(४) ...आणि ज्या शिकारी जनावरांना तुम्ही प्रशिक्षित केले असेल - ज्यांना अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही शिकार करण्याचे प्रशिक्षण देत असता - ते ज्या जनावराला तुमच्यासाठी धरून ठेवतील त्यालाही तुम्ही खाऊ शकता.१९ तथापि त्यावर अल्लाहचे नाव उच्चारा२० आणि अल्लाहचा कायदा भंग करण्यापासून त्याची भीती बाळगा. अल्लाहस हिशेब घेताना वेळ लागत नाही.
(५) आज तुमच्यासाठी सर्व पवित्र वस्तू वैध करण्यात आल्या आहेत. ग्रंथधारकांचे भोजन तुमच्यासाठी वैध आणि तुमचे जेवण त्यांच्याकरिता वैध२१ आहे चारित्र्यवान व स्वतंत्र स्त्रियासुद्धा तुमच्यासाठी हलाल (वैध) आहेत मग त्या श्रद्धावंतांच्या जमातीतील असोत अथवा त्या लोकसमूहातील ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला होता,२२ परंतु अट अशी की तुम्ही त्यांचे महर अदा करूनच विवाहबंधनात त्यांचे रक्षक बनावे. असे होऊ नये की, तुम्ही त्यांच्याशी स्वैर कामतृप्तीत लागावे किंवा लपून छपून अनैतिक संबंध ठेवावेत. आणि एखाद्याने ईमानच्या मार्गावर चालण्याचे नाकारले तर त्याचे संपूर्ण जीवनकार्य वाया जाईल व तो मरणोत्तर जीवनामध्ये दिवाळखोर बनेल.२३
(६) हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्ही नमाजसाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड व हात कोपरापर्यंत धुवावे, डोक्यावर हात फिरवावे व पाय घोट्यापर्यंत धूत जावे.२४ जर जनाबत (अपवित्रते) च्या स्थितीत असाल तर स्नान करून शुचिर्भूत व्हा.२५
(५) आज तुमच्यासाठी सर्व पवित्र वस्तू वैध करण्यात आल्या आहेत. ग्रंथधारकांचे भोजन तुमच्यासाठी वैध आणि तुमचे जेवण त्यांच्याकरिता वैध२१ आहे चारित्र्यवान व स्वतंत्र स्त्रियासुद्धा तुमच्यासाठी हलाल (वैध) आहेत मग त्या श्रद्धावंतांच्या जमातीतील असोत अथवा त्या लोकसमूहातील ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला होता,२२ परंतु अट अशी की तुम्ही त्यांचे महर अदा करूनच विवाहबंधनात त्यांचे रक्षक बनावे. असे होऊ नये की, तुम्ही त्यांच्याशी स्वैर कामतृप्तीत लागावे किंवा लपून छपून अनैतिक संबंध ठेवावेत. आणि एखाद्याने ईमानच्या मार्गावर चालण्याचे नाकारले तर त्याचे संपूर्ण जीवनकार्य वाया जाईल व तो मरणोत्तर जीवनामध्ये दिवाळखोर बनेल.२३
(६) हे श्रद्धावंतांनो, जेव्हा तुम्ही नमाजसाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड व हात कोपरापर्यंत धुवावे, डोक्यावर हात फिरवावे व पाय घोट्यापर्यंत धूत जावे.२४ जर जनाबत (अपवित्रते) च्या स्थितीत असाल तर स्नान करून शुचिर्भूत व्हा.२५
१९) शिकारी जनावरे म्हणजे कुत्रा, चित्ते, बाज व शिक्रे इ. आणि ते सर्व हिंस्त्र पशु आणि श्वापद ज्यांच्यापासून मनुष्य शिकारीचे काम घेतो. प्रशिक्षित शिकारी जनावरांचे वैशिष्ट आहे की ते इतर हिंस्त्र पशुप्रमाणे शिकारीला फाडून खात नाही तर आपल्या मालकासाठी पकडून ठेवतो. म्हणूनच इतर हिंस्त्र पशुंनी पकडलेले जनावर हराम आहे आणि पाळीव हिंस्त्र जनावरांचे शिकार हलाल आहे.
२०) म्हणजे शिकारी जनावरांना शिकारीसाठी सोडताना `बिस्मिल्लाह' म्हणावे. या आयतने हे स्पष्ट झाले की शिकारी जनावराला शिकारीसाठी सोडतांना अल्लाहचे नाव घेणे आवश्यक आहे. यानंतर शिकार जिवंत मिळाली तर अल्लाहचे नाव घेऊन त्याला `जुबह' केले पाहिजे. शिकार जिवंत नसले तरी ते हलाल होईल. कारण शिकारी जनावर शिकारवर सोडताना अल्लाहचे नाव प्रारंभी घेतले होते. हाच आदेश बाण सोडतानासुद्धा आहे.
२१) ग्रंथधारकांच्या खाण्यात त्यांनी `जुबह' केलेले जनावरसुद्धा आहे. आमच्यासाठी त्यांचे जेवण व त्यांच्यासाठी आमचे जेवण हलाल होण्याचा अर्थ होतो आमच्या आणि त्यांच्यामध्ये जेवणासाठी काही अडथळा व अस्पृश्यता नाही. आम्ही त्यांच्यासह व ते आमच्या बरोबरीने खाऊ शकतात. ही जाहीर सूट देण्याअगोदर हे वाक्य पुन्हा म्हटले गेले, ``तुमच्यासाठी पवित्र वस्तू हलाल केलेल्या आहेत.'' यावरून स्पष्ट होते की ग्रंथधारक स्वच्छतेचे आणि पावित्र्याचे नियम पालन करत नसतील जे शरीयतनुसार आवश्यक आहे किंवा त्यांच्या खाण्यात हराम वस्तूंचा समावेश असेल तर त्यापासून दूर राहिले पाहिजे. ते अल्लाहचे नाव न घेता एखाद्या जनावराला जुबह करतात किंवा अल्लाहशिवाय दुसऱ्याचे नाव घेऊन `जुबह' करतात तर ते खाणे हराम आहे. अशाप्रकारे त्यांच्या `दस्तरखान' (जेवनावळीत) दारू, डुकराचे मांस किंवा इतर हराम वस्तू असेल तर त्यांच्यासह आपण जेवण घेऊ शकत नाही. ग्रंथधारकांऐवजी इतर मुस्लिमेतरांविषयीसुद्धा हाच आदेश आहे. फरक येवढाच आहे की `जुबह' ग्रंथधारकाचाच वैध आहे जेव्हा की त्यांनी अल्लाहचे नाव घेतले असेल. परंतु मुस्लिमेतरांच्या (ग्रंथधारकांशिवाय) हाताचा `जुबह' आपण खाऊ शकत नाही.
२२) म्हणजे यहुदी आणि खिश्चन आहेत. विवाह फक्त त्यांच्याच स्त्रियांशी होऊ शकतो. अट यासाठी सुरक्षित स्त्रियांची आहे. याविषयी धर्मशास्त्रींमध्ये मतभेद आहेत. इब्ने अब्बास (रजि.) यांचे मतानुसार येथे ग्रंथधारक ते आहेत जे इस्लामी राज्यातील रहिवाशी आहेत. दारूल हर्ब आणि दारूल कुफ्रचे यहुदी आणि खिश्चनांच्या स्त्रियांशी निकाह करणे योग्य नाही. हनफीयांचे याविषयी मतभेद आहेत. त्यांच्या मते विदेशातील ग्रंथधारक स्त्रियांशी निकाह करणे हराम नाही तर अप्रिय (मक्रूह) आहे. सईद बिन मुसाय्यिब आणि हसन बसरी (रह.) यांच्या मतानुसार आयतचा आदेश सामान्य आहे म्हणून ``जिम्मी'' आणि ``गैरजिम्मी'' असा भेद योग्य नाही. तसेच मुहसेनात (सुरक्षित) अर्थातसुद्धा मतभेद आहेत. माननीय उमर (रजि.) यांच्या मतानुसार याने तात्पर्य पवित्र (शीलवान) स्त्री आहे म्हणून ग्रंथधारक स्वच्छंद आचरण करणाऱ्या स्त्रियांचा (सुरक्षित) स्त्रियांत समावेश होत नाही. हेच मत हसन, शाबी आणि इब्राहीम नखई यांचे आहे. तसेच हनफीया यांचेसुद्धा हेच मत आहे. या विरोधात इमाम शाफई यांचे मत आहे की येथे शब्द `लौंडिया' विरुद्ध (दासी) उपयोगात आला आहे. म्हणजे त्या ग्रंथधारक स्त्रिया ज्या दासी नाहीत
२३) ग्रंथधारक स्त्रियांशी विवाहाची परवानगी दिल्यानंतर हे वाक्य चेतावणीच्या रूपात वापरले गेले आहे. जो कोणी या परवानगीचा फायदा घेईल तो आपल्या ईमान आणि चारित्र्यासाठी सजग राहिला पाहिजे. असे होऊ नये की मुस्लिमेतर पत्नीच्या प्रेमात पडून आणि तिच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आपल्या ईमानपासून हात धुवून बसावे. आपली वागणूक आणि
व्यवहार ईमानविरोधी नसावेत.
२४) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आदेशाचा जो खुलासा केला त्यावरून माहीत होते की तोंड धुण्याच्या क्रियेत तोंडात गुळणी करणे आणि नाक साफ करणे याचा समावेश होतो. याव्यतिरिक्त तोंड धुणे पूर्ण होत नाही. कान डोक्याचा भाग आहे म्हणून डोक्याचा `मसह' (डोके धुणे) यात कानाच्या आत बाहेर ओल्या हाताने साफ करणे संमिलित आहे. म्हणून वुजू प्रारंभ करण्यापूर्वी हाथ धुणे आवश्यक आहे. कारण ज्या हातांनी मनुष्य वुजू करत आहे अगोदर ते स्वच्छ होणे आवश्यक आहे.
२५) नापाकी (अपवित्रता) संभोगाने झाली असेल किंवा स्वप्नात वीर्य मनी बाहेर पडल्याने, दोन्ही स्थितीत स्नान करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत स्नान न करता नमाज अदा करणे किंवा कुरआनला स्पर्श करणे अवैध आहे (तपशीलासाठी पाहा, सूरह ४ : ४३ टीप. ६७-६९)
Post a Comment