Halloween Costume ideas 2015

धर्माच्या आज्ञापालनासंदर्भात प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश : पैगंबरवाणी (हदीस)


सकीफ कबिल्याचे व्यक्ती गैलान बिन सलमा यांनी ज्या वेळी इस्लाम धर्म स्वीकारला त्या वेळी त्यांच्या दहा पत्नी होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की त्यांनी फक्त चार पत्नींना जवळ ठेवावे आणि बाकिच्यांना सोडून द्यावे. गैलान बिन सलमा यांनी हजरत उमर (र.) यांच्या शासनकाळात आपल्या या चारही पत्नींना तलाक दिले आणि जी काही त्यांची मालमत्ता होती ती आपले पिता आणि इतर बांधवांमध्ये वाटून दिली. ही गोष्ट ह. उमर (र.) यांना कळल्यावर त्यांनी गैलान यांना बोलावून घेतले आणि म्हणाले, "मला वाटतं सैतानाने आकाशात जाऊन तुमच्या मृत्यूची बातमी ऐकली असेल आणि त्याने तुम्हाला येऊन सांगितले असेल की तुमच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. काही दिवसच तुम्ही जगणार आहात. (म्हणून तुम्ही आपल्या पत्नींना त्यांच्या वारसापासून वंचित ठेवण्यासाठी) आपली सगळी मालमत्ता आपल्या पिता आणि बांधवांना देऊन टाकली. मी अल्लाहची शपथ घेऊन सागतो की तुम्हाला आपल्या पत्नींना परत जवळ करावे लागेल आणि जी मालमत्ता तुम्ही वाटून दिली आहे ती परत घ्यावी लागेल. तसे नाही केले तर मी तुमच्या पत्नींना तुमच्या मिळकतीचा वारस बनवणार आणि लोकांना आदेश देणार की त्यांनी तुमच्या कबरीवर दगड मारावेत." (संदर्भ- मुसनद अहमद, जादे राह-७३)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अन्सार लोकांतील काही महिलांना संबोधून सांगितले, "जर एखाद्या महिलेच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असेल आणि तिने परलोकात याचा मोबदला मिळेल या आशेवर संयम वाळगला असेल तर तिला स्वर्गात प्रवेश मिळेल." हे ऐकून एका महिलेने प्रेषितांना विचारले, "आणि जर कुणाची दोन मुलं मयत झाली असतील तर?" प्रेषितांनी उत्तर दिले, "तीसुद्धा स्वर्गात जाईल." तेवढ्यात एक महिला आपल्या बाळाला घेऊन प्रेषितांकडे आली आणि म्हणाली, "हे प्रेषित, माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी तीन मुलांचा दफनविधी केला आहे." प्रेषितांनी विचारले, "तुमच्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे?" ती होय म्हणाली. प्रेषितांनी तिला सांगितले की "तीनही मुलं नरकापासून तुमचा बचाव करतील. " (संदर्भ- मुस्लिम, तरगीब व तरहीब)

हजरत उमैमा बिन्त रुकैया म्हणतात की, मी इतर काही महिलांच्या सोबत प्रेषित मुहम्मद (स.) यांना हे वचन दिले की मी धर्म आणि त्यांच्या आज्ञांचे पालन करीन. प्रेषितांनी हे वचन घेताना आम्हाला सांगितले, "जितके तुम्हाला जमेल तितकेच आणि जेवढे होईल तेवढेच आज्ञापालन करा." मी (उमैया) म्हणाले, "अल्लाह आणि त्याचे प्रेषित (स.) आमच्यावर आमच्यापेक्षाही जास्त मेहरबान आहेत." (संदर्भ- मिश्कात, जादे राह, २४८)

संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget