(३) ...तसेच हेदेखील तुमच्यासाठी निषिद्ध आहे की, फासे टाकून आपले भविष्य पाहावे.१४ या सर्व कृती आज्ञा भंग करणाऱ्या आहेत. आज विरोधकांना तुमच्या धर्माकडून पूर्ण निराशा झाली आहे म्हणून तुम्ही त्यांना भिऊ नका तर माझ्या कोपाचे भय बाळगा.१५ आज रोजी मी तुमचा धर्म (दीन) तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे. (म्हणून वैध आणि अवैधतेची जी बंधने तुमच्यावर घातली गेली आहेत त्यांचे पालन करा.)१६ परंतु जर एखाद्याने भुकेने विवश होऊन यापैकी एखादी वस्तू खाल्ली अन्यथा गुन्ह्याकडे त्याचा कल झाला असता तर नि:संशय अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आहे.१७
(४) लोक विचारतात की त्यांच्याकरिता काय वैध केले गेले आहे, त्यांना सांगा, तुमच्याकरिता सर्व पवित्र वस्तू वैध केल्या गेल्या आहेत.१८
१४) या आयतमध्ये ज्याला हराम ठरविले गेले आहे, त्याचे तीन मुख्य प्रकार जगात दिसून येतात आणि आयतचा हुकूम या तिन्हीवर लागू होतो.
१) अनेकेश्वरवादी भविष्य पाहाणे (फालगीरी) - ज्यात एखाद्या देवी किंवा देवतापासून भाग्यनिर्णय जाणून घेतले जाते किंवा परोक्षाचे ज्ञान घेतले जाते किंवा आपापसातील भांडणे मिटविण्यासाठी याचा आधार घेतला जातो. मक्का येथील अनेकेश्वरवादींनी या ध्येयासाठी काबागृहात `हुबल' नावाच्या मूर्तीला विशिष्ट केले होते. त्या मूर्तीवर सात बाण ठेवलेले होते ज्यावर वेगवेगळे शब्द कोरलेले होते. एखाद्या कामाला करणे किंवा न करणे असेल किंवा हरवलेली वस्तू सापडण्यासाठी, दाव्याचा निर्णय लागावयाचा असेल अशावेळी लोक `हुबल' च्या पुजाऱ्यांकडे जात. त्याला नजराना देत असत आणि हुबलपाशी याचना करीत की आमच्या या मामल्याचा तू फैसला कर. मग फासा टाकणारा पूजारी बाणांद्वारे भविष्य वर्तवित असे. जे बाण हातात येत त्याच्यावर लिहिलेल्या शब्दाला हुबलचा निर्णय (फैसला) समजला जाई.
२) अंधविश्वासावर आधारित फालगीरी (ज्योतिषी)- वेगवेगळया प्रकारचे शकून फलित ज्योतिषी, भविष्यक्ता, नक्षत्र इ. सर्व प्रकार तसेच फालगीरी (ज्योतिषी) चे अनेक प्रकार यात समाविष्ट आहेत.
३) जुगारासमान खेळ आणि काम - ज्यात वस्तूंचे वाटप, हक्क, सेवा आणि तर्वâसंगत निर्णयावर आधारित ठेवण्याऐवजी केवळ संयोगवश (भाग्य) गोष्टीवर आधारित असते. उदा. लॉटरी इ. या तीन प्रकाराला हराम (अवैध) ठरविल्यानंतर ``कुरआ-अंदाजी'' ची ही साधी सरळ पद्धत इस्लाममध्ये योग्य ठरविली आहे. ज्यामध्ये दोन बरोबरीच्या कामांत किंवा दोन समान हक्कांच्या मध्ये निर्णय करण्यासाठी याचा आधार घेतला जातो.
१५) `आज' म्हणजे एखादी विशिष्ट तिथी किंवा दिवस नाही तर तो काळ अभिप्रेत आहे ज्यात या आयतींचे अवतरण झाले. आपल्या भाषेत `आज' हा शब्द वर्तमान काळासाठी वापरला जातो. ``विरोधक तुमच्या जीवनधर्मापासून निराश झाले आहे.'' याचा अर्थ असा आहे की आता इस्लाम धर्म, इस्लामी जीवनपद्धती एक स्थायी व्यवस्थेचे रूप धारण करून आहे. तसेच आपल्या स्वत:च्या शासनप्रणालीने ही जीवनव्यवस्था लागू झाली व कायम झालेली आहे. विरोधक या इस्लामी जीवनव्यवस्थेच्या स्थापनेत आजपर्यंत अडथळे निर्माण करीत होते, आता मात्र ते निराश होऊन बसले आहेत. त्यांनी या व्यवस्थेला नष्ट करण्याची आशा सोडून दिली तसेच लोकांना पुन्हा अज्ञानकाळात नेण्याची त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. म्हणून तुम्ही ``त्यांची भीती बाळगू नका तर माझी भीती बाळगा'' म्हणजेच या धर्माचे आदेश आणि निर्देशावर चालण्यासाठी आता यापुढे विरोधकाची शक्ती, भीती, हस्तक्षेप किंवा प्रकोपाची भीती शिल्लक राहिली नाही. मनुष्याच्या भीतीला आता कोणतेच कारण बाकी राहिले नाही. आता तुम्हाला अल्लाहच्या कोपचे भय बाळगावयास हवे. कारण त्याच्या आदेशपालनात तुम्ही काही हलगर्जीपणा केला तर तुमच्याकडे काही बहाणा शिल्लक राहणार नाही जेणेकरून तुमच्याशी नरमाईचा व्यवहार केला जावा. आता तुम्ही दुसऱ्यांच्या प्रभावाखाली नाहीत की त्यामुळे अल्लाहचे आदेशपालन करण्यात तुम्हाला अडचण यावी. आता या स्थितीत तर स्पष्ट अर्थ होईल की तुम्ही अल्लाहचे आदेश पालन करू इच्छित नाही.
१६) ``धर्माला परिपूर्ण केले'' म्हणजे जीवन धर्माची व्यावहारिकता आणि तत्त्वज्ञानाची आता एक स्थायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एक पूर्ण सांस्कृतिक व्यवस्थासुध्दा स्थापित केली आहे ज्यामुळे जीवनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात सैद्धान्तिक रूपात किंवा विस्तृत रूपात सापडतात. मार्गदर्शनासाठी या जीवन व्यवस्थेऐवजी कोणत्याही स्थितीत दुसरीकडे जाण्याची गरज भासत नाही. कृपा पूर्ण करणे म्हणजे मार्गदर्शनाचे कार्य पूर्णत्वास नेले आहे. इस्लामला धर्माच्या स्वरुपात कबूल केले म्हणजे तुम्ही मला दिलेल्या वचनाप्रमाणे अल्लाहची उपासना आणि त्याच्या आदेशांच्या आज्ञापालनाचे कार्य व्यवहार्यत: निष्ठापूर्वक पूर्ण करून दाखविले आहे. म्हणून मी त्याचा (इस्लामी जीवनपद्धती) स्वीकार करून तुमच्या जीवनव्यवहारात तुम्ही फक्त माझीच (अल्लाहची) आज्ञाधारकता व उपासना करावी यासाठी तुम्हाला नियुक्त केले आहे. आता खरे तर माझ्याशिवाय इतर कोणाचे आज्ञापालन आणि उपासनेचे जोखड तुमच्या मानांवर शिल्लक राहिले नाही. विचासरणीच्या दृष्टीने तुम्ही माझे मुस्लिम (आज्ञाधारक) आहात. त्याचप्रकारे जीवनव्यवहारात माझ्या शिवाय दुसऱ्याचे मुस्लिम बनून राहण्यास तुम्ही विवश नाहीत.
१७) पाहा, सूरह २ (अल्बकरा) टीप. १७२
१८) विचारणाऱ्यांचा उद्देश हा होता की त्यांना सर्व हलाल वस्तूंविषयी विस्ताराने सांगितले जावे म्हणजे इतर सर्व वस्तूंना ते हराम (अवैध) समजू लागतील. उत्तरादाखल कुरआनने हराम वस्तूंचा तपशील दिला आणि यानंतर जाहीर मार्गदर्शन केले की सर्व पवित्र वस्तू हलाल (वैध) आहेत. अशाप्रकारे प्राचीन धार्मिक दृष्टिकोन रद्द करण्यात आला. प्राचीन दृष्टिकोन होता की सर्वकाही आहेत.'' यावरून स्पष्ट होते की ग्रंथधारक स्वच्छतेचे आणि पावित्र्याचे नियम पालन करत नसतील जे शरीयतनुसार आवश्यक आहे किंवा त्यांच्या खाण्यात हराम वस्तूंचा समावेश असेल तर त्यापासून दूर राहिले पाहिजे. ते अल्लाहचे नाव न घेता एखाद्या जनावराला जुबह करतात किंवा अल्लाहशिवाय दुसऱ्याचे नाव घेऊन `जुबह' करतात तर ते खाणे हराम आहे. अशाप्रकारे त्यांच्या `दस्तरखान' (जेवनावळीत) दारू, डुकराचे मांस किंवा इतर हराम वस्तू असेल तर त्यांच्यासह आपण जेवण घेऊ शकत नाही. ग्रंथधारकांऐवजी इतर मुस्लिमेतरांविषयीसुद्धा हाच आदेश आहे. फरक येवढाच आहे की `जुबह' ग्रंथधारकाचाच वैध आहे जेव्हा की त्यांनी अल्लाहचे नाव घेतले असेल. परंतु मुस्लिमेतरांच्या (ग्रंथधारकांशिवाय) हाताचा `जुबह' आपण खाऊ शकत नाही.
Post a Comment