Halloween Costume ideas 2015

दोषी कोणः मर्कज का दिल्ली प्रशासन?

दिल्लीच्या निजामुद्दीन भागामध्ये असलेल्या तब्लीगी जमाअतच्या मर्कज (केंद्रा) मध्ये अकडून पडलेले काही लोक कारोनाबाधित असल्याच्या बातम्या 30 आणि 31 मार्च रोजी मीडियामध्ये झळकू लागल्या. त्यामुळे देशात एकच गहजब उडाला. मीडियाने असे वार्तांकन केले जणू कोरोना व्हायरस मुसलमान असून, देशात कोरोना फैलावण्यामध्ये त्याची आणि मर्कजची युती होती. या संदर्भात एकांगी वार्तांकन करण्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये केरळाचे राज्यपाल आरीफ मुहम्मद खान आणि कॅनडियन नागरिक तारीक फतेह यांनी तबलिगी जमाअतवर भरपूर तोंडसुख घेतले. अशा परिस्थितीत सत्य काय आहे? हे वाचकांसमोर मांडणे आवश्यक असल्याने हा लेखन प्रपंच.
    दिल्लीच्या जवळच असलेल्या नोएडामध्ये ’सीज फायर इंडस्ट्री’ नावाची एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये 17 मार्च रोजी ब्रिटनहून एक ऑडिटर आला होता जो की कोरोनाग्रस्त होता आणि त्याच्यामुळे या कंपनीतील 24 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. मुळात नोएडामध्ये कोरोना फैलावलाच या कंपनीमुळे, जिला की नंतर सील करण्यात आले.(उर्वरित पान 2 वर)
मात्र नोएडामध्ये कोरोना फैलावण्यासाठी कोणीही या कंपनीला दोषी ठरवत नाही. त्याविरूद्ध मोहीमही उघडली जात नाही. मात्र त्याचवेळेस मर्कजलाच दोषी ठरविण्यामध्ये दिल्लीचे उपराज्यपाल, मुख्यमंत्री केजरीवाल पासून ते मीडियापर्यंत सर्वांचे एकमत असल्याचे दिसून आले.
    या संदर्भात थोडेशे तथ्य धुंडाळले तर खालीलप्रमाणे स्थिती उत्पन्न होते.
1) 13 मार्च रोजी देशाच्या स्वास्थ मंत्रालयाकडून सल्ला देण्यात आला की, कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही.
2)  13 ते 15 मार्चच्या दरम्यान मर्कजमध्ये 1500 लोक उपस्थित होते जी की सामान्य गोष्ट आहे. कारण मर्कज हे तबलिगी जमाअतचे अंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. या जमाअतचे काम जवळ-जवळ 150 देशांमध्ये चालते. या देशातून जमाअती जेव्हा भारतात येेतात तेव्हा मर्कजमध्येच त्यांची नोंद होते. हे जे लोक येतात ते सर्व आपापल्या देशाच्या पासपोर्ट व भारताच्या विजावर येतात. शिवाय देशाच्या प्रत्येक राज्यातून या ठिकाणी लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे त्या ठिकाणी 1500 किंवा 2000 लोक एकाच वेळेस उपस्थित होते. ही काही नवलाची गोष्ट नव्हती. बरे ! त्या तारखेत देशात फक्त तबलिगी मर्कजच असे होते की जेथे गर्दी होती, अशीही गोष्ट नाही. सत्य खालीलप्रमाणे आहे -
3)13 मार्च पर्यंत अंतरराष्ट्रीय विमान सेवा चालू होती व या तारखेपर्यंत अनेक विदेशी भारतात आलेले होते. 13 तारखेला केंद्र सरकारने विजा बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे मर्कजमध्ये विदेशी लोक ’लपून’ बसले होते. हा मीडियाचा शाब्दिक व्याभिचार होता.
4) 14 मार्चला देशात अनेक ठिकाणी गोमुत्र पार्ट्या झाल्या.
5) 19 मार्च रोजी दिल्लीमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या. याचाच अर्थ 18 मार्च पर्यंत लाखो विद्यार्थी दिल्लीच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये एकत्र येत होते.
6) 16 मार्चपर्यंत सिद्धीविनायक मंदीर सुरू होते.
7) 16 मार्च पर्यंतच उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदीरही सुरू होते.
8) 17 मार्च पर्यंत शिर्डीचे साईबाबा मंदीर सुरू होते.
9) 17 मार्च पर्यंत शनी शिंगणापूर मंदीरही सुरू होते.
10) 18 मार्चपर्यंत वैष्णोदेवी मंदीर सुरू होते.
11) 20 मार्च पर्यंत काशी विश्‍वनाथ मंदीर सुरू होते.
12) 19 मार्च रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा, ”सोशल डिस्टंसिंग’चे आवाहन केले.
13) 22 मार्च रोजी जनता कर्फ्युमध्ये संध्याकाळी 5 वाजता हजारो लोक थाळी आणि चमचे वाजवत समुहासमुहाने रस्त्यावर उतरून जल्लोष करीत होते.
14) 23 मार्चपर्यंत संसदेचे सत्र सुरू होते. ज्यामध्ये दुष्यंतसिंह सामील होते जे की, कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या पार्टीमध्ये सामील होऊन संसदेत आले होते.
15) 23 मार्चलाच मध्यप्रदेशमध्ये शिवरासिंह चौहान यांचा शपथविधी झाला. या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सामिल होे आणि एकमेकांना आलिंगन देऊन आनंद व्यक्त करत होते.
16) 24 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजता कुठलीही पूर्वसूचना न देता 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आणि येथूनच सर्व परिस्थिती बदलली.
17) तरीसुद्धा 25 मार्च रोजी लॉकडाऊनची परवा न करता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत जाऊन राम मूर्तींची पूजा करून त्यांना मंदिरात हलविले. या प्रसंगीही बरेच लोक त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले होते.
18) अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे विमान, बस, रेल्वेसह खाजगी वाहतूक बंद पडल्याने ज्याप्रमाणे असहाय्य लोक दिल्ली आणि देशाच्या उर्वरित भागातून आपापल्या घराकडे पायी निघाले. तसे तरी मर्कजमध्ये राहणार्‍यांनी केले नाही. सरकारने ’जेथे आहात तेथेच रहा’ असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे लोक मर्कजमध्येच राहिले. त्यांनी कुठलाही कायदा भंग केला नाही. उलट सरकारचे आदेश शब्दशः पाळले. तरी परंतु, त्यांनाच दोषी ठरविण्यात आले.
19) मर्कजमध्ये जे विदेशी येतात त्यांची अगोदर ओळख पटविली जाते आणि एक भींत आड असलेल्या पोलीस स्टेशन निजामुद्दीन मध्ये त्यांच्या आगमनाची कायदेशीर सूचना दिली जाते. हा गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला प्रघात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे विदेशी आले होते ते विमानाने आले होते. त्यांना जर कोरोनाचा संसर्गत होता तर याचा दूसरा अर्थ असा की विमानतळावर त्यांची योग्य वैद्यकीय तपासणी झालेली नाही. याला कोण जबाबदार होते याबद्दल कोणीच काहीच बोलत नाही. सगळे गप्प आहेत. मुळात तज्ज्ञांचं असं मत आहे की भारतात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या कमी यासाठी वाटते की, जगाच्या इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोना वायरसची तपासणी कमी होते. प्रत्येक 10 लाख लोकांमध्ये फक्त 18 लोकांच्या तपासण्या झाल्याचे एका पाहणीमध्ये आढळून आले आहे.
    अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे जी असहाय्यता पायी गावाकडे जाणार्‍या लोकांची होती तीच असहाय्यता मर्कजमध्ये अडकलेल्या लोकांची हाती. ते काही तेथे पार्टी करत नव्हते. एवढे असूनही मर्कज हे स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात होते आणि मर्कजमधील लोकाना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी मागून बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती करीत होते. मर्कज आणि प्रशसनाध्ये झालेला पत्रव्यवहार हा सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध आहे. एवढे सर्व सत्य वाचकांसमोर ठेऊन मी वाचकांच्याच सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करतो की त्यांनीच ठरवावा की चूक कोणाची आहे.
    आता तर ह्यात एफआयआर दाखल झालेला असून, निर्णय कोर्टात होईल. मीडियामधील काही लोक वेड्यासारखे वागत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकारने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे हेच खरे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget