Halloween Costume ideas 2015

काश्मीर : आयएएस अधिकार्‍याचा राजीनामा

अवघ्या 33 व्या वर्षी भारतीय प्रशासनिक सेवेच्या तरूण आणि तडफदार अधिकारी ज्याचे नाव कन्नन गोपीनाथन आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत काश्मीरसंबंधी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली. माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याशिवाय, जीवन जगण्याचा काही अधिकार नाही. कुणाला जीव वाचविण्यासाठी तुरूंगात डांबले गेले तर ते कोण स्विकारील. काश्मीरमध्ये तीन आठवड्यापासून स्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जात आहे. याच्याविरूद्ध आवाज उठविणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो. कारण जीवन आणि स्वातंत्र्य हातात हात घालून नांदत असतात. हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे.
    काश्मीरच्या परिस्थितीने व्यथित होवून 21 ऑगस्ट रोजी कन्नान गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोशल मीडियामध्ये त्या संबंधात बर्‍याच क्रिया आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. जम्मू काश्मीरमध्ये लोकांचे जीवन वाचविण्यासाठी सावधगिरी म्हणून प्रतिबंध लागू केलेले आहेत. सरकारच्या या म्हणण्याला कन्नन गोपीनाथन यांनी धुडकावून लावले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, काश्मीरमध्ये लोकांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराला बाधा पोहोचत आहे. त्यांनी ही गोष्ट स्वीकार केली की, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे हा सरकारचा अधिकार आहे. मात्र त्यावर काश्मीरी लोकांना प्रतिक्रिया देण्याचाही अधिकार दिला पाहिजे. सरकार निर्णय घेते आणि त्यामुळे हिंसा होईल, असे सांगून लोकांवर प्रतिबंध लादते हे कोणत्याही दृष्टीने लोकशाहीस अनुसरून नाही. राजीनामा देणे हा माझा व्यक्तिगत आणि भावनिक निर्णय होता. यात वाद नाही. मी डोक्याऐवजी मनाने विचार करून हा निर्णय घेतला. शाह फैसलसारखा राजीनामा देऊन राजकारणात जाण्याचा सध्यातरी माझा काही विचार नाही. मात्र लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल, अशा क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा आहे, असेही कन्नन यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना स्पष्ट केले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget