(१०५) पृथ्वी७४ आणि आकाशांत कित्येक संकेत आहेत ज्यावरून हे जात असतात आणि थोडेदेखील लक्ष देत नाहीत.७५
(१०६) यांच्यापैकी बहुतेक अल्लाहला मानतात परंतु अशाप्रकारे की त्याच्याबरोबर ते इतरांना भागीदार ठरवितात.७६
(१०७) हे समाधानी आहेत काय की अल्लाहच्या प्रकोपाचे एखादे संकट यांच्यावर झडप घालणार नाही? अथवा बेसावध असता पुनरुत्थानाची घटका अचानक यांच्यावर येणार नाही?७७
(१०८) तुम्ही यांना स्पष्ट सांगून टाका, ‘‘माझा मार्ग तर हा आहे, मी अल्लाहकडे बोलावितो, मी स्वत: देखील पूर्ण प्रकाशात आपला रस्ता पाहात आहे आणि माझे सोबतीदेखील, आणि अल्लाह पवित्र आहे७८ व अनेकेश्वरवाद्यांशी माझा काहीही संबंध नाही.’’
(१०९) हे पैगंबर (स.)! तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठविले होते, ते सर्वदेखील माणसेच होते, आणि जे याच वस्त्यांच्या निवासितांपैकी होते, आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य प्रकटन पाठवीत राहिलो होतो. मग काय या लोकांनी जमिनीवर संचार केला नाही की त्या लोकांचा शेवट त्यांना दिसला नाही जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत? निश्चितच परलोकाचे घर त्या लोकांसाठी आणखी उत्तम आहे ज्यांनी (पैगंबरांचे म्हणणे मान्य करून) ईशपरायणतेचे वर्तन अंगीकारले. काय आतादेखील तुम्ही समजणार नाही?७९ (पूर्वीच्या पैगंबरांशीसुद्धा हेच होत राहिले आहे की ते दीर्घकाळ उपदेश करीत राहिले आणि लोकांनी ऐकून घेतले नाही)
७३) वरील चेतावनीनंतर ही दुसरी अतिसूक्ष्म चेतावनी आहे. यात िंनदेचा पैलू कमी आणि उपदेशाचा पैलू जास्त प्रमाणात आहे. येथे संबोधन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे परंतु संबोधित अवज्ञाकारींचा समूह आहे. त्यांना सांगितले जात आहे, `हे अल्लाहच्या दासांनो! विचार करा तुमचा हा दुराग्रह किती चुकीचा आहे.' जर पैगंबरांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी प्रचार व प्रसाराचे हे काम केले असते तर तुम्ही सांगू शकला असता की आम्ही या स्वार्थी माणसाचे का म्हणून ऐकावे. परंतु तुम्ही पाहता की हा मनुष्य निस्वार्थ आहे. तुमच्या आणि जगभराच्या भलाईसाठी उपदेश करीत आहे. यात त्याचा काही एक फायदा नाही. अशा स्थितीत त्याचा सामना तुमच्या या दुराग्रहाने करण्यात काय प्राप्त होणार?
७४) आयत १०४ पर्यंत पैगंबर यूसुफ (अ.) यांची ऐतिहासिक घटना समाप्त् होते. अल्लाहचा उद्देश फक्त घटनेचे विवेचन करणेच असता तर याच जागी व्याख्यान संपले असते. परंतु घटनेचे वर्णन येथे एक उद्देश नजरेसमोर ठेवून केले आहे. म्हणून (लोकांच्या मागणीनुसार पैगंबर यूसुफ (अ.) यांची घटना जेव्हा ऐकविली गेली तेव्हा तिला) समाप्त् करताना काही वाक्ये आपल्या उद्देशाचे सांगितले गेले आणि अत्यंत संक्षिप्त्पणे काही वाक्यातच उपदेश आणि आवाहनाचा संपूर्ण विषय समेटून घेतला गेला.
७५) याचा उद्देश लोकांना त्यांच्या गफलतीपासून सावध करणे आहे. जमीन व आकाशातील प्रत्येक वस्तू ती एक वस्तूच नाही तर एक निशाणीसुद्धा आहे जी सत्याकडे संकेत करीत आहे. ज्या उद्देशासाठी मनुष्याला चेतनेसह विचार करणारी शक्ती देण्यात आली, ती केवळ याच सीमेपर्यंतच नाही की मनुष्याने या वस्तूना पाहावे आणि त्यांचा उपयोग आणि वापर कसा करावा याचे ज्ञान घ्यावे; परंतु खरा उद्देश आहे की मनुष्याने सत्याचा शोध करत राहावा आणि या निशाण्यांद्वारा सत्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत राहावे. याचविषयी अनेकजन गफलतीने काम करतात आणि परिणामत: ते मार्गभ्रष्ट होतात. मनावर कुलपे लावली गेली नसती तर पैगंबरांची शिकवण समजून घेणे आणि त्यांच्या मार्गदर्शनापासून लाभ उठविणे लोकांसाठी कठीण बनले नसते.
७६) हा स्वाभाविक परिणाम आहे त्या गफलतीचा ज्याकडे वरील वाक्यात संकेत केला आहे. जेव्हा लोकांनी मार्गातील निशाण्यांकडे डोळेझाक केली तर ते सरळमार्गापासून दूर गेले आणि लोक त्यामुळे जवळपासच्या झुडपांमध्ये फसले गेले. काही तर असे आहेत जे आपल्या ध्येयपथाला पूर्ण विसरून गेले आणि अल्लाह त्यांचा जन्मदाता आणि अन्नदाता आहे, याचे त्यांना भान राहिले नाही. बहुतेक लोक मात्र अल्लाहच्या नाकारण्याच्या मार्गभ्रष्टतेत नव्हे तर अनेकेश्वरत्वाच्या मार्गभ्रष्टतेत पडलेले आहेत. अनेकेश्वरत्वाची मार्गभ्रष्टता कधीही निर्माण झालीच नसती जर जमीन व आकाशातील या निशाण्यांकडे बोधप्रद दृष्टीने पाहिले गेले असते. या निशाण्या प्रत्येक क्षणी व प्रत्येक ठिकाणी या सत्यतेची साक्ष देत आहे की ईश्वर एक आहे.
७७) म्हणजे या ऐहिक जीवनाच्या संधीला दीर्घकाळ समजून आणि वर्तमान शांतीला शाश्वत समजून परिणामाच्या िंचतेला येणाऱ्या वेळेपर्यंत टाळू नका. कोणाकडेही याची काहीच शाश्वती नाही की त्याच्या ऐहिक जीवनाची संधी अमुक काळापर्यंत बाकी राहील. म्हणून काही िंचता करावयाची असेल तर आताच करावी.
७८) म्हणजे त्या गोष्टींपासून पवित्र आहे ज्या त्याच्याशी जोडल्या जात आहेत. त्या कमतरतेपासून पवित्र जे प्रत्येक अनेकेश्वरत्वाच्या मुळाशी जोडली जाते. त्या उणिवांपासून, अपराधांपासून आणि दुष्टव्यांपासून पवित्र जो अनेकेश्वरत्वाचा तार्किक परिणाम आहे.
७९) येथे एका मोठ्या विषयाला दोन-तीन वाक्यांत समेटले गेले आहे. याला विस्तृतपणे वर्णन करावयाचे झाल्यास म्हटले जाऊ शकते, ``हे लोक तुमच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही कारण जो मनुष्य काल त्यांच्या शहरात जन्माला आला आणि त्यांच्याच मध्ये बालपणापासून तरूण आणि तरूण्यापासून वयस्कर झाला, त्याच्याविषयी हे कसे मान्य केले जावे की अचानक अल्लाहने त्याला आपला दूत नियुक्त केला आहे?' यापूर्वीसुद्धा अल्लाहने आपले पैगंबर पाठविले होते आणि ते सर्व मानव होते. हेसुद्धा कधीच घडले नाही की अचानक एक अनोळखी व्यक्ती एखाद्या गावात प्रकट होतो आणि तो लोकांना सांगू लागतो की मला अल्लाहने पैगंबर बनवून पाठविले आहे. परंतु जे कोणी मानव सुधारकार्यासाठी नियुक्त केले गेले ते सर्व त्यांच्याच समाजातील होते आणि त्यांच्याचमध्ये लहानचे मोठे झाले होते. इसा (अ.) मूसा, इब्राहीम, नूह (अ.) हे कोण होते ? आता तुम्हीच पाहा ज्या लोकांनी यांच्या सुधार संदेशाला अमान्य केले आणि आपल्या निराधार कल्पना आणि बेलगाम इच्छांच्या मागे धावत राहिले, त्या लोकांचे काय परिणाम झाले? तुम्ही स्वत: आपल्या व्यापारासाठीच्या प्रवासादरम्यान आद, समुद, मदयन आणि लूतच्या लोकसमुदायाच्या भग्नावशेषा प्रदेशावरून जाता येता. काय त्या भग्नावशेषी प्रदेशाकडे पाहून तुम्हाला काहीच बोध प्राप्त् होत नाही? त्यांनी जगात हा परिणाम भोगला आहे तो परिणाम हाच संदेश देत आहे की परलोकात ते यापेक्षा जास्त वाईट परिणामाला सामोरे जातील. ज्यांनी जगात आपला सुधार करून घेतला, ते केवळ जगातच चांगले राहिले नाही तर परलोकात त्यांचा परिणाम यापेक्षासुद्धा चांगला होईल.
Post a Comment