(२) हे श्रद्धावंतांनो, ईशपरायणतेच्या प्रतीकांचा अनादर करू नका.५ निषिद्ध महिन्यांपैकी एखाद्याला वैध करू नका, कुर्बानीच्या जनावरांवर हात टाकू नका. त्या जनावरांवर हात टाकू नका ज्यांच्या गळ्यात ईश्वरार्पणाच्या खुणा म्हणून पट्टे घातले आहेत, त्या लोकांना छळू नका जे आपल्या पालनकर्त्याची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधात पवित्र गृहा (काबा) कडे जात असतील.६ मग जेव्हा एहरामची स्थिती संपेल तेव्हा तुम्ही शिकार करू शकता७- आणि पाहा, एका गटाने तुमच्यासाठी माqस्जदेहराम (काबा माqस्जद) चा मार्ग रोखला आहे, तर या गोष्टीवर तुमच्या रागाने तुम्हाला इतके भडकवू नये की तुम्हीदेखील त्यांच्या विरोधात अत्याचार कराल.८ नाही, जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत, त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका. अल्लाहचे भय बाळगा, त्याची शिक्षा फार कठोर आहे.
(३) तुम्हाकरिता निषिद्ध करण्यात आले आहेत मेलेले प्राणी,९ रक्त, डुकराचे मांस, ते जनावर जे अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने जुबाह केले असेल.१० ते जे गुदमरून अथवा मार लागून अथवा उंचस्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेले असेल अथवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल त्याव्यतिरिक्त ज्याला जिवंत अवस्थेत असताना११ तुम्ही कापले असेल अथवा ते जे वेदीवर१२ बळी दिले असेल.१३
५) प्रत्येक ती गोष्ट जी एखाद्या रीतीचे, धारणेचे किंवा कार्यशैली, चिंतनशैलीचे तसेच व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते ते त्याचे प्रतीक असते. कारण ते एक लक्षण किंवा निशाणी असते. सरकारी ध्वज, फौजेचा किंवा पोलिसांचा गणवेश, शिक्के, नोट आणि स्टॅम्प इ. सर्व सरकारच्या निशाण्या आहेत आणि त्यांचा ज्यांच्यावर जोर चालतो त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा ठेवतात. चर्च, सूळी इ. खिस्ती धर्माची प्रतीके आहेत. शेंडी, जाणवे आणि मंदिरे हिंदुत्वाची प्रतीके आहेत. केश, कडा, कृपाण आणि पगडी शीख धर्माची प्रतीके आहेत. हातोडा आणि विळा कम्युनिझमचे प्रतीक आहे आणि स्वास्तिक आर्याचे प्रतीक. हे सर्व पंथ आपल्या अनुयायांना या प्रतीकांचा आदर सन्मान राखण्याचा आदेश देतात. जर एखादा व्यक्ती एखाद्या विचारसरणीच्या प्रतीकांपैकी एखाद्याचा अनादर करतो तर हे याचा पुरावा आहे की ती व्यक्ती त्या व्यवस्थेचा शत्रू आहे. जर ती व्यक्ती त्याच व्यवस्थेशी संबंधित असेल तर त्याचे हे कृत्य आपल्या व्यवस्थेशी विद्रोह करण्यासारखे आहे. अल्लाहचे `शआइर' (प्रतीके) म्हणजे ती समस्त लक्षणे आणि निशाण्या ज्या शिर्वâ आणि कुफ्र (अनेकेश्वरत्व आणि नास्तिकता) आणि नास्तिकतेऐवजी विशुद्ध ईशपरायणता व एकेश्वरत्वाचे प्रतिनिधित्व करतात. अशा निशाण्या आणि प्रतीके ज्या रीतीत व व्यवस्थेत सापडतात. मुस्लिमांना त्यांचा आदर करण्यास सांगितले गेले आहे. अट हीच आहे की त्यांची मनोवैज्ञानिक पाश्र्वभूमी विशुद्ध एकेश्वरत्वाची आणि ईशपरायणतेची असणे आवश्यक आहे. अल्लाहच्या निशाण्यांचा आदर करण्याचा आदेश त्या वेळी देण्यात आला होता जेव्हा मुस्लिम आणि अरब अनेकेश्वरवादी लोकांत युद्ध सुरु होते. मक्का शहरावर अनेकेश्वरवादींचा कब्जा होता. अरबच्या प्रत्येक भागातून अनेकेश्वरवादी लोक हजसाठी आणि काबागृहाच्या दर्शनासाठी (उमरा) काबागृहाकडे येत असत. अनेक कबिल्यांचे मार्ग हे मुस्लिमांच्या ताब्यातील प्रदेशातून जात. अशा वेळी आदेश दिला गेला की हे लोक अनेकेश्वरवादी जरी असले तरी किंवा तुमच्या आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरु जरी असले तरी ते जेव्हा काबागृहाकडे जातात तेव्हा यांना त्रास देऊ नका. कारण यांच्या बिघडलेल्या धर्मात खुदापरस्ती (धर्मपरायणता) चा जेवढा भाग शिल्लक आहे तो आदर करण्यास पात्र आहे. त्याचा अनादर होऊ शकत नाही.
६) `शआ इरुल्लाह' (अल्लाहच्या निशाण्या) चा आदर करण्यासाठी आदेश दिल्यानंतर अल्लाहच्या काही प्रतीकांचा (निशाण्या) नामोल्लेख करून त्यांचा पूर्ण आदर करण्याचा मुख्य आदेश देण्यात आला. त्या वेळी युद्धरत स्थिती होती ज्यामुळे ही आशंका निर्माण झाली होती की युद्धाच्या नशेत मुस्लिमांच्या हातून त्या प्रतीकांचा अनादर होऊ नये.
७) `इहराम'सुद्धा अल्लाहच्या निशाण्यांपैकी (प्रतीक) एक निशाणी आहे आणि त्याच्या (इहराम) प्रतिबंधांपैकी कोणत्याही प्रतिबंधाला (अटीला) तोडणे म्हणजे अल्लाहच्या निशाणीचा अनादर करणे आहे. म्हणून अल्लाहच्या `शआइर' (निशाण्या) विषयी याचा उल्लेख केला गेला की जोपर्यंत तुम्ही `इहराम'च्या स्थितीत असाल शिकार करणे त्या अल्लाहच्या निशाणीचा (इहराम) अनादर करणे आहे. जेव्हा शरीयतनुसार `इहराम'चा काळ समाप्त् होतो तेव्हा शिकार करणे योग्य आहे.
८) विरोधकांनी त्या काळी मुस्लिमांना काबागृहाच्या परिक्रमेपासून रोखले होते आणि अरबांच्या पुरातन परंपरेनुसार हजपासूनसुद्धा मुस्लिमांना वंचित ठेवण्यात आले. म्हणून मुस्लिमांमध्ये हा विचार निर्माण झाला की विरोधक कबिल्यांचा मार्ग इस्लामी राज्यापासून जातो त्यांनासुद्धा आम्ही हजला जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या काफिल्यावर हजच्या काळात छापे मारण्यास सुरु करावे. परंतु अल्लाहने ही आयत अवतरित करून त्यांना असे करण्यापासून रोखले.
९) म्हणजे ते जनावर ज्याला नैसर्गिक मृत्यू आला आहे.
१०) म्हणजे ज्याला जुबह करतांना अल्लाहच्या नावाशिवाय इतर कोणाचे नाव घेतले गेले असेल किंवा ज्याला जुबह करण्याअगोदर हा संकल्प केला गेला असेल की हे जनावर अमुक पीरसाहेबासाठी किंवा देवीदेवतासाठी भेट आहे. (नजर, नवस व मन्नत आहे) (पाहा सूरह २, टीप. १७१)
११) म्हणजे जे जनावर उपरोक्त दुर्घटनांपैकी ज्या एखाद्या दुर्घटनेत जखमी झाले आणि ते मृतावस्थेत जिवंत आहे तर त्याला जुबह केल्यास त्याला खाल्ले जाऊ शकते. यावरून हे स्पष्ट होते की हलाल जनावराचे मांस फक्त जुबह केल्यानेच हलाल होते. दुसरा कोणताच प्रकार जनावराला हलाल करण्यास योग्य नाही. हे `जुबह' आणि `जक़ाह' इस्लामचे पारिभाषिक शब्द आहेत. याने अभिप्रेत मानेचा (हलक) तितकाच भाग कापणे ज्याने शरीरातील रक्त चांगल्या प्रकारे बाहेर पडेल. झटका मारणे किंवा गळा दाबणे व इतर अन्य प्रकाराने जनावराला मारण्याचे नुकसान म्हणजे त्याच्या शरीरातच बहुतांश रक्त गोठले जाते आणि ते मासांबरोबर चिकटून जाते. याविरुद्ध `जुबह' केल्याने (हलाल पद्धत) मेंदू आणि शरीर या दोहोत संबंध जास्त वेळ राहातो. यामुळे नसानसातून रक्त बाहेर फेकले जाते आणि अशाप्रकारे संपूर्ण शरीराचे पूर्ण मांस रक्ताने साफ होते. रक्ताविषयी वर उल्लेख आलाच आहे की ते (रक्त) अवैध आहे. म्हणून मांस पवित्र आणि हलाल होण्यासाठी आवश्यक आहे की रक्त मांसापासून पूर्ण वेगळे झाले पाहिजे.
१२) अरबीमध्ये मूळ शब्द `नुसुब' आला आहे. याने तात्पर्य ती सर्व स्थळे किंवा देवस्थाने आहेत ज्यांना `आस्ताना' (वेदी)सुद्धा म्हटले जाते. जिथे अल्लाहव्यतिरिक्त इतरांच्या नावाने मन्नत अथवा नैवेद्य दिला जातो. अशा स्थानावर दगडाची किंवा लाकडाची मूर्ती असो किंवा नसोत. या स्थानांना एखाद्या पीर, देवता किंवा संताच्या तसेच अनेकेश्वरवादी विचारसरणीने जोडलेले असते. अशा अस्थान्यावर (वेदीवर) `जुबह' केलेले जनावर हराम आहे.
१३) येथे ही गोष्ट अगदी समजून घेणे अत्यावश्यक आहे की खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये हराम व हलालचे प्रतिबंध लावण्यात आले आहे. यामागे वैद्यकीय लाभ किंवा नुकसान नाही तर त्याचे नैतिक फायदे आणि तोटे आहेत. वैद्यकशास्त्र आणि प्राकृतिक तथ्याविषयी संबंध अल्लाहने मनुष्याच्या स्वत:च्या प्रयत्नावर आणि शोधकार्यावर सोडून दिले आहे.
Post a Comment