मुंबई
संपूर्ण देश सध्या कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. दरम्यान, आपल्याकडे आता कोरोनाबाधितांचा आकडा जरी मोठ्या प्रमाणात वाढत असला तरीही आपल्या देशासाठी तसेच राज्यासाठी देखील एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या आज (२१ एप्रिल) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या १४ दिवसांमध्ये देशातील तब्बल २३ राज्यांतील ६१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. यात महाराष्ट्रासाठी विशेष बाब अशी की, या एकूण ६१ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांचा समावेश होतो.
राज्यातील लातूरसह उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या ४ जिल्ह्यांमध्ये तब्बल गेल्या १४ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. निश्चितच देशासह राज्यासाठी ही एक सकारात्मक बाब आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या काळात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक दक्ष झाल्यानंतर गेल्या १४ दिवसांत या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्यामुळे या जिल्ह्यांना निश्चितच फायदा झाला आहे.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा आता १८ हजारांच्याही पुढे गेला आहे. तर आत्तापर्यंत ३२५२ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाले आहेत. रोज रुग्णालयातून रुग्ण बरे होऊन घरी जाताना दिसत आहेतच. मात्र, सोमवारी (२० एप्रिल) एकूण ७०५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आत्तपर्यंत एकाच दिवशी इतके रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामूळे जरी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी मोठ्या संख्येने लोक बरे होऊन आपल्या घरी जात असल्याचे मोठे समाधानही व्यक्त केले जात आहे.

Post a Comment