जमाअते इस्लामी हिंदने नेहमीच समविचारी लोक, नागरी समाज आणि मानवाधिकार गट, एनजीओ आणि शांतता व जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने न्यायासाठी काम केले आहे. जमात सामाजिक आणि आर्थिक न्याय, समाजातील दुर्बल घटक आणि उपेक्षित लोकांना समानता देण्यासाठी देखील कार्यरत आहे आणि त्यासाठी जमातने विविध संघटना स्थापन केल्या आहेत.
नवी दिल्ली : भारतातील प्रमुख मुस्लिम धार्मिक-सामाजिक संघटना जमात-ए-इस्लामी हिंद आपल्या स्थापनेचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभरात सतत चार महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जमातच्या धार्मिक-सामाजिक योगदानाचा संदेश देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. या संदर्भात रविवारी 11 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लब येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांनी सांगितले की, ’’जमाअतचा संदेश हा एका ईश्वराचे पालन करणे असून त्याच्या शिकवणींवर आधारित मूल्याधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आहे. गेल्या 75 वर्षांपासून जमात हे दोन मुद्दे घेऊन काम करत आहे. या 75 वर्षांत जमातने अनेक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’’ जमातने रविवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात देशातील प्रतिष्ठित नागरिक, विचारवंत, प्राध्यापक, सामाजिक संस्था आणि इतर क्षेत्रातील लोकांना आमंत्रित केले होते. यावेळी गेल्या 75 वर्षात देशासाठी विविध क्षेत्रात जमातने दिलेले योगदानासंबंधी माहिती तपशीलवार सादर केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमात -ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.मोहम्मद सलीम इंजिनियर म्हणाले की, जमात 75 वर्षांपासून मूल्यांच्या आधारे एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. या 75 वर्षात, आम्ही तरुण, सामाजिक संस्थांमधील महिला आणि विविध धर्माच्या लोकांसोबत काम करून मूल्याधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत राहू.’’
सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांनी या 75 वर्षांच्या मुल्यांकन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले की, ’’जमातची मुख्य भूमिका धर्माला सकारात्मक परिमाण देण्याची आहे. धर्म आणि राजकारण हे समाजासाठी घातक आहेत अशी एक संकल्पना कायम आहे. हे सहसा संघर्ष आणि हिंसाचाराचे कारण बनते. आज आपण ज्या समस्या पाहत आहोत ते केवळ धर्माचे शोषण आणि निहित स्वार्थासाठी धर्माचा वापर आणि दुरुपयोग यामुळेच आहेत. जे लोक हे करतात त्यांचा धर्म आणि अध्यात्माशी काहीही संबंध नाही. जमातने धर्माचा सकारात्मक हेतूसाठी वापर करून मूल्याधारित समाज निर्माण केला पाहिजे, जिथे सहिष्णुता आणि इतर समुदायांच्या हक्कांचा आदर केला गेला पाहिजे असा संदेश दिला आहे. मूल्याधारित समाज निर्माण करण्यात धर्म महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. समाजाची जडण-घडण आणि सुधारणा धर्मावर आधारित असावी. न्याय्य समाजासाठी धर्म हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. या संदर्भात जमातने एक उदाहरण ठेवले आहे आणि त्याचा मुख्य संदेश धार्मिक आहे परंतु त्याच वेळी जमातने समुदाया- समुदायातील दरी कमी करण्यात आणि त्यांच्याशी संवाद आणि चर्चेसाठी व्यासपीठ तयार करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. आम्हाला समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे.’’ ते पुढे म्हणाले की, ’’हे केवळ संवाद आणि चर्चेद्वारेच शक्य आहे. आपल्या देशात शांततेसाठी विभिन्न समुदायांमध्ये अधिक चांगले समन्वय स्थापित करून केले जाऊ शकते. जमातकडे एक मॉडेल आहे ज्याद्वारे आपल्या देशाचे प्रश्न आणि समस्या सोडवता येतात. समाजाच्या भल्यासाठी यावर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी जमातची इच्छा आहे. देशात आंतरधर्मीय संवाद आणि चर्चेला चळवळीचे स्वरूप दिले हे जमातचे योगदान आहे. जमातने नेहमीच समविचारी लोक, नागरी समाज आणि मानवाधिकार गट, एनजीओ आणि शांतता व जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने न्यायासाठी काम केले आहे. जमात सामाजिक आणि आर्थिक न्याय, समाजातील दुर्बल घटक आणि उपेक्षित लोकांना समानता देण्यासाठी देखील कार्यरत आहे आणि त्यासाठी जमातने विविध संघटना स्थापन केल्या आहेत. भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध धार्मिक नेत्यांच्या मदतीने धार्मिक जन मोर्चा व्यासपीठ स्थापन केले आहे. जे सतत सद्भावना आणि जातीय सलोख्यासाठी कार्य करत आहे. धार्मिक जनमोर्चा ही चळवळ बनली आहे. आणखी एक मंच, फोरम फॉर डेमोक्रसी अँड कम्युनल अॅमिटी शांतता आणि न्याय, जातीय सलोखा आणि लोकशाही मूल्यांसाठी काम करत आहे.’’
जमातच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात सामाजिक आघाडीवर काम करणाऱ्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी, वंचितांना आवाज देण्यासाठी, शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी, कल्याणकारी कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. या क्षेत्रातील विविध संस्थांच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, ’’जमातने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लोकांसाठी काम केले आहे. या कामासाठी डझनभर संस्था कार्यरत असून देशातील विविध घटकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी अझउठ ची स्थापना करण्यात आली आहे, कथऋ सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे, विद्यार्थी संघटना डखज हा विद्यार्थी आणि तरुणांचा एक मंच आहे आणि 40 वर्षांपासून कॉलेज आणि कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे, ॠखज ही विद्यार्थिनींची संस्था आहे जी सतत तरूण मुलींमध्ये काम करत आहे, जमात संशोधन क्षेत्रातही काम करत आहे आणि अनेक संस्थांसोबत सहकार्य करत आहे. अशा प्रकारे आम्ही चांगल्या भारतासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी सतत प्रयत्नशील आणि काम करत आहोत. जमातच्या संघर्षाची प्रासंगिकता सध्याच्या वातावरणात अनेक पटींनी वाढली आहे. अध्यात्माच्या सहाय्याने शांततामय व न्याय्य समाज घडविण्यासाठी धर्मगुरूंनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. जमात शांतता आणि मूल्यावर आधारित समाज स्थापन करण्यासाठी समाजाच्या पुनर्रचनेसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करते. जमात इस्लामी हिंदचे सहसचिव, जनसंपर्क विभाग, अख्लाख अहमद खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
अनुवाद - एम.आय.शेख
Post a Comment