क्विंट, द प्रिंट, सत्य हिंदी.कॉम, नॅशनल दस्तक, प्रज्ञा का पन्ना, मीडिया टुमारो, न्यूज लाँड्री, अल्ट न्यूज सारखे न्यूज पोर्टल आणि साक्षी जोशी, अजित अंजुम, रविश कुमार, एम.के. सिंग, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून बाजपाई सारखे अनेक लोक जनहिताचे मुद्दे उचलत आहेत.
आज जगामध्ये आपण कोणाला शिकवू शकत नाही. पण विचार करण्यास न्नकीच भाग पाडू शकतो. हे सत्य लक्षात घेऊन उत्तोमत्तम कंटेंट तयार करून त्याची मांडणी आकर्षक पद्धतीने केल्यास भविष्यात नक्कीच फरक पडेल, अशी आशा करण्यासाठी भरपूर वाव आहे.
दुर्दैवाने मागील काही वर्षांपासून संवादाचे वर्तूळ संकीर्ण होत आहे. मतभेदांना आता पूर्वीसारखे स्थान राहिलेले नाही. राष्ट्रीय म्हणविल्या जाणाऱ्या मीडियामध्ये तेच मुद्दे उचलले जात आहेत जे बहुसंख्य समाजाला आकर्षित करतात व सरकारचे ज्याला अनुमोदन प्राप्त आहे. मात्र उद्याच्या भारताच्या जडणघडणीत सहाय्यक ठरतील असे मुद्दे कोणीच उचलत नाही. स्वाभाविकरित्या मग ही जबाबदारी वैकल्पिक मीडियाकडे आलेली आहे. उद्याच्या भारताच्या निर्माणासाठी आज कष्ट करावे लागणार आहेत. त्यासाठी सत्य आणि अहिंसेवर आधारित एका संवेदनशील समाजाची गरज आहे आणि असा समाज निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय मीडिया अजिबात करत नाहीये. नव्हे त्याला या जबाबदारीचे भानसुद्धा नाहीये. ईश्वरकृपेने हे भान वैकल्पिक मीडिया बाळगून आहे. आज क्विंट, द प्रिंट, सत्य हिंदी.कॉम, नॅशनल दस्तक, प्रज्ञा का पन्ना, मीडिया टुमारो, न्यूज लाँड्री, अल्ट न्यूज सारखे न्यूज पोर्टल आणि साक्षी जोशी, अजित अंजुम, रविश कुमार, एम.के. सिंग, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून बाजपाई सारखे अनेक लोक जनहिताचे मुद्दे उचलत आहेत. सरकारला प्रश्न विचारत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा यथाशक्ती विरोध करत आहेत. सरकारच्या चुका दाखवून देण्याचे काम फक्त वैकल्पिक मीडियाकडून होत आहे. ही आपल्या लोकशाहीसाठी घातक बाब आहे. खरे सांगावयाचे झाल्यास लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वैकल्पिक मीडियाने वाचविले आहे. हे उमाकांत लाखेडा (अध्यक्ष प्रेस्नलब ऑफ इंडिया) यांचे म्हणणे संयुक्तिक वाटते. उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’’जब किसी वजह से सियासी कयादत (राजकीय नेतृत्व) नाकाम हो जाती है तो उस मुल्क की सहाफत (मीडिया) को कयादत (नेतृत्व) और सहाफत दोनों का रोल अदा करना पडता है. अर्थात काही कारणाने जर का एखाद्या देशात राजकीय नेतृत्व देशाला योग्य दिशा देण्यात कमी पडत असेल तर मीडियाला आपल्या जबाबदारीसोबत देशाला नेेतृत्व देण्याचे काम देखील करावे लागते.
पत्रकारितेचे क्षेत्र सोपे क्षेत्र नाही. त्यासाठी कायम धोखा पत्करावा लागतो. या क्षेत्राला जरी सत्याचा भक्कम आधार असला तरी असत्याच्या पायावर ज्या समाजाची रचना झालेली असेल त्या समाजात सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणे किती कठीण असते, याचा अनुभव आज देश घेत आहे. आजकाल न्यायाधिशांना सुद्धा हे जमेनासे झाले आहे. तेही तेव्हा, जेव्हा त्यांना पोलीस संरक्षण प्राप्त असते. पत्रकारांना तर संरक्षणाशिवाय, रोजच आपला जीव धोक्यात घालावा लागतो. सांप्रदायिकतेने आज प्रत्येक क्षेत्राचा ताबा घेतला आहे. त्यामुळे देशाच्या भविष्यावर दुरगामी परिणाम करणाऱ्या मुद्दयांपेक्षा उथळ मुद्यांना राष्ट्रीय मुद्दे म्हणून सादर केले जात आहे. जनतेलाही तेच आवडत आहे. उदा. चीनने अरूणाचल सीमेवर पुन्हा आगळीक केली. हा मुद्दा राष्ट्रीय मीडियाला कमी महत्त्वाचा वाटतो. पण दीपिकाने आगामी चित्रपटात कोणत्या रंगाचे अंतरवस्त्र घातले हा मुद्दा मात्र महत्त्वाचा वाटतो. म्हणून जास्त चर्चा याच विषयाची केली जात आहे. भोपाळच्या खासदार व आतंकवादाच्या गुन्ह्यामधील चार्जशिटेड आरोपी प्रज्ञा ठाकूर आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा सारख्या उथळ पण जबाबदार पदावर आसीन लोकांनी जेव्हा दीपिकाच्या अंतरवस्त्राच्या रंगाचा मुद्दा उचलला तेव्हा राष्ट्रीय मीडियाने त्यांच्या वक्तव्याला भरघोस प्रसिद्धी दिली. मात्र हा वैकल्पिक मीडियाच होता ज्याने राजेश खन्ना- मुमताजपासून अक्षयकुमार, खा. नवनीत राणा, स्मृती इरानी, मनोज तिवारी आणि निरूहा पर्यंतच्या भगव्या रंगातील कपड्यातील जुन्या आक्षेपार्ह्निलप्स चालवून चोख प्रत्युत्तर दिले.
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय मीडिया आपल्या एकतर्फी बातम्या देण्याच्या धोरणामुळे स्वतःची प्रतिष्ठा आणि विश्वासर्हता दोन्ही घालवून बसला आहे. याउलट सत्याची कास धरल्या कारणाने वैकल्पिक मीडियाची प्रतिष्ठा आणि विश्वासर्हता दोन्ही कायमच नसून तर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज मेनस्ट्रिम मीडियामध्ये दिल्या गेलेल्या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी लोक वैकल्पिक मीडियाचा आधार घेत आहेत. वंचित, बहुजन आणि अल्पसंख्यांक समुदायातील लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. या समाज घटकांना वैकल्पिक मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे जनतेसमोर मांडण्याची व जनमताला प्रभावित करण्याच्या चालून आलेल्या या संधीचे सोने करण्यासाठी पुढे येण्याची व कष्ट करण्याची गरज आहे.
आता ते दिवस संपले जेव्हा वंचित, बहुजन आणि अल्पसंख्यांकांना राष्ट्रीय मीडियामध्ये डावलले जात होते. आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो लेखक आहे, पत्रकार आहे, उपसंपादक आहे आणि संपादकही आहे. विशेष म्हणजे त्याला आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्काय इज द लिमिट.
जनमताला मोठ्या प्रभावित करण्याची वैकल्पिक मीडिया ही एका प्रकारची ईश्वरीय देणगीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज वंचित, बहुजन आणि अल्पसंख्यांकांना आपली कल्पकता, कार्यक्षमता आणि रचनाशीलता याचे दर्शन घडविण्याची आयती संधी चालून आलेली आहे. याचा लाभ उठविण्याची गरज आहे. या संबंधी आपापल्या समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. मुस्लिम समाजाचा जिथपर्यंत संबंध आहे तिथपर्यंत आपण पाहतो साधारणपणे वैकल्पिक मीडियाचा उपयोग हा समाज वाढदिवसाच्या शुभेच्छा, फालतू शायरी, व्यर्थ फॉरवर्डस्, स्वतःचे विविध अँगलने घेतलेले बटबटीत फोटो आणि उलेमांच्या्निलप्स याच्या पुढे जाताना दिसत नाहीत. फार कमी मुस्लिम लोक आहेत जे वैकल्पिक मीडियाचा प्रभावशाली वापर करतांना दिसून येतात. हे दुर्दैवी चित्र पालटण्यासाठी ज्यांना वैकल्पिक मीडियाच्या महत्त्वाची जाणीव आहे अशा लोकांना अहोरात्र विविध मार्गाने जनमतास प्रभावित करण्यासाठी कष्ट घेण्याची गरज आहे. आज जगामध्ये आपण कोणाला शिकवू शकत नाही. पण विचार करण्यास न्नकीच भाग पाडू शकतो. हे सत्य लक्षात घेऊन उत्तोमत्तम कंटेंट तयार करून त्याची मांडणी आकर्षक पद्धतीने केल्यास भविष्यात नक्कीच फरक पडेल, अशी आशा करण्यासाठी भरपूर वाव आहे.
इंडिया टुमारोद्वारे शिबिराचे आयोजन
याच गोष्टीची जाणीव ठेऊन, ’’कल के भारत के निर्माण में वैकल्पिक मीडिया की भूमिका’’ या विषयावर 18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीच्या कॉन्स्टीट्युशनल्नलबमध्ये एका चर्चासत्राचे आयोजन इंडिया टुमारो न्यूज पोर्टलद्वारे करण्यात आले होते. ज्यात उमाकांत लाखेडा (अध्यक्ष प्रेस्नलब ऑफ इंडिया), प्रा. प्रदीप माथूर आणि एमआयटी जयपूरचे प्रा.सलीम इंजिनियर हे हजर होते.
याप्रसंगी वैकल्पिक मीडियामध्ये महत्त्वाची भूमीका बजावणाऱ्या ज्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला त्यात मूकनायकच्या मीना कोतवाल, वसीम अक्रम त्यागी, मिल्लत टाईम्सचे शम्स तबरेज कास्मी, एशिया टाईम्सचे अश्रफ बस्तवी, स्वतंत्र पत्रकार अभय कुमार, मकतूब मीडिया, दी जनता लाईव्हच्या पूजा पांडेय, छात्र आणि कॅम्पस पत्रिका ’दी कम्पेनियन’ द हिन्दुस्थान गॅझेट, पल-पल न्यूजच्या खुशबू अख्तर - नदीम अख्तर आणि जनमानस राजस्थानचे रहीम खान इत्यादींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडिया टुमारोचे संपादक सय्यद खालीक अहेमद यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन इंडिया टुमारोचे वरिष्ठ पत्रकार अर्शद शेख यांनी केले.
- एम. आय. शेख
Post a Comment