माझी गणना आपले वाईट चिंतणार्यांमध्ये होईल जर का मी स्पष्टपणे आपल्याला हे नाही सांगितले की, आपल्या जीवनातील खरी समस्या काय आहे? माझ्या मते आपले वर्तमान आणि भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आपण त्या मार्गदर्शनासोबत कसा व्यवहार करताय, जे मार्गदर्शन आपल्यापर्यंत प्रेषित (सल्ल.) यांच्या मार्फत पोहोचलेले आहे. ज्यामुळेच आपल्याला मुसलमान म्हटले जात आहे. आणि त्या मार्गदर्शनाशी तुमच्या असलेल्या संबंधामुळे तुम्हाला आवडो किंवा न आवडो जगामध्ये तुम्हाला इस्लामचे प्रतिनिधी मानले जात आहे. जर आपण या ईश्वरीय मार्गदर्शनाची खरी अंमलबजावणी व वकिली केली, आणी आपल्या वाणी व वर्तनाने ती खरी असल्याची साक्ष दिली, शिवाय आपले सामुहिक चारित्र्य इस्लामचे खरे-खुरे प्रतिनिधीत्व करत गेले तर आपण जगातच नव्हे तर आखिरतमध्येही यशस्वी व्हाल. आणि भीती, दुःख, अपमान, निर्धणता, गुलामी आणि पराधिनतेचे हे काळे ढग जे आज आपल्यावर आलेले आहेत, काही वर्षाच्या आत निघून जातील.
सत्याकडे (सत्यधर्म अर्थात इस्लामकडे) आपले बोलावणे लोकांच्या बुद्धी आणि मनाला मोहित करत जाईल. आपला सन्मान जगात वाढत जाईल. न्यायाची अपेक्षा आपल्याकडून केली जाईल. विश्वास आपल्यावर केला जाईल. पुरावा आपण बोललेल्या गोष्टीचा दिला जाईल. कल्याणाची आशा आपल्याकडून केली जाईल. धर्मविरोधी नेत्यांचा सन्मान आपल्या तुलनेत क्षुल्लक होऊन जाईल. त्यांचे सर्व निर्णय राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून आपल्या खर्या आणि सत्याच्या आवडीच्या तुलनेमध्ये खोटे आणि फोल सिद्ध होतील. आणि त्या शक्ती ज्या आज त्यांच्या गोटामध्ये दिसत आहेत लवकरच त्यांच्यापासून विलग होवून इस्लामच्या गोटात येताना दिसतील. इथपर्यंत की एक वेळ अशी येईल जेव्हा साम्यवाद मास्कोमध्ये आपल्या रक्षणासाठी भटकताना दिसेल. भांडवलशाही स्वतः वॉश्िंगटन आणि न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या रक्षणासाठी व्याकूळ असल्याचे दृश्य दिसेल. भौतिकवादी आणि नास्तीक (लोक) लंडन आणि पॅरिसच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यामध्ये असमर्थ ठरतील. वंशवादी आणि राष्ट्रवादी लोकांना ब्राह्मण आणि जर्मन लोकांमधून सुद्धा आपले समर्थक मिळणार नाहीत. त्यांचा काळ इतिहासामध्ये केवळ एक बोधकथेच्या रूपामध्ये शिल्लक राहील आणि हे ही नमूद केले जाईल की इस्लामचे समर्थक जागतिक आणि विश्वविजयी शक्तीचे प्रतिनिधी कधीकाळी इतके मूर्ख होऊन गेले होते की, मुसा (अलै.) ची काठी त्यांच्या बगलेमध्ये होती आणि खाली पडलेल्या लाठ्या आणि दोर्यांकडे पाहून त्यांचा थरकाप उडत होता.
हे भविष्य तर आपले त्यावेळेस होईल ज्यावेळी आपण इस्लामचे खरे समर्थक आणि खरे साक्षीदार व्हाल. मात्र जर का याच्या विपरित आपले वर्तन राहिले आणि ईश्वराने पाठविलेल्या या मार्गदर्शनावर आपण सापासारखे वेटाळा घालून बसाल, न स्वतः त्याचा फायदा घ्याल न दुसर्यांना घेउ द्याल. स्वतःला मुस्लिमांच्या प्रतिनिधीच्या रूपाने जगासमोर सादर कराल, परंतु आपली सामुहिक कथनी आणि करनी यातून जी साक्ष जाईल ती अज्ञानतेची, शिर्क, चंगळवादी आणि नैतिक अधःपतनाची जाईल.
कुरआन घरात उंच जागी ठेवलेला आहे आणि मार्गदर्शनासाठी आपण धर्मभ्रष्ट नेते आणि पथभ्रष्ट करणार्या प्रत्येकाशी संपर्क जोडत आहात. आपण दावा अल्लाहच्या बंदगीचा करता आणि प्रत्यक्ष बंदगी सैतान आणि अल्लाहशिवाय इतरांची केली जात आहे. मित्रत्व आणि शत्रूत्व व्यक्तिगत लाभ समोर ठेवून केले जात आहेत. आणि या प्रकारे आपल्या जीवनाला आपण इस्लामच्या आशिर्वादापासून वंचित ठेवत आहात आणि जगालाही इस्लामकडे आकृष्ट करण्याऐवजी त्याला दूर करत आहात. मग अशा परिस्थितीत आपले हे जीवन यशस्वी होईल ना पारलौकिक जीवन. याचा परिणाम तर ईश्वरीय नियमानुसारच होईल, जो आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात आणि शक्यता तर हीच आहे की, आपले भविष्य या वर्तमानापेक्षाही वाईट असेल.
यापेक्षा इस्लामची मुद्रा उतरवून उघडपणे आपण काफीर (इस्लामचा इन्कार करणारा) होवून जा. म्हणजे किमान आपले हे जीवन तरी तसे बनून जाईल जसे की अमेरिका, रशिया आणि ब्रिटनमध्ये राहणार्यांचे बनलेले आहे. मात्र मुस्लिम असूनसुद्धा मुस्लिमासारखे ना राहणे आणि अल्लाहच्या धर्माचे खोटे प्रतिनिधीत्व करून जगातील इतर लोकांच्याही मार्गदर्शनाचा मार्ग बंद करणे एक असा अपराध आहे जो की, आपल्याला या जगामध्ये समृद्ध होऊ देणार नाही. या गुन्ह्याची शिक्षा जी कुरआनमध्ये लिहिलेली आहे आणि जिचा प्रत्यक्ष नमुना ज्यू समाज आपल्यासमोर प्रत्यक्षात दिसत आहे त्या शिक्षेला आपण टाळू शकणार नाही. मग आपण संयुक्त राष्ट्रीयतेच्या दोन वाईट वैशिष्ट्यांपैकी कमी वाईट वैशिष्ट्याला जवळ कराल किंवा आपली वेगळी राष्ट्रीयता असल्याचे बिंबवून ते सर्व मिळवाल जे की, मुस्लिम राष्ट्रीयतेचे समर्थक प्राप्त करू इच्छितात. या शिक्षेला टाळण्याचा फक्त एकच मार्ग आहे तो हा की आपण हा गुन्हा सोडून द्यावा.

Post a Comment