'शोधन' या आपल्या साप्ताहिकाचा 52 वा अंक वाचण्यात आला. त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यावाचून राहवत नव्हते... सुंदर लेखांनी आणि विचारांनी सजलेलं आपलं साप्ताहिक हे प्राध्यापक झाकीर सर यांनी मला पाठवले होते त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे... विविध महत्त्वपूर्ण विषयाला हात घालणारे उत्कृष्ट लेख व मला माझ्या मनाचा पुन्हा एकदा शोध घेण्यास भाग पाडणारे असेच हे साप्ताहिक ठरले...
बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देश संबंधाबद्दल एक महत्त्वाची घटना म्हणजे चीन व सऊदी अरब देशातील नाविन्यपूर्ण मैत्री हा माझ्यासारख्या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यासाठीचा काळजीचा विषय... चीनची जागतिक व्यापारावर अंकुश ठेवण्याची भयंकर भूक व त्यासाठी जमेल तो मार्ग वापरण्याची वृत्ती ही काही अंशी घातक अशी आहे. खरं तर शेजारच्या राष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध ही भारताची खरी गरजच म्हणावी लागेल परंतु त्यात आपण दिवसेंदिवस अपयशी ठरलो आहोत. प्रत्येक राष्ट्राला आपले हितसंबंध जोपासण्याचा हक्क आहे परंतु चीन व अरब देशांच्या या नव्या मैत्रीमुळे भारत खऱ्या अर्थाने जागतिक संबंधांच्या बाबतीत मागे पडला हे सिद्धच होत आहे.
अमेरिकेसारख्या स्वार्थ, अहंकार व दंबयुक्त देशाची खुशामत करण्याच्या नादात भारताने अगोदरच कधीही भरून न येणारे असे आपल्या देशाचे नुकसान करून ठेवले आहे. ज्याची सुरुवात ही भारतीय जनतेला अंधारात ठेवून 95 साली केलेला हा GATT (General Agreement on Tariff and Trade) करार त्यामुळे भारतीय जनता व संसद यांचे निर्णय स्वातंत्र्य ही मोडीत निघत आहेत... GATT कराराबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल पारतंत्र्याचा नवा सापळा, गुलामीच्या नव्या श्रृंखला... बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताची बाजारपेठ उद्योग आणि जंगले, समुद्र इत्यादी संपदा लुटण्याचा मुक्त परवाना देणारा हा करार... सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांच्याच श्रमावर व पैशावर उभी राहिलेली व वाढलेली वीज, विमा, बँक, टेलिफोन अशी सार्वजनिक क्षेत्रीय कवडी मोलाने नफेकोर कंपन्यांना विकून जनतेच्या सुविधा हिरावून घेणारा हा करार... भारतीय उद्योगधंदे बंद पाडणारा लाखो कामगार कर्मचाऱ्यांना बेकार करणारा हा करार... आपली जंगले परक्यांच्या हवाली करून आदिवासींना देशोधडीला लावणारा हा करार... आपले समुद्रकिनारे बळकावून अजस्त्र यांत्रिक बोटीद्वारे मच्छीमारांना उसकावून लावणारा हा करार... भारतीय शेती बड्या कंपन्यांच्या घशात घालून सामान्य शेतकऱ्याला देशात देशोधडीला लावणारा हा करार... नव्या पेटंट कायद्याद्वारे आपल्याच बियाणावरचा हक्क नष्ट करून लुटरुंच्या घशात घालणारा हा करार... नव्या पेटंट कायद्याद्वारे औषधांच्या किमती दहा-वीस पट वाढवून कोट्यावधी गरीब जनतेच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकणारा हा करार...
देशातील महागाईचा डोंगर पाहता आपल्या लक्षात येईल की आपण अशा आंतरराष्ट्रीय करारामुळे आपल्या देशाचे किती नुकसान करून घेतलेले आहे त्यातल्या त्यात चीन व अरब देशातील हे करार म्हणजे पेट्रोलियम पदार्थावर आता अमेरिका रशियाच्या नंतर चीनची पकड आणि भारताचे पेट्रोलियमसंबंधी इतर देशांवरचे परावलंबित्व ज्यामुळे की अनियंत्रित अशी महागाई ही भविष्यात आणखीन गडद झालेली दिसेल...
व्यापार व सांस्कृतिक दृष्टिकोनातून भारत हा अरब राष्ट्रांचा जुना मित्रच. या राष्ट्रांसोबत आपली मैत्री ही व्यापार वृद्धीच्या दृष्टिकोनातून व स्थिर असे संबंध आपण आजघडीला अरब देशांसोबत म्हणावे त्या प्रमाणात ठेवू शकलो नाहीत. त्यातच सध्याचे संकुचित व घातकी मनोवृत्तीचे केंद्र सरकार भारताचे भवितव्य याबद्दल भीती वाटते...
परंतु म्हणतात ना प्रेम, करूना, संस्कृती, मानवता, आत्मा म्हणजेच आपले अध्यात्म व मानव धर्म यांच्या मजबूत पायाने उभा राहिलेला आपला भारत देश अशा बहुअंगी संकटातून मात करत आलेला आहे व आजचे भांडवलदारीचे व तिरसकाराचे आपल्या देशावरचे संकट आपण संपवूत यात शंका नाही.
साप्ताहिकातील अध्यात्मविषयीचे लेख हे खरे आपल्याला ताकद विश्वास देण्यासाठीचे इथेच महत्त्वपूर्ण ठरतात... ज्यामुळे की आपली सामाजिक बांधिलकी मानवता यासाठीचा आपल्या मनावर व बुद्धीवर साचलेला दुबळेपणा हा दूर होऊ शकतो... आत्मा मानसातील दोन शक्तीचा संघर्ष, पैगंबर वाणी (हदीस) वर आलेले साप्ताहिकातील लेख.
वरील दोन्ही लेखांमधील गोष्टही मला स्वतःला परत माझ्यामध्ये डोकावून पाहण्यासाठी आग्रहकारक ठरली. मनामधला संघर्ष हा नेहमी मला प्रत्येक ठिकाणी जाणवलेला आहे ही गोष्ट चांगली ही गोष्ट वाईट आपण चांगली गोष्ट कशी निवडायची व त्यानुसार पुढील पाऊल कसे ठेवायचे नक्कीच आधीच मधील तर्कादारावर आपण ज्या गोष्टी स्वीकारू शकतो ते आपण स्वीकारून पुढे चला व ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटली परंतु तर्काचा आधार काय असला पाहिजे हे आपल्याला आत्मा काय आहे हे समजल्यावरच लक्षात येते की नक्कीच ईश्वराने आपल्या मनामध्ये अशा गोष्टी जन्मताच रुजवून ठेवलेल्या आहेत व आपलं मन की कुठली गोष्ट करायला हवी कुठली गोष्ट नाही त्या मुळे ईश्वराचा अंश म्हणून 'आत्मा' आपण ओळखतो तो नेहमीच आपल्याला योग्य असाच मार्ग दाखवतो आणि अंतर्मनाच्या ह्या युद्धामध्ये आपण योग्य व चांगल्या मार्गाची निवड करतो.. व आपण स्वतःसाठी ज्या गोष्टी मागतो त्याच पद्धतीत इतरांसाठीही आपण प्रार्थना करायला हवी यामुळे की आपोआपच मनातील नकारात्मकता हीसुद्धा कमी व्हायला लागते व आपण एक चांगली मनुष्य म्हणून स्वतःच भविष्य साकारत पुढे जात असतो.
साप्ताहिकेतील इतरही लेख हे खूप महत्त्वाचे वाटले, ज्यामध्ये की सध्या देशातील नवनवे राजकीय पक्ष ज्यांचे की यश अपयशाची वाटचाल चालू होताना आपणास दिसते व भारत जोडो यात्रेसंदर्भातील ही एक लेख बघितला नक्कीच ह्या दोन्ही लेखांमध्ये आपणाला आणखीन तर्कशुद्ध तटस्थपणे बाजू मांडू शकून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेऊ शकतो...
या लेखांची प्रतिक्रिया देत असताना आपल्याशी खूप काही गोष्टीवर चर्चा करावीशी वाटते, परंतु मला यात कुठल्याही शंका नाही की आपली भेट लवकरच होईल. जिथे की मला इतर गोष्टीवर चर्चा करता येईल व आपल्याकडून मार्गदर्शन घेता येईल...
परत एकदा आपले धन्यवाद म्हणून मी परत झाकीर सरांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढे सुंदर लेख असलेले साप्ताहिक मला वाचण्यासाठी दिले... धन्यवाद!
आपला ऋणी,
- गोविंद उत्तमराव गिरी
जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया, परभणी.
9767700940
Post a Comment