(११०) इथपावेतो की जेव्हा पैगंबर लोकांपासून निराश झाले आणि लोकांनीदेखील समजून घेतले की त्यांच्याशी खोटे बोलले गेले होते तेव्हा अकस्मात आमची मदत पैगंबरांना पोहचली. मग जेव्हा असला प्रसंग येतो तेव्हा आमचा कायदा असा आहे की ज्याला आम्ही इच्छितो वाचवितो आणि अपराध्यांवरून तर आमचा प्रकोप टाळलाच जाऊ शकत नाही.
(१११) पूर्वीच्या लोकांच्या या सत्य कथांमध्ये बुद्धी व विवेक बाळगणाऱ्यांसाठी धडा आहे. हे जे काही कुरआनमध्ये वर्णिले जात आहे या काही बनावट गोष्टी नाहीत तर जे ग्रंथ याच्यापूर्वी आलेले आहेत, हे त्यांचेच प्रमाणित सत्य आहे, आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील८० आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांकरिता मार्गदर्शन व कृपा आहे.
----------
१३. अर्रअद
अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) अलिफ, लाऽऽम, मीऽऽम, रा. ही ग्रंथाची वचने आहेत आणि जे काही तुमच्या पालनकत्र्याकडून तुम्हांवर अवतरले गेले आहे ते उघड सत्य आहे, पण (तुमच्या लोकांपैकी) बहुतेक लोक मानीत नाहीत.१
(२) तो अल्लाहच आहे ज्याने आकाशांना अशा आधाराविना स्थापित केले जे तुम्हाला दिसत आहे,२ मग तो आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला३
८०) म्हणजे प्रत्येक त्या वस्तूचे विवरण जे मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी आवश्यक आहे. काहींनी प्रत्येक वस्तूंच्या विवरणापासून जगभराच्या वस्तूंचे विवरण असा अर्थ काढला. तेव्हा त्यांना असा भ्रम होतो की कुरआनमध्ये जंगल आणि चिकित्साशास्त्र, हिशोब आणि इतर दुसरे ज्ञान आणि कलाविषयी कोणतेच वर्णन सापडत नाही. काही इतर लोक मुद्दामहून जबरदस्तीने कलाशास्त्राचे वर्णन कुरआनपासून काढू लागतात.
१) ही या सूरहची भूमिका आहे. ज्यात सूरहचा उद्देश काही शब्दांत सांगितला गेला आहे. संबोधन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आहे. आणि पैगंबर मुहम्मद (स) त्यांना संबोधन करून अल्लाह फर्मावितो, ``हे पैगंबर मुहम्मद (स.)! तुमच्या समाजातील अधिकांश लोक या शिकवणीचा स्वीकार करण्यास नकार देत आहेत. परंतु सत्य हेच आहे की या मार्गदर्शनाला आम्ही तुमच्यावर अवतरित केले आहे. लोकांनी यास मान्य करोत अथवा न करोत. या संक्षिप्त् भूमिकेनंतर मूळ भाषण सुरु होते. अवज्ञाकारींना समजावून सांगितले गेले आहे की ही शिकवण सत्य कशी आहे आणि तिच्याशी तुमचा व्यवहार अगदी चुकीचा कसा आहे.
या व्याख्यानाला समजण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) ज्याकडे लोकांना बोलवित होते, ते आवाहन तीन मौलिक तत्त्वांवर आधारित होते, हे समोर ठेवणे आवश्यक आहे.
पहिले तत्त्व, ईशत्व पूर्णत: अल्लाहचे आहे. म्हणून त्याच्याशिवाय कोणी दुसरा उपासनेचा (बंदगी) आणि भक्तीचा अधिकारी नाही.
दुसरे तत्त्व, या जगातील जीवनानंतर दुसरे एक पारलौकिक जीवन आहे, जेथे तुम्हाला तुमच्या कर्मांचा हिशेब द्यावा लागणार आहे.
तिसरे तत्त्व, मी अल्लाहचा पैगंबर आहे आणि मी जे काही प्रस्तुत करीत आहे ते आपल्यातर्फे नव्हे तर अल्लाहकडून प्रस्तुत करीत आहे.
या तीन गोष्टी (एकेश्वरत्व, पैगंबरत्व आणि परलोक जीवन) लोक मान्य करीत नव्हते. या भाषणात याचविषयी लोकांना अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि यांच्याचविषयी लोकांच्या शंकाकुशंकांना आणि खोट्या आरोपांना दूर करण्यात आले आहे.
२) दुसऱ्या शब्दांत आकाशांना न जानवणाऱ्या व न दिसणाऱ्या आधारांवर कायम केले आहे. प्रत्यक्ष रुपात विस्तृत नभेमंडळात अशी वस्तू नाही जी या अगणित नभपिंडाना धरून आहे. परंतु एक न जानवणारी शक्ती आहे जिने प्रत्येकाला आपल्या जागी आणि आपल्या परिक्रमापथावर कायम कार्यरत ठेवले आहे. या विशालकाय पिडांना व ग्रहांना एक दुसऱ्यांवर किंवा पृथ्वीवर पडू देत नाही.
३) याच्या स्पष्टीकरणासाठी पाहा सूरह ७, टीप ४१. संक्षिप्त्पणे येथे हा संकेत पुरेसा आहे की राजसिंहासना (सृष्टी साम्राज्यकेंद्र) वर अल्लाहच्या विराजमान होण्याला ठिकठिकाणी कुरआनमध्ये या उद्देशाने वर्णन करण्यात आले आहे, की अल्लाहने या सृष्टीला केवळ निर्माणच केले नाही तर तो स्वत: या साम्राज्यावर शासन करीत आहे. हे प्रचलित जग आपोआप चालणारा कारखाना नाही जसे अनेक अज्ञानी समजतात आणि सृष्टीचे अनेक ईश्वर नाहीत जसा इतर अनेक अज्ञानी लोकांचा समज आहे. ही एक नियंत्रित व्यवस्था असून एकच अल्लाह तिचे नियंत्रण करत आहे.
Post a Comment