅलिलीओ आणि अन्य वैज्ञानिकांसोबत चर्चने जो व्यवहार केला तो आपल्या सगळ्यांना माहित आहे. तार्किक विचार शक्तीला समाजातील शक्तीशाली वर्ग मग तो सामंत असोतकी पुरोहित आपल्या वर्चस्वाला आव्हान समजतात.
    भारतात राष्ट्रवादाच्या उदयासोबत आंबेडकर, भगतसिंग, नेहरू सारख्या नेत्यांनी तार्किक विचारसरणीला प्रोत्साहित केले आहे. जे लोक समानतेवर आधारित आधुनिक लोकशाही भारताच्या निर्माणाच्या विरोधात होते. ज्या लोकांनी इंग्रजांच्या विरूद्ध कधीच संघर्ष केला नाही, जे जमीनदार, राजा आणि पुरोहित वर्गाचे समर्थक होते ते सुद्धा तार्किक विचारांचे विरोधी होते. या समुहाला वाटत होते की, देशात ज्या पद्धतीचे सामाजिक परिवर्तन होत आहे त्यामुळे भारताच्या गौरवशालीत ऐतिहासिक प्रतीमेला तडा जाईल. नेहरूंची ही मान्यता होती की, वैज्ञानिक विचारसरणी हीच भविष्यातील आधुनिक भारताचा पाया असेल. हेच कारण आहे की, वैज्ञानिक विचारसरणीला प्रोत्साहित करण्याचे कलम राज्यासंबंधीच्या नीति निर्देशक तत्वांमध्ये सामील केली गेली आहे. आणि याच विचारसरणीअंतर्गत भारतीय प्रोद्योगिक संस्थान, विज्ञान आणि औद्योगिक अनुसंधान परिषद व भाभा परमाणु अनुसंधान केंद्र सारख्या वैज्ञानिक संस्था उभ्या केल्या गेल्या.
    मागच्या काही दशकामध्ये हिंदू राष्ट्रवादी राजकारणाच्या उदयाबरोबर नेहरूंच्या नीतिला चुकीचे ठरवले जात आहे. आणि तार्किक विचारसरणीला विदेशी अवधारणा म्हणून संबोधित केले जात आहे. आस्थेला वैज्ञानिक आणि तार्किकतेपेक्षा उच्च स्थान दिले जात आहे. हेच कारण आहे की, अंधश्रद्धेच्या विरूद्ध लढणारे या लोकांच्या गोळ्यांना बळी पडत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना याचसाठी आपला जीव गमवावा लागला. कारण की ते तार्किकता आणि वैज्ञानिक विचारसरणीचे पक्षधर होते. या उलट मोदीपासून ते निषंक पर्यंत हिंदू राष्ट्रवादी नेते एकीकडे तार्किक विचारसरणीचे विरोधक आहेत तर दूसरीकडे जन्मावर आधारित असामनतेचे समर्थक. हिंदू राष्ट्रवाद श्रद्धेला ज्ञान आणि विज्ञानच्या बरोबरीने दाखवून प्राचीन भारताचे उद्दातीकरण करत आहेत. त्याचा अंतिम उद्देश त्या युगा सारख्याच पदक्रम आधारित समाजाची पुनर्स्थापना करणे होय.

- राम पुनियानी
(मूळ इंग्रजी लेखाचा हिंदी अनुवार अमरिश हरदेनिया यांनी केला तर हिंदीचे मराठी भाषांतर एम.आय.शेख, बशीर शेख यांनी केले. )

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget