Halloween Costume ideas 2015

पवित्र कुरआनवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाची उपासना करेल तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात त्याच्या वाट्याला वंचितता  येईल.’’ मग त्यांनी या आयतीचे पठण केले, ‘‘जो मनुष्य माझ्या आदेशपत्राचे आज्ञापालन करील तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात दुर्भागी असेल.’’ (हदीस :   मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पवित्र कुरआनमध्ये पाच गोष्टी आहेत. ‘हलाल’, ‘हराम’, ‘मुहकम’, ‘मुतशाबेह’ आणि ‘इमसाल’.  ‘हलाल’ (वैध) ला वैध समजा, ‘हराम’ (अवैध) ला अवैध माना, ‘मुहकम’ (पवित्र कुरआनचा तो भाग ज्यात धर्मनिष्ठा आणि कायदा वगैरेची शिकवण दिली गेली आहे) चे अनुसरण  करा, ‘मुतशाबेह’ (कुरआनचा तो भाग ज्यात परोक्षाच्या गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे जसे- ‘जन्नत’ (नंदनवन), ‘दोजख’ (नरक), ‘अर्श’ (सिंहासन), ‘कुर्सी’ (खुर्ची) वगैरे) वर ईमान  बाळगा (आणि त्याची अवहेलना करू नका) आणि ‘इमसाल’ (लोकसमुदायांच्या विध्वंसाच्या धडा शिकविणाऱ्या कथा) पासून उपदेश प्राप्त करा. ` (हदीस : मिश्कात)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने काही अनिवार्य बाबी निश्चित केल्या आहेत त्या नष्ट करू नये आणि काही गोष्टी निषिद्ध  केल्या आहेत त्या करू नयेत आणि सीमा निश्चित केल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि काहींच्या बाबतीत त्याने न सांगता मौन बाळगले आहे तुम्ही त्यांच्या भानगडीत जाऊ
नका. (हदीस : मिश्कात)
माननीय जियाद बिन लबीद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्ट सांगितली आणि मग म्हणाले, ‘‘असे तेव्हा घडेल जेव्हा ‘दीन’ (जीवनधर्मा) चे ज्ञान  संपुष्टात येईल.’’ यावर मी म्हणालो, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही पवित्र कुरआनचे पठण करतो आणि आमच्या अपत्यांना पठण करण्यास शिकवितो आणि आमची मुले त्यांच्या  अपत्यांना पठण करण्यास शिकवतील; तर मग ज्ञान कसे नष्ट होईल?’’
पैगंबरांनी सांगितले, ‘‘अति उत्तम! मी तुम्हाला मदीनेतील सर्वांत समजदार मनुष्य समजत होतो. ज्यू व खिश्चन तौरात आणि इंजीलचे किती अधिक प्रमाणात पठण करतात, परंतु   त्यांच्या शिकवणींचे जरादेखील अनुसरण करीत नाहीत, हे तुम्ही पाहात नाही काय?’’ (हदीस : इब्ने माजा)

भाग्यावर ईमान
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीचे स्वर्ग आणि नरक लिहिले गेलेले आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे  पैगंबर! मग आम्ही आमच्या लिहिलेल्याचा का लाभ घेऊ नये आणि कर्म सोडून द्यावे?’’ पैगंबरांनी सांगितले, ‘‘नाही, कर्म करा, कारण प्रत्येक व्यक्तीला तीच ईशकृपा लाभते ज्यासाठी  त्यास जन्माला घालण्यात आले आहे, जो दैववान आहे त्याला स्वर्गातील कामांची ईशकृपा मिळते आणि जो दुर्दैवी (नरकवासी) आहे त्याला नरकातील कामांची ईशकृपा मिळते.’’
यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘सूरह अल-लैल’च्या या दोन आयतींचे पठण केले (ज्या वरील हदीसमध्ये लिहिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ असा की) ज्याने संपत्ती खर्च केली आणि  ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब केला आणि उत्कृष्ट गोष्टीचा स्वीकार केला (म्हणजे इस्लामचे अनुसरण केले) तर आम्ही त्याला उत्तम जीवन म्हणजे स्वर्गाची ईशकृपा देऊन आणि  ज्याने  आपली संपत्ती खर्च करण्यात वंâजूषपणा दाखविला आणि (अल्लाहशी) अनभिज्ञ आणि उत्तम जीवनास खोटे ठरविले तर आम्ही त्याला त्रासदायक जीवनाची (नरक) ईशकृपा देऊ.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget