Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१७२) इसा मसीहने, तो अल्लाहचा एक दास आहे. याबदल कधीही स्वत: साठी अपमान समजले नाही आणि निकटवर्ती ईशदूतांना आपल्यासाठी अपमान कारक वाटले नाही. जो कोणी  अल्लाहच्या दास्यत्वास स्वत:साठी अपमान समजतो आणि गर्व करतो तर अल्लाह सर्वांना आपल्या समोर हजर करण्याची वेळ लवकरच आणील.
(१७३) तेव्हा ज्या लोकांनी श्रद्धा ठेवून सदाचरण अंगीकारले आहे, ते आपला मोबदला पुरेपूर प्राप्त करतील आणि अल्लाह आपल्या कृपेने त्यांना जादा मोबदला प्रदान करील आणि ज्या   लोकांनी बंदगीला स्वत:साठी अपमानास्पद मानले व गर्व बाळगला, त्यांना अल्लाह यातनादायक शिक्षा देईल आणि अल्लाहव्यतिरिक्त ज्याच्या ज्याच्या पालकत्वावर व मदतीवर ते   विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी कोणीच त्यांना तेथे आढळणार नाही.
(१७४) लोकहो, तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्याजवळ उज्ज्वल प्रमाण आले आहे आणि आम्ही तुमच्याकडे असा प्रकाश पाठविला आहे जो तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन करणारा आहे. (१७५) मग जे लोक अल्लाहची गोष्ट मान्य करतील व त्याचा आश्रय शोधतील, त्यांना अल्लाह आपल्या दया व कृपेच्या छत्राखाली घेईल आणि आपल्याकडे येण्याचा सरळमार्ग त्यांना  दाखवील.
(१७६) हे नबी (स.)!२१९ लोक तुम्हाला कलालासंबंधी२२० आदेश  विचारतात, सांगा, अल्लाह तुम्हाला आदेश देतो. जर एखादा मनुष्य नि:संतान मेला असेल आणि त्याची एक बहीण   असेल२२१ तर तिला त्याच्या ठेवलेल्या मालमत्ते (वारसा) तून निम्मा हिस्सा मिळेल, आणि जर बहीण नि:संतान वारली असेल तर भाऊ तिचा वारस ठरेल.२२२ जर मृताचे वारस दोन  बहिणी असतील तर त्या सोडलेल्या मालमत्तेतून दोन तृतीयांशच्या हक्कदार ठरतील,२२३ आणि जर अनेक भाऊ-बहिणी असतील तर स्त्रियांचा एकेरी व पुरुषांचा दुप्पट वाटा असेल.   अल्लाह तुमच्यासाठी आदेशांचे स्पष्टीकरण करीत आहे, जेणेकरून तुम्ही भटकत फिरू नये आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगतो.

अल्माइदा (मदीनाकालीन, एकूण आयती १२०)

अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) हे श्रद्धावंतांनो! मर्यादांचे पुरेपूर पालन करा. तुमच्याकरिता चरणारे चतुष्पाद मवेशी वर्गातील सर्व जनावरे वैध केली गेली आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याबद्दल पुढे तुम्हाला  सांगण्यात येईल. परंतु एहराम (हजकरिता परिधान केलेली वस्त्रे) च्या अवस्थेत शिकारीला आपल्याकरिता वैध ठरवू नका. नि:संशय अल्लाह जे इच्छितो ती आज्ञा देतो.



२१९) ही आयत हा सूरह अवतरण झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर अवतरित झाली आहे. काही कथनांद्वारा माहीत होते की कुरआनची ही  शेवटची आयत आहे. हे जरी सत्य नसले तरी  हे मात्र सिद्ध आहे की ही आयत हि.स. ०९ मध्ये अवतरित झाली आहे आणि सूरह निसा याच्या फार पूर्वीपासून एक पूर्ण सूरहच्या रूपात पठण केला जात होता. याच कारणाने या  आयतला त्या आयतीक्रमात जोडले गेले नाही ज्या वारसाहक्कासंबंधी सूरहच्या आरंभी आले आहेत, तर यास परिशिष्टाच्या रूपात शेवटी सामील केले आहे.
२२०) `कलाला'च्या अर्थात मतभेद आहेत. कुणाच्या मतानुसार `कलाला' ती व्यक्ती आहे जो नि:संतान आहे आणि ज्याचे बापदादा जिवंत नसावेत. काहींच्या मते `कलाला' त्या मृत  व्यक्तीला म्हटले जाते जो नि:संतान होता. माननीय उमर (रजि.) शेवटपर्यंत याविषयी आपले निश्चित मत बनवू शकले नाहीत. परंतु फिकहशास्त्रींनी माननीय अबू बकर (रजि.)  यांच्या मताला मान्य केले की `कलाला' केवळ पहिल्याच अर्थाने आहे. कुरआननुसारसुद्धा याची पुष्टी होते. कारण येथे कलालाच्या संपत्तीतून बहिणीला अर्ध्याचा वारसदार म्हटले आहे.  जर बाप जिवंत असेल तर बहिणीला काहीच मिळत नाही.
२२१) येथे त्या भाऊ बहिणीच्या वारसाचा उल्लेख आहे ज्याचे आई-वडील त्याच मयताचे असावेत किंवा केवळ वडील मृतकाचे आणि त्याचा एक असेल. माननीय अबू बकर (रजि.) यांनी  एकदा एका व्याख्यानात या अर्थाला स्पष्ट केले होते आणि सहाबानी मतभेद दाखविला नाही. सर्व एकमत या विषयी आहेत.
२२२) म्हणजे भाऊ त्याच्या पूर्ण संपत्तीचा वारस असेल. जर इतर कोणी हकदार नसेल किंवा एखादा वारस असेल जसे पती, तर त्याचा वाटा दिल्यानंतर शिल्लक संपत्ती भावाला मिळेल.
२२३) हाच आदेश दोन पेक्षा जास्त बहिणींसाठीसुद्धा आहे.

१) म्हणजे त्या मर्यादांचे आणि अटींचे पालन करा जे या अध्यायात तुमच्यावर लागू करण्यात आले आहेत आणि सामान्यत: अल्लाहच्या शरीयतने तुमच्यावर लागू केले आहेत. या  प्रस्तावनेच्या संक्षिप्त् वाक्यानंतर त्या अटींचे वर्णन सुरु होते ज्यांच्या पालनाचा आदेश देण्यात आला आहे.
२) अन् आम (चतुष्पाद) हा शब्द अरबी भाषेत उंट, गाय, मेंढा आणि बकरीसाठी वापरला जातो आणि `बहिमा' प्रत्येक चरणाऱ्या चतुष्पादला म्हटले जाते. `जनावरांपैकी चरणारे चतुष्पाद  तुमच्यासाठी वैध ठरविण्यात आले आहेत.' म्हणजे ते सर्व चरणारे चतुष्पाद वैध ठरविले आहे जे मवेशी जातीचे असतील म्हणजे जे जीवजतुंचा आहार घेण्याऐवजी घासपाला खातात  आणि जे चतुष्यादासारखे गुण राखतात. यावरून सांकेतिक दृष्ट्या ही गोष्ट समोर येते, की मांसाहारी, दुसऱ्या जनावरांना मारून खाणारे जनावर तुमच्यासाठी अवैध (हराम) आहेत. याच  संकेताला (आयत) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट करून हदीसमध्ये स्पष्ट आदेश दिला की हिसंक पशु हराम (अवैध) आहेत. याच प्रमाणे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या  पक्षांनासुद्धा हराम ठरविले ज्यांचे पंजे असतात आणि जे दुसऱ्या जनावराचे शिकार करतात व खातात व मृत जनावरे खातात.
३) `इहराम' त्या फकीरी पोषाखाला म्हणतात जे काबागृहाची परिक्रमा करण्यासाठी परिधान केले जाते. या पोषाखात केवळ एक लुंगी असते आणि एक चादर जी अंगावर घेतली जाते.  याला `इहराम' यासाठी म्हटले जाते की यास बांधल्यानंतर मनुष्यावर अनेक वस्तू हराम (अवैध) होतात ज्या साधारण स्थितीत हलाल (वैध) असतात. उदा. केशकर्तन, सुवासिक वस्तूंचा वापर, प्रत्येक प्रकारचा शृंगार, वासनापूर्ती इ. याच प्रतिबंधांपैकी एक हा आहे की कोणत्याही जीवाची हत्या करणे अवैध आहे. शिकार निषिद्ध आहे आणि शिकारीसाठीचा पत्ता कोणाला  दिला जाऊ शकत नाही.
४) म्हणजे अल्लाह निरंकुश शासक आहे. त्याला पूर्ण अधिकार आहे की जे काही आदेश त्याने द्यावे, त्यांत दासाला त्याच्या आदेशांत कमी-जास्त करण्याचा मुळीच अधिकार नाही.  त्याचे सर्व आदेश उत्तमवर्तन आणि निहित हितावर आधारित आहेत. परंतु मुस्लिम त्या आदेशांचे पालन यासाठीच करीत नाही, की तो त्यांना उचित व हितकारक समजतो तर  आदेशांचे पालन फक्त स्वामीचे आज्ञापालन करण्याच्या आधारावर करतो. कुरआन पूर्ण जोर देऊन हा नियम स्थापित करत आहे की वस्तूंना हराम व हलाल (वैद-अवैध) बनविण्यासाठी  निर्माणकर्त्या अल्लाहची अनुमतीशिवाय किंवा अनुमतीहीनतेशिवाय इतर कोणत्याच आधाराची आवश्यकता नाही. अशाचप्रकारे दासासाठी एखाद्या कार्याचे वैध किंवा अवैध होणे हेसुद्धा अल्लाह ज्याला हलाल (वैध) करतो ते हलाल (वैध) आहे आणि ज्याला हराम (अवैध) ठरवितो ते अवैध आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget