Halloween Costume ideas 2015

मर्कजच्या घटनेवरून मुस्लिम बोध घेतील का?

Markaz
मर्कजच्या घटनेनंतर बहुतांशी मुस्लिमांची अवस्था भरकटल्यासारखी झाली आहे. भारतातील कोरोनावाढीचे कारण हे फक्त मरकजमधीलच मुस्लिम आणि सोशल मीडियामध्ये मुस्लिम  समाजाच्या संदर्भातील होत जाणाऱ्या विकृत व्हिडिओमुळे तर तो अक्षरश: हवालदिलच झाला आहे. त्यातच राज साहेबांच्या गोळ्या घालण्याच्या विधानामुळे तर आणखीनच संभ्रमात  पडला आहे. त्यातच मुस्लिम समाज सुधारणेसाठी शून्य योगदान असणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तर तब्लीग जमातने संपूर्ण देशाची माफी मागावी असे निवेदन देऊन भारतीय  मुस्लिम समाजाबद्दल किती प्रेम आहे हे अप्रत्यक्ष दाखवून स्वत:च्या स्वार्थाची पोळी मात्र पद्धतशीरपणे भाजून घेतली आहे.
एक मात्र खरे, भारतीय मुस्लिमांनी मरकजची ही घटना योग्य की अयोग्य या फंद्यात न पडता हा क्षण मुस्लिम समाज सुधारणेसाठी मिळालेली एक अनोखी संधी आहे, असे म्हणून  स्वीकारले पाहिजे. खालील काही गोष्टी मरकजच्या बाबतीत प्रामुख्याने स्वीकाराव्या लागतील.
१) ही संघटना कधीही कोणत्याही जातीय दंगलीत अथवा कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक कार्यात सहभागी झालेली नव्हती.
२) संघटनेने आपल्या कार्यप्रणाली व आचारविचार शंभर वर्षांत बदललेले नाहीत.
३) धर्मप्रचार करणे, अनीती व वाममार्गापासून तरुण पिढीला रोखणे, व्यसनाधीन मुस्लिमांचे प्रबोधन करण्यात अग्रेसर ठरली आहे.
४) समाजविघातक कृत्याचा कसलाही आरोप सिद्ध झालेला नाही.
५) जमातीचे कोट्यवधींच्या संख्येने देशविदेशात अनुयायी आहेत.
६) संघटनेने हिंदूविरोधी भूमिका कधीही घेतलेली नाही.
तबलीगने केवळ धर्मप्रचार करण्याबरोबरच असंख्य तरुणांना आपल्या कार्यात आकर्षित केले. मुस्लिमांतील काही मूठभर व्यक्तींना कस्रfचत तबलीगची धोरणे पसंत पडणार नाहीत, परंतु  याचा अर्थ तबलीगवर नाहक देशद्रोहाचा जणू ठपका लावून तिला संपुष्टात आणण्याचे प्रयत्न जर होणार असतील तर ते सर्व मुस्लिम समाजाला एकत्र येऊन सुधारण्यासाठी पावले  उचलावीच लागतील. तबलीग तिच्या धोरणानुसार कस्रfचत बरोबर असेल. अर्धा भरलेला ग्लास तो कसा निर्देश करतो हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून आहे. तो अर्धा भरलेला आहे  की रिकामा हे ज्याचे त्याने ठरवावे.
तबलीगला कोरोनाच्या या घटनेमुळे बोटांवर मोजण्याइतक्या मुस्लिमेतर लोकांना क्षणांत प्रसारमाध्यमांनी प्रकाशझोतात आणून त्यांच्या १०० वर्षांचे श्रेय अब्जावधी लोकांच्या समोर  आणले. कोरोनाचे थैमान आज ना उद्या जरूर थांबेल, परंतु आता तबलीग जमात असो की इतर मुस्लिम संघटना सर्वांनीच एका प्लॅटफॉर्मवर येऊन नव्या उद्दिष्टांसाठी आखणी करावी.  सद्यस्थितीचा सामना करण्यासाठी नव्या विचारसरणीच्या जडणघडणीची पायाभरणी करावीच लागेल.

प्रत्येक मुस्लिमाने काय करावे?
इस्लामच्या तत्त्वांनुसारच जीवनात आचरण करावे. प्रत्येकाने किमान पाच मुस्लिमेतर व्यक्तींशी सौहार्दपणे मैत्री करावी. ‘जकात’ स्वरूपात मिळणाऱ्या दानातून प्रत्येक राज्यात किमान  एक सुपरस्पेशालिटी अद्ययावत दर्जाचे किमान ५०० खाटांचे हॉस्पिटल बांधण्यात यावे. त्यात गरीब व निराधारांबरोबरच सर्व जातीधर्मांच्या रुग्णांना सेवा देण्यात यावी. या वर्षी प्रत्येक  मुस्लिम कुटुंबाने विशेष योगदान दिल्यास संपूर्ण भारतातून १३ हजार कोटी जमा होतील. (फक्त १०० रु. दरमहा) हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल क्षेत्रातील  व्यक्तींना रोजगार मिळून सेवा करण्याची संधी मिळेल. ‘कोरोना’सारख्या रोगांच्या चाचणीसाठी विसंबून न राहाता संशोधन, चाचण्या सहजरित्या काळजीपूर्वक आणि विश्वासार्हतेने घेता  येतील. तसेच संपूर्ण देशभरातून दहा व्हेंटिलेटर्स, आयसोलेशन कक्ष बनविता येईल. तसेच निवृत्त मुस्लिम व्यक्तींकडून दर महिना बैठक घेऊन आराखडा तयार करता येऊ शकेल.
‘कोरोना’च्या या घटनेने जगभरातील सर्व धार्मिक स्थळे इतिहासात प्रथमच बंदिस्त झाली. खुली होतील ती दवाखाने. या गोष्टीचा बोध घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून मुस्लिम समाजाने बोध घेऊन हॉस्पिटल बांधण्यासाठी जोपर्यंत आम्ही झोळ्या फिरवणार नाही तोपर्यंत आमचा समाज हा स्थानिक प्रशासनावर विसंबून राहाणार नाही. अन्यथा सध्या होत  असलेला त्रास सहन करावाच लागेल, हे विसरून चालणार नाही. हॉस्पिटलनंतर आपणास इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतरही प्रसारमाध्यमांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यासाठी विशिष्ट  मनुष्यबळ तयार करावे लागेल. ‘शोधन’सारख्या बोटावर मोजण्याइतक्या नियतकालिकांच्या वाचक संख्येत शंभर पटीने वाढ होऊन तो इतर समाजबांधवांना वाचण्यासाठी कसा पॉप्युलर  होईल हे पाहाणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात समाजसुधारणेसाठी विविध मुस्लिम जमातींनी पुढाकार घेऊन महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देऊन मैदानात उतरावे लागेल. अन्यथा आज तबलीगची दुर्दैशा केली गेली तशी  इतरही मुस्लिम संघटनांची होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे लागेल.

- असलम जमादार
मो.: ९२२५६५६७६६

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget