माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे मुस्लिम महिलांनो! एखाद्या शेजारणीने आपल्या शेजारणीला भेटवस्तू दिल्यास ते तुच्छ समजू नये, मग ते एक बकरीचे खूर का असेना!’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
महिलांचा स्वभाव असा असतो की एखादी क्षुल्लक वस्तू आपल्या शेजारणीच्या घरी पाठविणे तिला आवडत नाही. त्यांची इच्छा असते की त्यांच्याकडे एखादी चांगली वस्तू पाठवावी. म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी महिलांना उपदेश केला आहे की लहानात लहान भेटवस्तूदेखील आपल्या शेजारणीकडे पाठवा आणि ज्या महिलांकडे शेजाऱ्यांकडून भेटवस्तू आली आणि ती क्षुल्लक असेल तरीही ती प्रेमाने स्वीकारली पाहिजे. त्यास तुच्छ समजू नये आणि त्यात कसलीही खोट काढू नये.
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझे दो शेजारी आहेत. त्यांच्यापैकी कोणाकडे भेटवस्तू पाठवू?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्या शेजाऱ्याकडे ज्याचा दरवाजा तुमच्या दरवाज्यापासून जवळ असेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
शेजाराचा परीघ आसपासच्या चाळीस घरांपर्यंत आहे आणि त्यांच्यापैकी सर्वात जास्त हक्कदार ते आहेत ज्यांचे घर सर्वांत जवळ असेल.
माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह व पैगंबर (स.) यांनी आपल्यावर प्रेम करावे असे ज्या मनुष्याला वाटत असेल त्याने संभाषण करताना खरे बोलावे, जर त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली असेल तर ती त्या ठेवीच्या मालकाला त्याने सुखरूप परत करावी आणि त्याने आपल्या शेजाऱ्यांशी चांगला व्यवहार करावा.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘अमुक महिला खूपच जास्त ऐच्छिक (नफ्ल) नमाज अदा करते, ऐच्छिक रोजे करते आणि दान देते आणि त्यामुळे ती प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या शेजाऱ्यांना आपल्या वाणीने त्रास देते.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती नरकात जाईल.’’ तो मनुष्य पुन्हा म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अमुक महिलेच्या बाबतीत म्हटले जाते की ती कमी प्रमाणात ऐच्छिक रोजे करते आणि खूपच कमी प्रमाणात ऐच्छिक नमाज अदा करते आणि पनीरचे काही तुकड्यांचे दान (सदका) देते, मात्र आपल्या वाणीने शेजाऱ्यांना त्रास देत नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती स्वर्गात जाईल.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण
पहिली महिला नरकात जाईल कारण तिने अल्लाहच्या दासांच्या अधिकारांचे हनन केले आहे. शेजाऱ्याला त्रास न दिला जावा हा त्याचा हक्क आहे आणि तिने हा हक्क अदा केला नाही आणि जगात तिने आपल्या शेजाऱ्यांची क्षमादेखील मागितली नाही म्हणून तिला नरकातच जावे लागेल.
माननीय उकबा बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या दोन व्यक्तींचा खटला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वप्रथम सादर करण्यात येईल त्या
शेजारी असतील.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण
अंतिम निवाड्याच्या दिवशी (कयामतच्या दिवशी) अल्लाहच्या दासांच्या अधिकारांच्या बाबतीत सर्वप्रथम अल्लाहसमोर दोन व्यक्ती सादर होतील. त्या जगात एकमेकांच्या शेजारी असतील आणि एकाने दुसऱ्याला त्रास दिला आणि अत्याचार केला असेल. या दोघांचा खटला सर्वप्रथम सादर होईल.

Post a Comment