माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहने काही अनिवार्य बाबी निश्चित केल्या आहेत त्या नष्ट करू नये आणि काही गोष्टी निषिद्ध केल्या आहेत त्या करू नयेत आणि सीमा निश्चित केल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि काहींच्या बाबतीत त्याने न सांगता मौन बाळगले आहे तुम्ही त्यांच्या भानगडीत जाऊ नका.'' (हदीस : मिश्कात)
माननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''दुर्बल 'मोमिन' (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली 'मोमिन' उत्तम आणि अल्लाह अधिक पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण 'ओठ' (कदाचित) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात.'' (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर 'दीन'चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल 'मोमिन'ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या 'मोमिन'ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्षमतेला सहारा बनवत नाही तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे हे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.
आलाम-ए-रोज़गार को आसाॅ बना दिया
जो ग़म हुआ, उसे ग़म-ए-जानाॅ बना दिया
अर्थात : सांसारिक संकटांना सोपं बनविलं, जे दु:ख झालं, त्यास ईश्वराचं दु:ख बनविलं.
माननीय अबु सईद खुदरी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''मी ऐशोआराम आणि निष्काळजीपणाचे जीवन कसे व्यतीत करू शकतो, जेव्हा इसराफील (अ.) (अंतिम निवाड्याच्या (कयामतच्या) दिवशी जो मृतात्म्यांना जागे करण्यासाठी सूर नावाची तुतारी फुंकणार आहे तो देवदूत.) सूर (तुतारी) हातात घेऊन, कान लावून, मान झुकवून वाट पाहात आहेत की केव्हा आदेश येतो सूर फुंकण्याचा? (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार?)'' लोकांनी विचारले, ''हे अल्लाहचे पैगंबर (स.)! मग आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे?'' पैगंबर म्हणाले, ''याचे पठण करीत राहा- 'हसबुनल्लाहु व निअमल-वकील.' (अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो योग्य कार्य घडविणारा आणि देखरेख करणारा आहे.)'' (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांची अस्वस्थता आणि काळजी पाहून आणि अधिकच उद्विग्न झाले आणि विचारले, ''जर आपली ही स्थिती आहे तर आमची काय स्थिती होईल? सांगा, आम्ही काय करावे जेणेकरून त्या दिवशी सफल होऊ.'' पैगंबरांनी त्यांना सांगितले, ''अल्लाहवर विश्वास ठेवा, त्याच्या देखरेखीत जीवन व्यतीत करा, त्याच्या दासत्वात जीवन व्यतीत करणारे सफल होतील.''
माननीय इब्ने उमर यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''जर एखादा मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आपल्या डोळयांनी पाहू इच्छित असेल तर त्याने या तीन सूरहचे पठण करावे- 'इज़श्शमसू कुव्विरत', 'व इज़स्समाउन फ़तरत' आणि 'इज़स्समाउन शक़्कत.' (या तीन्ही सूरहमध्ये अतिशय परिणामकारक पद्धतीने अंतिम निवाड्याच्या दिवसाचा आराखडा करण्यात आहे.) (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले 'यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा' (त्या दिवशी जमीन आपल्या सर्व स्थितींचे विवरण करील) आणि सहाबा (रजि.) (पैगंबरांचे सहकारी) यांना विचारले, ''स्थितीचे विवरण करण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय?'' लोकांनी म्हटले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे ज्ञान आहे.'' पैगंबर म्हणाले, ''जमीन अंतिम निवाड्याच्या दिवशी साक्ष देईल की अमुक पुरुष अथवा अमुक स्त्रीने माझ्या पाठीवर अमुक दिवशी आणि अमुक समयी सत्कर्म अथवा दुष्कर्म केले.'' हाच अर्थ आहे या आयतीचा. लोकांच्या या कर्मांना वरील आयतीत 'अख़्बार' म्हटले गेले आहे. (हदीस : तिर्मिजी)
संकलन
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment