लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वात महत्वाचे आणि पुण्य काम हे आहे कि, परेशान लोकांची देखरेख करणे आणि त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे : रिजवान-उर-रहमान खान, अध्यक्ष
मुंबई (नाजीम खान)
देश आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन ला दोन आठवड्या पेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या कालावधीत गरीब आणि सर्वसामान्य जनतेला पुष्कळ समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या समस्या पाहून, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र ने आपले सदस्य आणि कार्यकर्ते यांना अल्लाह च्या भक्तांची सेवा करण्यासाठी एकजूट होण्यास सांगून मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार 1 कोटी 34 लाखांचे अन्नधान्य गरवंतांपर्यंत पोहोचविण्यात आले. लॉकडाऊन संपेपर्यंत हे कार्य सुरूच राहील, असेही प्रदेशाध्यक्ष रिजवान उर रहमान खान म्हणाले.
जमाअत च्या सदस्यांनी या कठिन कालावधीत संसाधनची कमी असूनही, 22 ते 31 मार्च च्या कालावधीमध्ये वंचित लोकांना 1 करोड़ 34 लाखां पेक्षा जास्त रुपयांची मदद केली. यामधे खाद्य पदार्थ , तयार खाद्य पदार्थ आणि नगदी रकमेचाही समाावेश आहे. हे स्पष्ट आहे कि, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र ने आपल्या सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने 20,900 पेक्षा जास्त परिवारांमध्ये 1 करोड 13 लाख 14 हजार 635 रुपयांचे राशन पोहचविले आणि 14 लाख 21 हजार 950 रुपयांचे भोजन पॅक, 48400 लोकां पर्यन्त वितरित केले. 5 लाख रुपयांचे औषध आणि नगद सुध्दा रक्कम वितरित करण्यात आली.
या राहत कार्याला जमाअत च्या सदस्यांद्वारे सुरू ठेवण्यात आले आहे आणि जमाअत ने याला तोपर्यन्त सुरू ठेवण्याचा निश्चय केला आहे जोपर्यंत लॉक डाऊन संपणार नाही.
जमाअत चे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहमान खान यांनी सांगितले कि, जमात-ए-इस्लामी एकटी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मदत करण्याचे कार्य करू शकत नाही, म्हणुन इतर संगठन आणि लोकांना मदत कार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करीत आहे. हे पाहून आनंद होत आहे कि, समाजातील एक मोठा भाग संकटग्रस्त लोकांची सेवा करण्यात लागला आहे.
राज्याध्यक्ष यांनी कोरोना विषाणूपासून परेशान आणि पीड़ित लोकांच्या संकटावर अत्यंत दुःख व्यक्त करीत सांगितले कि, आम्हाला आशा आहे आपण लवकरच या कठीण परिस्थितीमधून बाहेर निघू आणि सामान्य स्थितीमध्ये परत येऊ. रिजवान-उर-रहमान खान पुढे म्हणाले, आमच्यासाठी हि वेळ आहे कि आम्ही आपल्या पालनकर्त्याकडे वळू आणि आपले कार्य आणि अंमलातून जबाबदारीची जाणीव आपल्या मध्ये निर्माण करून स्वतःमध्ये नैतिक परिवर्तन करत चांगल्या कामात शक्य तेवढी मदत करू.
मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव , बुलढाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड़,नागपूर, यवतमाळ ,अकोला आणि कोल्हापुर जिल्हयात आणि त्यांच्या तालुक्यासहित संपूर्ण महाराष्ट्र मधे जमात-ए-इस्लामी महाराष्ट्र चे सदस्य आणि कार्यकर्ता हे व्यक्तिगत आवडीने आणि गरजू लोकांना जेवण, राशन, औषधी आणि नगदी रक्कम वितरित करत आहेत, जे एक कौतूक करण्यासारखे आहे.
Post a Comment