Halloween Costume ideas 2015

सूचनांचे पालन होत नसण्याने लॉकडाऊनमधील मुंबई-पुणे भागात सवलती रद्द - उद्धव ठाकरे

मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉक डाऊन करण्यात आलं आहे. परंतु २० तारखेपासून राज्यातील काही भागात सशर्त सूट देण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगरच्या काही भागात उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली होती.
परंतु सरकारच्या सूचनांच योग्य पालन होत नाही त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाकडून देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी #लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द; लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे-प्रशासनाला निर्देश
२० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही व्यक्त केली होती नाराजी,निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द करण्याचा दिला होता इशारा
लॉकडाऊन संदर्भात शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली. १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर,पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.
ई-कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येणार. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हे मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहणार
#lockdown  बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे
राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंधच राहणार

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget