Halloween Costume ideas 2015

अर्रअद : : ईशवाणी (सुबोध कुरआन)

 


(२) ...आणि त्याने सूर्य व चंद्राला एका कायद्याच्या आधीन केले. या साऱ्या व्यवस्थेतील प्रत्येक वस्तू एका ठरलेल्या वेळेसाठी चाललेली आहे आणि अल्लाहच या सर्व कार्याची तजवीज करीत आहे. तो निशाण्या उघड करून देतो कदाचित तुम्ही आपल्या पालनकत्र्याच्या भेटीचा विश्वास बाळगाल. ४) येथे संबोधन त्या समाजाशी आहे जे अल्लाहच्या अस्तित्वाला नाकारत नव्हते. तोच निर्माणकर्ता आहे आणि सृष्टीव्यवस्था त्याच्याच हातात आहे, हे सर्व त्यांना मान्य होते. म्हणून वरील सत्यासाठी येथे प्रमाण देण्याची किंवा त्या लोकांपुढे ते प्रमाण ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. आकाशांना कायम करणारा, सूर्य चंद्राला नियमबद्ध करून ठेवणारा एकमेव अल्लाह आहे, हे त्यांना मान्य होते. त्यांना एका दुसऱ्या गोष्टीचे प्रमाण येथे दाखविले गेले की अल्लाहशिवाय दुसरा कोणी सृष्टीव्यवस्थेत सत्ताधारी नाही आणि अल्लाहच एकमेव उपास्य आहे. जो मनुष्य अल्लाह निर्माणकर्ता आणि पालनकर्ता आहे, हे मान्यच करत नाही त्याच्यासाठी हे प्रमाण कसे लाभप्रद ठरेल? याचे उत्तर म्हणजे अल्लाह अनेकेश्वरवादींसमोर एकेश्वरत्वाला सिद्ध करण्यासाठी जे तर्क ठेवतो तेच तर्क नास्तिकांसमोर अल्लाहचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पर्याप्त् आहेत. एकमेव एकच एक ईश्वर असण्याचे पूर्ण तर्क या आधारावर आहे की सृष्टीव्यवस्था ही एक जबरदस्त नियमबद्ध व्यवस्था आहे. या सृष्टीत चहुकडे एक सर्वव्यापी सत्ता, एक दोषरहित तत्त्वदर्शिता आणि एका अचूक ज्ञानाच्या निशाण्या दिसतात. या निशाण्या ज्याप्रमाणे पुष्टी करतात की या सृष्टीव्यवस्थेचे अनेक शासक नाहीत की अनेक व्यवस्थापक नाहीत; त्याचप्रमाणे या गोष्टीचीही पुष्टी करतात की या व्यवस्थेचा एकच एक शासक (नियंता) आहे. व्यवस्थेची कल्पना एका व्यवस्थापकाविना, कायद्याची कल्पना एका शासकाविना तसेच तत्त्वदर्शितेची कल्पना एका तत्त्वदर्शीविना, ज्ञानाची कल्पना एका ज्ञानीविना आणि सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे रचनेची कल्पना एका रचयित्याविना केवळ दुराग्रही मनुष्यच करु शकतो किंवा ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली असेल तोच करू शकतो.

५) म्हणजे ही व्यवस्था एक सर्वव्यापी सत्तेचा एक शासक आहे याचीच साक्ष देत नाही आणि एक जबरदस्त तत्त्वदर्शिता त्यात कार्यरत आहे, तर याचे सर्व भाग आणि त्यात कार्यरत सर्व शक्ती याचीसुद्धा साक्ष देतात की या व्यवस्थेच्या सर्व वस्तू नश्वर आहेत. प्रत्येकासाठी एक समयसीमा निश्चित केली आहे ज्यांच्या अंतापर्यंत ती चालते, त्यानंतर ती नष्ट होते. हे सत्य सृष्टीव्यवस्थेच्या एक एक भागासाठी लागू आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण व्यवस्थेलासुद्धा लागू आहे. या प्रकृती जगताची संपूर्ण रचना हे सिद्ध करीत आहे की सृष्टीव्यवस्थासुद्धा शाश्वत नाही, हिच्यासाठीसुद्धा समयसीमा निश्चित केली गेली आहे. हे जग नष्ट होईल आणि त्या जागी दुसरे जग अस्तित्वात येईल, म्हणून कयामत (पुनरुत्थान) होण्याची खबर दिली गेली आहे. म्हणून प्रलय (कयामत) ज्याच्या येण्याची सूचना दिली आहे त्याचे येणे असंभव नाही तर न येणेच असंभव आहे.

६) म्हणजे त्या निशाण्या ज्यांच्या वास्तवतेची सूचना पैगंबर मुहम्मद (स.) देत आहेत ते सत्यावर आधारित आहेत. सृष्टीत चहुकडे त्यांच्याविषयी साक्ष देणाऱ्या निशाण्या उपलब्ध आहेत. लोकांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांना दिसेल की कुरआनमध्ये ज्या गोष्टींवर ईमान धारण करण्यास सांगितले गेले आहे, त्याविषयीची पुष्टी धरती व आकाशातील अगणित निशाण्या देत आहेत.

७) वर सृष्टीच्या निशाण्या साक्षीसाठी समोर ठेवल्या आहेत. त्यांची साक्ष अगदी स्पष्ट आहे की या जगाचा निर्माणकर्ता आणि शासनकर्ता एकच आहे. परंतु मृत्यूनंतर दुसरे जीवन आणि अल्लाहच्या न्यायालयात माणसांची हजेरी लावणे तसेच मोबदला आणि शिक्षेविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या सूचना या सर्वांचे सत्याधिष्ठित असण्याची साक्षसुद्धा त्याच निशाण्या देत आहेत. त्या अप्रत्यक्ष जरी असल्या तरी थोडा विचार केल्यास समजून येतात. म्हणून पहिल्या वास्तविकतेवर सचेत करण्याची आवश्यकता भासली नाही. कारण ऐकणारा केवळ प्रमाणांना एकूनच समजून घेतो की त्यापासून काय सिद्ध होते. म्हणून दुसऱ्या वास्तविकतेवर मुख्य रुपाने सचेत करण्यात आले आहे की आपल्या निर्माणकर्त्यांच्या भेटीचा विश्वास तुम्हाला याच निशाण्यांवर विचार करून होऊ शकतो. वरील निशाण्यामुळे परलोकाचे प्रमाण दोन प्रकारे मिळते. 

एक म्हणजे जेव्हा आम्ही आकाशांची रचना आणि सूर्य व चंद्राच्या नियमबद्धतेवर विचार करतो तेव्हा आपले मन ग्वाही देते की ज्या अल्लाहने हे विशाल नभोमंळल बनविले आहे आणि ज्याच्या  

सामर्थ्याने मोठमोठे ग्रह नभोमंळलात भ्रमण करीत आहेत, त्याच्यासाठी मनुष्याला मृत्यूनंतर दुसऱ्यांदा जन्माला घालणे काहीच कठीण काम नाही. दुसरे म्हणजे याच नभोमंळलातील व्यवस्थेत आम्हाला साक्ष मिळते की याचा निर्माणकर्ता उत्तम तत्त्वदर्शी आहे. त्याच्या तत्त्वदर्शीपणाविरुद्ध आहे की त्याने मनुष्याला बुद्धी, चेतना आणि असा सजीव अधिकारी बनवून, मनुष्याला आपल्या धरतीवरील अगणित वस्तूंचा उपभोग घेण्याची शक्ती देऊन आणि निर्माणकर्ता प्रभु-स्वामीने मनुष्याच्या जीवनव्यवहाराचा हिशेब घेऊ नये आणि अत्याचारींना शिक्षा व सदाचारींना मोबदला देऊ नये? तो तर जरूर मनुष्याला विचारेल की ज्या मूल्यवान वस्तू त्याने मनुष्याच्या स्वाधीन केल्या, त्यांच्याशी त्याने कसा व्यवहार केला? एक आंधळा राजा आपल्या राज्याच्या मामल्यास आपल्या सहकाऱ्यांच्या हवाली करून निश्चिंत होऊ शकतो परंतु एक सर्वज्ञानी आणि तत्त्वदर्शीपासून अशा निष्काळजीपणाची आशा केली जाऊ शकत नाही. अशाप्रकारे आकाशांचे निरीक्षण आम्हाला केवळ परलोकवर विश्वास ठेवायास भाग पाडत नाही तर परलोक असण्यावर विश्वास दृढ करण्यास भाग पाडते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget