Halloween Costume ideas 2015

पावर ऑफ फुटबॉल


हॉलिवूड अभिनेता मॉर्गन फ्रीमनने विश्वचषक उद्घाटन समारंभात फिफा 2022 ब्रँड अम्बेसेडर गनीम अल मुफ्ताह याला विचारले, ’’आज जग आणखीन दुरावलेले आणि विभागलेले वाटत आहे. एकच मार्ग स्वीकारला तर इतके देश, भाषा आणि संस्कृती एकत्र येण्याचा मार्ग काय असू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरात, गनीम अल मुफ्ताह, कुरआनच्या सुराह अल हुजरतच्या आयतीचे पठन करतो, ज्यामध्ये मॉर्गनच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे.’’  ’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. ’’ (कुरआन :49 सुरे अलहुजरात आयत नं. :13)

या आयतीचे पठण केल्यानंतर गनीम म्हणतो, आमचा असा विश्वास आहे की, मानवजात या पृथ्वीवर राष्ट्रे आणि जमातींच्या रूपात विखुरलेली आहे, जेणेकरून आपण एकमेकांकडून भिन्नतेतून शिकावे, स्वतःस समृद्ध करावे आणि एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करावा.


1924 साली उस्मानिया खिलाफतीचे पतन झाल्यापासून जागतिक मुस्लिम समाज नेपत्थ्यात गेला होता व जागतिक नेतृत्व पाश्चिमात्य देशांकडे गेले होते. अशा परिस्थितीत मोठ्या कालावधीनंतर एक मुस्लिम देश 20 नोव्हेंबर 2022 रोजी अचानक प्रकाशझोतात आला. या दिवशी फिफा वर्ल्डकपची सुरूवात कतरमध्ये झाली. सुरूवातीचा सोहळा 5 अब्ज लोकांनी लाईव्ह पाहिला. त्यानिमित्त कतरच नव्हे तर सर्व मुस्लिम देशांमध्ये उत्साहचे वारे वाहिले. 

कतर 

अरब महाद्विपाच्या उत्तर पुर्वेला असलेला कतर हा छोटासा देश. ज्याचे क्षेत्रफळ 11 हजार 437 स्क्वेअर किलोमीटर आहे. या देशाचा मोठा भाग वाळवंटाने व्यापलेला असून, पर्जन्यमान जवळ-जवळ शुन्य (0) एवढे आहे. 30 लाख लोकांच्या या देशात मूळ कतरी नागरिकांची संख्या अवघी 1 लाख 652 हजार 608 एवढी आहे. बाकी सर्व प्रवासी मजूर आहेत. (संदर्भ : जनगणना 2009). 

3 सप्टेंबर 1971 ला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाल्यावर तेल आणि गॅस संपन्न राष्ट्र म्हणून कतर पुढे आला. राष्ट्रप्रमुख शेख तमीम बिल हमाद अलथानी यांच्या नेतृत्वात या देशाने नेत्रदिपक अशी प्रगती केली असून, या देशाची मानवविकास निर्देशांकातील श्रेणी अत्युच्च आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये त्याचा 31 वा क्रमांक आहे. 99 टक्के कतरी नागरिक शहरात राहतात. जगातील 13 टक्के तेलसाठे कतरमध्ये आहेत.

कतरला यजमानपद कसे मिळाले?

फिफाचे 22 कार्यकारी सदस्य आहेत. दर चार वर्षाला होणाऱ्या वर्ल्डकपचे यजमानपद कोणाला द्यावे त्याचा निर्णय हेच सदस्य करतात. 2010 साली या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत दक्षिण कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया व दस्तुरखुद्द अमेरिका यजमानपदाच्या स्पर्धेमध्ये असताना आपल्या व्यवहार कौशल्याच्या बळावर यजमानपद कतरने स्वतःकडे खेचून आणले. पण छोटा आकार आणि कमी लोकसंख्या असल्याकारणाने जगातील सर्वात मोठ्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन कतर करू शकेल काय याबद्दल सर्वच प्रतिस्पर्धी देशांच्या मनात मोठी शंका होती. कतरने मात्र सर्व शंका दूर करत आतापावेतोचे सर्वात महाग व भव्यदिव्य असे आयोजन करून सर्वांना चकित केले. या स्पर्धेसाठी कतरने अलजबून, स्टेडियम 974, खलीफा इंटरनॅशनल, अलबायत, लुसैल, एज्युकेशन सिटी, अहेमदबिन अली आणि अलथुमामामध्ये 8 नवे मोठे स्टेडियमच बांधले नाही तर त्या स्टेडियम भोवती आठ नवीन शहरे वसविली आहेत. यातील दोन स्टेडियमचे स्पर्धेनंतर सुटेभाग करून फिफाला भेट दिले जाणार आहेत. 1930 पासूनच्या फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात झालेल्या एकूण खर्चापेक्षा जास्त म्हणजे 220 बिलियन डॉलर कतरने या स्पर्धेसाठी खर्च केलेले आहेत. 2018 साली रशियामध्ये झालेल्या वर्ल्डकपचे बजेट फक्त 18 बिलियन डॉलर एवढे होते. यावरूनच कतरने या स्पर्धेसाठी किती पैसा ओतला याचा अंदाज येतो. वर्ल्डकपमध्ये प्रवेशाचे निकष अतिशय कठीण आहेत. मुख्य स्पर्धेसाठी चार संघांच्या आठ गटांची म्हणजे एकूण 32 संघांची निवड करण्यात आलेली आहे. फुटबॉलचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या युरोपीयन देशांचा समावेश प्रत्येक गटात दोन देश याप्रमाणे करण्यात आलेला आहे. ब्राझिल, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि अर्जेंटिनाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या स्पर्धेला प्रत्यक्ष पाहण्यासाठी 15 लाखांपेक्षा जास्त लोक आलेले असून, त्यांच्या राहण्यासाठी 60 हजार नवीन इमारती, 50 हजार हॉटेलमधील खोल्या, 9 हजार फॅन व्हिलेजमधील बिछाने, 4 हजार पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजातील ल्नझरी खोल्या, नवीन करकरीत मेट्रो रेल्वेचे जाळे अशी एकंदरित व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय, सऊदी अरब, युएई सारख्या 6 शेजारी देशांमध्ये जेथून रोज जाणेयेणे करता येणे शक्य आहे तेथे प्रेक्षकांना 60 दिवसाचे मोफत विजे देण्यात आलेले आहेत. कतर हा देश शुद्ध इस्लामी परंपरा पाळणारा असल्यामुळे 28 दिवसांच्या क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही आमची इस्लामी मुल्य कदापी सोडणार नाही, अशी घोषणा कतरचे अंतर्गत सुरक्षा मंत्री अब्दुल्ला नजरी यांनी केली असून, स्टेडियममध्ये दारू, बिअर मिळणार नसून, महिलांनाही अंगभर कपडे परिधान करावे लागणार आहेत. समलैंगिकतेवर कतरमध्ये बंदी असल्याकारणाने एलजीबीटी कम्युनिटीला स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असला तरी त्यांना त्यांचे विशिष्ट पेहराव, फलक, ध्वज आणि चाळे करण्यास संपूर्ण मज्जाव करण्यात आलेला आहे. 

स्पर्धेची सुरूवात

या स्पर्धेची सुरूवात दिमाखदार सोहळ्याने झाली असून, त्यासाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून गनीम अल मुफ्ताह या एका अपंग मुलाची कल्पक निवड करून कतरने जगाला डोळे विस्फारण्यास विवश केले आहे. 

हॉलिवूड अभिनेता मॉर्गन फ्रीमनने विश्वचषक उद्घाटन समारंभात फिफा 2022 ब्रँड अम्बेसेडर गनीम अल मुफ्ताह याला विचारले,

’’आज जग आणखीन दुरावलेले आणि विभागलेले वाटत आहे. एकच मार्ग स्वीकारला तर इतके देश, भाषा आणि संस्कृती एकत्र येण्याचा मार्ग काय असू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरात, गनीम अल मुफ्ताह, कुरआनच्या सुराह अल हुजरतच्या आयतीचे पठन करतो, ज्यामध्ये मॉर्गनच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे.’’

’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. ’’ (कुरआन :49 सुरे अलहुजरात आयत नं. :13). या आयतीचे पठण केल्यानंतर गनीम म्हणतो, आमचा असा विश्वास आहे की, मानवजात या पृथ्वीवर राष्ट्रे आणि जमातींच्या रूपात विखुरलेली आहे, जेणेकरून आपण एकमेकांकडून भिन्नतेतून शिकावे, स्वतःस समृद्ध करावे आणि एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करावा.

सजावट 

या स्पर्धेसाठी कतरमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली असून, प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी प्रेषित वचनांचे आकर्षक बिलबोर्ड लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी हॉटेल रूममध्ये बारकोड उपलब्ध करून देण्यात आलेले असून, त्याद्वारे प्रेक्षकांना इस्लामसंबंधी माहिती 24 तास घेता येईल. अनेक मस्जिदीचे मोअज्जन बदलून जगातून सुरेल आवाजात आजान देणारे मोअज्जन बोलावले आहेत. 10 विशेष तंबू, 2000 तज्ञ उलेमा प्रेक्षकांना अनेक भाषेतून इस्लामची माहिती देणार आहेत. इस्लाम संबंधीचे एक प्रदर्शन औकाफ मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेले असून, प्रत्येक स्टेडियमध्ये नमाजची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळेच कतरला टिकेलासुद्धा सामोरे जावे लागत आहे. काही लोक इस्लामचा द्वेष याच कारणासाठी करतात की, इस्लाम खऱ्या नैतिकतेचा, समतेचा प्रचारक आणि अनैतिकता, अत्याचार आणि शोषणाचा विरोधक आहे. याच कारणाने अनेक लोक मुस्लिमांशी घृणा करतात. मुस्लिमांचे खरे म्हणणे त्यांना कडवट लागते. मुळात प्रत्येक देशाच्या संस्कृतीची झलक त्या देशातील प्रत्येक आयोजनावर दिसत असते. त्यामुळे कतर सारख्या इस्लामी देशाच्या मुल्यांची झलक दिसेल असेल तर त्यात नवल काय? 

आदरातिथ्य

कुठल्याही जागतिक स्पर्धेमध्ये होणारी व्यावसायिक फायद्याची गणितं (दारू, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय अश्लील्नलीप्स) बाजूला ठेऊन कतरने प्रत्येकासाठी उच्चप्रतिचे अत्तर, फिफाचे चिन्ह, टी-शर्ट, पाण्याची बाटली व शॉलची पिशवी प्रत्येक प्रेक्षकाला देऊन आदरातिथ्याचे एक नवीन मापदंड प्रस्थापित केलेले आहे. या स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची रक्कम 440 मिलियन डॉलर्स अर्थात 3 हजार 585 कोटी एवढी आहे. 

स्पर्धेची सुरूवात अतिशय रोचक झाली असून, पहिल्याच दिवशी सऊदी अरबच्या कुठल्याच खिजगणतीत नसलेल्या संघाने अर्जेंटिनाच्या बलाढ्य संघाला नमवून स्पर्धेचे वातावरण तापवलेले आहे. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रंगतसुद्धा वाढत जाईल, असे एकंदरित चित्र आहे.  

- एम.आय. शेख 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget