पालघर येथे घडलेली मॉब लिंचिंगची घटना खुप क्लेशदायक आहे. मुळात लिंचिंग हे कृत्य घोर निंदनिय व अमानवीय आहे. पालघर येथील घटनेचा विडियो प्रसार माध्यमात पाहिल्या नतंर लोकांनी किती निर्दयतेने क्रुरपणे त्यांची हत्या केली हे स्पष्ट होते. जरी संबधितांनी लॉकडाउनचे नियम तोडले असतील तरी, कांही तरी खोटी अफवा पसरवून त्यांना ठार मारण्याचा अधिकार लोकांना कोणी दिला? हेच कळत नाही. आपल्या देशात कोर्ट आहे व दोष सिद्ध झाल्यास शिक्षा देण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे तरी परंतु लोक स्वतः शिक्षा का देत आहेत ? मग का आता आपल्याला न्यायालयाची आवश्यकता राहिलेली नाही का?
अलीकडे आपल्या देशात मॉबलिंचिंगच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अखलाक, पहेलु खान, तबरेज वगैरे अशा अनेक लोकांना ठेचून मारण्यात आले. त्यावेळेस अनेकांचे रक्त सळसळले नाही व ते मूकदर्शक बनले. त्यामुळेच अशी प्रवृत्ती देशात वेगाने फोफ़ावलीय व पुन्हा परवा लिंचिंग सारखी घटना घडून निरपराध साधु संताचा बळी गेला, आता कांहीही केले तर कोणीही त्यांचे जीव त्यांना परतावू शकणार नाही हे ही तेवढेच वास्तव.
गाड़ी अडविन्यात आली, त्यावर शंभर पेक्षा जास्त सैतानानी दगड़ाने व काठयाने हल्ला केला, विचार करा त्यावेळेस त्या साधूंच्या मनात किती भीती व दहशत निर्माण झाली असेल स्वतः चा जीव वाचविण्यासाठी किती गया-वया केला असेल परंतु त्या हल्ला करणार्या दहशतवाद्यांच्या मनात थोड़ीही दया आली नाही. या ठिकानी मी मुद्दाम दहशतवादी हा शब्द वापरला आहे तो कोणाची कथित भावना दुखाविण्यासाठी नव्हे तर त्या हल्लेखोंरानी घटनेच्या वेळेस त्या निरपराध साधु संताच्या मनात जी भीती व दहशत
निर्माण केली -(उर्वरित पान 7 वर)
होती ते दहशतवादी कृत्यच आहे. निर्भया प्रकरणातील दोषी हे सुद्धा एक प्रकारे दहशतवादीच होते. कारण त्यानी बलात्कार करून हत्या केली होती व तमाम माता, भगिनींच्या मनात स्वतः च्या सुरक्षेसंबंधी दहशत निर्माण केली होती.
या आधुनिक युगात लिंचिंग सारखे प्रकार आपल्या देशासाठी कलंक आहेत, आपण सहिष्णु आहोत म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतो परंतु संयम व सहिष्णुता प्रत्यक्षात वागण्यात दिसून आली पाहिजे. अजमल कसाब सारख्या खूंखार आतंकवाद्याला व निर्भयाच्या दोषीनाही कोर्टाचे सर्व पर्याय उपलब्ध करून देवूनच फासावर लटकविण्यात आले आहे, याही गोष्टीचा विचार लिंचींगवाद्यांनी करायला पाहिजे व कोर्ट व कायद्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. लिंचिंगवादी व त्यांना पाठिंबा देणार्यांची संख्या खूप वाढलेली आहे, आतंकवादी बगदादी व हे लिंचिंगवादी यांच्या वागन्यात समानता आहे. कारण बगदादी हा हैवान आहे व तो लोकांना ठार मारण्यात विश्वास ठेवतो तर लिंचिंगवादी सुध्दा लोकांना ठारच मारत आहेत. आता वेळ आली आहे की अशी प्रवृत्ती थांबविन्याची. याप्रकरणी शंभरपेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात काही अल्पवयीन ही आहेत, बघा काय भवितव्य घडवित आहोत आपण पुढील पिढीचा; विचार करण्याची व पावले उचलण्याची हीच वेळ आहे. मला त्या हल्लेखोराना विचारायचे आहे एवढी निर्दयता आणली कुठून, काय मिळाले तुम्हाला लिंचिंग करून? शेवटी कलम 302 चे आरोपी होण्याशिवाय काय मिळाले तुम्हाला?
या घटनेच्या वेळेस ज्या-ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्या विरुद्ध ही शासनाने कठोर कार्यवाही करायला हवी. दिल्लीमध्ये पोलिसांच्या समोरच गुंडांद्वारे आंदोलनकारी व विद्यार्थ्यांवर गोळीबार होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेते त्या पोलिसांवर कार्यवाही झाल्याचे ऐकिवात नाही, परंतु हे महाराष्ट्र आहे व शिवरायांचा, फुलेंचा व बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, व सरकारही खंबीर आहे, ते संबधितावर कार्यवाही करतीलच ही अपेक्षा.
- अॅड. शाहनवाज पटेल, औसा
मो. 9423349156
Post a Comment