Halloween Costume ideas 2015

मुसलमानांना गंभीर चेतावनी; ऐकाल तर बरे होईल !

राज ठाकरे साहेबांची मुलाखत पाहिली! आपणही पाहिली असेलच! बहुतांशी नेहमी प्रमाणे होती...! एक मीडिया ट्रायल मुसलमानांच्या विरोधात पद्धतशिर एनआरसी, सीएए विरोधी  भूमिका घेऊन संविधानिक पद्धतीने आंदोलनात उतरलेल्या मुस्लिमांच्या आणि त्यांना सहकार्य करणारे, त्यांच्यासह आंदोलनात असणारे हिन्दू, सिख, बौद्ध, ईसाई आणि ओबीसी- आदिवासी यांच्या विरूद्ध देखील सतत चालविली गेली! जे एन यू , जामिया मिलिया ते शाहीनबाμग असा तो आवाका होता...आणि मध्येच चीन मधून कोरोना आला आणि कोरोना  विरुद्ध वातावरण निर्माण करणे चालू झाले, त्याची गरजही होती! मात्र कोरोणाच्या सोशल डिस्टंसिंग आणि कलम 144 ते जमावबंदी पूर्वी एकवटलेली सर्व धर्मीय गर्दी हटली!
एनआरसी, सिएए विरुद्ध एकवटलेला संपूर्ण हिन्दू- मुस्लिम-सिख-ईसाई-ओबीसी-आदिवासी समाज हा इथल्या वर्णवादी, मनुवादी व्यवस्थेला नकोच होता, आणि हे आंदोलन फक्त कोरोना  आल्यामुळे संपले, पण अनेक हिन्दू-मुस्लिम-बौद्ध आणि अन्य मान्यवरांनी, आंदोलक, संस्था यानी जाहिर करून टाकले की हे आंदोलन फक्त कोरोनासाठी थांबविण्यात येत आहे, मात्र हे  सर्व थांबल्यावर पुन्हा एनआरसी, सीएए, एनपीआर विरुद्ध आंदोलन चालू करण्यात येईल आणि दिल्लीला ही घोषणा योगेंद्र यादव, तीस्ता सीतलवाड़ सारख्या अनेक मान्यवरांनी केली. हे  स्पष्ट आहे की याची सर्वात मोठी एनर्जेटिक शक्ति मुस्लिम समाज होता, ज्यास सर्व धोके कळल्यावर सर्व समाजाने साथ दिली होती ! ही सामाजिक एकी स्वातंत्र्यानंतरच्या 70  वर्षातील महत्वाची राष्ट्रीय घटना आहे! याची नोंद मनुवादी, वर्णवादी शक्तिनी घेतली होती! आणि हे कसे मोडून काढ़ायचे याची खलबते केली गेली नसतील हे न समझने बालिशपणाचे होईल!
30 जानेवारीला भारतात कोरोणाचा पहिला रुग्ण आढळला आणि स्पष्ट झाले की भारतात या संक्रमण विषाणुचे आगमन झाले आहे. मात्र फेबु्रवारित ट्रम्पच्या उत्सवात 1 लक्ष लोक  दिल्लीत गोळा झाले. इथे कोणतीही वैद्यकीय तपासणी नव्हती आणि विदेशातुन हजारो लोक या उत्सवात आले होते. यात संक्रमित असलेले होते ही शक्यता नकारता येत नाही. मार्च  मधे कोरोणाचा प्रताप जानवायला लागला आणि 23 ला जनता कर्फ्यू आणि 25 ला संपूर्ण लॉकडाऊन, कर्फ्यू जाहिर झाला. अचानक यामुळे काय गोंधळ उडाला, काय भयानक अवस्था  झाली, हे सर्व बऱ्याच लोकांकरवी लिहून, सांगून झाले आहे!
पुढे 25 च्या लॉकडाऊन मुळे अड़कलेले आणि लपलेले अशी मनुवादी मीडियाने विभागणी सुरु केली. लपलेले मशिदित, मर्कज मधे होते आणि अड़कलेले मंदिर आणि इतर ठिकाणी  होते. लपलेले सर्व मुस्लिम होते आणि अडकलेले सर्व हिन्दू होते! लपलेले मुस्लिम कोरोना पसरवणारे देशविघातक होते, मात्र अडकलेले बेचारे हिन्दू होते, ही मांडणी मीडियाने सुरु  केली! ही खेळी भारतीय समाजाच्या पहिल्यांदा धर्माच्या पलीकडे राष्ट्रीय समस्या म्हणून मुद्दे (एनआरसी/सीएए) समजून एकत्र येण्याच्या एकतेला तोडून धर्माधारित ध्रुवीकरणासाठी  पद्धतशीर वापरण्यात आली आणि त्याचे भयानक परिणाम सुद्धा (पण मणुवाद्याना हवे असलेले) दिसून यायला लागलेत. दिल्लीतिल तबलीग जमातीच्या मर्कजमधे 25 च्या लॉक  डॉउनमुळे अडकलेल्या मुस्लिमांचा ज्या पद्धतीने मुस्लिम कोरोना म्हणून प्रचार केला गेला, तो एनआरसी/ सिएए निमित्य एकत्र आलेल्या सर्वधर्मीय समाजाची एकता तोडून टाकण्याचाच  एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता. कारण कधी नव्हे एवढा भावनीक, सामाजिक आणि वैचारिक दृष्टया मुस्लिम समाज हिन्दू, बौद्ध, ओबीसी, दलित आणि इतर समाजासोबत आलेला  होता. त्याच काळात आलेल्या शिवजयंतीचा कार्यक्रम ऐतिहासिकपणे मुस्लिमानी साजरी केली आणि डॉ. आंबेडकर, म. फुले, म. गांधी, शाहू महाराज या सर्वांना आपला सामाजिक- वैचारिक नेता म्हणू लागला होता...! हे सर्व मर्कज प्रकरणाने मनुवाद्यानी पद्धतशिरपणे मोडून काढण्याचे प्रयत्न केले आहेत. यात मूर्ख, अशिक्षित आणि झापडबंद मुसलमानांनी  आपल्या हरकतिने सुद्धा हातभार लावलाच. आणि अश्याच हिंदुनी सुद्धा!!
आता महत्वाचा मुद्दा म्हणजे नुकतीच राज ठाकरे साहेबांची मुलाखत! या मुलाखतीत आधिच अनेक लोकांनी या लॉकडाऊन, कर्फ्यूमुळे बंद झालेले उद्योगधंदे (तसे हे नोटबंदी नंतरच  बुडित निघायला सुरु झाले होते, आता खापर...), त्यामुळे वाढणारी बेरोजगारी, कमी होणाऱ्या नोकऱ्या, बंद होणारे कार्यालय आणि उद्भवणाऱ्या भयानक परिस्थितीवर आपले विचार  व्यक्त केलेले आहेत! मात्र राज ठाकरे साहेबांनी याला कारण फक्त कोरोना असेल... आणि हे पसरविणारे मर्कज सारखे मुसलमान जबाबदार असतील आणि त्यानां झोडून काढ़ा... वगैरे  वक्तव्य गंभीरपने लक्षात घेणे गरजेचे आहेच!
आता कृपया मुसलमानांनी गंभीरता ओळखावी. ज्या भयानक स्तिथिला कोरोना लॉकडाऊनमुळे देश समोर जाणार आहे, त्याचा कालावधी निश्चित नाही. मात्र आता पुढे मुस्लिमानी सामुहिक नमाज, मेळावे किंवा गॅदरिंग केली, कारण कोणतेही असो, आणि या गैदरिंग मध्ये कोरोनाग्रस्त कुणीही नसला तरीही मीडिया यांच्यात कोरोनाग्रस्त किती होते याची संख्या  निश्चित सांगून टाकेल आणि मोठे राण देशभर उठविण्यात येईल. आज देशात 2000च्या घरात कोरोना रुग्ण आढळले आहेत, ज्यात 360 मुस्लिम आहेत आणि इतर मुस्लिमेत्तर  आहेत, ज्यांचा वस्त्या वेगळ्या आहेत आणि मशिदिशी, मर्कजशी यांचा काहीही संबन्ध नाही ! तरीही कोरोना पसरविन्यासाठी मुस्लिमाना टार्गेट करण्याचे षड्यंत्र काय हे विषद केलेच आहे!
आता पुढे कोरोनासाठी लॉक डाऊन पुन्हा महीने- दोन महीने वाढले की आर्थिक संकट सरळ अंगावर येणार आहे... तेव्हा बा मुसलमानानो खबरदारी घ्या आणि काहीही गरज येऊ दे या  कालावधीत गॅदरिंग टाळा आणि देशाच्या आर्थिक बरबादीचे घरबसल्या खापर आपल्या डोक्यावर फोडून घेऊ नका. हिन्दू समाजाचा बहुतांशी मागासवर्ग, आदिवासी, दलीत आधिच  आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या दृष्टीने कंगाल झालाय आणि कातावलाय, अश्या वेळेस मुसलमानांमुळे हा कोरोना जास्त पसरला आणि म्हणून बंदी सतत वाढवावी लागली  म्हणून देश बुडाला आणि म्हणून हिंदुनो तुमच्या दुर्गतिला मुसलमान जबाबदार आहेत, हाणा त्यांना... अश्या आरोळ्या मनुवादी चॅनेल्स वर गरजल्या नाहीत तर नवलच. म्हणून हे  70% अशिक्षित, गरीब, हातावर पोट असलेल्या, नोकरी नसलेल्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या, रोजनदारीवर आयुष्य काढणाऱ्या बा मुसलमाना! येणारा धोका ओळखा आणि कोणत्याही मूर्ख  मुसलमानांच्या धार्मीक आणि इतर कोणत्याही आवाहनाला बळी न जाता सद्या मशिदित किंवा इतर ठिकाणी कृपया गोळा होऊ नका. शासनाच्या सूचनांचे पालन करा! घरी रहा! आम्ही  आपल्या समाजाचे सदस्य आहोत. सुशिक्षित आहोत, समाजिक चळवळीत आयुष्य दिलेले आहे, अनेक पुस्तकांचे लेखक आहोत... नागरिक जीवन किती मोलाचे आहे हे आम्ही समजू  शकतो! बहुजनविचारधारा आणि बहुजन वैचारिक नेते आमचे मार्गदर्शक आहेत! विेशास ठेवा, मनुवादी कितीही ओरडले तरीही भला मोठा बहुजनसमाज वास्तव समजतो. तो तुमच्या  बरोबर आहेच... आता मात्र खबरदारी घ्या, हीच हात जोड़ून विनंती, याचना... म्हणाल तर भीक मागतोय...संकट तुमच्या डोक्यावर घिरटे घालतोय...!!

तुमचा सेवक.
- प्रा. जावेद पाशा
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget