प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की एक श्रद्धावंत दुसऱ्या श्रद्धावंताचा भाऊ आहे. त्याने त्यास वाऱ्यावर सोडून देऊ नये. त्याच्याशी खोटे बोलू नये. त्याच्यावर अन्याय करता कामा नये. तुम्ही आपसात एकमेकांच्या आरशासमान आहात. काही दोष आढळल्यास ते दूर करावेत. (अबू हुरैरा (र.), मिश्कात, तिर्मिजी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की अल्लाहने अशा व्यक्तीवर कृपा करावी जो मोलभाव करताना सक्ती करत नाही आणि मनाचा मोठेपणा दाखवतो. (ह. जाकिर (र.), बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की ज्याने आपल्या मुस्लिम बांधवाची कुणी चहाडी करत असताना त्याचा बचाव केला तेव्हा अल्लाह अनिवार्यपणे अशा मुस्लिम व्यक्तीला नरकाच्या अग्नीपासून बचाव करतो. (ह. अस्मा बिन्त झैद, अल बैहकी, मिश्कात)
सईद मुकहिरी म्हणतात की एकदा मी ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.) यांच्याकडे गेलो तेव्हा ते एका व्यक्तीशी बोलत होते. मी त्यांच्या समक्ष उभा राहिलो तेव्हा त्यांनी माझ्या छातीवर हाताने थाप दिली आणि म्हणाले की जेव्हा दोन व्यक्ती आपसात काही बोलत असतील तर त्यांची अनुमती घेतल्याशिवाय तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका, त्यांच्या बरोबर उभे राहू नका की त्यांच्याजवळ बसू नका.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "जर कुणी व्यक्ती आपल्या मुस्लिम बांधवाशी स्नेह बाळगत असेल तर त्याने त्याला तसे सांगावे की मी तुम्हाला आपल्या जवळ समजतो." (मिकदाम, अबू दाऊद, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "मृत्यू पावलेल्यांविषयी बरे-वाईट बोलू नका, कारण त्यांनी जे काही कर्म केले असतील ते त्यांनी पुढे पाठवलेले आहेत." (ह. आयेशा (र.), बुखारी, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की कयामतच्या दिवशी सर्वांत वाईट दुतोंडा माणसं असतील. जो काही लोकांकडे एक चेहरा घेऊन येतो आणि दुसऱ्या लोकांकडे दुसरा चेहरा घेऊन जातो. (ह. अबू हुरैरा (र.), बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
फातिमा बिन्त कैस म्हणतात की एके दिवशी मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले आणि म्हणाले की माझ्यासाठी ह. अबू जहम आणि ह. मुआविया यांनी (विवाहाचा) प्रस्ताव पाठवला आहे. आपले काय मत आहे? प्रेषितांनी उत्तर दिले, "मुआविया गरीब आहेत आणि अबू जहम तर खांद्यावरची काठी कधी खाली ठेवतच नाहीत." (बुखारी, रियाजुस्सालिहीन)
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment