Halloween Costume ideas 2015
October 2017

-कलिम अजीम, अंबाजोगाई
कॉंट्रॅक्ट मॅरेज'च्या आरोपावरून २० सप्टेंबरला हैदराबाद शहरातून तब्बल २० जणांना अटक करण्यात आली. यात लग्नाळू शेख, काजी व दलालांचा सामावेश होता. एका लॉजमध्ये काही बुजुर्ग शेख अल्पवयीन मुलींसोबत लग्नाचा बाजार मांडत होते. या सर्व आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतलं. या घटनेच्या सहा दिवसांनंतर पुण्यात 'हलाला' नामक 'काँट्रक्ट मॅरेज'वर बदनामीकारक कथा लिहल्याचा ठपका ठेवून काहींनी साहित्यिक राजन खान यांच्या कार्यालयावर हल्ला केला. या दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी यात 'काँट्रक्ट मॅरेज' हे  एक साधम्र्य आहे. लेखक राजन खान यांच्या १९८१ साली लिहलेल्या कथेवर सिनेमा तयार झालाय. या सिनेमातून मुस्लिम व इस्लाम धर्माची बदनामी झाल्याचा दावा काही राजकीय  संघटनांनी केला.
विशेष म्हणजे मूळ कथा न वाचता फक्त सिनेमाचं ट्रेलर पाहून त्या राजकीय कार्यकर्यांनी धुडगूस घातला. या विरोधाच्या निमित्तानं सिनेमा साहजिकच चर्चेत आला.  कदाचित हा निर्मात्याचाच स्टंट असावा अशा शंकेला जागा आहे. कारण प्रदर्शानापूर्वी सिनेमाविरोधात तीव्र आंदोलन छेडू म्हणणारे रिलीजनंतर गायब होते. राज्यभरात सिनेमाचे शो  सुरळीत सुरू आहेत. राज्यात मुस्लिम कल्याणासाठी असा पक्ष कार्यरत आहे, हे स्थानिक मुस्लिमांनाच माहीत नाही. मग अशा पक्षाच्या भीतीनं मल्टिप्लेक्स मालकांनी शो करण्यास  नकार दिला. या दोन शक्यतेवरुन निर्माते व विरोधक यांचं व्यावसायिक साटंलोटं होतं, अशी चर्चा रसिकवर्तुळात रंगलीय. असो. मूळ मुद्दा 'हलाला' या प्रथेबाबत आहे. 
हलाल' सिनेमा  पाहिल्यानंतर अनेकांच्या रसिकतेचा भ्रमनिरास झालाय. साहजिकच सिनेमात वादग्रस्त व रसिकता चाळवणारं असा काही मसाला नाही. सिनेमाचं कथानक खूपच सुमार दर्जाचं आहे.  सिनेमाचे मूळ लेखक राजन खान यांनीही म्हटलंय की ‘कथेसोबत अनेक ठिकाणी छेडछाड झालीय' मूळ कथा वाचली नसल्यानं मी त्यावर बोलू शकत नाही पण कथित हलाला  विधीबाबत सिनेमात अर्धवट माहिती प्रसारित झालीय. तलाकच्या अवैध प्रथेवरून हा सिनेमा सुरू होतो. नायक एका दमात पत्नीला तलाक बोलतो. मुळात ही प्रथाच इस्लामविरोधी आहे.  त्यामुळे ‘ट्रिपल तलाक' व ‘हलाला' प्रथेला विरोध करण्याऐवजी त्यांचं समर्थन सिनेमातून करण्यात आलंय. त्यामुळे हा प्रबोधनात्मक सिनेमा आहे असंही म्हणता येत नाही. सिनेमात  नायिकेचा एक डायलॉग आहे, ‘या प्रथेला झुगारून मला घेऊन गेला असता तर खरा मर्द ठरला असता' हा एकच संवाद मला प्रभावी वाटला. बाकी सिनेमाबद्दल बोलण्यासारखं फारसं  काही नाही, अभिनयाच्या बाबतीत सिनेमा खूपच सुमार आहे. सिनेमात तपशीलाच्या अनेक चुका आहेत.
सिनेमा कुठल्या पाश्र्वभूमीवर सुरू होतो हे शेवटपर्यंत कळत नाही. महाराष्ट्रात विभागवार व जिल्हावार भाषा बदलते पण सिनेमात बहुतांश ठिकाणी प्रमाण भाषा वापरलीय. चार-दोन  संवाद सोडले तर ग्रामीण टच भाषेला येत नाही, उलट गावातील मौलाना अस्खलीत लखनवी उर्दूत बोलतात. तर सिनेमाचं कथानक असलेलं मुस्लिम कुटुंबाचं हिंदी, मुसलमानीऐवजी  पुणेरी प्रमाण भाषेत संवादफेक करणं खटकतं. महाराष्ट्रात अनेक मुस्लिम कुटुंबात मराठी भाषा बोलली जाते, त्यात प्रामुख्याने कोल्हापुरी व कोकणी मराठी आहे. बाकी राज्यातील अन्य 
भागांत, खानदेशी, दख्खनी, हिंदी, उर्दू या व्यतिरिक्त हिंदी शैलीत स्थानिक बोली बोलतात. पण इथं सिनेमाची मुख्य पात्र प्रमाण मराठी भाषेतच बोलतात. या व्यतिरिक्त तपशीलाच्या  असंख्य न सहन होणाऱ्या चुका सिनेमात आहेत. उत्तम कथेला सिनेमाची स्क्रीप्ट जोडल्यानं कथा भरकटलीय, त्यामुळे सजग दर्शकांनी 'हलाल'कडे पाठ फिरवलीय.
रिलीजच्या पाचव्या दिवशी एकूण आठ दर्शकासोबत पुण्यात एक मोठ्या मल्टिप्लेक्सला मी सिनेमा पाहिलाय. शहरातील इतर थियटरमध्येही हेच चित्र दिसलं. वाद होऊ नये या प्रयत्नात निर्मात्यांनी खूपच 'गुलू-गुलू' सिनेमा बनवलाय. सहन न होणाऱ्या टेक्निकल (भयंकर) चुका सोडल्या तर सिनेमात काहीच वादग्रस्त नाही. त्यामुळे 'हलाल'बद्दलची चर्चा तूर्तास  थांबवतो. कारण माझ्या मते स्वतंत्र लेखाच्या विषयाइतकं महत्व हलाल सिनेमाला नाहीये. पण या निमित्तानं इस्लामच्या नावानं सुरू असलेल्या त्या भयंकर प्रथेबद्दल बोललं व  लिहलं गेलं पाहीजे. 
'ट्रिपल तलाक'नंतर सर्वात जास्त चर्चिला गेलेला शब्द म्हणजे 'निकाह ए हलाला' होय. इतकी चर्चा होऊनही याबद्दलचे गैरसमज अजून दूर झालेले नाहीये. टीव्हीचे  भाष्यकार इस्लामिक स्कॉलरसारखे प्रवचने देऊनही 'हलाला'बद्दल गैरसमजुती काढू शकलेले नाहीये. मुळातच माझी त्यांच्याकडून असलेली अपेक्षा बाळबोध आहे. पण मुस्लिम महिलांच्या  प्रश्नांवर कळवळा आणून बोलणारे हलाला प्रथेवर रसिकरंजन करत होते. हलाला प्रथा भारतीय उपखंडात कशी आली, याबद्दल अनेक तर्क आहेत. पण कुठल्याही तर्कात तथ्यता आढळत  नाही. इस्लामी न्यायशास्त्रात ही प्रथा आढळते. यातूनच १९३७ सालच्या शरियत अ‍ॅक्टमध्ये याची नोंद करण्यात आली. काही इस्लामी भाष्यकारांच्या मते कुरआन व हदीसमध्येदेखील ही प्रथा नाहीये.  मग प्रश्न असा पडतो की याची प्रॅक्टीस नेमकी कुठून आली. जगात बोटावर मोजण्याइतक्या राष्ट्रांत ही कुप्रथा सुरू आहे. बाकी अन्य देशांनी ही प्रथा हराम ठरवून बाद केलीय.
‘तिसऱ्यांदा तलाक दिला तर ती स्त्री त्याच्यासाठी वैध नाही जोपर्यंत तिचा दुसऱ्या पुरुषाशी विवाह होऊन त्यानंतर तो पुरुष तिला तलाक देईल. तसेच त्या पहिल्या पतीला आणि त्या  स्त्रीला वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यांदांचे आपण पालन करु शकू तरच त्यांना पुन्हा विवाह करुन वैवाहिक जीवन जगता येईल.’ -सूरह बकराह : २३०
कुरआनची वरील वचने स्पष्ट सांगतात की तलाकनंतर त्या महिलेचं दुसरं लग्नही काही कारणामुळे टिकलं नाही, तर पहिला पती तिच्याशी लग्न करू शकतो. वरील वचनाच्या एका  अन्य विवेचनात असं म्हटलंय की, नियोजितपणे ‘हलाला’ करणे शरियतचा भाग नसून इस्लामच्या विरोधात आहे. एकदा तला़क झाल्यानंतर कुठलीही महिला आपल्या मर्जीनुसार अन्य  पुरुषाशी लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहे. मात्र दोघांत पुन्हा बेबनाव झाल्यानं अशा परिस्थितीत ती महिला दुसऱ्या पतीनं तलाक दिल्यानंतर पहिल्या पतीसोबत आपल्या स्वखुशीनं लग्न  करू शकते. तसंच या नियोजित लग्नात 'काँट्रेक्ट पद्धती' लादणे किंवा काही दिवसांकरता लग्नासाठी पत्नीला प्रवृत्त करणं गैर आहे, असंही इस्लामनं म्हटलंय,
‘जेव्हा तुम्ही आपल्या पत्नींना तलाक द्याल आणि त्या प्रतीक्षाकाळ पूर्ण करतील, तेव्हा त्यांच्या नियोजित वराशी विवाह करण्यापासून प्रतिबंध करु नका. जेव्हा ते संमतीपूर्वक  एकमेकांशी विवाह करू इच्छित असतील’ -सूरह बकराह :२३२)
पण जाणूनबुजून एका महिलेला हलालासाठी प्रवृत्त करणे इस्लामविरोधात आहे. या प्रकाराला इस्लाममध्ये कडक शिक्षेचं प्रयोजन आहे.
अर्थातच वरील नियम हा तलाकला अवघड करण्यातला एक भाग आहे. तलाकला किचकट केलं तर तलाकचे प्रकार थांबतील असं प्रयोजन या नियमामागे होतं. दुसरं म्हणजे कुठलंही  कारण नसताना पत्नीला झटक्यात तलाक देणाऱ्या नवऱ्याला अद्दल घडावी असा हेतूही यामागे ठळक आहे. एका अर्थानं तलाक प्रथेला निर्बंध घालण्यासाठी वरील वचन आलं आहे. या  निर्बंधातून कोणी पळवाट शोधून नियोजित हलाला करीत असेल तर अशा व्यक्तीचा इस्लामने धिक्कार केलाय. या संदर्भात इब्ने माजाची (१९३६) एक हदीस आहे. यात प्रेषित मुहम्मद  (स) म्हणतात, ‘जो कोणी पूर्वनियोजित पद्धतीने हलाला करीत असेल आणि करवित असेल अशा व्यक्तीवर अल्लाहचा धिक्कार असो!’
भारतीय उपखंडात सुरू असलेली कथित 'निकाह ए हलाला'ची अघोरी प्रथा नेमकी कुठून आली याचे दाखले आढळत नाही. याबद्दल अनेक जाणकारदेखील नेमक्या पद्धतीबद्दल सांगू शकलेले नाही. पण एक मात्र खरंय की पुरुषसत्ताकतेचा पगडा यामागे स्पष्ट दिसतोय. कारण केवळ पुरुषाची चैन म्हणून ही जीवंत ठेवण्यात आली असावी. दुसरं म्हणजे निकाह ए  हलाला आड चालणारा काळा बाजार, मोठी आर्थिक उलाढाल या निमित्तानं सुरू असते. कदाचित हा आर्थिक घोडेबाजार सुरूच राहावा यासाठी 'निकाह ए हलाला'चा रिवाज सुरू असावा.  या अघोरी कुप्रथेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. किती दिवस आम्ही याविरोधात गप्प राहणार, का यासाठी पुन्हा इतर समुदायाच्या लढ्याची आम्ही वाट पाहात बसणार? किती दिवस यावर राजकारण करणाऱ्यांवर आम्ही दात-ओठ खात बसणार? आता पुरे हलाला प्रथेविरोधात आवाज उठवण्याची गरज आता निर्माण झालीय. यासाठी चर्चासत्र आयोजित करून मुस्लिम समुदायात जागरुकता आणण्याची गरज आहे. 'हलाला'बद्दल खूप वैचारिक लिहून झालंय. ते आता कपाटबंद झालंय. त्यामुळे घरोघरी जाऊन, रस्त्यावर उतरून, सार्वजनिक सभा- संमेलनं घेऊन, जाहीर इज्तेमा घेऊन 'हलाला' विरोधात प्रबोधन केलं पाहिजे. नसता पीडित महिला कोर्टात गेल्यास पुन्हा एकदा व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेप नको असं ओरडण्यापूर्वी आपणच ही प्रथा रद्दबातल केली पाहिजे. (सौजन्य : kalimajeem.blogspot.in)

मुंबई (प्रतिनिधी)-
भारतात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शेतकऱ्याच्या कर्जमाफी योजनेनुसार, राज्य सरकार जोपर्यंत  बँकेत पैसे भरणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याना वास्तविक दिलासा मिळणार नाही. ‘‘जो किसान मर नहीं रहा (आत्महत्या करीत  नाही) क्या वह अच्छा जी रहा है?’’ असा जळजळीत बॉम्बगोळा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावेंधिया यांनी टाकला आहे.
शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई प्रेस क्लब येथे शेतकऱ्याच्या समस्या यावर मूव्हमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टीस फॉर  वेलफेअर (एम.पी.जे.), महाराष्ट्र शाखेद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मुख्य वक्ते म्हणून जावेंधिया  बोलत होते. एमपीजेचे सचीव हुसैन खान यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, सबंध देशात शेतकऱ्याची समस्या एक ज्वलंत  समस्या झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी हा शुद्ध धोका असून याद्वारे केवळ २० टक्क्यांहून अधिक  लोकांना फायदा होणार नाही. केवळ कर्जमाफी ही समस्येवरील समाधान नसून इरीगेशन, विजेची पूर्तता यासुद्धा प्रमुख समस्या असल्याचे खान यांनी सांगितले. एमपीजे प्रदेश सरचिटणीस अफसर उस्मानी म्हणाले की, ग्रामीण भागात ना शाळा आहेत, ना रस्ते  आहेत. सिंचन योजनासुद्धा अपूर्ण अवस्थेतच आहेत. देशाची वाटचाल सुपर पॉवरकडे चाललेली आहे. शेतकरी आत्महत्या करण्यास  मजबूर झालेला आहे. 
गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावेंधिया यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या योजनांची लक्तरे वेशीवर टांगताना सांगितले की, गेल्या वर्षी राज्य सरकारने कापसाचे आधारभाव मूल्य रु.  ५५०० प्रति क्विंटल दिले होते. पण यावर्षी मात्र सरकार रु. ४४०० चा हमीभाव देत आहे? शेतकऱ्याना जगवायचे की मारायचे आहे सरकारला? असा खणखणीत इशारा देऊन जावेंधिया यांनी स्पष्ट केले की जगात एकही सरकार, विकसित देश असो अविकसित  देश, असे नाही जे शेतकऱ्याना मदत करीत नाही. जर बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनला सबसिडी मिळत असेल तर शेतकऱ्याना शेती  उत्पादनावर सबसिडी का देत नाही? असा रोखठोक सवाल करीत ‘‘माणसाला माणूस म्हणून इज्जत सन्मान मिळावा,’’ असे विचार  म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याची आठवण करून देत ते पुढे म्हणाले की देशात पराकोटीला पोहोचलेला  जातियवाद तसेच जागतिकीकरण यामुळेही शेतकरी आंदोलनाला खीळ बसली. ‘गेट करार’ शेतकऱ्याच्या मुळावर उठला होता,  त्याविरूद्ध प्रखर आंदोलन, विरोध होऊ नये म्हणून जातियवादी शक्तींनी व भांडवलदारांनी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली, असा  गौप्यस्फोट त्यांनी केला. ०जावेंधिया यांनी पुढे सांगितले की, खेडी आणि शेतकरी यांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, असे  केंद्रशासित पक्ष आणि त्याच्या वैचारिक पीठांना वाटत आहे, तेव्हा एमपीजे बरोबर, शेतकरी संघटना प्रत्येक आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही दिली. एम.पी.जे. मीडिया प्रमुख गजनफर हक यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

- इद्रिस खान
या गोष्टी कोणी नाकारू शकत नाही की आपला भारत देश सध्याच्या काळात एका वेगळ्या परिस्थितीत वाटचाल करीत  आहे लोकांमध्ये बेचैनी, स्थीरता, नैराश्य आहे, राग आहे. लोकांमध्ये सरकारच्या निर्णयाशी नाराजगी आहे. सरकारच्या धोरणाशी लोकांमध्ये घृणा आहे. देशात सुरू असलेली एकमेकांविषयी नफरत पसरविणाऱ्या भेदभावाच्या वातावरणास रोखण्यास सरकार असफल आहे. कुठे लोक महागाई व बेरोजगाराच्या समस्यांपासून परेशान आहात तर कुठे शेतकरी आपल्या समस्याला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. महिलांवरील अत्याचार, रेप प्रकरणे थांबायला तयार नाहीत दलितांवर, अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. अशा प्रकारचे वातावरण ना थांबत आहे, ना सरकार याला थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. 
उलट आवाहन केले जात आहे की, देश पुढे जात आहे. देशाची प्रगती होत आहे. दुःखाची गोष्ट अशी की या घटनांवर शासन मूग गिळूनच नाही तर गुंडांची पाठराखण करीत आहे. लोकांमध्ये जागृत होणारी ही बेचैनी, नैराश्याचा वातावरण, त्यांच्या मनात गोठवलेला राग हा कोणत्या स्तरावर पोहचेल? याचे परिणाम काय होतील? सांगणे कठीण झाले आहे. संदेश हा दिला जात आहे की, जे लोक सरकारची व त्यांच्या धोरणाची तरफदारी करीत नाही ते देशद्रोही आहेत सध्याच्या परिस्थितीत देशात जे वातावरण आहे ते पाहुन असे वाटते की देशात कायदा नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही.
शासनकर्त्यानीं देशाला गुंडाच्या हवाली करून दिले आहे. त्यांनी कोणावरही  अतिरेक करावा, वाटेल त्याला रस्त्यावर भरचौकात मारझोड करावी, मग तो दादरीचा अखलाक असो की राजस्थानच्या अल्वर  गावांतील पहलू खान असो, अगर झारखंडच्या लातीहारमधील मोहम्मद मजलुम व इनामतुल्ला; या दोघांना तर कत्तल करून  झाडावर लटकवण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर थाना येथील गुलाम मोहम्मद नावाच्या व्यक्तीला जिवे मारण्यात आले.  दिल्ली विद्यापीठाच्या नजीबला गायब करून आजपर्यंत त्याचा पत्ता लागू दिला नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये खोटेनाटे  आरोप लावून बिनधास्त कत्तल करण्यात आली परंतु मागील महिन्यात देशाची राजधानी दिल्ली ते मथुरा जाणाऱ्या रेल्वेमध्ये  वल्लभगढच्या दरम्यान 16 वर्ष वयाच्या जुनैद नावाच्या निष्पाप मुलाला जे रमजानच्या ईदीसाठी कपडे व सामान खरेदी करून  
आपल्या घरी जात होता, त्याला उपवास (रोजा) होता, अशा परिस्थितीत प्रवासातील गुंडानी त्याची दाढी धरून ओढली, त्याची टोपी  हवेत भिरकवली. ‘तुम्ही बीफ खानारे आहात, तुम्ही पाकिस्तानाचे एजंट आहात,’ असे सांगून शिवीगाळ करून थांबले नाहीत तर त्या कोवळ्या मुलावर चाकूचे 8 घाव केले, त्याच्या दोन भावांना व सोबत्यालाही जबरदस्त मारहाण करून जुनैदच्या पोटात चाकू भोसकून  जिवे मारून फरार झालेत. दलितांवरील अत्याचार काही कमी नाहीत. लिहतो म्हटल्यावर वर्तमानपत्राची पाने पुरणार नाहीत.  थोडक्यात सांगायचे तर दलित समाजाच्या व्यक्तीला सर्वोच्च पदावर विराजमान केल्याने प्रश्न सुटनार नाहीत. एकीकडे अशा  प्रकारचा देखावा करायचा आणि दुसरीकडे दलित खासदाराला राज्यसभेत त्याला आपल्या समाजाच्या व्यथा मांडते वेळी गदारोळ  माजवून त्याच्यावर राजीनामा देण्याची पाळी आणायची, हा कुठला व कसा न्याय आहे? समजू शकत नाहीं. इतके सर्व काही घडून  आजही देशात गंगा-यमुनाची सभ्यता कायम आहे. आजही देशवासीयांत प्रेम, सद्भावना, एकमेंकाच्या सुखदुःखात सामील होणे,  लग्नकार्यात हजर राहणे, मुस्लिम बांधव आपल्या देशबांधवांना दसरा दिवाळी सणाच्या शुभेच्छा देतात, तर हिंदू बांधव मुस्लिमांना  ईदच्या शुभेच्छा देतातमुस्लिमांकडून साजरे करण्यात आलेल्या ईद मिलनच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतात. असेच प्रेम  भावी तरून पिढीत कायम ठेवण्यासाठी देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक सुज्ञ व विद्वान  व्यक्तींना समोर येण्याची गरज आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान ट्वीट करून इदीच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणामध्ये  गौरक्षकांच्या माध्यमातूंन होणाऱ्या हत्याकांड व अत्याचाराच्या विरोधात विधाने करतात, परंतु याबाबतीत राज्य सरकारांना कडक  निर्देश दिले जात नाहींत. या निमित्याने एक म्हण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, ‘चोराला म्हणे चोरी कर आणि  सावकाराला सांगे खबरदार!’ 

धर्म माणसाचा मूळ स्वभाव असून तो त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. मानवी इतिहासाशी तो इतका निगडीत आहे की धर्माला नजरेआड करून इतिहासाची मांडणीच  करता येत नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची अत्यंत वैयक्तिक बाब असली तरी समाजाशीत्याचा तेवढाच दृढ संबंध आहे. म्हणजे धर्माचा अवलंब करताना सभोवतालच्या  समाजाचीही दखल घ्यावी लागते. मानव समाजाचा घटक असल्याने समाजाचा दबाव त्यावर येतो आणि कौटुंबिक वारसाने जो धर्म त्याला मिळालेला असेल त्याच धर्मात  तो वावरतो.
कौटुंबिक धर्म आता त्याचा वैयक्तिक धर्म म्हणून ओळखला जातो. प्रत्येक धर्म माणसाला समाजाच्या माध्यमाने संबोधतात त्या समाजेच माणसाच्या विचार व  स्वातंत्र्यावर दडपण येत असते. पण याची जाणीव त्याला होत नसते. कारण सामाजिक व्यवहारांमध्ये माणूस आपोआपच सहभागी होत राहतो. त्याच्या जडणघडणासाठी तो  योगदानही देतो. म्हणून पूर्वजांकडून मिळालेला धर्म खरा की खोटा याचा एक सामान्य माणूस कधीही विचार करीत नाही. या प्रसंगी असे प्रश्न मांडले जातात की, सामाजिक आणि धार्मिक तत्त्वे आणि मूल्ये परस्परविरोधी आहेत का? माणसाने वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या मुक्तीसाठी निवडेला मार्ग (धर्म) जर सर्वश्रेष्ठ ठरवला तर मग  संस्कृतीने विणलेल्या समाजाची त्यापासून अवहेलना तर होत नाही ना? स्वत:च्या आत्म्याच्या शांततेसाठी या जगाकडे पाठ फिरविली आणि एकांतवासात जाऊन वास्तव्य  केले तर त्यापासून त्यांच्या पदरी काय पडणार?
यापेक्षा जर त्यांनी समाजातील वाईट वृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले असते तर आपल्या बरोबरच आपल्या समाजालाही वाचविले असते. आपल्या साथीदारांचे, मित्रांचेही भले केले असते. एवढ्यावरच न थांबता पुढे जाऊन सांगितले जाते की, माणसाचा विकास समाजाच्या विकासाशी बांधिल आहे. समाज म्हणजे मानवाचे  सामूहिक कार्यक्षेत्र. त्या कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाचा इन्कार करणे होय. या जगातील आपल्या स्नेहसंबंधींचा माणूस सहप्रवासी आहे आणि या  प्रवासात आपल्या सोबत्यांना बरोबर घेतल्यानेच त्याला देवाचे दर्शन घडेल. एकंदर अशी परस्परविरोधी विधाने समाजशास्त्रज्ञ आणि धर्मपंडित माणसासमोर मांडतात, स्वाभाविकच माणसाला या दुहेरी पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे त्याच्या स्वतंत्र व्यक्तित्वात आणि सामाजिक अस्तित्वात तणावाचे वातावरण निर्माण होते.  अलीकडच्या काळात दलित अत्याचाराचा प्रश्न वादग्रस्त होत असतानाच नुकतेच पुण्यातील ‘सोवळे’ प्रकरण चव्हाट्यावर आले आणि जातियवादी व्यवस्थेची मानसिकता  पुन्हा एकदा उघड झाली. धर्माच्या शिकवणींच्या नावाखाली जे काही आज अंमलात आणले जात आहे, ते धर्माच्या मूळ शिकवणीत नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रीतीरिवाजांना धर्माचा आधार देण्यात आला आहे. म्हणूनच या रीतीरिवाजांना धार्मिक प्रावित्र्य प्राप्त झाले असल्याने आणि धर्मपंडितांनी त्यास मान्यता दिली असल्याने  सामान्य माणूस त्यांना आव्हान देत नाही. त्या रुढीपरंपरांनाच तो खरा धर्म समजतो. या रुढीपरंपरा कोणत्याही संस्कृतीवर आपला प्रभाव टावूâ शकतात. त्यामुळे या  रुढीपरंपरा त्या त्या संस्कृतीशी संलग्न असलेल्या समाजाचा गाभाच बनून जातात. त्यातही त्यांना धार्मिक मान्यता मिळाली तर मग श्रद्धा आणि धर्माची शिकवण म्हणून  कोणीही सामान्य माणूस त्यांच्या आहारी जातो आणि त्यालाच तो खरा धर्म समजतो. तोच वारसा पुढील पिढ्यांना आपोआपच मिळतो. अशा परिस्थितीत जर कुणी  धर्माच्या विरूद्ध बोलले, वागले अथवा त्याचा त्याग करण्याचे धाडस केले तर स्वाभाविकच अशा माणसाला समाजाशी तोंड द्यावे लागते. एकदा का कोणत्याही प्रकरणाला  धार्मिक पाठबळ मिळाले की मग कसलेच स्वातंत्र्य उरत नाही. विचारवंत आणि धर्मपंडित हातमिळवणी करून जनमाणसाला अंधारात ठेवून त्यांच्या भावनांना हात घालून  आपले हित साधण्याचे प्रयत्न धर्म आणि राजकीय सत्ताधारी करीत आले आहेत आणि यापुढेही करीत राहतील. कारण त्यांना सत्तेला आपल्या अधिपत्त्याखाली ठेवायचे
असते आणि तीच त्यांची गरज असते. धर्माचा वापर केल्याविना त्यांना हे करता येत नाही. मानवाला या जगात जर स्वातंत्र्य नसेल तर त्याचे जीवन गुलामगिरीत मग ती या जगात कुणाचीही असो, समाजाची, राष्ट्राची, धर्मपंडितांची असो, व्यतीत होईल. धर्म माणसाची वैयक्तिक बाब आहे, असे म्हणणारेच त्याची दिशाभूल करतात.  सोवळेपणाचा आव आणणाऱ्या ‘ओवळ्या’ मानसिकतेला माणसाने बळी पडू नये.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@gmail.com)

उपरोक्त विषय दर्शवितो की इस्लामी राज्यसत्तेत आत्मिक, स्वाभाविक व ध्येयात्मक दृष्टीकोणाचा बदल झाला आहे. अशाच प्रकारचा बदल किंवा परिवर्तन शासकाकडून इस्लामी राज्य घटनेच्या मूलतत्वामध्ये सुद्धा प्रकट होवू लागला या इस्लामी राज्यघटनेचे सात महत्व पूर्ण तत्व होते. त्यापैकी प्रत्येकात बदल घडून आणला गेला.


1) स्वतंत्र निवडणूक :
इस्लामिक राज्यघटनेची मुलभूत आधारशिला स्वतंत्र निवडणूक आहे. आम जनता स्वतंत्रपणे आपले प्रतिनिधी निवडते. कोणीही प्रयत्न पूर्वक सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न करत नाही. जनता आपला सल्ला मसलतीने उत्कृष्ट उमेदवाराची निवड करून सत्ता त्याच्या सुपूर्द करते. सत्ता-स्विकृती करताना त्यात उमेदवाराच्या प्रयत्नाचा अथवा कटाचा दखल नसतो. जनता सत्ता स्वीकृत करण्यास अथवा अस्विकृत करण्यास पूर्ण स्वतंत्र आहे. जोपर्यंत उमेदवारास सर्वांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत तो अधिकारावर येवू शकत नाही. तसेच जेव्हा जनतेचा विश्वास त्याच्यावरून उठेल त्यावेळी त्याने सत्तेत चिटकून राहू नये. सर्व मान्यवर खलीफा (ह.अबुबक्र (रजि.), ह. उमर रजि., उस्मान (र), ह.अली (रजि.) गण याच तत्वानुसार सत्तेवर आले होते.
    पण अमीर माविया जेव्हा खलीफा म्हणून सत्तेवर आले तेंव्हा परिस्थिती संभ्रामक झाली. म्हणूनच अमीर माविया सहाबी असून सुद्धा त्यांची गणना खलीफांच्या मालीकेत केली गेली नाही. हा त्यांचा एक प्रकारचा निषेधच होता. जेव्हा अमीर मावियाने मृत्यू पश्चात आपला पुत्र यजीदची खलीफा म्हणून घोषणा केली तेव्हा भयंकर परिवर्तन घडून आले. ज्यामुळे इस्लामी कायद्याला अगदी धाब्यावरच बसविले गेले. येथूनच वंश परंपरागत बादशाहीची सुरूवात झाली. त्या वेळेपासून आजतागायत मुस्लिम राष्ट्रांत निर्वाचित शासन पद्धतीकडे वळण्याची संधी प्राप्त झाली नाही. आता शासनकर्ते मुस्लिमांच्या स्वतंत्र सल्ल्याने नव्हेतर आपल्या शक्ती सामर्थ्याच्या बळावर अधिकार प्राप्त करू लागले. सत्ता स्वीकृती अथवा अस्विकृतीच्या मामल्यात लोक आता स्वतंत्र राहीले नाहीत. जनतेची स्वीकृती सत्तेवर येण्यास अनिवार्य राहीली नाही. आता कोणीच धजावत नाही आलेल्या व्यक्तीस विरोध करण्यास जर जनतेची सत्ता स्वीकृती प्राप्त झाली नाही तरीही सत्तेवर आलेली व्यक्ती सत्ता त्याग करण्यास तयार नसते. अशा प्रकारे बलपूर्वक सत्ता स्वीकृतीचा निषेध वा विरोध मन्सुर अब्बासीच्या शासन काळात इमाम मालीक (रह.)कडून करण्यात आला तेव्हा त्यांच्या पाठीवर आसूडांचे फटके मारले गेले व त्यांचे दोन्ही बाजू खांद्यापासून उपटून काढण्यात आले.

2) सल्लागार व्यवस्था
    दूसरा महत्व पूर्ण नियम या राज्य घटनेचा असा की राज्याचे शासन जनतेच्या सल्ला मसलतीने केले जावे. सल्ला अशा व्यक्तिकडून घेतला जावा ज्याच्या उच्च ज्ञान, संयम, विवेक व योग्य सल्ला देण्याच्या क्षमतेबद्दल आम जनतेस विश्वास असावा. खलीफांच्या शासन काळात जे लोग या संसदेचे सदस्य बनविण्यात आले त्यांचे निवड सर्वसामान्य जनतेकडून झालेली नव्हती तर असे सदस्य खलीफाद्वारे नियुक्त केले जात असे. परंतु, खलीफांनी त्यांचे सल्लागार मनोनित करताना हे कधीच पाहिले नव्हते की हे नियुक्त संसद सदस्य त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचे समर्थक व स्वार्थ पूर्तीसाठी सर्वोत्तम लोक असतील. उलट त्यांनी निस्वार्थपणे सन्मान पूर्वक समाजातील मौल्यवान रत्नांचीच निवड केली होती. ज्यांच्याकडून सत्य, निस्वार्थता, निर्भिडतेचीच अपेक्षा होती. त्यांच्या ज्ञान, सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने योग्य मार्गदर्शन व परामर्षः यावर प्रत्येकास विश्वास होता की हे लोक राज्यसत्तेस कधीही चुकीच्या मार्गावर जावू देणार नाहीत. आधुनिक काळानुसार जरी त्या काळी निवडणुका झाल्या असल्या तरी जनेतनं उपरोक्त स्वभावाच्या व्यक्तींनाच निवडून दिले असते व त्यांनाच विश्वास पात्र समजले असते.
    बादशाहीचा प्रारंभ होताच संसदेच्या कार्य पद्धतीत बदल झाला. आता बादशाह मर्जीनुसार स्वच्छंदपणे राज्य करू लागले. आता राजपुत्र व प्रशंसक (खुशामदी) दरबार सदस्य प्रांताचे गव्हर्नर व सरसेनापती त्यांच्या परिषदेचे सदस्य असत. त्यांचे सल्लागार असे असत की जर प्रामाणिकपणे आम जनतेचे मत त्यांच्या विषयी घेतले गेले असते तर त्यांच्या पदरात विश्वासाच्या एका मताऐवजी धिक्काराचे हजार मत पडले असते. याच्या विपरीत ईश्वरभय बाळगणारे सत्य प्रिय, सत्य वचनी, ज्ञानी, विवेकी, संयमी लोक ज्यांच्याबद्दल सर्व सामान्य लोकांना आदर व विश्वास होता असे लोक बादशाहाच्या दृष्टित अविश्वास पात्र, दोषी व संदिग्ध स्वभावाचे ठरू लागले.

3) अभिव्यक्ती स्वातंत्र्य :
    इस्लामी राज्यघटनेचे तिसरे मुलभूत तत्व आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सदाचारांचे आदेश व दुराचारांस प्रतिरोध. याला इस्लामने प्रत्येक मुस्लिमांचा अधिकारच नव्हे तर कर्तव्य म्हणून मान्यता दिली आहे व इस्लामचा हा आदेश आहे. इस्लामी समाज व इस्लामी शासन हे योग्य मार्गावर आहे किंवा नाही हे लोकांचा आत्मा व लोकांची वाणी स्वतंत्र असण्यावर अवलंबून आहे. कोणत्याही अनुचित कार्याबद्दल श्रेष्ठातल्या श्रेष्ठ व्यक्तिस त्याची चूक दाखविण्याची मुभा आहे. सत्य निर्भिडपणे सांगता यावे. खलीफांच्या शासन काळात केवळ हेच नव्हे की जनतेचे अधिकार व हक्क सुरक्षित व अवरोध होते तर खलीफा याला आपला कर्तव्य समजत व ते कर्तव्य बजावण्यास जनतेला प्रोत्साहित करीत असत. त्यांच्या संसद सदस्यानांच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीस बोलण्याचा व जाब विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. हे अधिकार वापर करणाऱ्या व्यक्तिस कसल्याही प्रकारची दमदाटी व भीती न दाखविता त्याच्या या धाडसीपणाची प्रशंसाच केली जात होती. जाब विचारण्याच्या हक्काचे स्वातंत्र्य इस्लामने प्रदान केलेले एक इश्वरीय हक्क आहे. व या इश्वरीय हक्काचा सन्मान करणे खलीफा आपले परम कर्तव्य समजत असत. व या अधिकाराचा जनकल्याणासाठी प्रयोग करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे पावन कर्तव्य आहे. जे अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) मार्फत समाजास प्राप्त झाले आहे, या हक्कांच्या वापरासाठी समाज व शासन दोघांचे ही वातावरण पोषक राहील याची कटाक्षाने काळजी घेतली जात असे. अशी दक्षता घेणे खलीफा हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजत.
    पण राजेशाही अमल सुरू झाल्याबरोबर जणू सद्‌सद्‌विवेक बुद्धीचे द्वार बंदच झाले. मुस्कटदाबी सुरू झाली. परिस्थिती व कायदा असा झाला की तोंड उघडावयाचेच असेल तर फक्त स्तुती व प्रशंसेसाठी नाहीतर तोंड बंद ठेवा. जर तुमचा अंतरात्मा इतका बलवान आहे की सत्य सांगितल्या शिवाय शांत बसूच शकत नाही तर बंदीवास किंवा मृत्यूदंडासाठी सज्ज रहा. हे धोरण मुस्लिमांना हळू-हळू निराश, भित्रे व अत्याचार सहन करणारे बनवीत गेले. जीवनाचा धोका पत्करून सत्य बोलणारे त्यांच्यात हळूहळू कमी होवू लागले. खुशामदी व चापलूसीची किंमत या जगाच्या बाजारात खूप वाढली. सत्यवचनी सत्य मार्गाची किंमत घटत गेली. उच्च लायकीवाले प्रामाणिक ; स्वतंत्र विचार श्रेणी लोक राजकारणापासून दूर गेले. सामान्य जनतेत खूप निराशा पसरली. कोणत्या राजपरिवाराचे राज्यस्थायी स्वरूपाने टिकून रहावे याचे प्रयत्न करण्याची भावना त्यांच्यात राहिली नाही. एक राजास पदच्यूत करून त्याचे राज्य बळकावणाऱ्याचे विरोधात त्यांनी निष्क्रियता दाखविली. अनेक घराणे राज्य सत्तेवर आले नी गेले. पण लोकांनी केवळ मूक बघ्याची भूमिका घेतली. या आवा गमनाच्या खेळात कसलीच रूची दाखवली नाही.

4) अल्लाह व जनतेसमक्ष उत्तरदायी :
    चौथे मुलभूत तत्व जे तिसऱ्या तत्वाशी निगडीत आहे ते म्हणजे खलीफा व त्याचे शासन अल्लाह व जनता दोघांच्या समक्ष उत्तरदायी आहेत. अल्लाह समक्ष उत्तरदायित्वाच्या जाणीवेने खलीफांना रात्रीची झोप व दिवसाची विश्रांती कठीण होती आपण रयतेला उत्तरदायी आहोत या भावनेने खलीफा स्वतःला सर्व ठिकाणी जबाबदार समजत असत. त्यांच्या शासनात हा नियम नव्हता की केवळ संसदभवनातच पूर्व सूचना देवूनच प्रश्न विचारता येतो. त्याचसाठी प्रत्येक दिवशी पाच वेळेस सार्वजनिक पद्धतीने नमाज अदा करण्याचा हेतू मस्जिदमध्ये उपस्थित राहून जनतेसमक्ष खलीफा जात असे. त्याचप्रमाणे प्रत्यक शुक्रवारी जुमाच्या नमाजमध्ये सामील राहून सर्वांचे म्हणणे ऐकत व ऐकवीत असत. दिवस आणि रात्र आपल्या अंगरक्षकाशिवाय बाजार पेठेत मुक्तपणे फिरत असत. इतर बादशाहा प्रमाणे बाजू व्हा रस्तासोडा अशा प्रकारच्या घोषणा होत नसत. सामान्य माणसाप्रमाणे सामान्य जनतेत ते वावरत असत. त्यांचे शासकीय निवासस्थाना (कच्चे घर)चे द्वार सदैव व सर्वांसाठी खुले होते. प्रत्येक इसम त्यांची भेट घेवू शकत होता. या सर्व प्रसंगी प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रश्न विचारू शकत होता व उत्तर अपेक्षित करू शकत होता. हे उत्तरदायित्व सिमित नव्हते तर याचे स्वरूप विशाल सर्व काळी सर्वांसाठी होते. हे प्रश्न विचारणे आजच्या सारखे निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फतचे नव्हते तर समस्त जनते समक्ष प्रत्यक्ष पणे होत असे. ते जनतेच्या इच्छेने अधिकारावर आले होते व जनतेची इच्छा त्यांना अधिकारावरून दूर सारू शकत होती. त्यांच्या जागी दूसरा खलीफा निवडला गेला असता. हेच कारण होते की त्यांना जनतेसमोर जाण्यास कसलीच भीती नव्हती व अधिकार पदापासून पदच्युत होण्याची धास्ती नव्हती.
      परंतु, बादशाही अमल सुरू होताच उत्तरदायी शासनाची कल्पना लोप पावली. अल्लाह समक्ष उत्तरदायी असण्याचा विश्वास केवळ बोलण्यापर्यंतच मर्यादित राहिला. प्रत्य आचरणात आणण्याचे चिन्ह फारच कमी दिसू लागले. प्रत्यक्ष जनतेसमक्ष उत्तरदायी असण्याचा तर कोण असा माईंचा लाल होता की जो बादशहास विचारण्याचे धाडस करील. ते बलपूर्वक सत्तेवर आले होते व त्यांचे आव्हान होते. ’’ज्यात सामर्थ्य असेल त्यांनी आमच्याकडून सत्ता हिसकावून घ्यावी’’ असे लोक जनतेचा सामना कसे करू शकत होते, कोणाची हिम्मत होती त्यांच्या जवळपास फिरकण्याची? ते नमाज सुद्धा अदा करीत होते तर सामान्य लोकांसमवेत नसून त्यांच्या महालातील अति सुरक्षित मस्जिदमध्ये. त्याचप्रमाणे त्यांच्या अतिविश्वसनीय अंग रक्षकाच्या गोतावळयात त्यांच्या स्वाऱ्या बाहेत निघत असत. पुढे व पाठीमागे सशस्त्र अंगरक्षक असत. रस्ते निर्मनुष्य केले जात. जनता व त्यांची समारोसमोर भेट कोठेच होत नसे
(क्रमशः) पुढील अंकात शेवटचा भाग.

- बशीर शेख
6 आक्टोबर रोजी महाराष्ट्रभर एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे नाव हलाल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलेले असून, चित्रपटाची कथा राजन खान यांनी लिहिलेली आहे. सदर चित्रपटाचे महाराष्ट्रभर स्वागत होत आहे, असे जरी भासविले जात असले तरी मुळात हा चित्रपट तद्‌न फालतू आणि चुकीच्या कथानकावर आधारित आहे. लोकसत्ता सारख्या दैनिकाने आपल्या 11 आक्टोबरच्या अंकात या
चित्रपटाचे परिक्षण सादर करतांना ’विसंगतीवर अचूक भाष्य’ असे शिर्षक लावलेले आहे. या चित्रपटात मुस्लिमांमधील नसलेल्या एका परंपरेला ती आहे, असे भासवून त्यावर एक पूर्ण चित्रपट बेतलेला आहे, यात शंका नाही की तीन तलाक हा मुस्लिमांमधील एक गंभीर प्रश्न आहे. मात्र हलाला हा मुस्लिमांमधील प्रश्न कधीच नव्हता आणि नाही. अपवादात्मक परिस्थितीत ठरवून हलाला केल्याच्या काही घटना उदाहरणार्थ कमाल अमरोही-मीना कुमारी घडलेल्या आहेत. हे नाकारता येत नाही. परंतु अशा घटना अतिशय अपवादातील अपवाद आहेत. चित्रपटाची कथा अशी आहे की, एका गावात एक मुस्लिम पुरूष आपल्या पत्नीला एकाच वेळेस रागाच्या भरात तीन तलाक देतो. मात्र राग शांत झाल्यावर काही दिवसांनी तो परत तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी तयार होतो. मात्र गावातील एक आलीम हा त्यास विरोध करतो व हलाला केल्याशिवाय त्याला पत्नीला पुन्हा नांदविता येणार नाही, असे सांगतो. पुढे काय होते याच्याशी आपले काही देणेघेणे नाही. मुळात गफलत इथेच झालेली आहे. तीन तलाक दिल्यानंतर पत्नीला परत नांदविता येत नाही हे सर्व मुस्लिमांना माहीत आहे. मग चित्रपटातील नायकाला ते कसे माहित नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तीन तलाक दिलेले असतांना कुठलाही शहाणा पुरूष परत त्याच स्त्रीकडे जावून तिच्याशी पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न मुदलातच करू शकत नाही. म्हणून या चित्रपटातील नायक तसा प्रयत्न करतो हेच मुळात इस्लामी शरियाला धरून नाही. म्हणजेच यातील पुढील कथानक आपोआप फसत गेलेले आहे. ठरवून हलाला अर्थात कृत्रिम हलाला करता येत नाही, हे साधे धार्मिक तत्व आहे.
    मुळात कुरआनमध्ये जी तरतूद आहे ती अशी की,एखाद्या मुस्लिम पुरूषाने आपल्या पत्नीला तलाक दिलेला असेल. मग एक असो का तीन व तिला सोडून दिलेले असेल व तिचा पुनर्विवाह झालेला असेल व काही कारणांमुळे तिचा तिचे त्या ठिकाणीही नांदणे लागलेले नसेल आणि त्या पुरूषानेही तिला नैसर्गिक कोर्समध्ये तलाक दिलेला असेल व तिची इद्दत संपलेली असेल तेव्हा पहिल्या पतीला जर असे वाटत असेल की तिच्याशी पुन्हा लग्न करावे तर तो करू शकतो. या संदर्भात पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘नंतर जर (दोन वेळा तलाक दिल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला तिसऱ्यांदा) तलाक दिला तर ती त्याच्यासाठी वैध नाही. जोपर्यंत तिचा (स्वैच्छेने) दुसऱ्या पुरूषाशी विवाह होवून त्यानंतर (स्वैच्छेने) तो पुरूष तिला तलाक देईल तसेच पहिल्या पतीला आणि या स्त्रीला वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे आपण पालन करू शकू तरच त्यांना पुन्हा विवाह करून वैवाहिक जीवन जगता येईल. या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत. ज्या तो लोकांच्या मार्गदर्शनासाठी स्पष्ट करीत आहे. जे (त्याच्या मर्यादा भंग करण्याचा परिणाम) जाणतात.’ (संदर्भ : कुरआन : सुरे बकरा आयत नं. 230) 
    मात्र तीन तलाक दिल्यानंतर पश्चाताप झाल्याने तिच्याशी पुन्हा लग्न करण्यासाठी ठरवून एखाद्या विश्वासपात्र व्यक्तीबरोबर तिचे अस्थाई लग्न लावून त्याच्याशी तिचे शारीरिक संबंध झाल्यानंतर परत त्याला तलाक देण्यास भाग पाडून पुन्हा तिच्याशी विवाह करणे हे अनैतिकच नसून गुनाहे कबीरा ’मोठा गुन्हा’ आहे. इस्लामसारख्या नैतिक व्यवस्थेच्या धर्मामध्ये अशी माणुसकीला काळीमा फासणारी तरतूद असूच शकत नाही, याची साधी माहिती स्वतःला राजन खान म्हणणाऱ्या लेखकाला नसावी ही दुर्देवाची बाब आहे. राजन खानचा साहित्य इतिहास व त्यांची विचारधारा पाहता त्यांनी इस्लामच्या तरतुदींचा विपर्यास केला यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. मुळात चार-दोन लोकांनी ठरवून हलाला केला असेल तर ते इस्लामच्या नजरेमध्ये सर्व गुन्हेगार आहेत. इस्लामच्या धार्मिक तत्वांशी त्यांना जोडता येणार नाही. इस्लाममध्ये ठरवून हलाला करताच येत नाही. त्यामुळे हलाल चित्रपट हा विसंगीतवर अचूक भाष्य नसून चुकीचे भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाला फार महत्व देण्याची आवश्यकता नाही. मुळातच चुकीच्या कथानकावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपट लिहिणाऱ्या राजन खानची नियतच मुळात चुकीची आहे. शेवटी एवढेच म्हणावे वाटते की इस्लाममधे असली कुठलीच हिणकस तरतूद नाही जी स्त्रीत्वाचा अपमान करेल. त्यामुळे हलाल चित्रपटाचा ज्या ठिकाणी उल्लेख येईल हे सत्य वाचकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

-राम पुनियानी
विद्यार्थ्यांना हे का शिकविले जात नाही की राईट बंधूंच्या विमानाच्या शोधाच्या अगोदर अगोदर शिवकर बापूजी तलपडे नावाच्या एका व्यक्तीने विमान तयार केले होते. या व्यक्तीने राईट बंधूंपेक्षा 8 वर्षे अगोदर विमान उडवूनही दाखविले होते. आमच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना हे सांगितले जाते काय? जर सांगितले जात नसेल तर त्यांना हे सांगितले गेले पाहिजे’
  
हे अमृत वचन आहे केंद्रीय मानवसंसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे. जे त्यांनी एका पुरस्कार वितरण समारोहास संबोधित करतांना उच्चारले आहे. अशा गोष्टींव्यतिरिक्त असे निती नियम ही लागू केले जात आहेत जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशातील शोध आणि शिक्षणाच्या दिशेवर विपरित परिणाम टाकत आहेत.काही दिवसांपूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी एक उच्चस्तरीय समिती गठित करून त्यांना सांगितले होते की, ’’ पंचगव्याच्या फायद्यांवर संशोधन करावे. पंचगव्य म्हणजे गोमुत्र, शेण, दूध, दही आणि तुपाचे मिश्रण. पंचगव्यावर शोध करण्यासाठी आयआयटी दिल्लीला नोडल संस्थान म्हणून नियुक्त केले गेले आहे. अशाही बातम्या येत आहेत की, मध्यप्रदेश सरकार शासकीय दवाखान्यात ॲस्ट्रो ओपीडी अर्थात ज्योतिष बाह्य रूग्ण विभाग सुरू करणार आहे. ज्या ठिकाणी ज्योतिषी रूग्णांना हे सांगतील की त्यांना कोणता आजार आहे. हे पुण्यकर्म राज्य शासनाद्वारे स्थापित आणि पोषित एका संस्थेद्वारे केले जाणार आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य मंत्रालयाच्या आयुष विभागाच्या सह्योगाने संजीवनी बुटीला शोधून काढण्यासाठी एक परियोजना सुरू केलेली आहे. संजीवनी बुटीचा उल्लेख रामायणात आलेला आहे. जेव्हा लक्ष्मण रावणाबरोबर युद्ध करतांना बेशुद्ध झाले तेव्हा ही बुटी आणण्यासाठी हनुमान यांना पाठविण्यात आले. हनुमान यांना त्या बुटीची ओळख नसल्याने त्यांनी तो पूर्ण डोंगरच उचलून आणला होता. प्रतिष्ठित आयआयटी खडकपूर आपल्या पदवीपूर्व पाठ्यक्रमामध्ये वास्तूशास्त्राला सामिल करणार असल्याचे समजते. या ठिकाणी एक वास्तुशास्त्र केंद्रही आहे जे लोकांना वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी आपल्या घरासमोर भगवान गणेश आणि हनुमानाची मूर्ती लावण्याचा सल्ला देते. हे नीतिनियम संघ प्रशिक्षित भाजपा नेत्यांची वैज्ञानिक समज किती प्रगल्भ आहे, ह्याचे दर्शन घडविते. काही वर्षापूर्वी आपल्य प्रधानमंत्र्यांनी मुंबईमध्ये एका आधुनिक रूग्णालयाच्या उद्‌घाटनाच्या वेळेस बोलतांना श्रोत्यांना या गोष्टीची आठवण करून दिली होती की प्राचीन भारतामध्ये विज्ञानाने किती जबरदस्त प्रगती केली होती. ते म्हणाले होते की, एक काळ असा होता की, चिकित्सा विज्ञानामध्ये आपल्या पूर्वजांनी अशी प्रगती केली होती की ज्यावर आम्हाला गर्व करता येईल. आपण सगळयांनी महाभारतातील कर्नाबद्दल वाचलेलेच आहे. महाभारतात हे म्हटले आहे की, कर्ण आपल्या आईच्या गर्भातून जन्मले नाही याचाच अर्थ त्या काळात अनुवांशिक विज्ञान अस्तित्वात होते. तेव्हा तर कर्ण आपल्या आईच्या गर्भाच्या बाहेर जन्मू शकले. आपण सर्व भगवान गणेशाचे पूजा करतो. त्या काळात एखादा प्लास्टिक सर्जन असेल ज्याने की हत्तीच्या डोक्याला मनुष्याच्या शरिरावर यशस्वीपणे प्रत्यारोपित केले.’ या काल्पनिक आणि हास्यास्पद गोष्टी हळूहळू शालेय अभ्यासक्रमामध्येही जागा मिळवत आहेत. हे मुख्यतः भाजप शासित राज्यात होत आहे. दिनानाथ बत्रा नामक एक सभ्य ग्रहस्थ आहेत ज्यांचे एक पुस्तक आहे ज्याचे नाव तेजोमय भारत आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना सांगते की, ’अमेरिका स्टेमसेल मध्ये शोध लावण्याचा दावा करतो परंतु, सत्य हे आहे की, डॉ. बालकृष्ण गणपत मातापूरकर यांनी अगोदरच शरीराच्या अवयवांचा निर्माण करण्याचे विधीवत पेटेंट करून घेतलेले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटत असेल की हा शोध नवीन नव्हता. डॉ. मातापूरकर यांना महाभारतातून प्रेरणा मिळाली होती. कुंतीला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र अशाच विधीने प्राप्त झाला होता. जेव्हा गांधारीचे गर्भपात झाले आणि त्यातून एक मांसाचा गोळा निघाला तेव्हा द्वैपायन व्यास ऋषिंना बोलाविण्यात आले. त्यांनी त्या मांसाच्या गोळयाला लक्षपूर्वक पाहिले आणि मग त्यात काही विशिष्ट अशा औषधी मिसळल्या आणि थंड पाण्याच्या एका टाकीमध्ये तो मांसाचा गोळा ठेवून दिला. नंतर त्यांनी त्या मांसाच्या गोळयाचे शंभर तुकडे केले आणि त्या तुकड्यांना दोन वर्षापर्यंत तुपाने भरलेल्या शंभर वेगवेगळया टाक्यांमध्ये ठेवले. याच तुकड्यांपासून दोन वर्षानंतर शंभर कौरव जन्माला आले. हे वाचल्यानंतर डॉ.मातापूरकर यांना असा आभास झाला की स्टेमसेल त्यांचा शोध नाही. स्टेमसेलचा शोध तर भारतात हजारो वर्षापूर्वी लागलेला होता. (संदर्भ : तेजोमय भारत पान क्र. 92-93). याचप्रमाणे पौराणिक कथांना वैज्ञानिक सत्य म्हणून दाखविले जात आहे. पौराणिक कथा ऐकण्याला आणि वाचण्याला दिलखेचक असू शकतात. परंतु त्या सगळया कपोलकल्पीत आहेत, यात कुठलाच संशय नाही. त्यांना खरे मानने वैज्ञानिक दृष्टीकोण आणि विज्ञानाच्या आत्म्याच्या विरूद्ध आहे. याचप्रमाणे असेही म्हटले जाते की, भारतात प्राचीन काळात टेलीवीजन होता. कारण की संजयने कुरूक्षेत्रापासून कित्येक मैल दूर बसलेल्या व्यास ऋषींना महाभारताच्या युद्धाचे विवरण ऐकविले होते. हे ही म्हटले जाते की, श्रीराम यांनी पुष्पक विमानातून यात्रा केली होती. म्हणजेच प्राचीन भारतात वैमानिक की विज्ञान सुद्धा अस्तित्वात होते. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, विमानाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अनेक वैज्ञानिक सिद्धांतांची आणि उपकरणांची मदत घ्यावी लागते. अशा सिद्धांतांचा आणि उपकरणांचा विकास 18 व्या शतकानंतरच सुरू झाला. यात कुठलीच शंका नाही की प्राचीन भारताने सुश्रूत, चरक आणि आर्यभट्टाच्या रूपाने उत्कृष्ट असे वैज्ञानिक जगाला दिले. परंतु, हे मानने की हजारों वर्षापूर्वी भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य प्राप्त केले होते. स्वतःला महिमामंडित करण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे. स्वातंत्र्यता संग्रामाच्या चिंतकांनी वैज्ञानिक समज आणि दृष्टीकोनाच्या वाढीवर भरपूर जोर दिला होता. आणि याच कारणामुळे वैज्ञानिक समज वृद्धींगत करण्याला आपल्या घटनेमध्ये सुद्धा स्थान मिळालेले आहे. दूसरीकडे मुस्लिम राष्ट्रवादी आणि हिंदू राष्ट्रवादी इतिहासाला आपापल्या धर्माच्या राजांच्या माध्यमातून महिमांडीत करून त्यांचा उपकरणासारखा उपयोग करीत आहेत. दोघांना वाटते की, त्यांच्या धार्मिक ग्रंथामध्ये जे काही लिहले आहे तेच अंतिम सत्य आहे. आज भारतात हिंदू राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहेत. ते मागील सात दशकातील भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची खिल्ली उडवित आहेत आणि आस्थेवर आधारित कपोलकल्पीत कथांना ज्ञान आणि विज्ञानाचा दर्जा देत आहेत. हे एक प्रतिगामी पाऊल आहे. या प्रवृत्तींच्या विरोधात 9 ऑगस्ट 2017 रोजी वैज्ञानिकांनी आणि तार्किकवाद्यांनी रस्त्यावर उतरून जबरदस्त विरोध प्रदर्शन केलेले आहे. त्यांची मागणी अशी होती की ह्या छद्‌म वैज्ञानिकांना शोध आणि वैज्ञानिक शिक्षणाचा भाग बनविता येणार नाही. अनेक राज्यांमध्ये प्रदर्शन करून लोकांनी ही मागणी केली की, विज्ञान आणि शिक्षणाच्या वाढीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद वाढविली जावी. विज्ञान आणि छद्‌म विज्ञान यांच्यातील अंतर स्पष्ट आहे. विज्ञान प्रश्न विचारण्याला आणि चिकित्सेला प्रोत्साहन देतो. या उलट छद्‌म विज्ञान फक्त श्रद्धेच्याच गोष्टी करतो आणि विरोधाला दाबण्याचा प्रयत्न करतो. भारतात वैज्ञानिक समजूत वाढावी, यासाठी मागील काही दशकांपासून जोरदार प्रयत्न झालेले आहेत. मात्र वर्तमान सरकार त्या प्रयत्नांना मातीमोल ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हिंदीतून अनुवाद: बशीर शेख आणि एम.आय.शेख

तुम्हारी तहेजीब अपनेही खंजर से आप खुदकुशी करेगी, जो शाख़-ए-नाज़ूक पे आशियाँ बनेगा नापायेदार होगा
-एम.आय.शेख
पाश्चिमात्य पुरूष फार हुशार असतात पण तेवढेच स्वार्थी असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी वाईट गोष्टींनाही चांगले म्हणून जगासमोर मांडण्यात त्यांचा हतखंडा असतो. उदाहरणार्थ वेश्येला पोर्नस्टार म्हणून महिमा मंडित करून ती करत असलेल्या वाईट कृत्याच्या घृणेची तीव्रता समाजातून कमी करण्यात त्यांना कमालीचे यश आलेले आहे.
त्याचा परिणाम असा झालेला आहे कि, आज युरोप आणि अमेरिकेमध्ये विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलीसुद्धा स्वतःचा खर्च भागविण्यासाठी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे निःसंकोचपणे कबूल करतात.
    अल्लाहने पुरूषामध्ये स्वतःचा एक गुण ठेवलेला आहे तो म्हणजे शिर्क विषयी घृणा. ज्याप्रमाणे अल्लाह स्वतःच्या कोणत्याही प्रकारचा शिर्क (भागीदारी) सहन करत नाही. त्याचप्रमाणे त्याने पुरूष/नराच्या मनामध्ये आपल्या स्त्री (पत्नी)/मादी विषयी एकाधिकाराची भावना टाकलेली आहे. एखादा दुसरा पुरूष/नर आपल्या पत्नी//मादीकडे लैंगीक नजरेने पहात असेल तर ती गोष्ट तो कदापी सहन करू शकत नाही. पृथ्वीचा इतिहास साक्षी आहे की याच एका कारणावरून अनेक पुरूष/नरांनी एकमेकांचे मुडदे पाडलेले आहेत. मात्र पाश्चिमात्य पुरूषाने ही भावना गमावलेली आहे. मुक्त लैंगिक संबंधांना सामाजिक मान्यता मिळाल्याने अनेक पुरूषांना त्यांच्या पत्नीचे दुसऱ्या पुरूषाबरोबर संबंध असल्याचे माहिती असूनसुद्धा ते त्याकडे डोळेझाक करतात. कारण त्यांचेही अनेक महिलांबरोबर संबंध असतात. 
मुलांचा जन्म आणि संवर्धन यामध्ये होणारा त्रास सुसह्य व्हावा यासाठी अल्लाहने लैंगिक संबंधामध्ये अवर्णनीय असा आनंद ठेवलेला आहे. मात्र कुटुंब नियोजनाच्या गोंडस नावाखाली या लोकांनी स्त्रीला तिच्या पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या अधिकारापासून वंचित करून लैंगिक संबंधांना मनोरंजनाचा दर्जा दिलेला आहे. मनोरंजन एक अशी गोष्ट आहे की, त्यात प्रत्येक वेळेस नाविण्याची अपेक्षा केली जाते. म्हणून आपल्या लैंगिक संबंधामध्ये नाविन्य आणण्यासाठी हे लोक अनेक किळसवाणे प्रयोग करीत असतात. स्त्रीच्या शरिराची रचना पुरूषासाठी आणि पुरूषाच्या शरिराची रचना स्त्रीसाठी एकमेकांना लैंगिक संबंधांपर्यंत घेवून जाण्यासाठी पर्याप्त असते. त्यात पुन्हा सुंदर निसर्ग, शुद्ध आणि थंड वारे, खळखळून वाहणारे झरे, आकर्षक फुले, मनमोहक सुगंध, नदीचे विस्तीर्ण पात्र, नीळया शार पाण्याचे समुद्रकिनारे हिरवीगार धरती, शुभ्र बर्फ वृष्टी, रिमझिम पाऊस, प्रसन्न सकाळ, मादक संध्याकाळ, सुंदर वस्त्रे या सगळया गोष्टीतून अल्लाहने स्त्री-पुरूषांच्या लैंगिक संबंधाना नैसर्गिकरित्या फुलविण्याची यथोचित व्यवस्था करून ठेवलेली आहे.
मात्र लैंगिक संबंधाचे जेव्हा मनोरंजनात रूपांतर झाले तेव्हा या सगळया गोष्टी कमी पडू लागल्या. अशा परिस्थितीत लैंगिक संबंधामध्ये उत्कटता आणण्यासाठी सीगारेट, बीअर, दारू, ड्रग्स, उन्मादक औषधी, अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देणारे साहित्य व टी.व्ही. सिरीयल्स आणि चित्रपटांची निर्मिती झाली. नशा आणि मुक्त लैंगिक संबंध यांच्या संयोगातून जो समाज निर्माण झाला तो मोठ्या प्रमाणावर अनैतिक झाला. त्या समाजात राहणारे स्त्री-पुरूष वरून जरी छान आणि सुखवस्तू वाटत असले तरी आतून हे सगळे लोक पिसाळले गेले. त्यांचे चित्त अस्थीर झाले. या अस्थिरतेतूनच मग कनिटक्ट, वर्जीनिया, लॉस वेगास सारखे हत्याकांड घडत गेले व भविष्यातही घडतील यात शंका नाही. या लोकांनी आपल्या ऐहिक समाधानासाठी, स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या एवढी रूंद करून ठेवली आहे की, त्यातून स्त्री-पुरूषांना सहज एकरूप होता येते. स्त्री-पुरूष लैंगिक संबंधांमधे उत्कटता आणण्याचे एक साधन संगीतही आहे. म्हणून पाश्चिमात्य देशामध्ये संगीताने आपल्या उत्कर्षाच्या साऱ्या सीमा ओलांडून विकृतीमध्ये प्रवेश केलेला आहे. अशाच एका संगीत रजनीचा कार्यक्रम अमेरिकेच्या लॉस वेगास शहरामध्ये मँडले बे हॉटेलच्या प्रांगणात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेला होता. त्यात 15 ते 50 वयोगटातील एकंदरित 22 हजार लोक सामील झालेले होते. संगीताच्या ठेक्यावर बेभानपणे नाचणाऱ्या या लोकांच्या गर्दीमध्ये अचानक पावसासारखा गोळयांचा वर्षाव झाला आणि 59 लोक ठार तर 527 जखमी झाले. मँडले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरील आपल्या खोलीतून स्टीफन पैडॅक या व्यक्तीने हा अंधाधूंद गोळीबार केला होता. पोलीस जेव्हा त्याच्या खोलीत पोहोचले तेव्हा 19 स्वयंचलित रायफलीच्या गराड्यात स्टीफन मृत अवस्थेत मिळून आला. गोळया संपन्याआधी त्याने एक गोळी स्वतःसाठीही राखून ठेवली होती.

स्टीफन पैडॅक
स्टीफन पैडॅकचा जन्म 9 एप्रिल 1953 रोजी झाला. तो एक सेवानिवृत्त सांख्यिकी अधिकारी व मोठा जुगारी होता. त्याच्या मालकीचे अनेक फ्लॅट होते. ज्याच्या येणाऱ्या भाड्यावर तो आपली उपजीविका चालवित होता. त्याचे स्वतःचे राहते घर अतिशय सुंदर असे होते. त्याने दोन लग्ने केली होती. परंतु एकही मुलगा अथवा मुलगी होणार नाही, याची दक्षता घेतली होती. घटनेच्या वेळेस तो तिसऱ्या एका मारिलोऊ डैनली नावाच्या महिलेबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होता. त्याच्याकडे बंदुकीचे लायसन्स होते. तो परवानाधारक वैमानिक सुद्धा होता. तो एक मितभाषी व्यक्ती होता. त्याला व्हीडीओ गेम्स आणि पोकर खेळणे आवडत होते. त्याला पर्यटनाचाही छंद होता. तो आपल्या आईसाठी स्वतःच्या हाताने तयार केेलेल्या कुकीज (बिस्कीटे) पाठवित होता. तो कुठल्याही दृष्टीकोनातून मनोरूग्ण वाटत नव्हता. लॉस वेगासचे शेरीफ (पोलीस प्रमुख) जोसेफ लोम्बार्डो यांनी पैडॅक संबंधी सांगितले की, ’’ माझ्या अजून लक्षात येत नाही की हा माणूस एकाएकी असा कसा वागला?’’ एफबीआयने चौकशीअंती घोषित केले की त्याचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नव्हते. अमेरिकेचे लॉस वेगास शहर विलासी आणि जुगारी मनोवृत्तीच्या लोकांच्या पसंतीचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. जगभरातून जुगारी, कबाबी प्रवृत्तीचे लोक लाखोंच्या संख्येने या शहरात ’एन्जॉय’ करण्यासाठी येतात. याचीच एक मिनी आवृत्ती दुबईमध्येही आकारास आलेली आहे.

इतर महत्वाच्या गोळीबाराच्या घटना
    लॉस वेगास गोळीबाराची ही ताजी घटना अपवाद म्हणून सोडून देता येण्यासारखी नाही. कारण यापूर्वीही ऑक्टोबर 1991 मध्ये अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील किलीन गावातील एका हॉटेलमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने ज्याचे नाव जॉन हेनार्ड होते त्याने गर्दीमध्ये ट्रक घुसवून 23 लोकांना ठार केले होते व स्वतःही आत्महत्या केली होती. 20 एप्रिल 1999 मधे कोलोरॅडोच्या कोलंबायीन विद्यालयामध्ये 2 विद्यार्थ्यांनी केलेल्या अंदाधूंद गोळीबारामध्ये 13 लोक ठार झाले होते. यात गोळीबार करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली होती. 16 एप्रिल 2007 मध्ये अमेरिकेच्या वर्जीनिया विद्यापीठामध्ये झालेल्या गोळीबारात 32 लोक ठार झाले होते. 3 एप्रिल 2009 मध्ये न्यूयॉर्कच्या बिंघमटन मधील सीविक इमीग्रेशन सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात 13 लोक ठार झाले होते. 14 डिसेंबर 2012 रोजी अमेरिकेच्याच कनेक्टिकटच्या विद्यालयामध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 27 लोक ठार झाले होते. 2 डिसेंबर 2015 साली कॅलीफोर्निया राज्याच्या इनलँड रिजनल सेंटरवर बॉम्बफेक करून 14 लोकांना ठार करण्यात आले. होते. 12 जून 2016 रोजी फ्लोरिडा राज्याच्या ऑरलँडो गावातील एका समलैंगिक नाईट क्लबमध्ये गोळीबार करून 49 लोकांना ठार करण्यात आलेले होते.
    एकंदरित कुठल्या ना कुठल्या कारणावरून अमेरिकेमध्ये सामुहिक हत्या करण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे. या सर्व घटना माथेफिरू लोकांनी केल्या, असे सुलभीकरण करून जमनार नाही. याची सामाजिक कारणे काय आहेत? यासंबंधी चर्चा करणे अप्रस्तुत होणार नाही.

अनैतिकतेची सुरूवात कशी होते?

जैसे-जैसे जिंदगी पेचिदातर हो जाएगी
आदमी की और भी बेचारगी बढ जाएगी
    ज्या क्षणापासून माणसाच्या जीवनामध्ये अनैतिकतेचा शिरकाव होतो त्या क्षणापासून तणावाची सुरूवात होते. स्टिफन पैडॅकच्या आयुष्याची सुरूवातच अनैतिकतेतून झाली. म्हणून त्याचे जीवन शेवटपर्यंत अनैतिकतेतच व्यतीत झाले. आयुष्यात तीन बायका आल्या पण मुलबाळ होणार नाही, याची त्याने सुरूवातीपासूनच दक्षता घेतली होती. म्हणून तो मुलांमुळे माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदापासून वंचित झाला. मुलांच्या बाबतीत एक सत्य बऱ्याच लोकांना माहित नसते. ते म्हणजे कुटुंबाबरोबर फक्त मुलांचाच विकास होत नसतो तर आई वडिलांचा सुद्धा विकास होत असतो. मुलं जस-जशी मोठी होत जातात, तस-तसे आई-वडिलही प्रबुद्ध होत जातात. म्हणूनच ज्या कुटुंबात मुलं होत नाहीत ते कायम निराशेच्या छायेमध्ये जगतात अमेरिकेमध्ये तर चैनीचे जीवन जगण्यासाठी जाणून बुजून मुलं जन्माला घातली जात नाहीत. अशामुळे माणसांचे जीवन निरूद्देश होवून जाते. त्यांच्या आयुष्यात फक्त तीन गोष्टी उरतात. एक मनोरंजन, दोन मनोरंजन आणि तीन मनोरंजन. परंतु मनोरंजनाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा विकृती निर्माण होते. म्हणूनच मनोरंजन क्षेत्रातील बहुतेक लोक अगदी तरूण वयात डिप्रेशनमध्ये जगत असतात किंवा आत्महत्या तरी करत असतात. अनैतिकतेतून तणाव, तणावातून विकृती आणि विकृतीतून अपराध या दुष्टचक्रातून लॉस वेगाससारख्या घटना घडतात. स्टीफनच्या जीवनामध्ये जे घडायला पाहिजे होते ते घडले असते तर कदाचित त्याचा विकास संतुलित झाला असता व त्याच्यामध्ये 59 तरूण लोकांना ठार मारण्याची विकृती निर्माण झाली नसती.

शरिर व आत्म्याचा संतुलित विकास
    अल्लाहने माणसाची निर्मिती शरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून केलेली आहे. ज्याप्रमाणे शरिराला पोषणाची गरज असते, त्याप्रमाणे आत्म्यालाही पोषणाची गरज असते. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याचप्रमाणे आत्मासुद्धा आजारी पडतो. लॉस वेगाससारख्या घटना आजारी आत्म्याच्या लोकांच्या हातून घडत असतात. शरिराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे अण्णाची गरज असते त्याचप्रमाणे आत्म्याच्या पोषणासाठी इबादती (प्रार्थना) ची गरज असते. ज्याप्रमाणे अन्नातून पोषक द्रव्य न मिळाल्यास शरीर आजारी पडते त्याचप्रमाणे इबादतीतून पोषक द्रव्य न मिळाल्यास आत्मा आजारी पडतो. जगातील सर्व धर्मामध्ये शरीर आणि आत्म्याच्या संकल्पनेला मान्यता दिलेली आहे. मात्र या दोहोंचा संतुलित विकास फक्त इस्लामी व्यवस्थेमधूनच शक्य आहे. इतर व्यवस्थांमध्ये शरीराच्या विकासावर जास्त लक्ष दिलेले आहे. पश्चिमी व्यवस्थेमध्ये फक्त शरीराच्याच विकासाकडे लक्ष दिलेले आहे हे ठळकपणे जाणवते. म्हणून त्या व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांचे आत्मे आजारी आहेत. फरक फक्त एवढाच आहे कोणी कमी आजारी आहे कोणी जास्त आजारी आहे. मुस्लिमांमध्येसुद्धा आजारी आत्म्यांची संख्या कमी नाही. जे मुस्लिम इस्लामी इबादतींचा अव्हेर करतात ते आत्मीक आजाराला निमंत्रण देतात. आत्म्याचा आजार जेव्हा बळावतो तेव्हा हत्या, आत्महत्या, सामुहिक हत्या, बलात्कार, आतंकवाद, बेछूट गोळीबार सारख्या घटना होत असतात. स्टीफन पैडॅकला अमेरिकी मीडियाने आतंकवादी न म्हणता माथेफिरू म्हंटलेले आहे. मात्र आतंकवाद्याला माथेफिरू म्हटल्याने काहीच फरक पडत नाही. अशा लोकांनी केलेल्या हिंसा कुठल्याही आतंकवाद्याने केलेल्या हिंसेपेक्षा कमी त्रासदायक नसतात. म्हणून जगातून हिंसेचा नायनाट करावयाचा असेल तर शरीर व आत्म्याचा संतुलित विकास साधावयास हवा. तो साधण्यासाठी, कुटूंब व्यवस्था सदृढ करण्यासाठी, नैतिक जीवनाचा आनंद लुटण्यासाठी, लैंगिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी इस्लामी व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. देअर इज नो वे बट इस्लाम.
    जसे पाणी उकळू लागल्यावर गॅस कमी करून उपयोग होत नाही तसेच समस्या उग्र बनल्यानंतर उपाय करून उपयोग होत नाही. पाश्चिमात्य देशांकडून हीच चूक झालेली आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या समस्या उग्र करून घेतलेल्या आहेत. बायबलने त्यांना दारू पिण्याची, ड्रग्स घेण्याची, व्याज खाण्याची, व्याभिचार करण्याची, जुगार खेळण्याची व इतर काळे धंदे करण्याची परवानगी दिलेली नाही. या लोकांनी बायबलच्या शिकवणीच्या विरोधात जावून हे सर्व आपल्या मर्जीने केलेले आहे व त्याचीच ते शिक्षा भोगत आहेत. लॉस वेगासची घटना त्यांच्या या विकृतीचाच आविष्कार आहे. म्हणून धर्माला दोष देवून उपयोग नाही. तुम्हाला, आम्हाला आणि सर्वांना सुखाने जगायचे असेल तर ही अनैतिक व्यवस्था उलथून नैतिक व्यवस्था लागू करावी लागेल. सुदैवाने याची सुरूवात युरोप आणि अमेरिकेमध्ये झालेली आहे. रोज दोन चार लोक इस्लाम धर्माचा स्विकार करीत आहेत.
    9/11 च्या घटनेनंतर अमेरिकेमध्ये दरवर्षी 20 हजार अमेरिकन नागरिक इस्लाम धर्माचा स्विकार करीत आहेत. ज्यांना या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी यू ट्युबवर जावून इस्लाम इन युरोप एवढे टाईप केले तरी किती इस्लाम प्रवेशाच्या क्लिप्स येतात हे त्यांनीच स्वतःच्या डोळयांनी पहावे. प्रश्न इस्लाम स्विकारण्याचा नाही, नैतिक जीवन जगण्याचा आहे. पृथ्वीचा इतिहास साक्षी आहे की, इस्लाम एक आधुनिक सुरक्षित, नैतिक जीवन व्यवस्था आहे.

 परळ - एल्फिंस्टन रेल्वे स्थानकावील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा प्राण गेल्यानंतर रेल्वेच्या बाबतीत सरकारची प्राथमिकता काय असावी? या संबंधी मोठ्‌या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. बुलेट ट्रेन देशाच्या विकासाचे प्रतिक असू शकेल मात्र सुरक्षेचे मुल्य मोजून विकासाचे प्रतिक उभे करणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न समाज माध्यमातून  सरकारला विचारला जात आहे. या घटनेनंतर अनेक संस्था, राजकीय पक्षांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शविलेला आहे.
मुंबई एक असे शहर आहे ज्या शहरात दररोज हजारो लोक आपल्या डोळयात विकासाचे स्वप्न घेवून येत असतात. हा सिलसिला गेल्या अनेेक वर्षांपासून चालू आहे. मुंबईनेही या आगंतुक पाहुण्यांचा कधी अव्हेर केला नाही. दोन्ही हात पसरून मुंबईने या येणाऱ्या लोकांचे स्वागत केलेले आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नांना नुसतेच पंख दिले असे नाही तर त्या पंखांना एवढे बळही दिले आहे की ते उत्तूंग भरारी मारू शकलेले आहेत. अनेक कफल्लक लोक मुंबईत येवून गर्भश्रीमंत झालेले आहेत. रेल्वे फलाटावर झोपणारे मोठमोठ्या टोलेजंग इमारतीमध्ये राहत आहेत.
 त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या हजारो लोकांचे ओझे पेलण्यात अलिकडे हे शहर कमी पडत आहे. मुंबईची जनसंख्या इतकी वाढलेली आहे की, ती स्वतःच एक समस्या होवून बसलेली आहे. मुंबईची जीवन वाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन आज मुंबईकरांसाठी मृत्यू वाहिनी होऊन राहिली आहे. रोज चार दोन लटकलेले लोक या लोकलच्या रूळाखाली येवून मरत आहेत. सप्टेबरच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी मुंबई शहरामध्ये ट्रेन मधून पडून मरणाऱ्यांची संख्या 12 होती. अजून डिसेंबर यायचाच आहे मात्र आत्तापर्यंत लोकलमध्ये पडून मरणाऱ्यांची संख्या चारशे पेक्षा जास्त झालेली आहे. या संख्येवरून लोकल ट्रेन किती धोकादायक झालेली आहे, याचा अंदाज यावा. एक मोठा पाऊस, एक छोटी अफवा मुंबईमध्ये लोकांचे जीवन धोक्यात घालण्यासाठी पुरेशी आहे. परेलच्या पुलावर सकाळी 10.30 वाजता एकाच वेळेस चार लोकल ट्रेन आल्या. त्यातून उतरलेले सर्व प्रवासी पुलावर आले. पुलावर अगोदरपासून असलेले प्रवासी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे पुलावरच थांबले. येथूनच रेटारेटीस सुरूवात झाली. तेवढ्यात डोक्यावर फुलाचा ताटवा घेवून निघालेल्या एका मजुराच्या ताटव्यातून फुलं गळून पडायला लागली. तेव्हा कोणीतरी ओरडलं ’फुल गिरा’ लोकांना ऐकू आलं ’पुल गिरा’ आणि एकच गलका झाला. चेंगराचेंगरी झाली आणि 23 निरपराध लोक कायमची मुंबई सोडून निघून गेले. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करण्याच्या बाबतीत हा जागतिक उच्चांक आहे. एवढया मोठ्या संख्येने प्रवाशांची नियमित व्यवस्था करणे कुठल्याही रेल्वे नेटवर्कला सहज शक्य नाही. प्रवाशांची ही संख्या असाधारण आहे म्हणून त्यांच्यासाठी सुरक्षेचे उपायही असाधारण असावयास हवेत. परंतु बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्यांना याची जाणीव नाही. मागच्या रेल्वे बजेटमध्ये देशातील संपूर्ण रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी 1 लाख कोटी रूपये आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्याची तर तरतूद झाली नाही उलट सव्वा लाख कोटीच्या बुलेट ट्रेनची घोषणा मात्र झाली. मुंबई शहरामध्ये लोकल ट्रेनला पर्याय नाही. ट्रॅफिक जाममुळे स्वतःचे वाहन असतांनासुद्धा बाय रोड कोणालाही प्रवास शक्य नाही. सीएसटीहून विरार, कल्याण, डोंबिवली, ठाण्याकडे जाणे म्हणजे लोकलनेच जाणे हे सुत्र ठरलेले. अशात गाड्यांची फ्रीक्वेन्सी (वारंवारिता) कमी असल्याने सकाळ आणि संध्याकाळ लोकलने प्रवास करणे दिवसेंदिवस जीव घेणे ठरत आहे. केवळ लोकसंख्या एखाद्या शहराचा प्रश्न असू शकतो याची मुंबई शहराकडे पाहिल्यावरच खात्री पटते. लोकलमध्ये नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तयार झालेल्या माफिया सदृश्य टोळया सुद्धा एक डोकेदुखी आहेत. अशा टोळया नवीन प्रवाशांना डब्यात घुसूच देत नाहीत. कोणी घुसायचा प्रयत्न केल्यास हाणामारी केली जाते. गर्दीमुळे लोकलमध्ये चढणे आणि इच्छीत स्टेशनवर उतरणे या दोन्ही गोष्टी अतिशय जोखीमेच्या असतात. प्लेटफॉर्म आणि डब्यामधील अंतर जास्त असल्यामुळे अनेक लोक चढतांना किंवा उतरतांना त्या गॅपमध्ये पडून मरण पावलेले अथवा कायम जायबंदी झालेले आहेत. नवीन माणसाला तर एकदा प्रवास केल्यानंतर दुसऱ्यांदा लोकलमध्ये प्रवास करण्याची हिम्मत होत नाही. त्यापेक्षा मुंबई नको अशी तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते. सर्व कामे बाजूला ठेवून मुंबईच्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, स्टेशनचे आधुनिकीकरण करणे, प्लेटफॉर्मचा विस्तार करणे, रेल्वे पुलांचे रूंदीकरण करणे हे काम सरकारने प्राधान्य देवून करणे गरजेचे आहे.
देशात रोज कुठे ना कुठे रेल्वे रूळावरून घसरत आहे. छोटे-मोठे अपघात होत आहेत. रेल्वे प्रवास पूर्वीसारखा सुरक्षित राहिलेला नाही म्हणून देशभरातील रेल्वेचे आधुनिकीकरण व सुरक्षेचे उपाय ही केंद्र सरकारची प्राथमिकता असायला हवी. त्यानंतर आर्थिक कुव्वत असेल तर बुलेट ट्रेनचा विचार करावयास हरकत नाही. परंतु मुलभूत सुविधा नसतांना बुलेट ट्रेनवर खर्च करणे ही आपल्या देशाला परवडण्यासारखी चैन नाही. शिवाय मुंबई - अहेमदाबाद हे अंतर फक्त 550 किलोमीटर आहे व हे अंतर विमानाने फक्त 40 मिनीटात कापले जाते. या मार्गावर विमानांची संख्या सुद्धा भरपूर आहे. विमानाचे भाडे सुद्धा चार हजाराच्या आसपास आहे. असे असतांना एवढेच दर बुलेट ट्रेनला देवून 40 मिनीटाच्या प्रवासासाठी अडीच तास देवून प्रवास कोणता शहाणा माणूस करेल? हे समजून येत नाही. म्हणून तज्ज्ञांच्या मते मुंबई-अहेमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग व्यापारीक दृष्ट्या तोट्याचा ठरू शकतो.
अपघात आणि अधःपतन परेल ब्रिजवर चेंगराचेंगरी दरम्यान काही लोक अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावले होते. तर काही लोकांनी आपल्यातील पाश्वीवृत्तीचे दर्शनही घडवित होते. बीबीसीने दिलेल्या बातमी अनुसार जेव्हा चेंगराचेंगरी सुरू झाली तेव्हा एक तरूण महिला अनेक प्रेतांच्या खाली दबलेली होती. शेवटच्या घटका मोजत होती. मदतीचा धावा करीत होती. अशा अवस्थेतही एक व्यक्ती तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. अनेक लोकांनी मृत महिलांच्या पर्स, पुरूषांच्या बॅगा, मोबाईल फोन पळवीत होते. या घृणास्पद कृत्यातून आपल्या समाजाची सामुहिक नैतिक पातळी किती खोल गेली याचा अंदाज येतो. चेंगराचेंगरीची घटना जेवढी दुःखाची आहे त्यापेक्षा जास्त दुःख या लोेकांच्या अशा अनैतिक कृत्यामुळे झालेले आहे.
केंद्राची बुलेट ट्रेनची योजना व्यवहार्य नसतांनाही केवळ एका पक्षाचे सरकार दोन्ही ठिकाणी आहे म्हणून महाराष्ट्र शासन या प्रकल्पामध्ये सामील होत आहे. प्रकल्पाची एक तृतीयांश रक्कम महाराष्ट्राला द्यावयाची आहे. बुलेट ट्रेनचा सगळा प्रवास गुजरातमधून होणार आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी या बुलेट ट्रेनची उपयोगिता फारशी नाही, हे माहित असतांनासुद्धा नाईलाजाने राज्य शासन या अव्यवहार्य प्रकल्पाला जनतेच्या करातून जमा झालेला पैसा खर्च करण्यास तयार झालेले आहे. याचा मुंबईतूनच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातून विरोध व्हावयास हवा. परंतु तो होतांना दिसत नाही.

- अ‍ॅड. मो. यूसुफ थोरात, ९९७५८९५१७८
आधुनिक युगात माणूस एकमेकांच्या जवळ येत आहे. कॉम्प्युटरने आणि इंटरनेटने त्यातभर टाकली. पृथ्वीच्या त्या टोकाचा माणूस या टोकाच्या माणसाशी बोलू लागला, त्याला पाहू लागला. विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि पुढे पुढे एकमेकांना व्यापारिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सैनिकी इत्यादी मदत होऊ लागली. देशादेशामध्ये मैत्री होऊ लागली आणि एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे येऊ लागला. शेजारी देश एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होऊ लागले आणि सर्वत्र आनंद दरवळू लागला. भारत देश याला अपवाद नाही. पण सीमावादाने, आतंकवादाने साऱ्याआनं दावर विरजन टाकले. शेजारी शेजारी देशांमध्ये संशय, द्वेष, रागयाचे वातावरण पूर्वीच्या आनंदावर मात करू लागले आहे.
चीन देश भारताच्या पूर्वेस आहे. त्याची सीमा भारताच्या पूर्वोत्त सीमेला लागू आहे. भारत त्याच्याकडून मैत्रीची अपेक्षा ठेवून असताना तो नसल्या खोडकर बालकासारखा खोडसाळपणा करीत राहतो. तरीही भारत त्याच्यासोबत व्यापारिक संबंध ठेवून चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहतो. मोठा भाऊ लहान भावाची समजूत काढीत असताना दिसतो. हे भारताचे मोठेपण आहे. कोणताही देश केवळ दारूगोळ्यांनी मोठा होत नसतो. देश मोठा होण्यासाठी त्या त्या देशातील लोकांची मनं देशासाठी मोठी पाहिजेत. भारतीयांची मनं देशासाठी मोठी आहेत म्हणून भारतात चिनी मालावर बहिष्कार टाकला जात असल्याचे दिसते. ज्या भारताच्या निर्यातीमधून मिळालेल्या पैशातून चीन दोन वेळचे जेवण जेवतो त्या चिन्यांच्या समोरील ताट ओढण्याची हिंमत भारतातील सर्वसामान्यांच्या मनात आणि मनगटात आहे, याचा विश्वास चिनीमालावरील बहिष्काराने स्पष्ट केला.
ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्याचा घाट, काश्मिरच्या उत्तरेकडील सीमावर्तीभागातून पक्क्या सडक निर्माण योजना आखून त्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणे, सिक्कीम माझा म्हणणे, नकाशांमध्ये अरुणाचलला स्वत: म्हणून ठरविणे, ...आणि आता डोकलामवर डोकं लढवत बसणे इत्यादी त्याच्या कोडकर सवर्इंना भारतीय लोक चिनीमालावरील बहिष्काराने सडेतोड उत्तर देणार आहेत... देत आहेत. ही बाब खरोखरच स्वागतार्ह आहे. एखाद्या शत्रूदेशाला केवळ बंदुकीच्याच गोळीने उत्तर देता येत नाही तर, खरेदी-विक्रीच्या माध्यमातून म्हणजे व्यापारिक संबंधातून सुद्धा उत्तर देता येते. याचे प्रॅक्टिकल भारतीयांनी करायला सुरूवात केली आहे.
भारतामध्ये चिनीमाल ज्या दारातून येतो ती दारे कायमचीच बंद व्हायला पाहिजे, पण सरकार तसे तर करीत नसेल तर, आम्ही भारतीय जनता त्या मालाला विकतच घेणार नाही. या पर्यायाचा उपयोग करणार आहोत. या बहिष्काराच्या बाणांचा वर्षाव आम जनता तर काय साधूसंत सुद्धा करू लागले आहेत. काही ठिकाणी वकीलमंडळींनी सुद्धा या बहिष्काराच्या बोहल्यावरपाय ठेवला आणि जनमत बनविणे सुरू केले आहे. बहिष्काराचे शस्त्र, राजकीय चर्चा यातून डोकलामचा प्रश्न सुटणारच असं बुद्धिवंतांना वाटू लागले आहे. पण त्यांचं मन परत परत त्या देव्हाऱ्याकडे वळते आणि चिंताग्रस्त होते आहे. ज्यामध्ये चिनी देव जाऊन बसलेला आहे. भारतातील बहुसंख्य मूर्तिपूजकांनी आपापल्या देव्हाऱ्यात त्या चिनी देवाला जागा दिली आहे. घर असो की दुकान सर्वत्र हा चिनी देव पूजनीय म्हणून भारतातील कोट्यवधी देवांना मागे टाकून हा पुढे झाला आहे.
हा चिनीदेव म्हणजे गलेलठ्ठ माणसाची बसलेली मूर्ती आहे. या मूर्तीचे पोट बाहेर निघालेले असून डोक्यावर केस नाहीत. ही अर्धनग्न मूर्ती भारतीय पेहरावातील धोतर नेसलेली आहे. कानात मोठमोठी कुंडलं आणि देवीदेवतेप्रमाणे अलंकार घातलेली दिसते. ही चीनमधून चिनीदेव म्हणून आलेली मूर्ती भारतातील मूर्तीपूजकांनी आपापल्या घरात, दुकाना, ऑफीसमध्ये पूजास्थानावर बसवून ठेवली आहे. या मूर्तीवर व तिच्या पूजनावर बहिष्कार घालून तिला भारताच्या सीमेबाहेर घालवणे हा खऱ्या अर्थाने चीनवर बहिष्कार होईल. अन्यथा आपली मानसिकता चीनची गुलामी पत्करण्याच्या योगतेचीझाली आहे असे समजा! चीन सीमावादात जरूर हारेल, पण तुमच्या मूर्तिपूजन मानसिकतेवर त्याने विजय मिळविला आहे.
इस्लाम मूतिपूजनाला विरोध करणारा धर्म आहे. मूर्तिपूजा करणे ही मानवीय विकृती असल्याचेही अनेक विद्वानांनी सांगितले, पण मूर्तिपूजक आपला मूर्तीपूजनाचा नाद सोडत नाहीत उलट देशातील धर्माच्या देवांमध्ये अजून भर म्हणून त्यांनी चिनी देव आपल्या देव्हाऱ्यात इतरदेवांसमवेत बसविला आणि मोठ्या श्रद्धेने त्याची पूजाकरणे सुरू केले आहे. आज चिनी मालावर बहिष्कार टाकणाऱ्यांनी या गोष्टीवर विचार करणे गरजेचे आहे.
कोणताही देश तोपर्यंत स्वतंत्र होत नाही जोपर्यंत त्याची मानसिकता बदलत नाही. भारत एक स्वतंत्र देश आहे, पण मानसिकता इंग्रजांच्या गुलामीची आहे. देशाला ‘आपला देश’ म्हणण्याची बोलीभाषा आहे जरूर, पण वागणूक मात्र साताऱ्याला लुटण्याचीच. बोफोर्सपासून बैतुलमालापर्यंत सारा भ्रष्टाचार. आता देशी माल वापरावा याकरिता स्वदेशी चळवळ चालविल्या गेल्याचे आपण पाहिले आहे, पण पाहतापाहता स्वदेशी चळवळ भ्रष्टाचाऱ्यांच्या वाळवीने खाऊन टाकली. आजकाल काय झालं, माणसं विकली जातात. मीच मोर्चा काढतो, मागणी करतो. तुम्हाला जगवतो आणि ज्याला विरोध करतो त्यालाच मोर्चेकरी विकतो. पाकीट घेतो आणि आंदोलन बंद पाडतो. शेतकऱ्यांचे मोर्चे, मराठा आरक्षणाचे मोर्चे याचे उदाहरण होऊ शकतात. अशी चर्चा ऐकिवास आल्यानंतर दु:ख वाटते. असेच चिनी मालाचेही होईल की काय याची भीती वाटते. ‘चिनी देव आणि भारताचा देव्हारा’ हे समीकरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण चीनवर विजय मिळवू शकत नाही, मग या चीनीमालाच्या बहिष्कार आंदोलनात साधूसंत उतरो की वकील... रिझल्ट मात्र निल!
चिनीदेव भारतात आला तरी कसा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी आपण मूर्तिपूजेची उत्पत्ती कशी झाली यावर विचार करू या. मूर्तिपूजा करणारे मुळात सत्य नाकारणारी मानसिकता जोपासणारे लोक असतात. सत्याला नाकारणे म्हणजे असत्याला सत्य म्हणून स्वीकारणे होय. असत्याला सत्य समजूुन स्वीकारणारी मानसिकता मूर्तिपूजेचे उगमस्थान आहे. त्याशिवाय भयातूनही मूर्तिपूजेचा उगम असल्याचे दिसते.म्हणजेच असत्याला सत्य समजून स्वीकारणारी भ्याड मानसिकता मूर्तिपूजेचे उगमस्थान आहेहे स्पष्टहोते. भारतीयांची हीच मानसिकता ओळखून चीनचा देव नेपाळमार्गे भारतात घुसला आणि मूर्तिपूजकांच्या देव्हाऱ्यात जाऊन बसला. नव्हे! घुसविला गेला. मग याला भारतात घुसविण्याचे काय कारण असेल बरे,... तर याचेकारण असे की कोणत्याही देशाला आपल्या अधीन कसे करता येईल याचा विचार शत्रूदेश करीत असतो. भारतीयांची मानसिकता दैववादी आहे आणि मूर्तिपूजा हा त्याचाच एक महत्वपूर्ण भाग आहे. चीनचा देव पुजता पुजता भारतीयांची मानसिकता चीनची गुलामी पत्करण्यास अनुवूâल होऊन भविष्यात भारतावर मानसिक गुलामी लादण्यास सोपे जाईल हा प्रयत्न चीनचा आहे.
धर्माची पकड त्या त्या धर्मातील लोकांवर राहावी यासाठी मूर्तिपूजक धर्मांमध्ये देवांच्या पुजण्याचे प्रथा रूढ आहे. बुद्धानंतर बुद्धाची मूर्ती बनवून त्याची पूजा करणे, जैनाचेही तसेच आणि येशूचेही तसेच. वास्तविक मी देव आहे अथवा माझे मृत्यूनंतर माझी पूजा करावी असे कोणीही म्हटले नाही. बुद्ध तरक भौतिकवादी होते, पूजेला तेथे स्थान नाही. पण तरीही धर्माची पकड आपल्यामार्पâत त्या त्या धर्माच्या लोकांवर राहावी याकरिता धर्ममार्तंडांनी मूर्तिपूजेला प्रोत्साहन दिले. यातूनही मूर्तिपूजेचा उगम झाला असे दिसते. इस्लाम याला अपवाद आहे. मुसलमानांच्या घरात देव्हारा नाही. मस्जिदमध्ये मूर्ती नाही.
इंग्रजांनी भारतावर अडीचशे वर्षे राज्य केले. जमीन जिंकण्यासाठी बंदुका वापरल्या, युद्धे केलीत आणि मानसिक गुलामी लादण्याकरिता धर्मप्रचारक आणलेत. आज इंग्रज गेलेत, भारत स्वतंत्र झाला पण भारतातील ‘ती’ मानसिक गुलामी कायम आहे. इस्लामबाबत तसे नाही. भारतातील केरळचा हिंदू राजा चेरामन पेरुमल अरबस्थानात गेला. त्याला इस्लाम पटला म्हणून त्याने इस्लाम कबूल केला. त्याच्या अनुयायांना सुद्धा इस्लाम पटला म्हणून त्यांनी स्वत: इस्लाम भारतात आणला. कोण्या अरब माणसाने इस्लाम भारतात आणला नाही अथवा भारतीयांवर लादला नाही. भारतातील पहिली मस्जिद केरळमध्ये आहे. तिचे नाव चेरामन पेरुमल मस्जिद असे आहे.
आजसुद्धा ज्यांना इस्लाम पटतो तो इस्लाम कबूल करतो. मुस्लिम बनतो. धर्मांतरामध्ये इतर धर्मांतून इस्लाममध्ये दाखल होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. येथे मानसिक गुलामी नाही. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. एकता आहे. समता आहे. भारताला गिळण्याचे स्वप्न नाही, उलट भारताला चुकीच्या मानसिकतेतून काढण्याचा - वाचविण्याचा प्रयत्न आहे. इस्लाम शुद्ध लोकशाहीचा स्वीकार करणारा धर्म आहे. भारतीयांचा धर्म आहे, कारण भारतातील अनेक आध्यात्मिक ग्रंथ ऋग्वेद, कल्किपुराण, अध्यात्मपुराण, बौद्धस्कंद इत्यादी धर्मग्रंथांनी पैगंबर मुहम्मद (स.) विषयी त्यांचे जन्माचे दोन हजार वर्षापूर्वी माहिती दिली आहे.
चीनचे मात्र तसे नाही त्याने भारताला आपल्या कचाट्यात करकच्च पकडून ठेवण्यासाठी, नव्हे! गिळंकृत करण्यासाठीच भारताच्य देव्हाऱ्यात चीनचा देव घुसविला आहे. चीनची आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी सर्व गुलामी भारतीयांवर लादून त्यांच्यावर राज्या करायचे आहे. येथे साम्यवाद उभारावयाचा आहे. लोकशाही नष्ट करायची आहे. भांडवलवादाचा शत्रू म्हणून भारतीयांना पुढे करायेच आहे. त्याला धर्मप्रचार तर मुळीच करायचा नाही तर चीनव्रती मानसिक गुलाम तयार करावयाचे आहेत. डोकलाम हा मुद्दा भारतीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेले कृत्य आहे. भारतीयांचे लक्ष भारतातील चीनच्या इतर हालचालींपासून विचलीत करून सीमेवर आणून ठेवण्यासाठी रचलेला डाव आहे. भारतात माक्र्सवादी, लेनिनवादी, नक्षलवादी चळवळींकडून भारतीयांचे लक्ष विचलीत करणे सामान्य जनतेची मूर्तिपूजक मानसिकता पाहून मूर्तिपूजेत गुंतवून ठेवणे आणि अजगराने हळूहळू आपली शिकार गिळंकृत करावी तसे भारताला गिळंकृत करावे असा मनसुबा आहे.
इस्लाम अशा कृत्यांचा निश्चित धिक्कार करतो. आणि शुद्ध लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतो. जगात बावन्न मुस्लिम देश आहेत. तेथे पंचावन्न टक्क्यांच्या वर केवळ मुस्लिम आहेत. तेथील प्रत्येक मुस्लिमाला आपापल्या देशाप्रती प्रेम आहे. भारतातील मुस्लिमसुद्धा भारतावर प्रेम करतात अन्यथा ते केव्हाचेच पाकिस्तानमध्ये स्थानांतरित झाले असते, कारण तशी वेळ आली होती. सिंध व पंजाबमधील मुस्लिमेतरांना देशप्रेम नव्हते म्हणून ते भारतात आले या जनविचारांना येथे बळकटी मिळते आणि त्यांच्या भारतप्रेमावर प्रश्नचिन्ह जनता उभी करते, ही शोकांतिका आहे. असेच चीनचा देव भारताच्या देव्हाऱ्यात बसलेला पाहून इतरांना ते चीनप्रेमी असल्याचे वाटेल ना?
श्रद्धा मोठी की पूजन मोठे याच तुलना आगामी काळात होईल अशी आशा आहे. सत्य असत्य ओळखण्याची दृष्टी सर्वांना आपापल्या परीने लाभेल. असत्याला सोडून सत्याला स्वीकारण्याची शक्ती अल्लाह सर्वांना देईल. देवही नको अन् देव्हारेही नको असे लोक म्हणतील आणि चीनदेवाला पळता भुई थोडी होईल, तेव्हाच आपण जिंकू!

सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’द्वारे दोन कोटी तीस लाख ग्राहकांना गॅस पुरवठा करण्यात आला आलेला आहे. त्यासाठी सकार सबसिडीही ग्राहकांच्या बँकेच्या खात्यात जमा करीत आहे. या योजनेद्वारे अडीच कोटी गॅसधारक पाठीमागे एक लाख नोकऱ्या निर्मितीचीही घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु कसल्या नोकऱ्या आणि त्या किती पगाराच्या याची काही माहिती नाही.
मध्यतरीच्या काळात सरकारने सक्षम गॅसधारकांनी सबसिडीची मदत नाकारावी म्हणून आवाहनही केले होते. त्याद्वारे सरकारला एकवीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचीही माहिती जाहीर झालेली होती. परंतु नंतर कॅगच्या अहवालानुसार स्पष्ट झाले की, फक्त १७६४ कोटी रुपयांची त्याद्वारे बचत झाल्याचे आढळलेले आहे. बाकीची बचत आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्या म्हणून झालेली आहे.
पूर्वी पेट्रोल पंपावर एक रुपया जरी इंधनतेलाचा भाव वाढला तरी ग्राहकांची नाराजी उफाळून यायची, परंतु इंधन तेलाच्या भावाची रोजची चढउतार होऊ लागल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत सोळा रुपये अशी पेट्रोल पंपावर घसघशीत वाढ झाल्याची खबर बेदखल झाली.
रोजच्या अशा करामतींमुळे घरगुती गॅसची भाववाढही जनतेच्या लक्षात येत नाही, सर्वसामान्य जणांना त्यामुळे दरवाढीची लागायची धग लागत नाही.
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाधटिंगण देश उत्तर कोरियाचे अस्तित्वच आम्ही संपवून टाकू अशषी धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रक्तरंजित युद्धांचा तसेच शांतता प्रक्रियेचाही प्रदीर्घ अनुभव असलेल्या अमेरिकेसारखा देश, आपली जागतिक शांततेची व विश्वाच्या अस्तित्वाची भलीमोठी जबाबदारी विसरून, जेव्हा इतक्या खालच््या पातळीवर येऊन उद्दामपणे वागतो, तेव्हा हे सुंदर जग लवकरच समाप्त होईल, असे भाकित करण्यास हरकत नाही. कोणताही आत्मघातकी आधीच मेलेला असतो, मात्र त्याला इतकेच सिद्धकरायचे असते की मी शत्रूच्या शक्तीला व विचारधारेला घाबरत नाही, जीव देईन पण शरण जाणार नाही. इतके साधे सरळ गणित जे उत्तर कोरियाच्या आत्मघातकी ‘रॉकेट मॅन’ किमजॉन ऊन ने मांडले आहे, ते अमेरिकेसारख्या देशाला कसे कळत नाही, तसेच या जबाबदार महासत्तेच्या पुढाऱ्यांची सायकॉलॉजी कोणत्याथराला पोहोचली आहे याची पण भीती वाटते. राष्ट्रसंघाचा लगाम ज्या अण्वस्त्र देशांच्या हाती आहे आणि विश्वाचे भवितव्य आणि अस्तित्वाचे घोडे जे उधळीत आहेत त्या देशांनी उत्तर कोरियाशी वाटाघाटी व वार्तालाप हवे त्याच वेळी िहे देश त्याला आत्मघात करण्यास विवश करीत आणि धमकावित आहेत, हा अहंकार आणि पोलिसी कृती जगातील अशक्त राष्ट्रे निमूडपणे बघत आहेत. इराणशी वाटाघाटी होऊ शकते, मात्र उ. कोरियाशी नाही, हे तर जगात लोकशाहीचा विडा उचलणाऱ्या देशांची शिरजोरी, मुजोरी व अरेरावीच झाली.
- निसार मोमीन, पुणे.

‘खिलाफत’ इस्लामी लोकशाही? हे निसार मोमीन यांचे मनोगत वाचनात आले. मी अनेक वर्षे आखाती राष्ट्रांत अभियंता म्हणून कार्यरत होतो. तेथे आखातातील वेगवेगळ्या देशांतील मित्रांशी नेहमी संवाद असायचा. मुळात आखाती राष्ट्रांतील लोकांना भारतातील लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्याचा हेवा वाटतो. जगाला आणि खुद्द इस्लामधर्मीयांना खिलाफतीबद्दल माहिती तरी काय आहे? शिवाय चोरांचे हात कलम करणे आणि व्यभिचाऱ्यांना ठेचून मारण्यापलीकडे!
माझ्या एका कुवैती सहकाऱ्याने मला मौ. सय्यद अबूल आला मौदूदी यांची इंग्रजी भाषांतरित ‘व्याज’ या पुस्तकाची प्रत दिली तेव्हा मला खऱ्या अर्थाने ‘इस्लामी अर्थिव्यवस्थे’चा साक्षात्कार झाला. परंतु विडंबना अशी की जगात कोठेही अशी शासन व्यवस्था संपूर्णत: अस्तित्वात नाही. कोणत्याही भूमिगत चळवळ आणि रक्तरंजित क्रांतीपेक्षा लोकशाही शासन व्यवस्था ही कधीही लोकहिताची आहे. साम्यवादी राष्ट्रेसुद्धा अध्यक्ष निवडींना लोकशाही मार्गाचा अवलंब करून संभाव्य संघर्ष टाळतात. लोकशाहीत संविधान लवचिक असते. लोकांना आपली अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, दिवाणी, फौजदारी कायदा व्यवस्था कुरआन आणि प्रेषितवाणीनुसार करावयाचे असल्यास लोकशाहीत शक्य आहे. परंतु अमेरिका आणि यूरोपीय राष्ट्रे लोकशाहीचे कितीही समर्थक असले तरी आपल्या स्वार्थासाठी अरब राष्ट्रांत लोकशाही रुजवण्यासाठी स्वारस्य दाखवत नाहीत. उलट इजिप्तसारखा गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून हुकूमशाही-लष्करशाहीने पिंजलेल्या राष्ट्रातील लोकांनी कशीबशी स्थापन केलेलेल्या लोकनियुक्त सरकारचे उच्चाटन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
- विलास पावडे, पिंपरी, पुणे.

    माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत वजनदार वस्तू जी अंतिम निवाड्याच्या दिवशी मोमिनच्या तराजूमध्ये ठेवली जाईल ती म्हणजे त्याची नीतीमत्ता होय. अभद्र बोलणारा आणि अर्वाच्च कथन करणाराला अल्लाह अजिबात पसंत करीत नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ‘खलकुन हसनुन’चे स्पष्टीकरण देताना अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी म्हटले आहे, ‘‘हुवा तला़कतुल व़िज्ह व ब़ज्लुल मअरु़फि व क़फ़्फल अ़जा.’’ (मनुष्याने एखाद्या हसतमुखाने भेटणे, अल्लाहच्या वंचित दासांवर धन खर्च करणे आणि कोणालाही त्रास न देणे यालाच चांगली नीतीमत्ता म्हणतात.)
    माननीय अली (रजि.) यांनी सांगितले,     ‘‘अश्लील बोलणारा आणि अश्लील गोष्टींचा प्रसार करणारा हे दोन्ही पाप सारखेच आहेत.’’ (हदीस : मिश्कात)
दुतोंडीपणा
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वांत वाईट मनुष्य तो आढळेल जो जगात दोन चेहरे बाळगत होता. काही लोकांशी एका चेहऱ्याने भेटत होता आणि दुसऱ्या लोकांशी दुसऱ्या चेहऱ्याने.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैहि)
स्पष्टीकरण : दोन मनुष्यांमध्ये अथवा दोन समूहांमध्ये जेव्हा शत्रुत्व निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी काही लोक असेही आढळतात जे दोन्हींकडे पोहोचतात आणि दोघांच्या होकाराला हो म्हणतात आणि त्यांच्या आपसांतील शत्रुत्वावर चर्चा करतात व ते वाढविण्याचा प्रयत्न करतात, हा फार मोठा दुराचार आहे.
    त्याचप्रमाणे काही लोक समोर अतिशय दृढ संबंध प्रगट करतात मात्र जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची निंदा करण्यास सुरूवात करतात, हाच दुतोंडीपणा आहे.
    माननीय अम्मार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगात दुतोंडीपणाने वागणाऱ्या मनुष्याच्या तोंडात अंतिम निवाड्याच्या दिवशी आगीच्या दोन जिव्हा असतील.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यांच्या तोंडात आगीच्या दोन जिव्हा यासाठी असतील की जगात त्याच्या तोंडातून आग निघत होती जी दोन मनुष्यांच्या आपसांतील संबंधाला जाळून टाकत होती.
चुगलखोरी
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे अधिक ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘चुगलखोरी म्हणजे तू आपल्या बंधुचा उल्लेख त्याला न आवडणाऱ्या पद्धतीने करावा.’’ मग पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘मी उल्लेख करीत असलेली गोष्ट जर माझ्या बंधुमध्ये आढळत असली तरीही ती चुगलखोरीच ठरेल काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही उच्चारलेली गोष्ट जर त्याच्यात आढळत असेल तरीही ती चुगलखोरीच झाली आणि जर ज्याच्यात ती गोष्ट नाही त्या मनुष्याबाबत जर ती गोष्ट म्हटली गेली तर तुम्ही त्याच्यावर आरोप करणे होईल.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : मोमिनला त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल चांगल्या पद्धतीने टोकले गेले तर निश्चितच त्याला वाईट वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या अपराधाची सूचना त्याच्या वरिष्ठांना दिली गेली तर तेही त्याला आवडेल, कारण हीदेखील त्याच्यात सुधारणा घडविण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही आपल्या मोमिन बंधुला समाजाच्या नजरेतून उतरविण्यासाठी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या त्रुटी सांगाल तर त्याला खूप वाईट वाटेल. जो मनुष्य उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो आणि कोणत्याही प्रकारे मान्य करीत नाही, त्याचे दुराचरण व्यक्त करणे चुगलखोरी नसून त्याचा स्वभाव समाजासमोर उघड करणे फार मोठे पुण्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याचेच मार्गदर्शन केले आहे.
    माननीय अबू सईद व जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी व्यभिचारापेक्षाही मोठे पाप आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! चुगलखोरी व्यभिचारापेक्षा मोठे पाप कसे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मनुष्य व्यभिचार करतो, मग पश्चात्ताप व्यक्त करतो तेव्हा अल्लाह त्याचा पश्चात्ताप कबूल करतो, परंतु जोपर्यंत तो मनुष्य ज्याची चुगलखोरी करण्यात आली आहे, त्या माणसाला क्षमा करीत नाही तोपर्यंत अल्लाह चुगलखोरी करणाऱ्याला क्षमा करणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरीचे एक प्रायश्चित्त हे आहे की ज्याची तू चुगलखोरी केली आहे त्या मनुष्याकरिता तू माफीची प्रार्थना करावी. अशाप्रकारे म्हणा– हे अल्लाह! तू माझी आणि त्याची मुक्ती कर.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जर तो मनुष्य उपस्थित असेल आणि त्याच्याकरवी आपला अपराध माफ करविला जाऊ शकत असेल तर करवून घ्यावा आणि जर तो मरण पावल्यामुळे अथवा तो कोठेतरी दूरवर गेल्यामुळे माफीसाठी जागाच उरली नसेल तर त्याच्याकरिता माफीच्या प्रार्थनेव्यतिरिक्त दुसरा मार्गच उरत नाही.
    माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मृतांना वाईट बोलू नका कारण ते आपल्या कर्मांपर्यंत पोहोचलेले आहेत.’’ (हदीस : बुखारी)

(२२८) ...आणि याबाबतीत स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे परिचित पद्धतीनुसार जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत. मात्र पुरुषांसाठी स्त्रियांपेक्षा एक दर्जा अधिक आहे आणि अल्लाह सर्वांवर प्रभुत्वशाली, विवेकी आणि ज्ञाता आहे.
(२२९) तलाक दोन वेळा आहे नंतर स्त्रीला  एकतर सर्वसंमत पद्धतीने आपल्याजवळ ठेवून घ्या किंवा सन्मानपूर्वक तिला  निरोप द्या.२५० आणि तुमच्यासाठी हे वैध नाही की जे काही तुम्ही त्यांना दिले आहे त्यातून काहीही परत घ्यावे. २५१ अपवाद फक्त जर त्या दोघांना भय वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे ते पालन करू शकत नाहीत. नंतर जर तुम्हाला भय वाटत असेल की ते दोघे अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांवर कायम राहू शकत नसतील तर त्यांच्यामध्ये असा समेट घडविण्यामध्ये कोणताही अपराध नाही की पत्नीने आपल्या पतीला प्रतिदान देऊन स्वत:ला मुक्त करून घ्यावे.२५२ या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि जे अल्लाहच्या मर्यादाचे उल्लंघन करतील तेच अत्याचारी आहेत.

250) अरब अज्ञानता काळात पती आपल्‌या पत्नीला अनेक तलाक देत असे. ज्‌या स्त्रीशी तिचा पती नाराज झाला तर तिला तो पुन्हा पुन्हा तलाक देऊन समेट (रुजू) घडवून आणत असे, जेणेकरून ती बिचारी पतीबरोबरसुद्धा राहु शकत नसे की पूर्ण मुक्त होऊन दुसऱ्याशी निकाहसुद्धा करू शकत नसे. कुरआनची ही आयत याच अत्याचाराचे दार बंद करते. या आयतच्‌या प्रकाशात एक पती आपल्‌या पत्नीला जास्तीतजास्त दोनदाच रजई तलाक देऊ शकतो. अशी तलाक की ज्‌यानंतर समेट होऊ शकतो म्हणजे पुन्हा पत्नी म्हणून राहु शकते चा अधिकार वापरु शकतो. जो मनुष्‌य आपल्‌या पत्नीला दोनदा तलाक देऊन तिच्‌याशी समेट करतो, तो आपल्‌या आयुष्‌यात जेव्‌हा कधी तिला तिसरा तलाक देतो तेव्‌हा पत्नी त्याच्‌यासाठी कायमचीच वेगळी होते.
तलाक देण्याची योग्य पद्धत जी कुरआन आणि हदीसनुसार आहे ती म्हणजे पत्नीला मासिकपाळी व्‌यतिरिक्तच्‌या काळात एक तलाक दिला जावा. एक तलाक दिल्‌यानंतर जर त्याची इच्‌छा असेल तर दुसऱ्या पाळीनंतर दुसऱ्यांदा एक तलाक द्यावा. अन्यथा योग्य हेच आहे की पहिल्‌याच तलाकवर थांबावे. या स्थितीत पतीला हा अधिकार राहातो की इद्दत (तलाकनंतरचा कालावधी) संपण्यापूर्व जेव्‌हा वाटेल समेट (रुजू) करावा आणि ईद्दतकाळ संपला तरी दोघांच्‌यासाठी संधी उपलब्‌ध असते की पुन्हा परस्पर सहमतीने पुन्हा निकाह करावा. परंतु तिसऱ्या वेळी तिसऱ्या पाक (स्वच्‌छ) स्थितीत तिसऱ्यांदा तलाक दिल्‌यानंतर मात्र पतीला समेटाचा अधिकार राहात नाही आणि दोघांचा पुन्हा निकाह करण्याची संधी बाकी राहात नाही. एकाच वेळी तीन तलाक देण्याची आजकालच्‌या अडाणी लोकांची प्रथा शरियतनुसार मोठा भंयकर गुन्हा आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याविरुद्ध कडक शब्दांत निंदा केली आहे. आणि माननीय उमर (रजि.) तर एकाच वेळी तीन तलाक देणाऱ्याला कोडे मारण्याची शिक्षा देत असत.
251) म्हणजे महर आणि दागदागिणे, कपडे इ. पती आपल्‌या पत्नीला दिले तर त्यातील कोणतीही वस्तू परत घेण्याचा अधिकार त्याला नाही. ही गोष्ट इस्लामच्‌या नैतिकतेच्‌या विरुद्ध आहे की एखादी वस्तू जी त्याने दुसऱ्याला देणगी (हिबा, हदीया) रुपात भेट दिली असेल तिला पुन्हा परत मागावे. या हीन कार्याला हदीसमध्ये त्या कुÍयाची उपमा दिली आहे जो स्वत: केलेल्‌या उलटीला चाटतो. खासकरून एक पतीसाठी तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की त्याने तलाक दिल्‌यावर तलाक पश्चात पत्नीला निरोप देतांना त्या वस्तू परत मागाव्‌यात ज्‌या त्याने तिला दिल्‌या होत्या. याउलट इस्लामने ही शिकवण दिली आहे की तलाकपश्चात पत्नीला निरोप देतांना आणखी काही द्यावे. जसे पुढे आयत नं. 241 मध्ये स्पष्ट केले आहे.
252) शरियतमध्ये यास "खुलअ' म्हणतात. म्हणजे पत्नीने आपल्‌या पतीला काही देवून तलाक देणे होय. याविषयी पत्नी आणि पतीदरम्यान घरातल्‌या घरात मामला निश्चित झाला असेल तर त्यानुसार कार्यवाही होईल. परंतु जर न्यायालयात मामला गेला तर न्यायालय या गोष्टीचा शोध घेईल की खरोखरच या स्त्रीला आपल्‌या पतीची इतकी घृणा आहे की यापुढे दोघांचा निभाव लागणे अशःय आहे. याची पडताळणी झाल्‌या वर न्यायालय परिस्थितीनुरुप जो काही फिदीया (रक्कम) तजवीज करील ती फिदया रःकम देवून पत्नी आपल्‌या पतीपासून विभक्त होते. फिकाहशास्त्रींना बहुतेक मान्य नाही की जो माल पतीने त्या पत्नीला दिला होता त्यास परत घेताना जास्त काही देण्यात यावे.
"खुलअ'च्‌या स्थितीत जो तलाक दिला जातो तो रजई नव्‌हे तर बाईना आहे. म्हणजे पती समेट (रुजू) करु शकत नाही परंतु दोन्हींच्‌या सहमतिने निकाह होऊ शकतो.

दोन्ही काठ भरलेली नदी शांत असली की सुंदर भासते. तिच्या शांततेतही एक प्रकारचे संगीत असते व त्यातून सुख आणि समृध्दीचा संदेश आपोआपच प्रसूत होत असतो. मात्र तीच नदी जेव्हा आपली मर्यादा ओलांडते तेव्हा केवळ विनाशच आणते. अनेकांना देशोधडीला लावते. समाजाचेही असेच असते. सगळे शांत- समंजसपणे जगणार असतील तर जगातल्या ८० ते ९० टक्के समस्या आपोआपच संपतील. किंबहुना त्या निर्माणही होणार नाहीत. मात्र जर कोणी खळखळाट सुरू केला की समाज दुभंगायला सुरूवात होते. अशांतता आणि बेदीली माजते.
अमेरिकेतील लास वेगास येथील एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी स्टीफन पॅडॉक नावाच्या माथेफिरूने घडवलेल्या सामूहिक नरसंहाराच्या घटनेचे वृत्त ऐकून सारे जग हबकले. ओपन एअर म्युझिक फेस्टीव्हलममधील ५९ नागरिक या माथेफिरूच्या गोळीबाराला बळी पडले. पाचशेच्यावर लोक यात जखमी झाले असून यातील अनेकांच्या जीवाला असलेला धोका अजून टळलेला नाही. हा दहशतवादी स्वरूपाचा हल्ला नव्हता. पॅडॉक नावाचा हल्लेखोर चांगला सुस्थितीतील ६४ वर्षीय अमेरिकन वृद्ध इसम होता. सुरक्षा सैनिकांच्या गोळीबारात तो ठार झाला. त्याला सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम होता ही बाब पुढे आली आहे. अमेरिकेत म्हणे सध्या मर्डर ऍडिक्ट लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विकृत मानसिकतेतील हे लोक अशी हत्याकांडे तेथे अधूनमधून घडवत असतात. पण स्टीफन पॅडॉकने या साऱ्यांवर कडी केली आहे. गेल्या वर्षी फ्लोरिडात ओरलांडो येथे ४९ जणांचे हत्याकांड झाले होते. त्या आधी २०१२ ला सँडीहुक येथे २७ जणांचे आणि २००७ ला व्हर्जिनियात ३२ जणांचे हत्याकांड झाले होते. १९९१ पासून आतापर्यंत सामूहिक हत्याकांडाची अशी ८ मोठी प्रकरणे तेथे घडली आहेत. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेला माणूस बंदुका घेतो आणि दुसऱ्यांचे जीव घेत सुटतो हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य पूर्ण बिघडवणारा आहे. केवळ विकृती मानसिकतेतून लोकांचे जीव घेण्याचे अधिकांश प्रकार अमेरिकेतच पाहायला मिळतात. स्वताची विकृती शमवण्यासाठी असे दुसऱ्याचे जीव घेत सुटणे हा अघोरीपणाचा कळसच म्हणावा लागेल. आजार नियंत्रण संरक्षण वेंâद्रा (सीडीसी) नुसार, अमेरिकेत बंदुकीच्या हल्ल्यात दरवर्षी १२ हजार मृत्यू होतात. मागच्या ५० वर्षांत अशा घटनांत अमेरिकेत १५ लाखांहून अधिक बळी गेले. यात अंदाधुंद गोळीबार हत्येशी संबंधित लाख मृत्यूंचाही समावेश आहे. उर्वरित बळी आत्महत्या, चुकीने झालेला गोळीबार कायदेशीर कारवाईचे आहेत. अमेरिकेत शस्त्रास्त्र बाळगणे हा कायदेशीर अधिकार आहे. नागरिक दुकानातून सहज शस्त्रे विकत घेतात. वर्षांपूर्वी शाळेत गोळीबार झाल्यानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शस्त्रास्त्र कायदा आणण्याची मागणी केली होती. मात्र, संसदेतील ७० टक्के लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे अद्यापही कायदा बनू शकला नाही. जगभरातील एकूण सिव्हिलियन बंदुकांपैकी ४८टक्के केवळ अमेरिकी नागरिकांकडे आहेत. सुमारे ३१ कोटी शस्त्रे अमेरिकी लोकांकडे आहेत. ८९ टक्के अमेरिकी लोक जवळ बंदूक बाळगतात. यातील ६६ टक्के लोक एकापेक्षा जास्त बंदुका बाळगतात. अमेरिकेत बंदुका बनवणाऱ्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ९१ हजार कोटींची आहे. २.६५ लाख नागरिक या व्यवसायाशी निगडित आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेत शस्त्रांच्या विक्रीतून ९० हजार कोटी रुपये येतात. दरवर्षी एक कोटीहून अधिक रिव्हॉल्व्हर, पिस्तूल यासारख्या बंदुका येथे बनतात. शस्त्रांच्या वापरातून होणाऱ्या हिंसा मृत्यूंमुळे २० हजार कोटींचे नुकसान झाले. हा जीडीपीचा १.४ टक्के भाग आहे. (आकडेवारी : सीएनएन, सीडीस, आयबीआयएस) तेथे सहजपणे उपलब्ध होणारे शस्त्रास्त्र परवाने हे यामागचे मुख्य कारण आहे. या घटनेत बंदुकीचा चाप जरी स्टीफन पॅडॉकने ओढला असला आणि तो दोषी असला तरी त्याच्या हातात बंदुक देणारे अथवा बंदुक हाती असलेल्या व्यक्तीला त्याच्याही कळत नकळत त्याचे लक्ष्य निर्धारीत करून देणारे यात अधिक दोषी ठरतात. तो दोष अमेरिकेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांकडे जातो. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी प्रचारकाळातच इतका विखारी प्रचार केला होता व अमेरिकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा जो निर्धार ठामपणे मुठी आवळून व्यक्त केला होता त्याला काठावर बसलेले अनेक लोक भुलले असल्याचे त्यांच्याच विजयावरून स्पष्ट होते. देशात शांतता, स्थैर्य नांदले पाहिजे ही जबाबदारी तर सत्ताधाऱ्यावर येतेच; पण आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षेचीही जबाबदारी त्याची असते. तसे असेल तरच जगातली सगळ्यांत परिपक्व लोकशाही म्हणून टेंभा मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. आपण संथ पाण्यात विनाकारण जी खळबळ निर्माण केली आहे व त्यामुळे जो गढूळपणा आला आहे, तो वाढणार नाही याची दक्षता येथून पुढच्या काळात अमेरिका आणि तिचे प्रमुख घेतील, हीच अपेक्षा!

-सुनिलकुमार सरनाईक, ४९२०३५१३५२
‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही!’’ ही क्रांतिकारी प्रतिज्ञा होती डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांची! आपल्या घोर प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसमवेत नागपूर येथील नागभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्यागकेला व बौद्ध धर्मात प्रवेश केला. खरं तर हिंदू धर्मात जन्मलेल्या बाबासाहेबांवर हिंदू धर्माचा त्याग करण्याची पाळी आली ती इथल्या विषमतेवर आधारलेल्या समाजरचनेत त्याच्या झालेल्या होरपळीमुळेच! अलीकडे हिंदू धर्म आणि संस्कृतीचे भले मोठे कौतुकाचे ढोल बडविले जात आहेत, पण किती जरी जोरजोरात गोडवे गायिले तरी या संस्कृतीनेच दीनदुबळ्यांच्या डोक्यावर सतत आपल्या वर्णवर्चस्वाच्या लाथेने प्रहार करून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करण्यात आनंद मानला होता, त्यांना गावकुसाबाहेर सक्तीने ठेवून त्यांच्यावर मानसिक गुलामगिरी लादली होती. या संस्कृतीने आणि धर्ममार्तंडांनी सतत मानवतेचे वस्त्रहरण करून नागवे केले होते. हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. अशा पाश्र्वभूमीवर भयानक व भीषण अस्पृश्यता, जातिभेद आणि उच्चनीचतेचा आगडोंब व त्यात झालेली समस्त दलितांची होरपळ पाहूनच डॉ. बाबासाहेबांची हिंदू धर्मात राहण्याची इच्छाच जळून खाक झाली होती आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या एकूणच सर्व वाङ्मयामध्ये आपणाला दिसून येते.
डॉ. बाबासाहेबांनी या देसाची घटना लिहिताना राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवून लोकशाहीचे संवर्धन करणे, याकरिता धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंतर्भूत केले आहे. धर्मनिरपेक्ष समाजरचनेसाठी त्यांनी संविधानात ज्या तरतुदी नमूद केल्या आहेत त्या अशा...
(अ) कलम १५(१) - धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही.
(ब) कलम २५(१) - सार्वजनिक व्यवस्था, नीतिमत्त्व व आरोग्य यांच्यावर या भागातील अन्य उपबंधाच्या अधिनतेने सक्षम विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रज्ञापित करावयाच्या आचरणाच्या व त्याच्या प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्वशक्ती सारख्याच हक्कदार आहेत.
(क) कलम २८(१० - राज्याच्या पैशातून चालविल्या जाणाNया कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.
(ड) कलम ३०(१) - धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व समाजांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालविण्याचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे.
राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या या वरील तत्त्वानुसार देशाचा राज्यकारभार चालतो, संविधानातील या तरतुदीमुळेच भारतात विविध धर्मांचे लोक राहात असतानाही राज्यकारभारात कुठल्या एखाद्या धमार्तचा हस्तक्षेप होत नाही.
‘डोनाल्ड युजेन स्मिथ’ धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताना म्हणतात, ‘‘धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे जे सर्वांना व्यक्तिगत आणि सामुदायिक धर्मस्वातंत्र्य बहाल करते. घटनात्मकरित्या कोणत्याही विशिष्ट धर्माला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बांधलेले नसते. त्याचप्रमाणे ते कुठल्याही विशिष्ट धर्मास उत्तेजन देत नाही किंवा कोणत्याही धर्मात हस्तक्षेपही करीत नाही.’’
एम. एन. रॉय म्हणतात, ‘‘जेव्हा राज्याचा विशिष्ट धमार्तशी शरीराच्या अवयवाप्रमाणे कोणताही संबंध नसतो, तेव्हा त्यास धर्मनिरपेक्ष राज्य म्हणता येईल.’’
वेबस्टरचा शब्दकोश सांगतो, ‘‘धर्मनिरपेक्षता म्हणजे शिक्षण आणि नीतीयिम यांना धार्मिक वर्चस्वापासून दूर अलिप्त ठेवणे इष्ट आहे, असे मानणारा विचार होय.’’
बायन विल्सन म्हणतात, ‘‘धर्मनिरपेक्षता ही अशी प्रक्रिया आहे की, ज्यातून धार्मिक विचार-क्रिया-कला आणि संस्थेचा सामाजिक प्रभाव कमी होतो.’’
पं. जवाहरलाल नेहरू म्हणतात, ‘‘धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ भौतिक विचार किंवा धर्मविरोधी विचार नव्हते, सर्व धर्मांना समान मानण्याची आणि सर्व धर्मांचा आदर करण्याची प्रवृत्ती होय.’’
म. गांधी तर म्हणतात की, ‘‘देशातील शासनाने धर्माच्या बाबतीत तटस्थ राहणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय.’’
वरील व्याख्यांवरून धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे स्पष्ट होते. धर्मनिरपेक्षतेमध्ये प्रत्येक धर्माचे अस्तित्व मान्य आहे.
डोनाल्ड युजेन स्मिथ यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत नमूद केल्याप्रमाणे, ‘‘धर्मनिरपेक्ष राज्य कोणत्याही धर्मास उत्तेजन देत नाही,’’ हे वादातीत आहे. ममात्र ‘‘धर्मात हस्तक्षेपही करीत नाही’’ या विधानावर भारताच्या राज्यकारभाराबाबत वाद होऊ शकतो.
शासन हे कल्याणकारी असते. धर्मसंस्था प्राचीन काळापासून ‘आहे तशा’ पद्धतीने चालत आलेली आहे. ‘‘धर्म सांगेल तसे शासन चालावे’’ ही मध्ययुगीन संकल्पना आहे. समता, स्वातंत्र्य आणि विज्ञानावर या संकल्पना आधुनिक आहेत. त्यामुळे त्या धर्मात सापडणे शक्य नाही, हे डॉ. बाबासराहेबांना ठाऊक होते, म्हणून ते म्हणतात, ‘‘देशात समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी राज्याने निधर्मीकरण आचरणात आणणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय.’’
‘‘समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि विज्ञानवाद या आधुनिक संकल्पना समाजात अंमलात आणायच्या असतील तर शासनाने धर्मात हस्तक्षेप केलाच पाहिजे,’’ असेही डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते. अर्थात त्यामुळेच भारतीय राज्यघटना लिहिताना त्यांनी धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेचा ठिकठिकाणी पुरस्कार केलेला दिसून येतो.
धर्मनिरपेक्षता हे भारताचे मूलभूत अंग आहे, ते कोणत्याही स्वरूपात बदलता येणार नाही, हे अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ठणकावून सांगितले आहे, असे असतानाही काही राजकीय पक्ष आणि धर्मवादी संघटना ‘‘भारत हे हिंदूराष्ट्र आहे!’’ असे म्हणून या देशाला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी या ना त्या प्रकारे प्रत्नशील आहेत. विशेष म्हणजे असा विचार मांडणारे, तसेच अशा विचाराला पाठबळ देणारे सरकार केंद्रात विराजमान झाले आहे. त्यामुळे हिंदूराष्ट्राची कल्पना वास्तवात आणणे त्यांना थोडे सुलभ झाले आहे; असे वाटते. मात्र यामध्ये देशाच्या धार्मिक विविधता कशा टिकवायच्या हे मोठे आव्हान उभे आहे. खरं तर फाळणीनंतर भारत ‘हिंदूराष्ट्र’ म्हणून जाहीर व्हावे, असा मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्या वेळी झाला होता, अजून तो सुरूच आहे, मात्र तो अजूनही यशस्वी झालेला नाही, तरीही हिंदुत्ववादी राजकारणाला ‘हिंदूराष्ट्र’ अभिप्रेत आहे. आज भारतीय लोकशाहीला धर्मांधतेचे म्हणून जे आव्हान उभे आहे, ते स्वातंत्र्यानंतर इथे जी राज्यव्यवस्था निर्माण झाली, ती ज्यांच्या हातात एकवटली, ज्यांच्या हातात इथल्या राज्यव्यवस्थेच्या सत्तेचे दोर होते, त्यांच्या कार्यपद्धतीचा हा परिपाक आहे. नेहरू-इंदिरा-राजीव गांधींच्या सत्तेने इथल्या मूलभूत सामाजिक ‘फॅसिझम’ला आवर घालण्याचे, त्याला क्षीण करण्याचे काम तर केले नाहीच, उलट त्या शक्तींना अननुभूतपणे व प्रच्छन्नपणे खतपाणी मिळेल अशा पद्धतीने सत्ता राबविली. त्याचा परिपाक म्हणून जुन्या सामाजिक सत्तेच्या, अमानवी समाजरचनेच्या शक्ती पुन्हा पुन्हा उफाळून येत आहेत. लोकशाहीला अशा धर्मांधतेचे आव्हान उभे ठाकले आहे, यात शंकाच नाही.
या पाश्र्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. हिंदू तत्त्वज्ञान लोकशाहीला पूरक आहे का?, हिंदू तत्त्वज्ञान समतेचा पुरस्कार करते का?, किंवा हिंदू धर्मग्रंथ मसतेचा आणि बंधुतेचा विचार देतात का! अशा प्रश्नाचे जंजाळ अनेकांच्या डोळ्यात घर करून राहते, त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ‘‘हिंदुत्व म्हणजेच धर्मनिरपेक्षता’’ असे उद्दामपणे व रेटून बोलतात, त्या वेळी सर्वसामान्य जण अधिकच गोंधळात पडतात. डॉ. बाबासाहेबांच्या विचाराकडे कानाडोळा करून काही सेक्युलरवादी सत्तेच्या लालसेने ‘संघा’च्या ‘हो’ला ‘हो’ करताना दिसतात. काही परिवर्तनवादी नेते तर त्याच्या गोटात जाऊन सुखनैन निद्रा घेतात. हे पाहून बहुसंख्यकांना हेच खरे वाटू लागते, आणि तेही ‘री’ ओढायला सरसावतात. हे वास्तव आहे. मात्र डॉ. बाबासाहेबांनी या आक्रमक धर्मवादाला शरण जाणाNयांना थोपविले आहे. ते म्हणतात,
‘‘हिंदुत्व ही फॅसिझम किंवा नाझीझमप्रमाणे एक राजकीय विचारधारा आहे आणि ती सर्वथा लोकशाहीविरोधी आहे. हिंदुत्वाला मोकळे रान सोडले तर (आणि ते म्हणजे हिंदू बहुसंख्यत्व) तर जे हिंदूधर्माच्या बाहेर आहेत व त्याला विरोधी आहेत, त्यांच्या वाढीला तो एक अडसर आहे. हा दृष्टिकोन केवळ मुस्लिमांचाच नाही तर दलित आणि ब्राह्मणेतरांचादेखील हाच दृष्टिकोन आहे.’’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, पृ.२४१, खंड-१)
म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या दृष्टीतून इथल्या लोकशाहीला वा मानवतेला हिंदुत्ववादी राजकीय विचारसरणीचा नक्कीच धोका संभवतो.
आपला भारत देश केवळ हिंदुंचा नाही, भारतामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक राहतात. आपल्या देशाच्या विकासप्रक्रियेत मुस्लिम, खिश्चन व इतर अल्पसंख्याकांचाही सहभाग आहे. अर्थात म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी ‘धर्मनिरपेक्षता’ अधोरिखेत केली आहे. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकास करण्यासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक असते. त्याकरिता धर्मनिरपेक्षतेची नितांत गरज आहे, व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी धर्मनिरपेक्षता उपोयगी ठरते.
सहिष्णुतावृत्तीचा विकास करण्यासाठी आपण सर्व मानवजातीचे घटक आहोत या विचाराने परस्पर बंधुभाव जोपासला पाहिजे; विघटन कार्यशक्तीचा बिमोड करण्यासाठी आणि धार्मिक व सामाजिक समस्याचे निर्मूलन करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची गरज आहे.
(संदर्भ : (१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ - (प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई-१२), (२) राज्यशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमातील पुस्तके.)
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापुरातील पुरोगामी डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget