Halloween Costume ideas 2015

द्वेषाने गाठला परमोच्च बिंदू

एनडीटीव्ही हिंदीचे पत्रकार रविश कुमार झुंडी द्वारा केल्या जाणार्‍या हिंसेसंदर्भात कार्यक्रम सादर करताना नेहमी म्हणत असतात की, हा सांप्रदायिक उन्माद कधीही तुमच्या तरूण मुलांना खूनी बनवू शकेल. रविश कुमारची ही भविष्यवाणी मागच्या आठवड्यात दुर्दैवाने खरी ठरली. दिल्लीच्या मौजपूर भागामध्ये पंडितांच्या एका गल्लीमध्ये साहिल सिंह नावाच्या 23 वर्षाच्या हिंदू तरूणाला त्याच्या प्रथम नावावरून मुस्लिम समजून हिंदू पंडित तरूणांनी बेदम मारहाण केली. इतकी की त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात साहिलची आई संगिता सिंह यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, ’तो स्कूटरवरून आपल्या मित्रांबरोबर घरी परत येत होता. पंडितांच्या मौजपूर येथील गल्लीमध्ये आला असता त्याच्या मित्रांनी हिंदीमध्ये साहिल चलना यार ! असे म्हणून हाक मारली. ती त्या ठिकाणी असलेल्या पंडितांनी ऐकली. त्यावरून त्यांना राग आला की एक मुसलमान आपल्या गल्लीत कसा काय येवू शकतो. त्यावरून त्यांनी साहिलला बेदम मारहाण केली.’
    साहिल हा सुनिल आणि संगीता सिंह यांचा तरूण मुलगा होता. त्याच्या वडिलांची तब्येत ठिक राहत नसल्यामुळे बिल्डींग मटेरियलचा व्यवसाय तो सांभाळत होता. दूसरा एक भाउ आदित्य सिंह अवघ्या 13 वर्षाचा असून, बहीण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कमवता मुलगा असा अचानक मरण पावल्यामुळे या दाम्पत्याच्या दुःखाला कुठलीच सीमा राहिलेली नाही. या संदर्भात बोलताना मयताचे वडील सुनिल सिंह यांनी सांगितले की, आपल्या देशात जी घृणेची भावना पसरविली जात आहे ती देशासाठी अत्यंत खतरनाक आहे. माझ्या मुलाचे नाव साहिल होते. गल्ली पंडितांची होती आणि त्यांनी साहिलला मुस्लिम समजून मारून टाकले आहे. आश्‍चर्य म्हणजे पोलीस याबाबतीत माझ्या बाजूने उभे राहण्याऐवजी आरोपीतांना वाचविण्यामध्ये आपली शक्ती खर्च करीत आहे. त्यांनी पत्रकारांना प्रश्‍न विचारला की तुम्हाला विश्‍वास बसेल का की, साहिल सारखा 6 फुट 1 इंच उंच आणि 80 किलो वजनाच्या तरूणाला फक्त दोन लोक जीवे मारू शकतात. त्याला मारण्यासाठी एकपूर्ण झुंड सामील होती. मात्र पोलिसांनी फक्त दोघांना अटक केलेली आहे. बाकींना अटक करण्यामध्ये पोलीस टाळाटाळ करत आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजसुद्धा लपवित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्हीमध्ये काहीच रेकॉर्ड झालेले नाही.
    सुनिल सिंह पुढे म्हणतात की, साहिलला जेव्हा झुंडीद्वारे मारहाण केली जात होती तेव्हा पंडितांची पूर्ण गल्ली जमा झाली होती आणि त्यांना आनंद होत होता की, त्यांच्या लोकांना एका मुसलमानाला ठार मारले आहे. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो एक ठाकूर तरूण होता तेव्हा ते म्हणायला लागले, ” ये बहोत गलत काम हुआ”.
    शुक्रवारी घडलेल्या या घटनेसंबंधी तपशील असा की, साहिल हा आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून परत येत होता आणि त्याच्या मित्रांनी त्याला साहिल म्हणून जेव्हा हाक मारली. तेव्हा गल्लीमध्ये उभा असलेला तसेच दारूच्या नशेमध्ये असलेला चंद्रभान नावाचा एक इसम त्याला आडवा आला आणि त्याने त्याच्याशी वाद घातला. तो म्हणत होता की, आमच्या गल्लीत येण्याची तुझी हिम्मत कशी झाली. तेवढ्यात चंद्रभानचा मुलगाही मित्रांसह तेथे आला आणि लाठा काठ्यांनी सर्वांनी मिळून साहिलला मारहाण करण्यास सुरूवात केली. साहिल ओरडत होता, मदत मागत होता पण कोणीही त्याच्या मदतीला पुढे आले नाही. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून स्कूटर घेऊन घरी आला आणि आईच्या कुशीत कोसळला. तात्काळ त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.    

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget