Halloween Costume ideas 2015

दारू समाजासाठी किती घातक?


विधात्याचे म्हणणे आहे की, ’’ते तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. त्यांना सांगा की दोन्हीमध्ये मोठा अपराध आहे. जरी त्यामध्ये लोकांसाठी काही लाभ आहे परंतु त्यांचा अपराध त्यांच्या लाभापेक्षा अधिक मोठा आहे. (सुरे अलबकरा 2: आयत नं. 219)’’

जगातील सर्व सत्ताधारी मद्यपान आणि जुगाराचे अनेक फायदे सांगत असतात पण त्यांच्या वाईटांविषयी ते तोंड उघडून बोलत नाहीत. पण ईश्वरीय ग्रंथात याविरूद्ध स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. जर्मनीमधील एका ख्रिस्तीधर्मीय डॉ्नटरने असा दावा केला आहे की, जर जगातील सर्व मद्यपानगृह बंद केले तर मी हमी देतो की,  अर्धे दवाखाने आणि अर्धे कारागृह बंद पडतील.’’ त्यांच्या या विधानात माणसांना जडणाऱ्या रोगांविषयी तसेच गुन्हेगारी वृत्तीत वाढ होऊन जेलमध्ये  लोकांना बंदिस्त करण्याविषयी सांगितले आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले की, दारू समस्त दुष्कृत्यांची जननी आहे. त्याचबरोबर असेही सांगितले आहे की, दारू आणि श्रद्धा एकत्र होऊ शकत नाहीत. 

पवित्र कुरआनचे म्हणणे आहे, हे श्रद्धावंत लोक हो! मद्यपान आणि जुगार हे सर्व घाणेरडे सैतानी कृत्य आहेत. त्यांच्यापासून अलिप्त राहा. तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. सैतानाची तर अशी इच्छा असते की, दारू आणि जुगारांद्वारे तुमच्यामध्ये शत्रुत्व निर्माण करावे आणि तुम्हाला ईश्वराचे स्मरण आणि नमाजपासून गाफिले करावे. तुम्ही या गोष्टी पासून दूर रहा? दारूच्या बाबतीत ज्या दहा गोष्टींचा धिक्कार केला गेला आहे. त्यामध्ये दारू बनवणारा, दारू पिणारा, दारू पाजणारा, मागवून घेणारा ! विक्री करणारा, विकत घेणारा, कुणाला बक्षीस म्हणून देणारा, त्याच्यापासून होणारे उत्पन्न उपयोगात आणणारे हे सर्व लोक सामिल आहेत. म्हणजे माणसामध्ये पाश्वीवृत्ती निर्माण करणारा आणि समाजात गुन्हेगारी पसरवणाऱ्या सर्व स्त्रोतांना बंद केले गेले आहे. आधुनिक संशोधनाने ही गोष्ट समोर आली आहे की, आपण जे अन्न खातो आणि पितो त्याप्रमाणे दारू कधीही पोटात जाऊन शरीरात विलीन होत नाही. रक्तात त्याच्यापासून होणाऱ्या उलाढालीपासून हृदय विकार होऊ शकतो. माणूस लवकर वृद्धापकाळास पोहोचतो. मद्यपान करणाऱ्या पुरूषांची शरीरयष्टी कमकुवत होते. या सर्व वाईट गोष्टी होत असताना भांडवलदार सामाजिक अधःपतनाची परवा न करता स्वतःचा धंदा चालवत राहतात. आकर्षित करणाऱ्या जाहिराती करून लोकांना फसवले जाते. 

दारूमुळे माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट होते याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले. एक सुशिक्षित तरूणाने जगासमोर याचे उदाहरण सादर केले आहे. उच्च शिक्षा घेऊन त्याने अमेरिकेतल्या एका प्रख्यात कंपनी फॉरगासमध्ये नोकरी मिळवली. प्रगती करत तो उच्च दर्जावर पोहोचला. काही आठवड्यापूर्वी अमेरिकेतून परत येताना त्याने विमानातच आपल्या शेजारी बसलेल्या महिलेवर लघुशंका केली.

ह्या प्रकरणाला तर सुरूवातीला दुर्लक्षित केले गेले शेवटी दिल्ली पोलिसांनी त्याला बंगळूरमध्ये अटक करून जेलमध्ये पाठवले. जिथं नोकरीवर होता त्या कंपनीने त्यास नोकरीवरून काढून टाकले. त्यात तरूणाबरोबरच त्याच्या कुटुंबियांना आणि देशवासियांनाही लाज वाटावी असे काही घडले.

देशाच्या राजधानीत यावर्षी नववर्षाच्या मुहूर्तावर एक हृदयद्रावक घटना घडली. एका कारमध्ये पाच युवक जात असताना वीसवर्षाच्या एका मुलीला 12 किलोमीटर पर्यंत कारद्वारे फरफटत नेले हे सगळे युवक दारूच्या नशेत होते. म्हणजे दारूमुळे कुणाकुणाचे कुठे कसे जीवन उध्वस्त होते हे सांगता येत नाही. त्यामुळे शासनाने दारू आणि नशेडी पदार्थांवर बंदी घातली पाहिजे. रस्ते अपघातात सर्वाधिक प्रमाण दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांचे असते. शासनाने कर उत्पादनासाठी अन्य स्त्रोत शोधून काढावेत आणि दारूवर बंदी घालून लाखो लोकांचे संसार, अपघात वाचवावेत.

- डॉ सलीम खान


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget