Halloween Costume ideas 2015

सत्याची साक्ष

ज्याप्रमाणे आपण खरे साक्ष लपवून खोटी साक्ष देत आहोत, त्याचा परिणामही आपल्याला याची देही याची डोळा पहावा लागत आहे. हे पाहणे आपले प्राक्तन आहे जे की, ईश्‍वरीय कायद्याप्रमाणे आहे. जेव्हा एखादा समाज कुठलाही ईश्‍वरीय पुरस्कार नाकारतो आणि आपल्या निर्मात्याशी गद्दारी करतो तेव्हा ईश्‍वर त्या समाजाला या जगातही शिक्षा देतो आणि परलोकीही शिक्षा देतो. ज्यू समाजाच्या बाबतीत अल्लाहचा हा नियम पूर्ण झालेला आहे. त्यांच्यानंतर आता मुस्लिम आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे आहेत. अल्लाहला ज्यू लोकांशी कुठली व्यक्तीगत दुश्मनी नव्हती की ज्यामुळे त्याने त्यांना शिक्षा दिली. आणि आमच्यासोबत अल्लाहची कोणतेही नातेसंबंध नाहेत की, आपण गुन्हे करावेत आणि शिक्षेपासून वाचून जावेत. सत्य हे आहे की, आपण सत्याची साक्ष देण्यामध्ये जेवढी दिरंगाई करू आणि सत्याविरूद्ध साक्ष देण्यामध्ये जेवढ्या गतीने पुढे जावू ठिक त्याच गतीने आपण कोसळत जाणार आहोत. मागच्या एका शतकात मोरक्कोपासून पूर्वी भारतातील अनेक देश आपल्या हातून निघून गेलेले आहेत. मुस्लिम समाज हळूहळू पराजित आणि गुलाम होत चालला आहे. मुस्लिम असणे आता प्रतिष्ठेचे राहिलेले नाही. उलट अपमान, दारिद्रय आणि मागासलेपणाचे द्योतक बनलेले आहे. जगात आमची किमत राहिलेली नाही. कोठे आम्हाला उघडपणे मारून टाकले जात आहे तर कुठे घरातून बेदखल केले जात आहे. कुठे आम्हाला वाईट वागणुकीची चव चाखायला मिळत आहे तर कुठे आम्हाला केवळ चाकरीसाठी जीवंत ठेवले गेलेले आहे. ज्या ठिकाणी मुस्लिमांची सत्ता शिल्लक राहिलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांची पराजय वर पराजय झाली. आणि आज त्यांची स्थिती आहे की, आज त्यांचा विदेंशी शक्तींसमोर भीतीने थरकाप उडत आहे.
    कदाचित ते इस्लामची तोंडी आणि प्रत्यक्ष साक्ष देणारे असते. तर ह्या असत्याला मानणार्‍या लोकांचा त्यांच्यासमोर भीतीने थरकाप उडाला असता. दूर कशाला जाता आपल्या भारताचीच अवस्था पाहा. सत्याची जी साक्ष देण्यामध्ये आपण सुस्ती केली उलट सत्याच्या विरूद्ध साक्ष दिली, त्याचा परिणाम हा झाला आहे की, संपूर्ण देश मुस्लिमांच्या हातातून निघून गेला. सुरूवातीला मराठा आणि शिखांनी मुस्लिमांना पराजित केलं. मग इंग्रजांची गुलामी आपल्या नशिबी आली आणि आता दुर्दशेची परमोच्च पातळी आपण गाठलेली आहे. आज आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्‍न बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांकांचा आहे आणि मुस्लिमांचा या आशंकेने थरकाप उडालेला आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्याला त्यांचा गुलाम बनवून टाकतील. आणि तो परिणाम पहावा लागेल जो कधीकाळी या देशात क्षुद्र म्हणविणार्‍या समाजाला पहावा लागला होता. ईश्‍वराला स्मरणकरून मला सांगा जरा तुम्ही इस्लामची खरी साक्ष दिली असती तर या ठिकाणच्या बहुसंख्यांकाकडून तसा धोका निर्माण झाला असता जसा आज झालेला आहे? किंवा जर आपण तोंडी आणि प्रत्यक्षात आजही इस्लामची साक्ष देणारे बणून जाऊ तर हा बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांकाचा प्रश्‍न काही वर्षात संपणार नाही का?

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget